Advance-C/C2/Union-and-Typedef/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:24, 11 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Advance C मधील Typedef and Union वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात आपण काही उदाहरणांच्या सहाय्याने, 'typedef' कीवर्ड आणि 'union' कीवर्ड बद्दल जाणून घेऊ.
00:17 येथे, उबंटु ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 11.10. आणि उबंटुवरील gcc कंपायलरचे 4.6.1 वर्जन वापरणार आहोत.
00:29 या पाठासाठी 'C' वरील पाठांचे ज्ञान असावे.
00:36 नसल्यास संबंधित पाठांसाठी येथे दाखवलेल्या आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:43 प्रथम typedef कीवर्ड बद्दल जाणून घेऊ.
00:49 उपलब्ध किंवा user-defined datatypes ला सांकेतिक नाव देण्यासाठी Typedef या कीवर्डचा उपयोग केला जातो.
00:58 या पध्दतीने कमांडस साठी उपनाव घोषित करता येते.
01:03 कोडला स्पष्टता प्रदान करण्यास हे मदत करते.
01:07 यामुळे कोड सहजपणे समजतो आणि तो बदलताही येतो.
01:12 सिंटॅक्स असा आहे: typedef existing_name alias_name. उदाहरणार्थ: typedef unsigned int uint;
01:24 आपला कोड पाहू.
01:28 'pallindrome.c' हे आपल्या फाईलचे नाव आहे.
01:34 ह्या प्रोग्रॅममधे दिलेला अंक palindrome म्हणजे उलट सुलट वाचला तरी सारखाच राहतो का हे तपासू.
01:41 typedef कीवर्डच्या सहाय्याने unsigned int या डेटाटाईपला 'uint' हे उपनाव दिले.
01:52 व्हेरिएबल्स घोषित करण्यासाठी uint वापरू.
01:59 palindrome तपासण्यासाठी हे लॉजिक वापरले आहे.
02:03 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
02:06 Ctrl+Alt+T ही बटणे एकत्रित दाबून टर्मिनल उघडा.
02:16 टाईप करा: gcc space pallindrome dot c space hyphen o space pallindrome. एंटर दाबा.
02:29 टाईप करा : dot slash pallindrome
02:34 आपल्याला दिसेल: "Enter any three digit number".
02:38 मी 121 टाईप करत आहे.
02:42 आऊटपुट असे दिसेल: "Given number is a palindrome number".
02:47 आता union datatype जाणून घेऊ.
02:52 Union म्हणजे संग्रह केलेल्या विविध डेटाटाईप्सचा संच.
02:57 Union त्याच्या सर्व सदस्यांना एकच स्टोरेज स्पेस म्हणजे संचित करण्याची जागा विभागून देते.
03:03 एकावेळी युनियनचा एकच सदस्य ऍक्सेस करता येतो.
03:08 सिंटॅक्स 1: union union_name महिरपी कंसात members; महिरपी कंसाबाहेर union_variableआणि सेमीकोलन.
03:21 यासाठी आणखी एक सिंटॅक्स देखील आहे.

सिंटॅक्स 2: union union_name महिरपी कंसात members; महिरपी कंसाबाहेर सेमीकोलन union union_name union_variable;

03:39 उदाहरण पाहू.
03:41 आपल्या फाईलमधील कोड समजून घेऊ.
03:47 "union dot c" हे आपल्या फाईलचे नाव आहे.
03:52 आपण student नावाचे union घोषित केले आहे.
03:56 येथे english, maths आणि science ही तीन व्हेरिएबल्स आहेत.
04:02 main() फंक्शनमधे stud हे union व्हेरिएबल घोषित केले आहे.
04:09 येथे union व्हेरिएबलच्या सहाय्याने union सदस्य ऍक्सेस करू शकतो.stud dot english, stud dot maths, stud dot science
04:21 नंतर आपण एकूण गुण कॅलक्युलेट करून ते दाखवणार आहोत.
04:26 कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा: gcc space union dot c space hyphen o space union आणि टाईप करा: dot slash union
04:44 हे आऊटपुट दिसेल: "Total is 228".
04:50 structure आणि union मधील फरक पाहू.
04:55 Union त्याच्या सर्व सदस्यांना एकच स्टोरेज स्पेस विभागून देते.
05:01 Structure त्याच्या सर्व सदस्यांना स्वतंत्र स्टोरेज स्पेस प्रदान करते.
05:07 Union कमी मेमरी स्पेस व्यापते.
05:11 Structure अधिक मेमरी स्पेस व्यापते .
05:14 union चे उदाहरण: union student{int marks; char name[6]; double average;};
05:27 union व्हेरिएबलसाठी मेमरीचे ऍलोकेशन 8 bytes असेल कारण double datatype सर्वात जास्त मेमरी स्पेस व्यापतो.
05:39 structure: चे उदाहरण struct student{int mark; char name[6]; double average;};
05:48 structure व्हेरिएबलचे मेमरी ऍलोकेशन: 2bytes+6bytes+8bytes =16bytes. असे असेल.
06:00 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
06:04 थोडक्यात,
06:06 आपण शिकलो: typedef , union, union आणि structure मधील फरक.
06:14 असाईनमेंट,
06:17 कर्मचा-यांच्या नोंदी दाखवणारा प्रोग्रॅम लिहा.
06:21 जसे की name, address, salary.
06:25 employee नावाने union घोषित करा.
06:29 typedef च्या सहाय्याने त्याला emp असे उपनाव द्या.
06:35 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
06:39 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:42 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
06:47 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
06:53 ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
07:04 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:08 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:16 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. http://spoken-tutorial.org\NMEICT-Intro
07:22 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana