Biogas-Plant/C4/Maintenance-and-Repair/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार बायोगॅस संयंत्राची देखरेख आणि दुरूस्तीच्या पठात आपले स्वागत.
00:11 ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण बायोगॅस संयंत्र आणि बायोगॅस बर्नरचे देखरेख आणि दुरुस्ती करण्यासाठी विविध तंत्र शिकणार आहोत.
00:27 बायोगॅस संयंत्राचे थोड्या थोड्या वेळाने अर्धवट आणि पूर्ण स्वच्छता करणे आवश्यक आहे.
00:37 हे खात्री करेल की बायोगॅस संयंत्र सुरळीतपणे चालते.
00:43 तसेच हे खात्री करेल की अनेक वर्षे बायोगॅस संयंत्र कार्यक्षमतेने काम करेल.
00:53 प्रथम आपण देखरेख विभागात एक नजर टाकू.
00:58 तर, तुम्ही बायोगॅस संयंत्राचे देखरेख कश्यप्राकारे कराल?
01:08 रोजच्यारोज देखरेख करण्यासाठी खालील प्रमाणे कार्य केले पाहिजे-
01:17 नेहमी योग्य प्रमाणात जैव-कचर्या सोबत पाणी एकत्र करावे.
01:25 हे खात्री करेल की मिश्रण टॅंक मधून डायजेस्टर टॅंक मध्ये जैव-कचर्याची वाहतूक व्यवस्थित होईल.
01:37 जर वनस्पती कचरा टाकायचा असेल तर, पाने चिरडून १-४ सेमी पर्यन्त चिरून घ्यावी.
01:49 डायजेस्टर टॅंक मध्ये जास्त प्रमाणात पेंढा टाकु नये नाहीतर ते पाचवण्यास अवघड आहे.
02:01 तसेच झाडांच्या फांद्या आणि काठ्या टाळले पाहिजे.
02:09 साबण, तेल, रासायनिक, कीटकसंहारक द्रव्य आणि कीटकनाशके टाकू नये.
02:19 माती, वाळू किंवा दगड देखील टाकू नये.
02:26 हे डायजेस्टरच्या तळाशी साठून राहील आणि वायू उत्पादन होण्यास अडचण येईल.
02:34 जैव-कचऱ्याचे प्रमाण पुरवणे संयंत्राचे आकार यावर अवलंबून आहे.
02:42 डायजेस्टर टॅंक मध्ये जास्त प्रमाणात जैव-कचरा टाकु नये.
02:48 ह्यासाठी जैव-कचरा जास्त टाकायचा नाही, जर जास्ता टाकला तर डायजेस्टर टॅंक मध्ये पचनक्रियासाठी कमी वेळ लागेल.
03:00 त्यामुळे फस्फसण्याची क्रिया पूर्ण होणार नाही, न पचवता मळी टॅंक मध्ये खत बाहेर येईल.
03:12 जर डायजेस्टर टॅंक मध्ये जैव-कचरा कमी टाकला असेल तर वायूचे उत्पादन कमी होईल.
03:22 पाणी साठणे नियमितपणे तपासले पाहिजे नाहीतर नलिके मधले पाणी गॅसच्या वाहतुकीत अडथळा आणतील.
03:33 वायू नालिकेला उचलल्यामुळे डायजेस्टर टॅंक मध्ये पाणी परत येऊ शकते.
03:45 तसेच मळीची वाहतुक मळी टॅंकमध्ये सुरळितपणे पडते का ते तपासा.
03:55 याची खात्री करा जेव्हा मळी टॅंक पूर्णपणे भरून जाते तेव्हा ही मळी टॅंकच्या बाहेर वाहते.
04:05 ज्वालाग्रही वस्तू जसे पेटवणारी वस्तू आणि / किंवा सिगारेट घुमटाच्या बाहेरील नळीच्या जवळ आणले नाही पाहिजे.
04:17 आणखी एक महत्वाची गोष्ट करायची आहे जी-
04:23 तीन वर्षातून एकदा डायजेस्टर टॅंक मधली मळी पूर्णपणे काढली पाहिजे.
04:34 हे सहसा गवंडी स्वतः करू शकतो.
04:41 दाखवल्या प्रमाणे, मिश्रण टॅंक आणि मळी टॅंक झाकून ठेवावे.
04:48 हे खात्री करेल की योग्य स्वच्छता आणि बायोगॅस जवळ डासांची प्रजनन टाळण्यासाठी केले जाते.
05:00 आता आपण दुरुस्तीच्या विभागाकडे पाहू.
05:06 बायोगॅस बर्नरची दुरुस्ती नेहमी एक योग्य तंत्रज्ञ यांनी केली पाहिजे.
05:16 तुम्ही येथे बायोगॅस बर्नर पाहता.
05:23 दुरुस्ती सुरू करण्यासाठी, प्रथम रबरी नळी आणि बर्नर येथील गॅस वाहतूक बंद करून घ्या.
05:39 हे करणे खूप महत्वाचे आहे.
05:44 गॅस वाहतूक बंद केल्या नंतर तुम्ही येथे बिना ज्योतचे बर्नर पाहता.
05:53 काही मिनिटे थांबून बर्नर पेटवून पहा आणि खात्री करून घ्या की गॅस वाहिनी बंद झाली आहे.
06:03 आता बर्नरला जोडलेली रबरी नळी काढून टाका.
06:09 बर्नरला जोडलेली रबरी नळीच्या वर जी घट्ट वॉहज क्लिप आहे ती सैल करा.
06:19 एकदा का ती सैल झाली, रबरी नळी बाहेर खेचणे.
06:26 आता गॅसचा आवाज तपासण्यासाठी आपल्या कानाजवळ रबरी नळी ठेवा.
06:36 आवाज नाही म्हणजे गॅसचा प्रवाह नाही आणि दुरुस्तीचे काम सुरक्षितपणे करू शकतो.
06:47 आता आपण बर्नरच्या भागांना वेगळे करणे सुरू करू.
06:53 नंतर आपण बर्नर मधला कचरा काढून टाकू.
06:59 चित्रात दाखवल्या प्रमाणे, रबरी नळीला जोडणर्या बर्नर द्वारे हवा फुंका.
07:09 तसेच हे ज्वाला रिंग पर्यन्त हवा सुरळीतपणे पोहोचते का हे तपासण्यासाठी मदत होईल.
07:19 बर्नरला हलके ठोकून नंतर त्याची वरची बाजू खाली करा.
07:27 तुम्ही बर्नर मधला कचरा पडतांना पाहू शकता.
07:34 जर हवा फुंकल्याने कडक कचरा काढता येऊ शकला नाही, तर एक कोरडी घासणी वापरले जाऊ शकते.
07:48 ज्वाला रिंग स्वच्छ करण्यासाठी, एक पिन वापरून त्याच्या होल मध्ये समाविष्ट करा.
07:58 रिंगचे स्वच्छ होल खात्री करेल की- गॅसचे सुरळीतपणे प्रवाह आणि पूर्ण ज्यॉत
08:10 स्वच्छ रिंग अश्या प्रकारे दिसेल.
08:15 जे उल्लेखित आहे त्याच्या व्यतिरिक्त, संयंत्राची नियतकालाने तपासणी करणे आवश्यक आहे.
08:25 तपासणी ही डायजेस्टर टॅंकच्या तळाशी तडा शोधण्यास मदत करेल.
08:34 अन्यथा, निर्माण झालेला बायोगॅस या तडांद्वारे वातावरणात बाहेर पडू शकतो.
08:44 म्हणूनच लवकरात लवकर ह्या तडांना सीलबंद करणे.
08:51 ३ वर्षातून एकदा, गवंडी डायजेस्टर टॅंकच्या आतल्या भिंतीला पून्हा रंग करतो.
09:03 हे पांढरे सिमेंट आणि चिकटवण्यासाठी कृत्रिमचे मिश्रण वापरून केले जाते.
09:15 जर तडा असेल तर, तडांना सील बंद करण्यास ह्या मिश्रणाची मदत होईल.
09:23 हे मिश्रण तयार करण्यासाठी खालील प्रकारे वापरा- पाणी २ लिटर , कृत्रिम चिकटवण्यास २५० ग्रॅम, पांढरे सिमेंट २ किलो.
09:49 व्यवस्थित मिसळा. आणि वापरा
09:55 थोडक्यात: ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण बायोगॅस संयंत्र आणि बायोगॅस बर्नरचे देखरेख आणि दुरुस्ती करण्यासाठी विविध तंत्र शिकलो.
10:13 हा व्हिडिओ IIT बॉम्बे, मधील Rural-ICT संघ व स्पोकन ट्युटोरियल संघाच्या सूक्ताने तयार केले आहे.
10:26 या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी या लिंकवर जाऊ शकता.
10:35 मी रंजना भांबळे स्पोकन ट्युटोरियल संघाची सदस्य आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana