Firefox/C2/Firefox-interface-and-toolbars/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Firefox Interface and Toolbars
Author: Manali Ranade
Keywords: Mozilla Firefox
|
|
---|---|
00:00 | Mozilla Firefoxच्या Interface and Toolbars वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:05 | या ट्युटोरियलमध्ये आपण फायरफॉक्सच्या Interface आणि Toolbars बद्दल जाणून घेणार आहोत. |
00:11 | आपण या ट्युटोरियलमध्ये Ubuntu Linux 10.04 वर Firefoxचे version 7.0 वापरणार आहोत. |
00:19 | चला, आता फायरफॉक्सच्या इंटरफेसवर एक नजर टाकू या. |
00:23 | अत्याधुनिक ब्राउजरमध्ये आवश्यक असणारी सर्व वैशिष्ट्ये फायरफॉक्स मध्ये आहेत. |
00:28 | Mozilla Firefox प्रभावीपणे वापरण्यासाठी तुम्ही त्याच्या प्रत्येक वैशिष्ट्याशी परिचित असायला हवे. |
00:34 | Mozilla Firefox चा इंटरफेस सहा वेगवेगळ्या भागांत विभागला जाऊ शकतो. |
00:41 | Menu bar, Navigation toolbar, Bookmarks bar, Side bar, Status bar आणि Content area |
00:53 | या प्रत्येकावर एक नजर टाकून त्याचे कार्य समजून घेऊ. |
00:57 | आता File मेनूवर क्लिक करून मग New Window वर क्लिक करा. |
01:01 | एक नवी विंडो उघडेल. |
01:05 | काही लोकांना त्यांच्या ब्राऊजरवरील छोटी अक्षरे वाचायला त्रास होतो. |
01:08 | त्यासाठी View मेनूमधील Zoomपर्यायावर जाऊन Zoom in हा पर्याय निवडून पानाचा आकार वाढवता येतो. |
01:14 | किंवा तुम्ही Ctrl आणि + चे चिन्ह दाबूनही हीच गोष्ट करू शकता. |
01:18 | यामुळे तुमच्या text चा आकार वाढेल. |
01:21 | तुम्ही वापरत असलेल्या Mozilla Firefox चे version जाणून घेण्यासाठी Help मेनूवर क्लिक करून About Firefox वर क्लिक करा. |
01:27 | डिफॉल्ट रूपात Firefox एक homepage दर्शवते. |
01:32 | परंतु आपल्या पसंतीचे वेबपेज homepage म्हणून सेट करण्यासाठी Edit मेनूवरील Preferences वर क्लिक करा. |
01:39 | विंडोजवरील युजरनी प्रथमToolsआणि नंतर Options वर क्लिक करा. |
01:42 | येथे General tab मधील homepage या फिल्डवर क्लिक करा. आणि ‘www.yahoo.com किंवा तुमच्या पसंतीचे वेबपेज टाईप करा. |
01:52 | आता तुम्ही उजव्या बाजूच्या खालच्या कोप-यातील Close button दाबून Firefox Preference window बंद करू शकता. |
02:00 | वेबपेज मधील एखादा शब्द शोधण्यासाठी तुम्ही Edit मेनूचा वापर करू शकता. |
02:05 | address barवर ‘www.google.com’ टाईप करा. |
02:12 | Edit मेनूमधील Find वर क्लिक करा. |
02:14 | ब्राऊजर विंडोच्या खालील बाजूस एक छोटा टूल बार दिसेल. |
02:19 | त्यातील textboxमध्ये ‘Gujarati’हा शब्द टाईप करा. |
02:23 | त्या पानावरील ‘Gujarati’हा शब्द highlight झालेला दिसेल. |
02:28 | या फंक्शनचा उपयोग वेबपेजवरील मोठ्या टेक्स्ट मजकूरातील शब्द शोधण्यासाठी करता येतो. |
02:33 | आता हे बंद करू या. |
02:35 | Navigation toolbar, नावाप्रमाणेच आपल्याला इंटरनेटवर navigate करण्यास मदत करतो. |
02:41 | Navigation bar एक मोठा टेक्स्ट बॉक्स असतो. यात आपण वेबपेजचा address टाईप करतो. |
02:48 | यालाच URL bar किंवा Address bar असेही म्हणतात. |
02:52 | URL barवर क्लिक करून तेथील उपस्थित Address डिलिट करा. |
02:57 | तेथे ‘www.google.com’ टाईप करा. |
03:02 | एंटर दाबा. |
03:03 | आता आपण गुगलच्या homepage वर आहोत. |
03:06 | back arrow च्या आयकॉनवर क्लिक करून तुम्ही आधी असलेल्या पानावर परत जाऊ शकता. |
03:12 | google च्या homepageवर परत जाण्यासाठी forward arrow च्या आयकॉनवर क्लिक करा. |
03:17 | URL barच्या उजव्या बाजूला घराच्या आकाराचा एक आयकॉन आहे. |
03:22 | हे बटण तुम्हाला सध्याच्या वेब पेजवरून तुमच्या डिफॉल्ट homepage वर घेऊन जाईल. |
03:28 | जेव्हा तुम्हाला एखाद्या विशिष्ट वेब पेजवरून ब्राऊजिंगची सुरूवात करायची असते त्यावेळी हे बटण उपयोगी पडते. |
03:34 | homepage या बटणावर क्लिक करा. |
03:36 | लक्षात असू द्या पूर्वीच आपण homepage बदलून ते ‘www.yahoo.com’ केले होते. |
03:42 | यामुळे homepage बटण दाबल्यावर ब्राऊजर आपल्याला yahoo च्या homepage घेऊन जाईल. |
03:49 | आता Bookmarks bar बघा. |
03:51 | Bookmarks चा उपयोग आपण ब-याचदा वापरत असलेली वेब पेजेस उघडण्यासाठी होतो. |
03:57 | URL barवर टाईप करा. ‘www.gmail.com’. |
04:03 | ते पान उघडल्यावर URL barच्या उजवीकडे असलेल्या चांदणीवर क्लिक करा. |
04:10 | ती चांदणी तुम्हाला पिवळ्या रंगाची झालेली दिसेल. |
04:13 | त्या चांदणीवर पुन्हा क्लिक करा. |
04:14 | एक डायलॉग बॉक्स उघडेल. |
04:17 | ‘Folder’ फिल्डच्या drop down मधूनBookmarks टूलबार निवडा. |
04:23 | बघा Gmailचा bookmark आता Bookmarks टूलबारवर समाविष्ट झालेला आहे. |
04:28 | yahoo च्या homepageवर जाण्यासाठी homepageच्या आयकॉनवर क्लिक करा. |
04:33 | आता Gmailचा bookmark क्लिक करा. हे तुम्हाला Gmail login page वर घेऊन जाईल. |
04:39 | homepage म्हणून नको असलेल्या परंतु तुम्हाला सतत लागणा-या साईटससाठी Bookmarks bar चा उपयोग तुम्ही करू शकता. |
04:46 | पुढे आपण Sidebar बद्दल जाणून घेणार आहोत. |
04:49 | View मेनूवर क्लिक करून Sidebar या पर्यायातील History पर्याय निवडा. |
04:54 | तुम्हाला असे दिसेल की डावीकडे आलेल्या बारमध्ये तीन पर्याय आहेत. Today, Yesterday, Older than 6 months. |
05:02 | दाखवले गेलेले पर्याय हे त्या संगणकावरील फायरफॉक्स पूर्वी कधी वापरला गेला आहे त्यावर अवलंबून असतात. |
05:09 | मेनूचा विस्तार करण्यासाठी Today या आयकॉनच्या पुढील + च्या चिन्हावर क्लिक करा. |
05:15 | गुगलचे homepage उघडण्यासाठी तेथील गुगलच्या लिंकवर क्लिक करा. |
05:19 | बघा आपण आधी उघडलेल्या साईट पुन्हा उघडणे किती सोपे आहे! |
05:25 | Sidebar वर स्वतःचे असे सर्च फंक्शन आहे. |
05:29 | तुम्ही शोधत असलेल्या साईटचे नाव सर्च बॉक्समध्ये टाईप करू शकता. |
05:34 | मग ते तुमच्या history मध्ये त्या साईटचे नाव शोधेल. |
05:37 | सर्च बॉक्समध्ये गुगल टाईप करा. |
05:39 | पहिला रिझल्ट म्हणून आपल्याला गुगलचा होमपेज address दिसेल. |
05:43 | साईडबार बंद करण्यासाठी साईडबारच्या उजव्या बाजूच्या कोप-यातील छोट्या फुलीच्या बटणावर क्लिक करा. |
05:51 | पुढे Status bar काय करते ते पाहू. |
05:55 | Status bar तुमच्या ब्राऊजर विंडोच्या खालील भागात तुम्ही उघडत असलेल्या साईटची स्थिती दर्शवते. |
06:02 | URL barवर जाऊनwww.wired.com टाईप करा आणि एंटर दाबा. |
06:10 | लगेच Status bar कडे बघा ते तुम्हाला वेबपेज उघडण्याची स्थिती दर्शवेल. |
06:16 | Status bar मुळे तुम्हाला एखादी साईट का उघडत नाही किंवा ती उघडण्यात अंदाजे किती वेळ लागेल इत्यादी समजण्यास मदत होते. |
06:25 | आता शेवटी Content area बघू या. |
06:28 | आपण उघडत असलेल्या वेब पेजमधला मजकूर येथे वाचू शकतो. |
06:33 | अशा प्रकारे आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
06:35 | ट्युटोरियलमध्ये आपण फायरफॉक्सच्या Interface आणि Toolbars याबद्दल शिकलो. |
06:43 | COMPREHENSIVE ASSIGNMENT |
06:46 | तुमचे होमपेज बदलून ते www.spoken-tutorial.org करा आणि ते उघडा. |
06:54 | मग ब्राऊजरच्या History ह्या फंक्शनच्या सहाय्याने yahoo च्या वेबसाईटवर जा. |
07:00 | सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडिओ खालील लिंकवर उपलब्ध आहे. |
07:05 | ज्यामध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07:07 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07:12 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
07:17 | जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
07:21 | अधिक माहितीसाठी कृपया spoken hyphen tutorial dot org या संकेतस्थळाला जा. |
07:27 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. |
07:31 | यासाठी National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. |
07:39 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
07:50 | ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. ह्या ट्युटोरियल मधील आपल्या सहभागासाठी धन्यवाद. |