PHP-and-MySQL/C2/If-Statement/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time
Narration
00:00 basic php च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. येथे आपण 'IF' स्टेटमेंटबद्दल चर्चा करणार आहोत.
00:06 जर यापूर्वी तुम्ही code लिहिला असेल तर तुम्हाला 'IF' स्टेटमेंटबद्दल माहिती असेलच.
00:11 php मध्येही ते फार काही वेगळे नसते. मी तुम्हाला वापरून दाखवणार आहे.
00:16 आता आपण सुरूवात करू या.
00:18 'IF' स्टेटमेंटबद्दल थोडक्यात जाणून घेऊ. हे condition स्वीकरते.
00:23 जर ती condition, True असेल तर ते code चा एक भाग कार्यान्वित करते.
00:28 जर False असेल तर ते code चा दुसरा भाग कार्यान्वित करते.
00:32 उदाहरणादाखल ही रचना बघू या.
00:36 If मग कंसात 1 equals 1 ही condition लिहा.
00:41 लक्षात घ्या मी येथे दोन बरोबरची चिन्हे दिलेली आहेत. हा comparison operator आहे.
00:47 दुस-या ट्युटोरियलमध्ये आपण या ऑपरेटर्सबद्दल जाणून घेणार आहोत.
00:50 हा ऑपरेटर is equal to असा वाचला जातो जो equalsपेक्षा वेगळा असतो.
00:56 जेव्हा आपण व्हेरिएबल्स वापरतो आणि जेव्हा आपण तुलना करतो, तेव्हा आपण दोन वेळा equal to चे चिन्ह लिहितो.
01:02 True pathसाठी आपण दोन curly brackets (महिरपी कंस) वापरू शकतो.
01:06 आपण येथे हे टाईप करू या.
01:08 संबंधित code या कंसात असेल.
01:12 Not Trueपाथसाठी else .
01:15 तशीच रचना - म्हणजे दोन curly brackets .
01:17 उदाहरणार्थ if 1 equals 1 असल्यास True हा रिझल्ट echo होईल.
01:23 जर1 is not equal 1असल्यास फाईल कार्यान्वित झाल्यावर False हा रिझल्ट मिळेल.
01:30 परंतु एक बरोबर एक असल्यामुळे फाईल कार्यान्वित केल्यावर आपल्याला True हा रिझल्ट मिळेल.
01:36 आपण हे बदलू या. म्हणजे येथे 1 equals 2करू या. हे नसल्यामुळे आपल्याला False हा रिझल्ट मिळेल.
01:42 अशा प्रकारे आपण एक संख्या दुस-या संख्येबरोबर आहे का हे पाहणारा साधा प्रोग्रॅम तयार केला आहे.
01:49 अर्थातच हे प्रोग्रॅम लिहिण्यासाठी चांगले application नाही.
01:52 आपण यापेक्षा थोडे अधिक करून बघू या. आपण password access चा छोटा प्रोग्रॅम बनवू या.
01:58 आपला पासवर्ड येथे व्हेरिएबलमध्ये संचित करू या.
02:03 समजा पासवर्ड या व्हेरिएबलची व्हॅल्यू abc आहे.
02:05 आपणIF function मध्ये व्हेरिएबल समाविष्ट करू या.
02:11 IF पासवर्ड व्हेरिएबल नंतर double equals आणि 'def'
02:15 हे बरोबर असल्यास Access granted असा रिझल्ट मिळेल.
02:21 माफ करा. माझी चूक झाली. आपण युजरकडून 'def' ह्या पासवर्डची अपेक्षा करत आहोत. आणि प्रत्यक्ष सिस्टिममध्ये 'abc' हा पासवर्ड दिलेला आहे.
02:32 त्यामुळे तो def नसल्यास आपण Access denied म्हणू.
02:39 आपण 'abc' हा पासवर्ड इनपुट केला होता.
02:42 आता पासवर्ड व्हेरिएबलची तुलना आपण संचित केलेल्या 'def' या पासवर्ड बरोबर करू या.
02:50 जर पासवर्ड equals 'def' असेल तर 'Access granted' आणि नसेल तर 'Access denied' हा रिझल्ट मिळेल.
02:57 हे करून बघू या.
03:00 'Access denied' हा रिझल्ट मिळाला कारण हा पासवर्ड मॅच झाला नाही.
03:05 अशा प्रकारे आपण बघू शकतो की आपण येथे व्हेरिएबलचा समावेश केला आहे.
03:10 आता पासवर्ड बदलून तो 'def' करा आणि आता आपल्याला 'Access granted' हा रिझल्ट मिळेल.
03:18 आपल्याकडे येथे हा एका ओळीचा code आहे आणि येथे अजून एका ओळीचा code आहे.
03:22 त्यामुळे आपण हे curly brackets काढून टाकू शकतो.
03:25 त्यामुळे आता हे खूप व्यवस्थित दिसत आहे.
03:29 लक्षात ठेवा की अशा प्रकारच्या simple IF स्टेटमेंटमध्ये curly brackets समाविष्ट करण्यात काहीच अर्थ नसतो.
03:37 जर आपण एकापेक्षा जास्त ओळी समाविष्ट करणार असू तर आपल्याला curly brackets ची गरज असते.
03:42 उदाहरणार्थ येथे नवे व्हेरिएबल सेट करू या.
03:46 Access equals 'Allowed'
03:52 हा देखील अजून एका ओळीचा code आहे
03:57 परंतु जेव्हा आपण हे कार्यान्वित करू तेव्हा आपल्याला एरर मिळेल.
04:02 हे आपल्याला unexpected T_else on line 8 ही एरर दर्शवते.
04:08 आता आठव्या ओळीवर जाऊ या. याच्या आधीच्या ओळी मध्ये चूक झाली आहे.
04:13 त्यामुळे आपल्याला दोन किंवा त्यापेक्षा अधिक ओळींचा code असेल तर तो curly brackets मध्ये समाविष्ट करण्याची गरज असते.
04:22 रिफ्रेश केल्यावर आपल्याला Access granted हा रिझल्ट मिळेल.
04:25 आता आपण allowed ही व्हॅल्यू असलेले Access हे व्हेरिएबल सेट केले होते.
04:29 परंतु याचा आपण फार उपयोग केला नाही.
04:32 आपण हे केवळ एक उदाहरण म्हणून घेतले होते.
04:35 येथे एक ओळ आहे. तर येथे दोन ओळी आहेत, ज्या आपण एकत्र करू शकत नाही.
04:40 अशा प्रकारे आपण व्हेरिएबल बनवले आणि ते IF statement मध्ये समाविष्ट केले. मी आशा करते की याचा आपल्याला उपयोग होईल.
04:46 अशा प्रकारे आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
04:50 या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana