Firefox/C2/Firefox-interface-and-toolbars/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 Firefoxच्या Interface and Toolbars वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:05 यात आपण फायरफॉक्सच्या Interface आणि Toolbars बद्दल जाणून घेऊ.
00:11 आपण या ट्युटोरियलमध्ये Ubuntu Linux 10.04 वर Firefox 7.0 वापरणार आहोत.
00:19 आता फायरफॉक्सच्या इंटरफेसवर नजर टाकू.
00:23 अत्याधुनिक ब्राउजरची सर्व वैशिष्ट्ये फायरफॉक्स मध्ये आहेत.
00:28 Firefox प्रभावीपणे वापरण्यासाठी त्याची वैशिष्ट्ये माहित हवीत.
00:34 Firefox चा इंटरफेस सहा भागांत विभागला जाऊ शकतो.
00:41 Menu bar, Navigation toolbar, Bookmarks bar, Side bar, Status bar आणि Content area
00:53 या प्रत्येकाचे कार्य समजून घेऊ.
00:57 File मेनूवर क्लिक करून New Window वर क्लिक करा.
01:01 एक नवी विंडो उघडेल.
01:05 अनेकदा ब्राऊजरवरील छोटी अक्षरे वाचायला त्रास होतो.
01:08 पानाचा आकार वाढवण्यासाठी View मेनूमधे Zoomखालील Zoom in पर्याय निवडा.
01:14 किंवा Ctrl आणि + + चे चिन्ह दाबा.
01:18 यामुळे text चा आकार वाढेल.
01:21 Firefox चे version बघण्यासाठी Help मेनूतील About Firefox वर क्लिक करा.
01:27 डिफॉल्ट रूपात Firefox , homepage दर्शवते.
01:32 आवडीचे homepage सेट करण्यासाठी Edit मेनूतील Preferences वर क्लिक करा.
01:39 विंडोजसाठी Toolsखालील Options निवडा.
01:42 येथे General tab मधील homepage वर क्लिक करा. आणि ‘www.yahoo.com किंवा पसंतीचे वेब address टाईप करा.
01:52 आता खालच्या कोप-यातील Close button दाबून Firefox Preference window बंद करा.
02:00 वेबपेज मधील शब्द शोधण्यासाठी Edit मेनू वापरा.
02:05 address barवर ‘www.google.com’ टाईप करा.
02:12 Edit मधील Find वर जा.
02:14 ब्राऊजर विंडोच्या खाली एक छोटा टूल बार दिसेल.
02:19 त्यातील textboxमध्ये ‘Gujarati’ असे टाईप करा.
02:23 त्या पानावरील ‘Gujarati’हा शब्द highlight झालेला दिसेल.
02:28 मोठ्या मजकूरातील शब्द शोधण्यासाठी याचा उपयोग होतो.
02:33 आता हे बंद करू या.
02:35 Navigation toolbar च्या मदतीने आपल्याला इंटरनेटवर navigate करता येते.
02:41 Navigation bar ह्या मोठ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये वेबपेजचा address टाईप करता येतो.
02:48 याला URL किंवा Address bar ही म्हणतात.
02:52 URL barवर क्लिक करून तेथील Address डिलिट करा.
02:57 तेथे ‘www.google.com’ टाईप करा.
03:02 एंटर दाबा. हे गुगलचे homepage आहे.
03:06 back arrow वर क्लिक करून आधीच्या पानावर परत जाता येते.
03:12 google वर परत जाण्यासाठी forward arrow वर क्लिक करा.
03:17 URL barच्या उजवीकडे घराच्या आकाराचा आयकॉन आहे.
03:22 ह्याच्या मदतीने चालू वेब पेजवरून डिफॉल्ट homepage वर जाता येते.
03:28 विशिष्ट वेब पेजवरून ब्राऊजिंगची सुरवात करण्यासाठी हे बटण उपयोगी पडते.
03:34 homepage बटणावर क्लिक करा.
03:36 आपण पूर्वीच homepage बदलून ते ‘www.yahoo.com’ केले होते.
03:42 यामुळे homepage बटण दाबल्यावर ब्राऊजर yahoo वर जाईल.
03:49 आता Bookmarks bar बघा.
03:51 Bookmarks चा उपयोग वारंवार लागणारी वेब पेजेस उघडण्यासाठी होतो.
03:57 URL barवर टाईप करा. ‘www.gmail.com’.
04:03 ते पान उघडल्यावर URL barच्या उजवीकडे असलेल्या चांदणीवर क्लिक करा.
04:10 ती चांदणी तुम्हाला पिवळ्या रंगाची झालेली दिसेल.
04:13 त्यावर पुन्हा क्लिक करा, डायलॉग बॉक्स उघडेल.
04:17 ‘Folder’ फिल्डच्या drop down मधूनBookmarks टूलबार निवडा.
04:23 Gmail आता Bookmarks टूलबारवर समाविष्ट झाले आहे.
04:28 yahoo वर जाण्यासाठी homepageच्या आयकॉनवर क्लिक करा.
04:33 Gmailचा bookmark क्लिक करा. Gmail login page उघडले जाईल.
04:39 सतत लागणा-या परंतु homepage म्हणून नको असलेल्या साईटस् येथे Bookmark करता येतात.
04:46 आता Sidebar बद्दल जाणून घेऊ.
04:49 View मेनूतील Sidebar या पर्यायातील History निवडा.
04:54 डावीकडे आलेल्या बारमध्ये तीन पर्याय आहेत. Today, Yesterday, Older than 6 months.
05:02 दाखवले गेलेले पर्याय हे फायरफॉक्सच्या आधीच्या वापरावर अवलंबून असतात.
05:09 मेनू उघण्यासाठी Today च्या पुढील + च्या चिन्हावर क्लिक करा.
05:15 येथील गुगलच्या लिंकवर क्लिक करा.
05:19 बघा आपण आधी उघडलेल्या साईट पुन्हा उघडणे किती सोपे आहे!
05:25 Sidebar वर स्वतःचे असे सर्च फंक्शन आहे.
05:29 शोध घ्यायच्या साईटचे नाव सर्च बॉक्समध्ये टाईप केल्यास,
05:34 ते history मध्ये ती साईट शोधेल.
05:37 येथे गुगल टाईप करा.
05:39 पहिला रिझल्ट, गुगलचा होमपेज address दिसेल.
05:43 साईडबार बंद करण्यासाठी उजवीकडील कोप-यातील फुलीवर क्लिक करा.
05:51 पुढे Status bar काय करतो ते पाहू.
05:55 तुम्ही उघडत असलेल्या साईटची स्थिती खालील भागातील Status barदर्शवतो.
06:02 URL barवर जाऊनwww.wired.com टाईप करा आणि एंटर दाबा.
06:10 लगेच Status bar कडे बघितल्यास वेबपेज उघडण्याची स्थिती दिसेल.
06:16 Status bar मुळे साईट न उघडण्याचे कारण किंवा उघडण्यात लागणा-या वेळाचा अंदाज येतो.
06:25 आता शेवटी Content area बघू या.
06:28 उघडत असलेल्या वेब पेजमधला मजकूर येथे वाचू शकतो.
06:33 हा पाठ येथे संपला.
06:35 ट्युटोरियलमध्ये आपण फायरफॉक्सच्या Interface आणि Toolbars याबद्दल शिकलो.
06:43 COMPREHENSIVE ASSIGNMENT
06:46 तुमचे होमपेज बदलून ते www.spoken-tutorial.org करा आणि ते उघडा.
06:54 मग ब्राऊजरच्या History च्या सहाय्याने yahoo च्या वेबसाईटवर जा.
07:00 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
07:05 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:07 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:12 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:17 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:21 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
07:27 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:31 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
07:39 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:50 ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana, Sneha