Git/C2/Tagging-in-Git/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 18:40, 2 March 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
|
|
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या Tagging in Git वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात शिकणार आहोत: टॅगिंग आणि टॅगिंग चे प्रकार. |
00:12 | या पाठासाठी वापरणार आहोत:
उबंटु लिनक्स 14.04, Git 2.3.2 आणि gedit टेक्स्ट एडिटर तुम्ही तुमच्या पसंतीचा एडिटर देखील वापरू शकता. |
00:28 | या पाठासाठी - टर्मिनलवर वापरल्या जाणा-या लिनक्स कमांडसचे ज्ञान आवश्यक आहे. नसल्यास संबंधित लिनक्स वरील पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:41 | टॅगिंग बद्दल जाणून घेऊ. |
00:44 | एखाद्या कमिटचा टप्पा महत्वाचा म्हणून चिन्हांकित करणे म्हणजे टॅगिंग. |
00:49 | पुढील संदर्भासाठी बुकमार्क केल्याप्रमाणे आपण कमिट टॅग करू शकतो. |
00:54 | सामान्यपणे हे म्हणजे प्रकल्पाचे प्रकाशन v1.0 आहे असे चिन्हांकित करण्यासारखे आहे. |
01:02 | दोन प्रकारचे टॅग्ज आहेत: Lightweight टॅग आणि Annotated टॅग |
01:09 | प्रथम lightweight टॅग कसा बनवायचा हे जाणून घेऊ. |
01:15 | आपण बनवलेल्या mywebpage Git रिपॉझिटरीमधे जाऊ. |
01:21 | टर्मिनलवर जाऊन टाईप करा: cd space mywebpage आणि एंटर दाबा. |
01:30 | मी येथे html फाईल्स वापरणार आहे. |
01:34 | तुम्ही तुमच्या पसंतीची फाईल वापरू शकता. |
01:39 | Git log तपासण्यासाठी टाईप करा git space log space hyphen hyphen oneline आणि एंटर दाबा. |
01:48 | सध्या आपल्या रिपॉझिटरीमधे "Added colors, Added history.html" आणि "Initial commit" अशी तीन कमिटस आहेत. |
01:59 | आता “Added colors” या सर्वात शेवटच्या कमिटमधे lightweight टॅग बनवू. |
02:05 | आपण टॅग बनवतो तेव्हा डिफॉल्ट रूपात तो सर्वात शेवटच्या कमिटमधे बनतो. |
02:12 | टाईप करा:git space tag space v1.1 आणि एंटर दाबा. |
02:20 | येथे मी v1.1 असे टॅगचे नाव देत आहे. तुम्ही कोणतेही देऊ शकता. |
02:29 | टॅग बघण्यासाठी टाईप करा git space tag आणि एंटर दाबा. |
02:35 | आता आपल्या रिपॉझिटरीमधे केवळ एकच टॅग आहे. |
02:39 | पुढे आपण annotated टॅग बनवण्याबद्दल जाणून घेऊ. |
02:44 | त्यासाठी प्रथम mypage.html या फाईलमधे काही बदल करणार आहोत. |
02:52 | टाईप करा: gedit space mypage.html space ampersand आणि एंटर दाबा. फाईलमधे काही ओळी समाविष्ट करू. |
03:04 | नंतर फाईल सेव्ह करून बंद करा. |
03:07 | या टप्प्यावर आपले काम कमिट करू. |
03:11 | टाईप करा:git space commit space hyphen a m space डबल कोटसमधे “Added content in mypage.html” आणि एंटर दाबा. |
03:25 | हा टप्पा प्रोजेक्टसाठी अतिशय महत्वाचा आहे असे समजू. |
03:31 | त्यामुळे या कमिट पॉईंटवर टॅग बनवणे गरजेचे आहे. |
03:35 | येथे annotated टॅग बनवणार आहोत. |
03:39 | टाईप करा:git space tag space hyphen a space v1.2 space hyphen m space डबल कोटसमधे “My Version 1.2” आणि एंटर दाबा. |
03:55 | -m फ्लॅग वापरून तुम्ही कोणताही टॅग मेसेज देऊ शकता. |
04:01 | येथे tag मेसेज ऐच्छिक आहे. |
04:05 | टॅगची सूची बघण्यासाठी टाईप करा:git space tag आणि एंटर दाबा. आता आपल्याकडे दोन टॅग आहेत. |
04:14 | येथे v1.1 हा lightweight टॅग आहे तर v1.2 हा annotated टॅग आहे. |
04:21 | टॅगमधील फरक आपल्याला कसा ओळखता येईल? |
04:24 | git show कमांडच्या सहाय्याने दोन टॅगमधील फरक आपण पाहू शकतो. |
04:31 | टाईप करा:git space show space v1.1 आणि एंटर दाबा. |
04:38 | येथे lightweight tag v1.1 चा संपूर्ण तपशील पाहू शकता. |
04:44 | हे केवळ कमिटचा तपशील आणि फाईलमधील बदल दाखवते. |
04:50 | पुढे annotated tag v1.2 चा तपशील पाहू. त्यासाठी टाईप करा:git space show space v1.2 आणि एंटर दाबा. |
05:03 | येथे आपण पाहू शकतो: टॅगचे नाव, टॅगरचा तपशील, कमिट टॅग केल्याची तारीख, टॅग मेसेज, कमिटचा तपशील, फाईलमधील बदल. |
05:17 | सहका-यांसोबत काम करताना Annotated टॅगचा वापर करणे जास्त उपयोगी ठरेल. |
05:23 | जुन्या कमिटसमधे टॅग कसे चिन्हांकित करायचे हे जाणून घेऊ. |
05:29 | प्रथम Git लॉग तपासू. त्यासाठी टाईप करा git space log space hyphen hyphen oneline आणि एंटर दाबा. |
05:39 | उदाहरणादाखल मला “Added history.html” या दुस-या कमिटमधे टॅग समाविष्ट करायचा आहे. |
05:47 | टाईप करा: git space tag space hyphen a space v1.0 space. नंतर “Added history.html” space चा commit hash कॉपी करून पेस्ट करा. पुढे टाईप करा:hyphen m space डबल कोटसमधे “'My Version 1.0” आणि एंटर दाबा. |
06:09 | आता बनवलेला टॅग बघण्यासाठी टाईप करा git space tag आणि एंटर दाबा. |
06:19 | येथे बनवलेला tag v1.0 बघू शकतो. |
06:24 | पुढे आपण Git लॉगबरोबर टॅग्ज कसे बघायचे ते जाणून घेऊ. |
06:29 | टाईप करा:git space log space hyphen hyphen oneline space hyphen hyphen decorate आणि एंटर दाबा. |
06:40 | आपण टॅगच्या नावांसहित Git लॉग पाहू शकतो. |
06:44 | आता नको असलेले टॅग कसे डिलिट करायचे ते पाहू. |
06:49 | समजा आपल्याला tag v1.1 डिलिट करायचा आहे. |
06:53 | टाईप करा:git space tag space hyphen d space v1.1 आणि एंटर दाबा. |
07:02 | हे “Deleted tag v1.1” आणि commit hash असा मेसेज दाखवत आहे. |
07:08 | टॅग डिलिट झाला की नाही हे तपासून पाहू. |
07:14 | टाईप करा:git space tag आणि एंटर दाबा. |
07:19 | आपल्याला tag v1.1 दिसत नाही कारण तो यशस्वीरित्या डिलिट झाला आहे. |
07:25 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
07:29 | थोडक्यात, आपण या पाठात शिकलो: टॅगिंग आणि टॅगिंग चे प्रकार. |
07:38 | असाईनमेंट - lightweight टॅग आणि annotated टॅग बनवा आणि दोन्ही टॅग्ज मधला फरक समजून घ्या. |
07:47 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07:56 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08:03 | अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
08:08 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. या मिशनसंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08:20 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |