Advance-C/C2/Union-and-Typedef/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Advance C मधील Typedef and Union वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात आपण काही उदाहरणांच्या सहाय्याने, 'typedef' कीवर्ड आणि 'union' कीवर्ड बद्दल जाणून घेऊ. |
00:17 | येथे, उबंटु ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 11.10. आणि उबंटुवरील gcc कंपायलरचे 4.6.1 वर्जन वापरणार आहोत. |
00:29 | या पाठासाठी 'C' वरील पाठांचे ज्ञान असावे. |
00:36 | नसल्यास संबंधित पाठांसाठी येथे दाखवलेल्या आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:43 | प्रथम typedef कीवर्ड बद्दल जाणून घेऊ. |
00:49 | उपलब्ध किंवा user-defined datatypes ला सांकेतिक नाव देण्यासाठी Typedef या कीवर्डचा उपयोग केला जातो. |
00:58 | या पध्दतीने कमांडस साठी उपनाव घोषित करता येते. |
01:03 | कोडला स्पष्टता प्रदान करण्यास हे मदत करते. |
01:07 | यामुळे कोड सहजपणे समजतो आणि तो बदलताही येतो. |
01:12 | सिंटॅक्स असा आहे: typedef existing_name alias_name. उदाहरणार्थ: typedef unsigned int uint; |
01:24 | आपला कोड पाहू. |
01:28 | 'pallindrome.c' हे आपल्या फाईलचे नाव आहे. |
01:34 | ह्या प्रोग्रॅममधे दिलेला अंक palindrome म्हणजे उलट सुलट वाचला तरी सारखाच राहतो का हे तपासू. |
01:41 | typedef कीवर्डच्या सहाय्याने unsigned int या डेटाटाईपला 'uint' हे उपनाव दिले. |
01:52 | व्हेरिएबल्स घोषित करण्यासाठी uint वापरू. |
01:59 | palindrome तपासण्यासाठी हे लॉजिक वापरले आहे. |
02:03 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
02:06 | Ctrl+Alt+T ही बटणे एकत्रित दाबून टर्मिनल उघडा. |
02:16 | टाईप करा: gcc space pallindrome dot c space hyphen o space pallindrome. एंटर दाबा. |
02:29 | टाईप करा : dot slash pallindrome |
02:34 | आपल्याला दिसेल: "Enter any three digit number". |
02:38 | मी 121 टाईप करत आहे. |
02:42 | आऊटपुट असे दिसेल: "Given number is a palindrome number". |
02:47 | आता union datatype जाणून घेऊ. |
02:52 | Union म्हणजे संग्रह केलेल्या विविध डेटाटाईप्सचा संच. |
02:57 | Union त्याच्या सर्व सदस्यांना एकच स्टोरेज स्पेस म्हणजे संचित करण्याची जागा विभागून देते. |
03:03 | एकावेळी युनियनचा एकच सदस्य ऍक्सेस करता येतो. |
03:08 | सिंटॅक्स 1: union union_name महिरपी कंसात members; महिरपी कंसाबाहेर union_variableआणि सेमीकोलन. |
03:21 | यासाठी आणखी एक सिंटॅक्स देखील आहे.
सिंटॅक्स 2: union union_name महिरपी कंसात members; महिरपी कंसाबाहेर सेमीकोलन union union_name union_variable; |
03:39 | उदाहरण पाहू. |
03:41 | आपल्या फाईलमधील कोड समजून घेऊ. |
03:47 | "union dot c" हे आपल्या फाईलचे नाव आहे. |
03:52 | आपण student नावाचे union घोषित केले आहे. |
03:56 | येथे english, maths आणि science ही तीन व्हेरिएबल्स आहेत. |
04:02 | main() फंक्शनमधे stud हे union व्हेरिएबल घोषित केले आहे. |
04:09 | येथे union व्हेरिएबलच्या सहाय्याने union सदस्य ऍक्सेस करू शकतो.stud dot english, stud dot maths, stud dot science |
04:21 | नंतर आपण एकूण गुण कॅलक्युलेट करून ते दाखवणार आहोत. |
04:26 | कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा: gcc space union dot c space hyphen o space union आणि टाईप करा: dot slash union |
04:44 | हे आऊटपुट दिसेल: "Total is 228". |
04:50 | structure आणि union मधील फरक पाहू. |
04:55 | Union त्याच्या सर्व सदस्यांना एकच स्टोरेज स्पेस विभागून देते. |
05:01 | Structure त्याच्या सर्व सदस्यांना स्वतंत्र स्टोरेज स्पेस प्रदान करते. |
05:07 | Union कमी मेमरी स्पेस व्यापते. |
05:11 | Structure अधिक मेमरी स्पेस व्यापते . |
05:14 | union चे उदाहरण: union student{int marks; char name[6]; double average;}; |
05:27 | union व्हेरिएबलसाठी मेमरीचे ऍलोकेशन 8 bytes असेल कारण double datatype सर्वात जास्त मेमरी स्पेस व्यापतो. |
05:39 | structure: चे उदाहरण struct student{int mark; char name[6]; double average;}; |
05:48 | structure व्हेरिएबलचे मेमरी ऍलोकेशन: 2bytes+6bytes+8bytes =16bytes. असे असेल. |
06:00 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
06:04 | थोडक्यात, |
06:06 | आपण शिकलो: typedef , union, union आणि structure मधील फरक. |
06:14 | असाईनमेंट, |
06:17 | कर्मचा-यांच्या नोंदी दाखवणारा प्रोग्रॅम लिहा. |
06:21 | जसे की name, address, salary. |
06:25 | employee नावाने union घोषित करा. |
06:29 | typedef च्या सहाय्याने त्याला emp असे उपनाव द्या. |
06:35 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
06:39 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06:42 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
06:47 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
06:53 | ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
07:04 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07:08 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
07:16 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. http://spoken-tutorial.org\NMEICT-Intro |
07:22 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |