BOSS-Linux/C2/BOSS-Linux-Desktop/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script:Overview of BOSS Desktop
Author: Ranjana Bhamble
Keywords: BOSS OS,Overview, Desktop, Synaptic Package Manager
Time | Narration |
00:01 | 'बॉस' डेस्कटॉपवरील या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्यूटोरियलमध्ये, आपण बॉस डेस्कटॉप एन्वाइरन्मेंट चा परीचय करून घेऊया. |
00:12 | मी येथे विस्तृत भारतीय भाषा समर्थन पॅकेजेसद्वारे, 'बॉस लिनक्स' '3.4.2' चा वापर करत आहे. |
00:21 | स्लाइड्स मिनीमाइज करू. |
00:24 | येथे आपल्याला 'BOSS Desktop' दिसत आहे. |
00:28 | डावीकडे वरच्या बाजूला मेन मेन्यू दिसेल. |
00:33 | हा मेनू उघडण्यासाठी , आपल्या कीबोर्ड वरील Alt+F1 की दाबा. |
00:42 | किंवा Applications मेनूवर क्लिक करा. |
00:46 | अप्लिकेशन मेनूमध्ये, पूर्वीच इन्स्टॉल असलेल्या सर्व अप्लिकेशन्सचे वर्गीकरण आहे. |
00:54 | या अप्लिकेशन मेनूमधील काही महत्त्वाच्या अप्लिकेशन्सची ओळख करून घेऊया. |
01:01 | यासाठी अप्लिकेशन्स, अक्सेसरिज व तेथून कॅल्क्युलेटर मध्ये जा. |
01:08 | कॅल्क्युलेटर गणितीय, शास्त्रीय व आर्थिक आकडेमोड करण्यास उपयोगी पडतो. |
01:16 | त्यावर क्लिक करून 'कॅल्क्युलेटर' उघडू. |
01:20 | काही सोप्या आकडेमोडी करून बघूया. |
01:23 | 5*(into)8 असे टाईप करून नंतर =(equals to) चिन्ह दाबा. |
01:29 | =(equals to) चिन्हाऐवजी तुम्ही एन्टर की दाबू शकता. |
01:35 | आता ‘क्लोज’ बटन दाबून कॅल्क्युलेटरमधून बाहेर पडा. |
01:40 | आणखी एक अप्लिकेशन पाहूया. |
01:43 | त्यासाठी पुन्हा अप्लिकेशन्स, आणि नंतर अक्सेसरिजवर जा. |
01:49 | अक्सेसरिजमधील जी-एडिट टेक्स्ट एडिटर उघडण्यासाठी, त्यावर क्लिक करा. |
01:56 | आपल्याला स्क्रीनवर जी-एडिट हा टेक्स्ट एडिटर दिसत आहे. |
02:02 | आता मी इथे काही मजकूर टाईप करून ती सेव्ह करते. |
02:06 | Hello World टाईप करा. |
02:11 | फाईल सेव्ह करण्यास, Crtl आणि S की वापरा किंवा File मधील ‘Save’ वर क्लिक करा. |
02:20 | आपण फाईल मेनूमध्ये जाऊन नंतर सेव्ह वर क्लिक करुया. |
02:26 | आता Save As ‘डायलॉग बॉक्स’ दिसेल. |
02:29 | त्यात फाईलचे नाव व ती सेव्ह करण्याचे स्थान विचारते. |
02:36 | आता मी Hello.txt असे नाव टाईप करते व फाईल सेव्ह करण्यास ‘Desktop’ पर्याय निवडेन. |
02:47 | Save’ बटण वर क्लिक करा. |
02:49 | आता जी-एडिट विंडो बंद करून आपली फाईल डेस्कटॉपवर सेव्ह झाली आहे का ते तपासूया. |
02:58 | आता येथे डेस्कटॉपवर आपल्याला ‘Hello.txt’ ही फाईल दिसेल. |
03:05 | याचा अर्थ आपली टेक्स्ट फाईल व्यवस्थित सेव्ह झाली आहे. |
03:10 | आता मी डबल क्लिक करून ही फाईल उघडते. |
03:14 | येथे आपला Hello World टेक्स्ट आहे. |
03:18 | आपण जी-एडिट टेक्स्ट एडिटर मध्ये, अनेक स्थानिक भाषा मध्ये टाईप करू शकतो. |
03:24 | कसे करायचे ते पाहू. |
03:27 | जी-एडिट टेक्स्ट एडिटर मध्ये CTRL + SPACE BAR दाबा. |
03:33 | आपण खाली उजव्या बाजूला एक छोटा बॉक्स पाहू शकतो. |
03:39 | त्यावर क्लिक करा. |
03:41 | Hindi निवडा. |
03:43 | Inscript. |
03:45 | मी hello world टाइप करते. |
03:49 | आपण पाहू शकतो मजकूर हिंदी इनस्क्रिप्ट मध्ये बदललेला आहे. |
03:53 | आता मी Hindi नंतर Phonetic निवडेन. |
03:59 | मी फोनेटिक वापरुन welcome टाईप करेन. |
04:03 | हिंदी मध्ये टाईप झालेले welcome शब्द पाहू शकतो. |
04:08 | केलेले बदल सेव्ह करण्यासाठी , Save वर क्लिक करा. |
04:11 | आता टेक्स्ट एडिटर बंद करून अॅक्सेसरिजमधील आणखी एक महत्वाचे अॅप्लिकेशन, ‘Terminal’ हे पाहूया. |
04:20 | पुन्हा एकदा अॅप्लिकेशन्स, अॅक्सेसरिज आणि नंतर टर्मिनलवर जाऊ. |
04:27 | टर्मिनलला कमांड लाईन असेही म्हटले जाते, कारण इथून तुम्ही कॉम्प्युटरला कमांड देऊ शकता. खरे तर टर्मिनल हे 'GUI' पेक्षा अधिक प्रभावी आहे. |
04:40 | 'टर्मिनल' म्हणजे काय हे समजण्यासाठी एखादी सोपी कमांड देऊन पाहू. |
04:45 | त्यासाठी ‘ls’ टाईप करून एंटर दाबु. |
04:50 | करेंट वर्किंग डिरेक्टरीमधील सर्व फाईल्स आणि फोल्डर्सची यादी तयार झालेली तुम्हाला दिसेल. |
04:57 | इथे होम फोल्डरमधील सर्व फाईल्स व फोल्डर्सची ही यादी दिसत आहे. |
05:02 | होम फोल्डर म्हणजे काय ते आपण याच ट्युटोरियलमध्ये पुढे पाहूया. |
05:07 | स्पोकन ट्यूटोरियल्सच्या पूढील लिनक्स सिरीस मध्ये टर्मिनल कमांड्स चांगल्या पद्धतीने स्पष्ट केले आहेत. |
05:15 | आता टर्मिनल बंद करू. |
05:18 | आता पुढच्या अप्लिकेशनकडे म्हणजेच 'आइसविजल' वेब ब्राउझरकडे वळूया. |
05:25 | हे बॉस ऑपरेटिंग सिस्टम वर डिफॉल्ट वेब ब्राउझर आहे. |
05:30 | त्यासाठी अप्लिकेशन्स, इंटरनेट, नंतर 'आइसविजल' वेब ब्राउझरवर क्लिक करा. |
05:36 | 'आइसविजल' हे 'फायरफॉक्स' चे दुसरे( पूनर ब्रँड) वर्जन आहे. |
05:41 | हा ब्राउज़र वापरुन, ईमेल्स आक्सेस किंवा नेट वर काही माहितीसाठी शोध करू शकता. |
05:49 | आपण गूगलच्या साइट वर जाऊया. |
05:51 | अॅड्रेस बारवर जाण्यास शॉर्ट कट की F6 आहे. |
05:56 | किंवा आपण अॅड्रेस बारवर येथे क्लिक करू. |
06:00 | मी आता www.google.co.in टाईप करत आहे. |
06:07 | टाईप करत असतानाच 'आइसविजल' काही पर्याय सुचवेल. |
06:11 | त्यापैकी एखादा पर्याय निवडा. |
06:14 | ....किंवा पूर्ण अड्रेस टाइप करणे सुरू ठेवा आणि एंटर दाबा. |
06:19 | आता आपण गूगल सर्च पेज वर आहोत. सर्च बारमध्ये spoken tutorial टाईप करूया. |
06:27 | स्पोकन ट्यूटोरियल वेबसाइट पहिला पर्याय म्हणून सूचीबद्ध आहे. त्यावर क्लिक करू. |
06:34 | हे स्पोकन ट्यूटोरियलचे होम पेज उघडेल. |
06:38 | हे बंद करून पुढे जाऊया. |
06:42 | आता Applications वर क्लिक करून नंतर Office वर जाऊया. |
06:48 | आपल्याकडे ह्या ऑफीस मेनूमध्ये, लिबर ऑफीस पर्याय आहेत जसे Writer, Calc आणि Impress. |
06:57 | या लिबर ऑफीस स्वीट( Suite) चे वर्ड प्रोसेसर, स्प्रेडशीट आणि सादरीकरण घटक आहेत. |
07:04 | स्पोकन ट्यूटोरियल वेबसाईटवर या विषयांवर स्पोकन ट्युटोरियल्स उपलब्ध आहेत. आम्ही सुचवितो की त्यांचा शोध घ्या. |
07:12 | आता अप्लिकेशन्समधून साऊंड आणि व्हिडिओ मेनूमध्ये काय आहे ते पाहूया. |
07:19 | हा पर्याय बॉस ऑपरेटिंग सिस्टममध्ये विविध प्लेयर पर्यायांना सूचीबद्ध करतो. |
07:27 | व्हिडिओ किंवा ऑडिओ फाइल्सला प्ले करण्यास, यामाधून कुठलाही पर्याय वापरू शकता. |
07:33 | आता, काही इतर महत्त्वाच्या गोष्टी पाहूया, यावेळी Places मेनूवर जाऊ. |
07:41 | येथे पहिला पर्याय Home folder आहे. |
07:45 | तो उघडू. |
07:47 | 'बॉस OS' मध्ये प्रत्येक User चा विशिष्ट Home folder असतो. |
07:52 | होम फोल्डर हे जणू आपले घरच आहे. तिथे आपण आपल्या फाईल्स व फोल्डर्स संचित करू शकतो. |
08:00 | आपण परवानगी दिल्याशिवाय कोणीही ते बघू शकत नाही. |
08:04 | ‘फाईल परमिशन’ बद्द्लची आणखी माहिती स्पोकन ट्यूटोरियल वेबसाईटवर लिनक्स स्पोकन ट्युटोरियल्समधे उपलब्ध आहे. |
08:14 | आपल्या होम फोल्डरमधे आपल्याला डेस्कटॉप, डॉक्युमेंट्स, डाऊनलोड्स आणि म्यूजिक इत्यादि फोल्डर्स दिसतील. |
08:25 | लिनक्समध्ये, सर्वकाही एक फाइल आहे. |
08:29 | डेस्कटॉप फोल्डर उघडण्यास त्यावर डबल क्लिक करू. |
08:35 | आपण जीएडिट टेक्स्ट एडिटर मधून सेव्ह केलेली ‘Hello.txt’ फाईल आपल्याला इथे दिसत आहे. |
08:44 | म्हणजेच हा फोल्डर आणि डेस्कटॉप हे दोन्ही एकच आहेत. |
08:49 | आता मी हा फोल्डर बंद करते. |
08:52 | आता डेस्कटॉप थीम बदलणे शिकू. |
08:55 | उजव्या बाजूला कोपर्यात जा आणि तिथे प्रदर्शित यूजरनेम वर क्लिक करा. |
09:02 | माझ्या बाबतीत, यूजरनेम 'spoken' आहे. त्यामुळे मी 'spoken' वर क्लिक करते. |
09:09 | System Settings पर्याय वर क्लिक करा. |
09:13 | 'सिस्टम सेट्टिंग्स' डायलॉग बॉक्स उघडेल. |
09:16 | Background icon वर क्लिक करा. |
09:19 | प्रदर्शित यादीतून कुठलाही एक बॅकग्राउंड निवडा. |
09:23 | हे आपले नवीन बॅकग्राउंड म्हणून दिसेल. |
09:27 | हा डायलॉग बॉक्स बंद करा. |
09:29 | आता, आपण अप्लिकेशन्स मेनूमधील उपलब्ध सिस्टम टूल्स पर्याय वर येऊ. |
09:36 | ह्या मेनूमध्ये अनेक पर्याय आहेत, जे आपल्या डेस्कटॉप आणि विविध अप्लिकेशन्स व्यवस्थापित करण्यात मदत करते. |
09:44 | System tools, Administration आणि Synaptic Package Manager वर क्लिक करा. |
09:51 | तो लगेच प्रमाणीकरणासाठी एडमीन पासवर्ड विचारेल. |
09:57 | एडमीन पासवर्ड टाईप करा आणि Authenticate बटणवर क्लिक करा. |
10:02 | सिॅप्टिक पॅकेज मॅनेजर कसे वापरावे ह्याची माहिती या सीरीस मध्ये उपलब्ध आहे. |
10:10 | आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
10:14 | थोडक्यात :,या पठात शिकलो - |
10:18 | बॉस डेस्कटॉप,मेन मेन्यू |
10:21 | आणि 'बॉस लीनॅक्स' OS ची अनेक महत्त्वाची वैशिष्ट्ये. |
10:25 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
10:28 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
10:31 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
10:36 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम , Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
10:41 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
10:45 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
10:53 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
10:57 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:05 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11:11 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद. |