PHP-and-MySQL/C2/If-Statement/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:07, 17 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
|
|
---|---|
00:00 | basic php च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. येथे आपण 'IF' स्टेटमेंटबद्दल चर्चा करणार आहोत. |
00:06 | जर यापूर्वी तुम्ही code लिहिला असेल तर तुम्हाला 'IF' स्टेटमेंटबद्दल माहिती असेलच. |
00:11 | php मध्येही ते फार काही वेगळे नसते. मी तुम्हाला वापरून दाखवणार आहे. |
00:16 | आता आपण सुरूवात करू या. |
00:18 | 'IF' स्टेटमेंटबद्दल थोडक्यात जाणून घेऊ. हे condition स्वीकरते. |
00:23 | जर ती condition, True असेल तर ते code चा एक भाग कार्यान्वित करते. |
00:28 | जर False असेल तर ते code चा दुसरा भाग कार्यान्वित करते. |
00:32 | उदाहरणादाखल ही रचना बघू या. |
00:36 | If मग कंसात 1 equals 1 ही condition लिहा. |
00:41 | लक्षात घ्या मी येथे दोन बरोबरची चिन्हे दिलेली आहेत. हा comparison operator आहे. |
00:47 | दुस-या ट्युटोरियलमध्ये आपण या ऑपरेटर्सबद्दल जाणून घेणार आहोत. |
00:50 | हा ऑपरेटर is equal to असा वाचला जातो जो equalsपेक्षा वेगळा असतो. |
00:56 | जेव्हा आपण व्हेरिएबल्स वापरतो आणि जेव्हा आपण तुलना करतो, तेव्हा आपण दोन वेळा equal to चे चिन्ह लिहितो. |
01:02 | True pathसाठी आपण दोन curly brackets (महिरपी कंस) वापरू शकतो. |
01:06 | आपण येथे हे टाईप करू या. |
01:08 | संबंधित code या कंसात असेल. |
01:12 | Not Trueपाथसाठी else . |
01:15 | तशीच रचना - म्हणजे दोन curly brackets . |
01:17 | उदाहरणार्थ if 1 equals 1 असल्यास True हा रिझल्ट echo होईल. |
01:23 | जर1 is not equal 1असल्यास फाईल कार्यान्वित झाल्यावर False हा रिझल्ट मिळेल. |
01:30 | परंतु एक बरोबर एक असल्यामुळे फाईल कार्यान्वित केल्यावर आपल्याला True हा रिझल्ट मिळेल. |
01:36 | आपण हे बदलू या. म्हणजे येथे 1 equals 2करू या. हे नसल्यामुळे आपल्याला False हा रिझल्ट मिळेल. |
01:42 | अशा प्रकारे आपण एक संख्या दुस-या संख्येबरोबर आहे का हे पाहणारा साधा प्रोग्रॅम तयार केला आहे. |
01:49 | अर्थातच हे प्रोग्रॅम लिहिण्यासाठी चांगले application नाही. |
01:52 | आपण यापेक्षा थोडे अधिक करून बघू या. आपण password access चा छोटा प्रोग्रॅम बनवू या. |
01:58 | आपला पासवर्ड येथे व्हेरिएबलमध्ये संचित करू या. |
02:03 | समजा पासवर्ड या व्हेरिएबलची व्हॅल्यू abc आहे. |
02:05 | आपणIF function मध्ये व्हेरिएबल समाविष्ट करू या. |
02:11 | IF पासवर्ड व्हेरिएबल नंतर double equals आणि 'def' |
02:15 | हे बरोबर असल्यास Access granted असा रिझल्ट मिळेल. |
02:21 | माफ करा. माझी चूक झाली. आपण युजरकडून 'def' ह्या पासवर्डची अपेक्षा करत आहोत. आणि प्रत्यक्ष सिस्टिममध्ये 'abc' हा पासवर्ड दिलेला आहे. |
02:32 | त्यामुळे तो def नसल्यास आपण Access denied म्हणू. |
02:39 | आपण 'abc' हा पासवर्ड इनपुट केला होता. |
02:42 | आता पासवर्ड व्हेरिएबलची तुलना आपण संचित केलेल्या 'def' या पासवर्ड बरोबर करू या. |
02:50 | जर पासवर्ड equals 'def' असेल तर 'Access granted' आणि नसेल तर 'Access denied' हा रिझल्ट मिळेल. |
02:57 | हे करून बघू या. |
03:00 | 'Access denied' हा रिझल्ट मिळाला कारण हा पासवर्ड मॅच झाला नाही. |
03:05 | अशा प्रकारे आपण बघू शकतो की आपण येथे व्हेरिएबलचा समावेश केला आहे. |
03:10 | आता पासवर्ड बदलून तो 'def' करा आणि आता आपल्याला 'Access granted' हा रिझल्ट मिळेल. |
03:18 | आपल्याकडे येथे हा एका ओळीचा code आहे आणि येथे अजून एका ओळीचा code आहे. |
03:22 | त्यामुळे आपण हे curly brackets काढून टाकू शकतो. |
03:25 | त्यामुळे आता हे खूप व्यवस्थित दिसत आहे. |
03:29 | लक्षात ठेवा की अशा प्रकारच्या simple IF स्टेटमेंटमध्ये curly brackets समाविष्ट करण्यात काहीच अर्थ नसतो. |
03:37 | जर आपण एकापेक्षा जास्त ओळी समाविष्ट करणार असू तर आपल्याला curly brackets ची गरज असते. |
03:42 | उदाहरणार्थ येथे नवे व्हेरिएबल सेट करू या. |
03:46 | Access equals 'Allowed' |
03:52 | हा देखील अजून एका ओळीचा code आहे |
03:57 | परंतु जेव्हा आपण हे कार्यान्वित करू तेव्हा आपल्याला एरर मिळेल. |
04:02 | हे आपल्याला unexpected T_else on line 8 ही एरर दर्शवते. |
04:08 | आता आठव्या ओळीवर जाऊ या. याच्या आधीच्या ओळी मध्ये चूक झाली आहे. |
04:13 | त्यामुळे आपल्याला दोन किंवा त्यापेक्षा अधिक ओळींचा code असेल तर तो curly brackets मध्ये समाविष्ट करण्याची गरज असते. |
04:22 | रिफ्रेश केल्यावर आपल्याला Access granted हा रिझल्ट मिळेल. |
04:25 | आता आपण allowed ही व्हॅल्यू असलेले Access हे व्हेरिएबल सेट केले होते. |
04:29 | परंतु याचा आपण फार उपयोग केला नाही. |
04:32 | आपण हे केवळ एक उदाहरण म्हणून घेतले होते. |
04:35 | येथे एक ओळ आहे. तर येथे दोन ओळी आहेत, ज्या आपण एकत्र करू शकत नाही. |
04:40 | अशा प्रकारे आपण व्हेरिएबल बनवले आणि ते IF statement मध्ये समाविष्ट केले. मी आशा करते की याचा आपल्याला उपयोग होईल. |
04:46 | अशा प्रकारे आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
04:50 | या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |