BOSS-Linux/C2/BOSS-Linux-Desktop/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:44, 11 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search


Title of script:Overview of BOSS Desktop

Author: Ranjana Bhamble

Keywords: BOSS OS,Overview, Desktop, Synaptic Package Manager

Time Narration
00:01 'बॉस' डेस्कटॉपवरील या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्यूटोरियलमध्ये, आपण बॉस डेस्कटॉप एन्वाइरन्मेंट चा परीचय करून घेऊया.
00:12 मी येथे विस्तृत भारतीय भाषा समर्थन पॅकेजेसद्वारे, 'बॉस लिनक्स' '3.4.2' चा वापर करत आहे.
00:21 स्लाइड्स मिनीमाइज करू.
00:24 येथे आपल्याला 'BOSS Desktop' दिसत आहे.
00:28 डावीकडे वरच्या बाजूला मेन मेन्यू दिसेल.
00:33 हा मेनू उघडण्यासाठी , आपल्या कीबोर्ड वरील Alt+F1 की दाबा.
00:42 किंवा Applications मेनूवर क्लिक करा.
00:46 अप्लिकेशन मेनूमध्ये, पूर्वीच इन्स्टॉल असलेल्या सर्व अप्लिकेशन्सचे वर्गीकरण आहे.
00:54 या अप्लिकेशन मेनूमधील काही महत्त्वाच्या अप्लिकेशन्सची ओळख करून घेऊया.
01:01 यासाठी अप्लिकेशन्स, अक्सेसरिज व तेथून कॅल्क्युलेटर मध्ये जा.
01:08 कॅल्क्युलेटर गणितीय, शास्त्रीय व आर्थिक आकडेमोड करण्यास उपयोगी पडतो.
01:16 त्यावर क्लिक करून 'कॅल्क्युलेटर' उघडू.
01:20 काही सोप्या आकडेमोडी करून बघूया.
01:23 5*(into)8 असे टाईप करून नंतर =(equals to) चिन्ह दाबा.
01:29 =(equals to) चिन्हाऐवजी तुम्ही एन्टर की दाबू शकता.
01:35 आता ‘क्लोज’ बटन दाबून कॅल्क्युलेटरमधून बाहेर पडा.
01:40 आणखी एक अप्लिकेशन पाहूया.
01:43 त्यासाठी पुन्हा अप्लिकेशन्स, आणि नंतर अक्सेसरिजवर जा.
01:49 अक्सेसरिजमधील जी-एडिट टेक्स्ट एडिटर उघडण्यासाठी, त्यावर क्लिक करा.
01:56 आपल्याला स्क्रीनवर जी-एडिट हा टेक्स्ट एडिटर दिसत आहे.
02:02 आता मी इथे काही मजकूर टाईप करून ती सेव्ह करते.
02:06 Hello World टाईप करा.
02:11 फाईल सेव्ह करण्यास, Crtl आणि S की वापरा किंवा File मधील ‘Save’ वर क्लिक करा.
02:20 आपण फाईल मेनूमध्ये जाऊन नंतर सेव्ह वर क्लिक करुया.
02:26 आता Save As ‘डायलॉग बॉक्स’ दिसेल.
02:29 त्यात फाईलचे नाव व ती सेव्ह करण्याचे स्थान विचारते.
02:36 आता मी Hello.txt असे नाव टाईप करते व फाईल सेव्ह करण्यास ‘Desktop’ पर्याय निवडेन.
02:47 Save’ बटण वर क्लिक करा.
02:49 आता जी-एडिट विंडो बंद करून आपली फाईल डेस्कटॉपवर सेव्ह झाली आहे का ते तपासूया.
02:58 आता येथे डेस्कटॉपवर आपल्याला ‘Hello.txt’ ही फाईल दिसेल.
03:05 याचा अर्थ आपली टेक्स्ट फाईल व्यवस्थित सेव्ह झाली आहे.
03:10 आता मी डबल क्लिक करून ही फाईल उघडते.
03:14 येथे आपला Hello World टेक्स्ट आहे.
03:18 आपण जी-एडिट टेक्स्ट एडिटर मध्ये, अनेक स्थानिक भाषा मध्ये टाईप करू शकतो.
03:24 कसे करायचे ते पाहू.
03:27 जी-एडिट टेक्स्ट एडिटर मध्ये CTRL + SPACE BAR दाबा.
03:33 आपण खाली उजव्या बाजूला एक छोटा बॉक्स पाहू शकतो.
03:39 त्यावर क्लिक करा.
03:41 Hindi निवडा.
03:43 Inscript.
03:45 मी hello world टाइप करते.
03:49 आपण पाहू शकतो मजकूर हिंदी इनस्क्रिप्ट मध्ये बदललेला आहे.
03:53 आता मी Hindi नंतर Phonetic निवडेन.
03:59 मी फोनेटिक वापरुन welcome टाईप करेन.
04:03 हिंदी मध्ये टाईप झालेले welcome शब्द पाहू शकतो.
04:08 केलेले बदल सेव्ह करण्यासाठी , Save वर क्‍लिक करा.
04:11 आता टेक्स्ट एडिटर बंद करून अॅक्सेसरिजमधील आणखी एक महत्वाचे अॅप्लिकेशन, ‘Terminal’ हे पाहूया.
04:20 पुन्हा एकदा अॅप्लिकेशन्स, अॅक्सेसरिज आणि नंतर टर्मिनलवर जाऊ.
04:27 टर्मिनलला कमांड लाईन असेही म्हटले जाते, कारण इथून तुम्ही कॉम्प्युटरला कमांड देऊ शकता. खरे तर टर्मिनल हे 'GUI' पेक्षा अधिक प्रभावी आहे.
04:40 'टर्मिनल' म्हणजे काय हे समजण्यासाठी एखादी सोपी कमांड देऊन पाहू.
04:45 त्यासाठी ‘ls’ टाईप करून एंटर दाबु.
04:50 करेंट वर्किंग डिरेक्टरीमधील सर्व फाईल्स आणि फोल्डर्सची यादी तयार झालेली तुम्हाला दिसेल.
04:57 इथे होम फोल्डरमधील सर्व फाईल्स व फोल्डर्सची ही यादी दिसत आहे.
05:02 होम फोल्डर म्हणजे काय ते आपण याच ट्युटोरियलमध्ये पुढे पाहूया.
05:07 स्पोकन ट्यूटोरियल्सच्या पूढील लिनक्स सिरीस मध्ये टर्मिनल कमांड्स चांगल्या पद्धतीने स्पष्ट केले आहेत.
05:15 आता टर्मिनल बंद करू.
05:18 आता पुढच्या अप्लिकेशनकडे म्हणजेच 'आइसविजल' वेब ब्राउझरकडे वळूया.
05:25 हे बॉस ऑपरेटिंग सिस्टम वर डिफॉल्ट वेब ब्राउझर आहे.
05:30 त्यासाठी अप्लिकेशन्स, इंटरनेट, नंतर 'आइसविजल' वेब ब्राउझरवर क्लिक करा.
05:36 'आइसविजल' हे 'फायरफॉक्स' चे दुसरे( पूनर ब्रँड) वर्जन आहे.
05:41 हा ब्राउज़र वापरुन, ईमेल्स आक्सेस किंवा नेट वर काही माहितीसाठी शोध करू शकता.
05:49 आपण गूगलच्या साइट वर जाऊया.
05:51 अॅड्रेस बारवर जाण्यास शॉर्ट कट की F6 आहे.
05:56 किंवा आपण अॅड्रेस बारवर येथे क्लिक करू.
06:00 मी आता www.google.co.in टाईप करत आहे.
06:07 टाईप करत असतानाच 'आइसविजल' काही पर्याय सुचवेल.
06:11 त्यापैकी एखादा पर्याय निवडा.
06:14 ....किंवा पूर्ण अड्रेस टाइप करणे सुरू ठेवा आणि एंटर दाबा.
06:19 आता आपण गूगल सर्च पेज वर आहोत. सर्च बारमध्ये spoken tutorial टाईप करूया.
06:27 स्पोकन ट्यूटोरियल वेबसाइट पहिला पर्याय म्हणून सूचीबद्ध आहे. त्यावर क्लिक करू.
06:34 हे स्पोकन ट्यूटोरियलचे होम पेज उघडेल.
06:38 हे बंद करून पुढे जाऊया.
06:42 आता Applications वर क्लिक करून नंतर Office वर जाऊया.
06:48 आपल्याकडे ह्या ऑफीस मेनूमध्ये, लिबर ऑफीस पर्याय आहेत जसे Writer, Calc आणि Impress.
06:57 या लिबर ऑफीस स्वीट( Suite) चे वर्ड प्रोसेसर, स्प्रेडशीट आणि सादरीकरण घटक आहेत.
07:04 स्पोकन ट्यूटोरियल वेबसाईटवर या विषयांवर स्पोकन ट्युटोरियल्स उपलब्ध आहेत. आम्ही सुचवितो की त्यांचा शोध घ्या.
07:12 आता अप्लिकेशन्समधून साऊंड आणि व्हिडिओ मेनूमध्ये काय आहे ते पाहूया.
07:19 हा पर्याय बॉस ऑपरेटिंग सिस्टममध्ये विविध प्लेयर पर्यायांना सूचीबद्ध करतो.
07:27 व्हिडिओ किंवा ऑडिओ फाइल्सला प्ले करण्यास, यामाधून कुठलाही पर्याय वापरू शकता.
07:33 आता, काही इतर महत्त्वाच्या गोष्टी पाहूया, यावेळी Places मेनूवर जाऊ.
07:41 येथे पहिला पर्याय Home folder आहे.
07:45 तो उघडू.
07:47 'बॉस OS' मध्ये प्रत्येक User चा विशिष्ट Home folder असतो.
07:52 होम फोल्डर हे जणू आपले घरच आहे. तिथे आपण आपल्या फाईल्स व फोल्डर्स संचित करू शकतो.
08:00 आपण परवानगी दिल्याशिवाय कोणीही ते बघू शकत नाही.
08:04 ‘फाईल परमिशन’ बद्द्लची आणखी माहिती स्पोकन ट्यूटोरियल वेबसाईटवर लिनक्स स्पोकन ट्युटोरियल्समधे उपलब्ध आहे.
08:14 आपल्या होम फोल्डरमधे आपल्याला डेस्कटॉप, डॉक्युमेंट्स, डाऊनलोड्स आणि म्यूजिक इत्यादि फोल्डर्स दिसतील.
08:25 लिनक्समध्ये, सर्वकाही एक फाइल आहे.
08:29 डेस्कटॉप फोल्डर उघडण्यास त्यावर डबल क्लिक करू.
08:35 आपण जीएडिट टेक्स्ट एडिटर मधून सेव्ह केलेली ‘Hello.txt’ फाईल आपल्याला इथे दिसत आहे.
08:44 म्हणजेच हा फोल्डर आणि डेस्कटॉप हे दोन्ही एकच आहेत.
08:49 आता मी हा फोल्डर बंद करते.
08:52 आता डेस्कटॉप थीम बदलणे शिकू.
08:55 उजव्या बाजूला कोपर्यात जा आणि तिथे प्रदर्शित यूजरनेम वर क्लिक करा.
09:02 माझ्या बाबतीत, यूजरनेम 'spoken' आहे. त्यामुळे मी 'spoken' वर क्लिक करते.
09:09 System Settings पर्याय वर क्लिक करा.
09:13 'सिस्टम सेट्टिंग्स' डायलॉग बॉक्स उघडेल.
09:16 Background icon वर क्लिक करा.
09:19 प्रदर्शित यादीतून कुठलाही एक बॅकग्राउंड निवडा.
09:23 हे आपले नवीन बॅकग्राउंड म्हणून दिसेल.
09:27 हा डायलॉग बॉक्स बंद करा.
09:29 आता, आपण अप्लिकेशन्स मेनूमधील उपलब्ध सिस्टम टूल्स पर्याय वर येऊ.
09:36 ह्या मेनूमध्ये अनेक पर्याय आहेत, जे आपल्या डेस्कटॉप आणि विविध अप्लिकेशन्स व्यवस्थापित करण्यात मदत करते.
09:44 System tools, Administration आणि Synaptic Package Manager वर क्लिक करा.
09:51 तो लगेच प्रमाणीकरणासाठी एडमीन पासवर्ड विचारेल.
09:57 एडमीन पासवर्ड टाईप करा आणि Authenticate बटणवर क्लिक करा.
10:02 सिॅप्टिक पॅकेज मॅनेजर कसे वापरावे ह्याची माहिती या सीरीस मध्ये उपलब्ध आहे.
10:10 आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
10:14 थोडक्यात :,या पठात शिकलो -
10:18 बॉस डेस्कटॉप,मेन मेन्यू
10:21 आणि 'बॉस लीनॅक्स' OS ची अनेक महत्त्वाची वैशिष्ट्ये.
10:25 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
10:28 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:31 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10:36 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम , Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:41 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:45 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
10:53 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:57 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:05 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:11 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana