Gedit-Text-Editor/C2/Common-Edit-Functions/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:10, 10 October 2017 by Latapopale (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:01 gedit Text editor मधील Common Edit Functions वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:08 ह्या ट्युटोरिअलमध्ये gedit मध्ये वारंवार वापरत असलेल्या फंक्शन्सचे एडिटींग शिकणार आहोत.
00:15 आपण कंटेन्टला Cut, Copy आणि Paste , एक्शन्सना Undo आणि Redo आणि टेक्स्ट Search आणि Replace करणे शिकणार आहोत.
00:25 आपण आपले डॉक्युमेंट प्रिंट करणेदेखील शिकू.
00:29 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux 14.04 ऑपरेटिंग सिस्टम, gedit 3.10 वापरत आहे
00:39 ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमबद्दलचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
00:44 gedit Text editor उघडा.
00:48 आता Students.txt फाईल उघडा जी आपण पूर्वी तयार केली आहे.
00:55 टूलबारमध्ये आयकॉन लेबल open सह आयकॉन वर क्लिक करू.
01:01 विद्यमान फाईल उघडण्यासाठी हे शॉर्टकट आयकॉन आहे.
01:06 Open Files डायलॉग बॉक्स दिसेल.
01:09 उजव्या बाजूला असलेले Desktop फोल्डर निवडा.
01:12 Students.txt फाईल सिलेक्ट करा आणि Open वर क्लिक करा.
01:17 आता cut, copy आणि paste कसे करायचे ते शिकू.
01:22 प्रथम आपल्याला जो टेक्स cut किंवा copy करायचा आहे तो निवडावा.
01:27 मला ह्या फाईलमधून पहिल्या तीन विद्यार्थ्यांचे तपशील कट करायचे आहेत.
01:32 पहिल्या तीन विद्यार्थ्यांचे तपशील निवडण्यासाठी त्या तीन ओळींवर कर्सर क्लिक आणि ड्रॅग करा.
01:39 आता, टेक्स निवडलेला आहे.
01:42 आपण टूलबारमधील Cut आयकॉन वापरू शकतो किंवा Main मेन्यूमधून, Edit आणि Cut निवडा.
01:51 अन्यथा, टेक्स कट करण्यासाठी आपण Ctrl + X कीज एकत्रितपणे वापरू शकतो.
01:58 लक्षात घ्या की निवडलेला टेक्स फाईलमध्ये दिसत नाही.
02:03 कृपया लक्षात ठेवा, हा टेक्स डिलिट केला जात नाही.
02:08 तो clipboard म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंप्युटरच्या मेमरीच्या एका भागामध्ये साठवला गेला आहे.
02:13 Clipboard असे कंटेट साठवते जे एकतर कट किंवा कॉपी केले आहे.
02:18 कंटेन्ट तात्पुरती साठवली जाते जोपर्यंत ती पेस्ट किंवा अन्य कंटेन्टला कॉपी केली जात नाही.
02:25 एकदा तुम्ही gedit मधून बाहरे पडलात की Clipboard कंटेन्ट मेमरी मधून डिलिट होते.
02:31 gedit वर परत येऊ.
02:34 आता हा टेक्स्ट एका नवीन डॉक्युमेंटमध्ये पेस्ट करा.
02:38 मेन मेनूमधून, File आणि New वर क्लिक करा.
02:42 gedit विंडोमध्ये Untitled Document 1 नावाचे एक नवीन डॉक्युमेंट उघडेल.
02:47 आता, मेन मेन्यूमधून, Edit आणि Paste निवडा.
02:53 अन्यथा, आपण टेक्स पेस्ट करण्यासाठी Ctrl + V की एकत्रितपणे दाबू शकतो.
03:00 किंवा Toolbar मधील Paste आयकॉन वापरा.
03:04 Students.txt मधील टेक्स ह्या डॉक्युमेंटमध्ये पेस्ट केला जातो.
03:11 Students.txt टॅब निवडा.
03:14 आता उर्वरित विद्यार्थ्यांचे तपशील निवडा आणि त्याची एक प्रत बनवा.
03:20 मेन मेनूमधून, Edit आणि Copy निवडा.
03:24 आपण कंटेन्ट कॉपी करण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट Ctrl + Cदेखील वापरू शकतो.
03:30 लक्ष द्या की कॉपी केलेला टेक्स अजूनही दिसत आहे.
03:34 हा टेक्स clipboard देखील संचयित केला आहे.
03:38 Untitled Document 1 टॅब निवडा.
03:42 तिसर्या: ओळीनंतर कर्सर ठेवा आणि Enter दाबा.
03:46 आता कॉन्टेक्स मेनूसाठी राईट-क्लिक करा आणि Paste निवडा.
03:52 कंटेन्ट निर्दिष्ट स्थानावर पेस्ट केली आहे.
03:56 gedit मध्ये कंटेन्ट cut, copy आणि paste करण्याचा हा एक साधा आणि प्रभावी मार्ग आहे.
04:04 आता आपण Undo आणि Redo पर्याय पाहू.
04:07 gedit Text editor फाईलमध्ये केलेले कोणतेही बदल Undo करण्याची परवानगी देते.
04:13 मुळात हे डॉक्युमेंटमध्ये केलेले शेवटचे बदल मिटवते.
04:18 आपण चूक केल्यावर आणि आपल्याला ते पुन्हा हवे असल्यास Undo हे उपयुक्त आहे.
04:23 Undo साठी कीबोर्ड शॉर्टकट Ctrl + Z आहे.
04:27 Undo चा विरुद्ध Redo आहे
04:31 Redo कमांड Undo एक्शन मागे घेतो.
04:35 Redo साठी कीबोर्ड शॉर्टकट आहे Shift + Ctrl + Z .
04:41 आता gedit Text editorवर जाऊ.
04:44 राईट-क्लिक करा आणि Undo निवडा.
04:47 आपण कॉपी आणि पेस्ट केलेला टेक्स आता दिसत नाही.
04:52 copy-paste एॅक्शन पूर्ववत केली गेली आहे.
04:56 पुन्हा एकदा undo करूया. यावेळी, Ctrl + Z कीज एकत्रपणे दाबा.
05:04 आपण पाहू शकतो की कर्सर पुन्हा तिसऱ्या ओळीच्या टोकाशी परत आला आहे.
05:09 मागील क्रिया आता पूर्ववत केली गेली आहे.
05:13 राईट-क्लिक करा आणि पुन्हा Undo निवडा.
05:17 आम्ही आधी पेस्ट केलेल्या पहिल्या तीन ओळीदेखील ह्यापुढे दिसणार नाहीत.
05:23 आपण टूलबार मधील Undo आयकॉनचा वापर करू शकतो.
05:28 अशा प्रकारे आपण आतापर्यंत केलेल्या सर्व क्रिया Undo करू शकतो.
05:34 आता, आपण टेक्स पुन्हा परत कसा करू शकतो?
05:38 सोप्पे आहे ! राईट-क्लिक करा आणि Redo निवडा.
05:42 आता आणखीन पुन्हा एकदा आपली कृती redo करा.
05:45 या वेळी Shift + Ctrl + Z कीज दाबा.
05:50 Toolbar मध्ये आपण Redo आयकॉनदेखील वापरू शकतो.
05:55 आपल्याला टेक्स पुन्हा मिळाला आहे.
05:57 आणि आता आपण Students.txt फाईल्समधील फक्त विद्यार्थ्यांचा तपशील पाहू शकतो जो gedit विंडोमध्ये कॉपी करण्यात आला आहे.
06:06 पुढे, आपण Search आणि Replace पर्याय पाहू.
06:10 शंभर ओळी असलेल्या मजकुराच्या फायलीत एका विशिष्ट शब्दाचा शोध घेणे कठीण आहे.
06:17 Search फंक्शन संपूर्ण डॉक्युमेंटमध्ये शब्दाच्या एक किंवा सर्व आवृत्त्या शोधण्यासाठी परवानगी देतो.
06:24 gedit Text editor वर परत जाऊ.
06:28 आता मी आधीपासूनच तयार केलेली school.txt एक डॉक्युमेंट उघडतो.
06:34 ट्युटोरिअल सोबत Code.tile ह्या लिंकवर school.txt फाईल उपलब्ध आहे.
06:40 ते टेक्स्ट डॉक्युमेंट डाऊनलोड करून वापरा.
06:44 या डॉक्युमेंटमध्ये, मला एका विशिष्ट शब्दाचा शोध घ्यायचा आहे.
06:48 हे करण्यासाठी, मेन मेनूमधून Search वर व नंतर Find 'वर क्लिक करा.
06:53 अन्यथा आपण Ctrl + F की एकत्रित दाबू शकतो.
06:58 किंवा टूलबारमध्ये Search for text आयकॉन वापरा.
07:02 विंडोच्या वरच्या उजव्या कोपर्याxत Find बॉक्स उघडेल.
06:07 Find बॉक्समध्ये School शब्द टाईप करा.
07:11 लक्षात घ्या की school शब्दाची सर्व उदाहरणे डॉक्युमेंटमध्ये पिवळ्या रंगाने हायलाईट केली आहेत.
07:18 school ह्या शब्दाचा पहिला ऑकरन्स तपकिरी रंगात हायलाईट केला आहे.
07:24 आता Find बॉक्सवर कर्सर ठेवा आणि माऊसवर राईट-क्लिक करा.
07:29 निवडलेल्या पर्यायांच्या सूचीमधून Match Case वर क्लिक करा.
07:34 केवळ एक शब्द, केस ऑप्शनशी जुळतो. School या शब्दात S हा कॅपिटल आहे.
07:41 पुन्हा, Find बॉक्सवर कर्सर ठेवा आणि माऊसवर राईट-क्लिक करा. Match Case ऑप्शन्स अनचेक करा.
07:50 आता, मेन मेन्यूमधून Search वर क्लिक करा आणि नंतर Replace वर.
07:56 अन्यथा आपण Ctrl + H कीज एकत्रित दाबू शकतो किंवा टूलबारमधील Search for and replace text आयकॉन वापरा.
08:08 Replace डायलॉग बॉक्स दिसेल.
08:11 Search for फील्डमध्ये, schools टाईप करा आणि Enter दाबा.
08:17 Replace with बॉक्समध्ये, colleges टाईप करा. Match entire word only चेक बॉक्स तपासा.
08:26 आपण पाहू शकतो की सर्व schools हे शब्द पिवळ्या रंगात हायलाईट केले आहेत.
08:31 Replace बटणावर क्लिक करा.
08:34 हे schools च्या पहिल्या ऑकरन्सला colleges शी बदलेल.
08:39 सर्व ऑकरन्स schools ला colleges सह बदलण्यासाठी Replace All बटणावर क्लिक करा.
08:46 विंडो बंद करण्यासाठी Close' बटणावर क्लिक करा.
08:50 gedit Text editor टाईप केल्याप्रमाणे आपल्याला शोधण्याची मुभा देतो.
08:56 Find बॉक्स उघडण्यासाठी Ctrl आणि' F की एकत्र दाबा.
09:01 आता Find बॉक्समध्ये, Students टाईप करा.
09:06 लक्षात घ्या की जेव्हा आपण पहिले अक्षर S टाईप कराल तेव्हा कर्सर सर्व डॉक्युमेंटमधून S अक्षरे हायलाईट करतो.
09:14 अखेरीस, आपण टायपिंग केल्यावर संपूर्ण शब्द Students हायलाईट केला जातो.
09:20 आता आपण school.txt फाईल कशी प्रिंट करावी ते पाहू.
09:25 Menu bar मधून फाईल निवडा आणि नंतर Print.
09:30 आपण टूलबारमधील Print आयकॉनवरदेखील क्लिक करू शकतो.
09:35 Print डायलॉग बॉक्स दिसेल.
09:38 जर प्रिंटर आपल्या मशीनशी जोडलेला असेल तर, तो Printer details अंतर्गत येथे सूचीबद्ध केला जाईल.
09:44 या विंडोमधील टॅब्स आणि सिलेक्शन्स हे डीफॉल्ट कॉन्फिगरेशन सेटिंग्जनुसार असतील.
09:50 आपले डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी, तळाशी उजवीकडे Print बटणावर क्लिक करा.
09:55 जर प्रिंटरचे कॉन्फिगरेशन योग्य असेल, तर आपले डॉक्युमेंट प्रिंट होईल.
10:00 ह्यासह आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. सारांश काढूया.
10:05 या ट्युटोरियलमध्ये आपण Cut, Copy आणि Paste, Undo आणि Redo, Search आणि टेक्स रिप्लेस करणे आणि प्रिंट ऑपशन्स शिकलो.
10:16 तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे-
10:19 gedit मध्ये School.txt फाईल उघडा.
10:23 पहिला परिच्छेद कॉपी करा आणि हे एका नवीन डॉक्युमेंटमध्ये पेस्ट करा.
10:27 नवीन डॉक्युमेंट SchoolNew.txt म्हणून सेव्ह करा.
10:32 शीर्षक म्हणून About School अशी पहिली ओळ टाईप करा.
10:38 फाईलमधील मजकूरातील बदलांवर लक्ष द्या.
10:42 खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पाहा.
10:49 स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट टीम वर्कशॉप्स घेते आणि प्रमाणपत्रे देते.
10:54 अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.
10:58 या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये तुम्हाला प्रश्न आहेत का? कृपया ह्या साईटला भेट द्या.
11:03 मिनिट आणि सेकंड निवडा जिथे आपल्याला प्रश्न आहे.
11:07 आपला प्रश्न थोडक्यात स्पष्ट करा. आमच्या टीममधील कोणीतरी त्यांना उत्तर देईल.
11:13 स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे.
11:20 ह्या मिशनवरील अधिक माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे.
11:25 हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून आवाज .......... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana