LibreOffice-Suite-Draw/C2/Create-simple-drawings/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:16, 20 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:02 | लिबरऑफिस ड्रॉ मध्ये साधे चित्र कसे काढावे, या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:08 | या मध्ये खालील बाबींचा उपयोग करून साधे चित्र कसे काढावे हे शिकाल. |
00:13 | मुलभूत आकार जसे, ओळी, बाण, आणि आयत. |
00:17 | मुलभूत भूमितीय आकार, चिन्ह, चांदण्या आणि बॅनर. |
00:22 | ऑब्जेक्ट निवडणे,स्थानांतरीत आणि डिलीट करणे शिकाल. |
00:27 | मार्जिन सेट करण्यास, ruler वापरा आणि ऑब्जेक्ट स्थानासाठी align टूलबार वापरा. |
00:33 | येथे आपण Ubutu Linux Verson 10.04 आणि LibreOffice Suite verson 3.3.4. वापरत आहोत. |
00:42 | आता,शब्द वस्तू स्पष्ट करू. |
00:44 | “Object” शब्द ड्रॉ मध्ये वापरलेले आकार किंवा आकारांचा गट जसे, ओळी, चौकोन, बाण, फ्लोचार्ट इत्यादी सुचित करतो. |
00:55 | या स्लाईड मध्ये दाखविलेले सर्व आकार objects स्वरूपात आहेत. |
00:59 | डेस्कटॉंप वर सेव असलेली “WaterCycle” फ़ाइल उघडू. |
01:04 | अगोदर ऑब्जेक्ट निवडणे शिकू. |
01:08 | समजा, ढग निवडायचा असल्यास त्यावर क्लिक करूया. |
01:13 | असे करताना आठ हैन्डल्स दिसतील. |
01:16 | हैन्ड्ल्स, निवडलेल्या ऑब्जेक्ट च्या आजू-बाजूला निळ्या किंवा हिरव्या लहान चौकोन मध्ये दिसतात. |
01:22 | नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही हैन्ड्ल्स आणि त्यांच्या उपयोगाबद्दल अधिक शिकाल. |
01:27 | आपल्या चित्रा मध्ये अधिक ऑब्जेक्ट जोडू. |
01:30 | जमिनीला चित्रित करण्यास आयत समाविष्ट करू. |
01:34 | Drawing टूलबार मध्ये “Basic shapes” वर क्लिक करून नंतर “Rectangle” वर क्लिक करा. |
01:39 | कर्सर ला पेज वर आणा. तुम्हाला प्लस चिन्हा सोबत कॅपिटल I दिसेल. |
01:45 | आयत काढण्यास माउस चे डावे बटण पकडून ड्रॅग करा. |
01:50 | माउस चे बटन सोडा. |
01:52 | नंतर, जमिनीपासून ढगापर्यंत जलबाष्प च्या काही हालचाली दाखविण्यास काही बाण काढू. |
02:00 | ओळ काढण्यास, Drawing टूलबार मधील “Line” वर क्लिक करा. |
02:04 | कर्सर पेज वर घ्या. |
02:06 | तुम्हाला तिरप्या डैश सोबत प्लस चिन्ह दिसेल. |
02:10 | माउस चे डावे बटण पकडून वरून खालपर्यंत ड्रॅग करा. |
02:15 | तुम्ही सरळ ओळ काढली आहे. |
02:17 | ओळीला दोन हैन्ड्ल्स आहे. |
02:20 | आता ओळीला बाणाचे टोक जोडू. |
02:23 | आता ओळ निवडू. |
02:25 | context मेन्यु पाहण्यासRight-click करून “Line” वर क्लिक करा. |
02:30 | “Line” डायलॉग बॉक्स दिसेल. “Arrow styles” tab वर क्लिक करून त्यानंतर “Arrow style” ड्रोप-डाऊन वर क्लिक करा. |
02:39 | हे उपलब्ध “Arrow styles” दर्शवेल. |
02:43 | “Arrow” नावाचा पहिला पर्याय निवडा. |
02:46 | OK वर क्लिक करा. |
02:48 | हे ओळी च्या दोन्ही टोकाला निवडलेल्या बाणाच्या टोकाचे स्टाइल जोडेल. |
02:52 | पण आपल्याला बाणाचे टोक ओळीच्या च्या फक्त एका अंत भागावर हवे. |
02:57 | प्रथमCTRL+Z दाबून या बदलास अंडू करू. |
03:02 | context मेन्यु पाहण्यास पुन्हा Right-click क्लिक करा. |
03:05 | “Line” tab वर क्लिक करा. |
03:09 | येथे “Arrow Styles” च्या खाली तुम्ही “Style” नावाची फिल्ड पहाल. |
03:14 | तुम्ही दोनdrop-down बॉक्सेस पाहत आहात- प्रत्येक ओळीच्या च्या अंत भागास एक. |
03:19 | डाव्या drop-down बॉक्स वर क्लिक करा आणि “Arrow” निवडा. |
03:23 | उजव्या drop-down बॉक्स मध्ये “none” निवडा. |
03:26 | OK वर क्लिक करा. |
03:28 | लक्ष द्या बाणाचे टोक ओळीच्या वरच्या भागावर जोडले आहे. |
03:33 | आपण“Lines आणि Arrows” पर्याय वापरून बाण काढू शकतो. |
03:38 | या बाणाच्या बाजूला आणखी दोन बाण काढू. |
03:42 | Drawing टूलबार वरूनLines आणि Arrows वर क्लिक करा आणि Line Starts with Arrow निवडा. |
03:48 | कर्सर draw पेज वर आणा. |
03:51 | माउस चे डावे बटण पकडून वरून खाली ड्रॅग करा. |
03:56 | अशाप्रकारे बाण काढणे सोपे आहे, हो ना? |
04:00 | याप्रकारे आणखीन एक बाण जोडू. |
04:06 | ट्यूटोरियल थांबवून Assignment करा. |
04:09 | तुमच्या “MyWaterCycle”, फ़ाइल मध्ये ओळ काढा. |
04:13 | Line निवडा आणि Line डायलॉग बॉक्स उघडा. |
04:16 | Line Properties फिल्ड च्या खाली, लाइन साठी स्टाइल, रंग, रुंदी आणि स्पष्टता बदला. |
04:24 | Arrow Styles फिल्ड च्या खाली ऐरो स्टाइल बदला. |
04:28 | आता, चांदणी काढू. |
04:31 | Drawing टूलबार वर जा आणि स्टार च्या बजुला लहान काळ्या त्रिकोणावर क्लिक करा. |
04:37 | आता “5-Point Star” निवडू. |
04:41 | कर्सर ढगा च्या बाजूला ठेवा. |
04:44 | माउस चे डावे बटण पकडून डाव्या बाजूला ड्रॅग करा. |
04:48 | तुम्ही चांदणी काढली आहे. |
04:50 | आता ऑब्जेक्ट स्थानांतरीत आणि डिलीट करणे शिकू. |
04:54 | स्थानांतरा साठी, त्यास निवडा आणि हवे त्या जागेवर ड्रॅग करा. |
04:59 | आता, माउस चे बटण सोडा. |
05:02 | ऑब्जेक्ट स्तानांतरित करण्यास, कीबोर्ड वरील, वर, खाली आणि आजू-बाजूला बाण असलेल्या कीज वापरू शकता. |
05:08 | ऑब्जेक्ट स्थानांतरीत करणे सोपे आहे, हो ना? |
05:11 | ऑब्जेक्ट डिलीट करण्यास, त्यास निवडून कीबोर्ड वरील Delete कि दाबा. |
05:17 | ऑब्जेक्ट डिलीट झाला आहे. हे सोपे आहे ना? |
05:20 | आता, मुलभूत साधन- Ruler आणि Align टूलबार बद्दल शिकू. |
05:26 | Ruler चा पेज मार्जिन सेटअप आणि मापांचे विभाग सुधारण्यास वापर होतो. |
05:31 | Align टूलबार चा वापर ऑब्जेक्ट स्थानासाठी होतो. |
05:35 | Ruler, वर आणि डाव्या बाजूच्या ड्रॉ वर्कस्पेस वर दिसत आहे. |
05:40 | माप विभाग सेट करण्यासाठी वर असलेल्या Ruler वर राईट-क्लिक करा. |
05:45 | तुम्हाला मापन विभागाची सूची दिसेल. |
05:48 | “Centimeter” वर क्लिक करा. |
05:50 | वर Ruler साठी माप विभाग आता, सेंटीमीटर झाला आहे. |
05:55 | अशाप्रकारे डाव्या बाजूवरील ruler साठी माप सेट करू. |
06:00 | खात्री करा, ऑब्जेक्ट माप मध्ये बनले असावे, नेहेमी दोन्ही rulers साठी समान मापन विभाग सेट करावा. |
06:08 | सक्रिय ruler पांढऱ्या रंगात असेल. |
06:12 | ruler चा अंतिम भाग पेज मार्जिन वेल्यू ला दर्शवितो ज्याला आपण “Page Setup” मध्ये सेट केले आहे. |
06:19 | Ruler, ऑब्जेक्ट साठी माप कसे दर्शवितो ते पाहू. |
06:23 | cloud निवडा. |
06:25 | तुम्ही ruler वरील दोन लहान सुरु आणि अंत चिन्ह पाहू शकता? |
06:29 | हे ढगाचे किनार स्पष्ट करतात. |
06:32 | जर तुम्ही या चिन्हाला ruler वर आणता, तर पहाल कि चित्र परिस्थितीनुसार बदलते. |
06:38 | ruler पेज वरील ऑब्जेक्ट चा आकार दर्शवितो. |
06:42 | हे आपल्याला पेज वरील ऑब्जेक्ट चे स्थान आणि पेज सीमा दर्शविण्यास सक्षम बनविते. |
06:49 | आता, पुढच्या मुलभूत साधनAlign टूलबार कडे वळू. |
06:53 | आपण “Align” टूलबार चा उपयोग निवडलेले ऑब्जेक्ट, डाव्या, उजव्या, वर, खाली, आणि मध्ये एकत्र करण्यास करतो. |
07:01 | “Align” टूलबार प्राप्त करण्यास, “Main Menu” वर जाऊन “View” वर क्लिक करा. |
07:07 | “View” मेन्यु खाली “Toolbars” वर क्लिक करा. |
07:11 | टूलबार्स ची सूची दिसेल. |
07:13 | “Align” वर क्लिक करा. |
07:15 | “Align” टूलबार दिसेल. |
07:18 | आता पाहू कि भिन्नAlign पर्याय वापरताच ऑब्जेक्ट कसे एकरेषेत येतात. |
07:24 | आता, ढग निवडू. |
07:26 | “Align” टूलबार वरील “Left” वर क्लिक करा. |
07:29 | ढग डाव्या बाजूला एकत्रित झाला आहे. |
07:32 | “Centered” आणि “Centre” या दोन पर्यायांमधील फरक समजून घेऊ. |
07:38 | आपण वर्तुळाला “Centre” आणि नंतर “Centered” मध्ये संरेखित करू. |
07:43 | अगोदर वर्तुळाला उजवीकडे संरेखित करू. |
07:47 | वर्तुळ निवडूनAlign टूलबार वर राईट-क्लिक करू. |
07:52 | आता, Align टूलबार वरील “Centre” वर क्लिक करा. |
07:56 | वर्तुळ मध्य स्थानी संरेखित झाला आहे. |
07:59 | “Centre” पर्याय हे ऑब्जेक्ट ला तंतोतंत पेज च्या वर आणि खालच्या मर्जीन मध्ये केंद्रित करते. |
08:06 | हे पेज च्या रुंदी नुसार ऑब्जेक्ट स्थानांतरीत करत नाही. |
08:10 | आता Align टूलबार वरून “Centered” निवडा. |
08:15 | वर्तुळ पेज च्या मध्ये केंद्रित झाला आहे. |
08:18 | “Centered” पर्याय वर्तुळला पेज च्या मध्यभागी संरेखित करतो. |
08:23 | हे ऑब्जेक्ट ला पेज ची रुंदी, वर आणि खालच्या मार्जिन नुसार स्थानांतरीत करते. |
08:33 | आता आपण ऑब्जेक्ट ला आपल्या चित्रा च्या नमुन्या नुसार पुन्हा त्याच्या बरोबर स्थानावर आणू. |
08:40 | बंद करण्या अगोदर फ़ाइल सेव करण्यास विसरू नका. |
08:43 | तुमच्या साठी Assignment आहे. |
08:46 | MyWaterCycle फ़ाइल मध्ये, पेज जोडा. |
08:50 | हे दोन चित्र बनवा. |
08:53 | एरो कीज वापरून त्यांना स्थानांतरीत करा. |
08:55 | तुम्ही काढलेला कोणताही ऑब्जेक्ट निवडा आणि डिलीट करा. |
08:59 | ऑब्जेक्ट चा आकार मोजण्यास ruler वापरा. |
09:04 | “Align” टूलबार वापरून ऑब्जेक्ट ला पेज च्या मध्यभागी संरेखित करा. |
09:11 | हा पाठ येथे संपला. |
09:15 | या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही, साधे चित्र कसे काढावे, |
09:19 | मुलभूत आकार जसे, ओळी, बाण, आणि आयत, |
09:24 | मुलभूत भूमितीय आकार, चिन्ह, चांदण्या आणि बैनर्स, |
09:29 | ऑब्जेक्ट डिलीट करणे, |
09:32 | ऑब्जेक्ट स्थानासाठी ruler आणि align टूलबार वापरणे शिकलात. |
09:37 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे. |
09:41 | ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल. |
09:44 | जर तुमच्या कडे चांगली Bandwith नसेल तर आपण व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
09:48 | स्पोकन ट्यूटोरियल प्रीजेक्ट टीम. |
09:51 | स्पोकन ट्यूटोरियल च्या सहायाने कार्यशाळा चालविते. |
09:54 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09:58 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
10:04 | "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
10:09 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळालेले आहे. |
10:17 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
10:27 | या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केलेले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |