Biogas-Plant/C4/Maintenance-and-Repair/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:26, 11 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | नमस्कार बायोगॅस संयंत्राची देखरेख आणि दुरूस्तीच्या पठात आपले स्वागत. |
00:11 | ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण बायोगॅस संयंत्र आणि बायोगॅस बर्नरचे देखरेख आणि दुरुस्ती करण्यासाठी विविध तंत्र शिकणार आहोत. |
00:27 | बायोगॅस संयंत्राचे थोड्या थोड्या वेळाने अर्धवट आणि पूर्ण स्वच्छता करणे आवश्यक आहे. |
00:37 | हे खात्री करेल की बायोगॅस संयंत्र सुरळीतपणे चालते. |
00:43 | तसेच हे खात्री करेल की अनेक वर्षे बायोगॅस संयंत्र कार्यक्षमतेने काम करेल. |
00:53 | प्रथम आपण देखरेख विभागात एक नजर टाकू. |
00:58 | तर, तुम्ही बायोगॅस संयंत्राचे देखरेख कश्यप्राकारे कराल? |
01:08 | रोजच्यारोज देखरेख करण्यासाठी खालील प्रमाणे कार्य केले पाहिजे- |
01:17 | नेहमी योग्य प्रमाणात जैव-कचर्या सोबत पाणी एकत्र करावे. |
01:25 | हे खात्री करेल की मिश्रण टॅंक मधून डायजेस्टर टॅंक मध्ये जैव-कचर्याची वाहतूक व्यवस्थित होईल. |
01:37 | जर वनस्पती कचरा टाकायचा असेल तर, पाने चिरडून १-४ सेमी पर्यन्त चिरून घ्यावी. |
01:49 | डायजेस्टर टॅंक मध्ये जास्त प्रमाणात पेंढा टाकु नये नाहीतर ते पाचवण्यास अवघड आहे. |
02:01 | तसेच झाडांच्या फांद्या आणि काठ्या टाळले पाहिजे. |
02:09 | साबण, तेल, रासायनिक, कीटकसंहारक द्रव्य आणि कीटकनाशके टाकू नये. |
02:19 | माती, वाळू किंवा दगड देखील टाकू नये. |
02:26 | हे डायजेस्टरच्या तळाशी साठून राहील आणि वायू उत्पादन होण्यास अडचण येईल. |
02:34 | जैव-कचऱ्याचे प्रमाण पुरवणे संयंत्राचे आकार यावर अवलंबून आहे. |
02:42 | डायजेस्टर टॅंक मध्ये जास्त प्रमाणात जैव-कचरा टाकु नये. |
02:48 | ह्यासाठी जैव-कचरा जास्त टाकायचा नाही, जर जास्ता टाकला तर डायजेस्टर टॅंक मध्ये पचनक्रियासाठी कमी वेळ लागेल. |
03:00 | त्यामुळे फस्फसण्याची क्रिया पूर्ण होणार नाही, न पचवता मळी टॅंक मध्ये खत बाहेर येईल. |
03:12 | जर डायजेस्टर टॅंक मध्ये जैव-कचरा कमी टाकला असेल तर वायूचे उत्पादन कमी होईल. |
03:22 | पाणी साठणे नियमितपणे तपासले पाहिजे नाहीतर नलिके मधले पाणी गॅसच्या वाहतुकीत अडथळा आणतील. |
03:33 | वायू नालिकेला उचलल्यामुळे डायजेस्टर टॅंक मध्ये पाणी परत येऊ शकते. |
03:45 | तसेच मळीची वाहतुक मळी टॅंकमध्ये सुरळितपणे पडते का ते तपासा. |
03:55 | याची खात्री करा जेव्हा मळी टॅंक पूर्णपणे भरून जाते तेव्हा ही मळी टॅंकच्या बाहेर वाहते. |
04:05 | ज्वालाग्रही वस्तू जसे पेटवणारी वस्तू आणि / किंवा सिगारेट घुमटाच्या बाहेरील नळीच्या जवळ आणले नाही पाहिजे. |
04:17 | आणखी एक महत्वाची गोष्ट करायची आहे जी- |
04:23 | तीन वर्षातून एकदा डायजेस्टर टॅंक मधली मळी पूर्णपणे काढली पाहिजे. |
04:34 | हे सहसा गवंडी स्वतः करू शकतो. |
04:41 | दाखवल्या प्रमाणे, मिश्रण टॅंक आणि मळी टॅंक झाकून ठेवावे. |
04:48 | हे खात्री करेल की योग्य स्वच्छता आणि बायोगॅस जवळ डासांची प्रजनन टाळण्यासाठी केले जाते. |
05:00 | आता आपण दुरुस्तीच्या विभागाकडे पाहू. |
05:06 | बायोगॅस बर्नरची दुरुस्ती नेहमी एक योग्य तंत्रज्ञ यांनी केली पाहिजे. |
05:16 | तुम्ही येथे बायोगॅस बर्नर पाहता. |
05:23 | दुरुस्ती सुरू करण्यासाठी, प्रथम रबरी नळी आणि बर्नर येथील गॅस वाहतूक बंद करून घ्या. |
05:39 | हे करणे खूप महत्वाचे आहे. |
05:44 | गॅस वाहतूक बंद केल्या नंतर तुम्ही येथे बिना ज्योतचे बर्नर पाहता. |
05:53 | काही मिनिटे थांबून बर्नर पेटवून पहा आणि खात्री करून घ्या की गॅस वाहिनी बंद झाली आहे. |
06:03 | आता बर्नरला जोडलेली रबरी नळी काढून टाका. |
06:09 | बर्नरला जोडलेली रबरी नळीच्या वर जी घट्ट वॉहज क्लिप आहे ती सैल करा. |
06:19 | एकदा का ती सैल झाली, रबरी नळी बाहेर खेचणे. |
06:26 | आता गॅसचा आवाज तपासण्यासाठी आपल्या कानाजवळ रबरी नळी ठेवा. |
06:36 | आवाज नाही म्हणजे गॅसचा प्रवाह नाही आणि दुरुस्तीचे काम सुरक्षितपणे करू शकतो. |
06:47 | आता आपण बर्नरच्या भागांना वेगळे करणे सुरू करू. |
06:53 | नंतर आपण बर्नर मधला कचरा काढून टाकू. |
06:59 | चित्रात दाखवल्या प्रमाणे, रबरी नळीला जोडणर्या बर्नर द्वारे हवा फुंका. |
07:09 | तसेच हे ज्वाला रिंग पर्यन्त हवा सुरळीतपणे पोहोचते का हे तपासण्यासाठी मदत होईल. |
07:19 | बर्नरला हलके ठोकून नंतर त्याची वरची बाजू खाली करा. |
07:27 | तुम्ही बर्नर मधला कचरा पडतांना पाहू शकता. |
07:34 | जर हवा फुंकल्याने कडक कचरा काढता येऊ शकला नाही, तर एक कोरडी घासणी वापरले जाऊ शकते. |
07:48 | ज्वाला रिंग स्वच्छ करण्यासाठी, एक पिन वापरून त्याच्या होल मध्ये समाविष्ट करा. |
07:58 | रिंगचे स्वच्छ होल खात्री करेल की- गॅसचे सुरळीतपणे प्रवाह आणि पूर्ण ज्यॉत |
08:10 | स्वच्छ रिंग अश्या प्रकारे दिसेल. |
08:15 | जे उल्लेखित आहे त्याच्या व्यतिरिक्त, संयंत्राची नियतकालाने तपासणी करणे आवश्यक आहे. |
08:25 | तपासणी ही डायजेस्टर टॅंकच्या तळाशी तडा शोधण्यास मदत करेल. |
08:34 | अन्यथा, निर्माण झालेला बायोगॅस या तडांद्वारे वातावरणात बाहेर पडू शकतो. |
08:44 | म्हणूनच लवकरात लवकर ह्या तडांना सीलबंद करणे. |
08:51 | ३ वर्षातून एकदा, गवंडी डायजेस्टर टॅंकच्या आतल्या भिंतीला पून्हा रंग करतो. |
09:03 | हे पांढरे सिमेंट आणि चिकटवण्यासाठी कृत्रिमचे मिश्रण वापरून केले जाते. |
09:15 | जर तडा असेल तर, तडांना सील बंद करण्यास ह्या मिश्रणाची मदत होईल. |
09:23 | हे मिश्रण तयार करण्यासाठी खालील प्रकारे वापरा- पाणी २ लिटर , कृत्रिम चिकटवण्यास २५० ग्रॅम, पांढरे सिमेंट २ किलो. |
09:49 | व्यवस्थित मिसळा. आणि वापरा |
09:55 | थोडक्यात: ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण बायोगॅस संयंत्र आणि बायोगॅस बर्नरचे देखरेख आणि दुरुस्ती करण्यासाठी विविध तंत्र शिकलो. |
10:13 | हा व्हिडिओ IIT बॉम्बे, मधील Rural-ICT संघ व स्पोकन ट्युटोरियल संघाच्या सूक्ताने तयार केले आहे. |
10:26 | या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी या लिंकवर जाऊ शकता. |
10:35 | मी रंजना भांबळे स्पोकन ट्युटोरियल संघाची सदस्य आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |