Ruby/C3/Object-Oriented-Concept-in-Ruby/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 08:14, 3 July 2014 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Object-Oriented-Concept-in-Ruby

Author: Manali Ranade

Keywords: Ruby


Time Narration


00.01 रुबी मधील Object Oriented Concept वरील पाठात आपले स्वागत.
00.06 या पाठात शिकणार आहोत,
00.08 क्लासेस,
00.09 ऑब्जेक्ट बनवणे
00.10 रुबी मधील मेथडस घोषित करण्याच्या पध्दती.
00.13 येथे आपण,
00.14 उबंटु लिनक्स वर्जन 12.04 आणि
00.16 रुबी 1.9.3 वापरणार आहोत.
00.19 या पाठासाठी लिनक्स कमांडस, टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे.
00.24 संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00.28 तुम्हाला आठवत असेल की आपण ttt डिरेक्टरी बनवली होती.
00.33 त्या डिरेक्टरीवर जाऊ.
00.35 नंतर ruby hyphen tutorial आणि classes ह्या डिरेक्टरीत जा.
00.41 रुबी ही object oriented लँग्वेज आहे.
00.44 रुबीमधील स्ट्रिंग किंवा नंबर पासून व्हॅल्यूपर्यंत सर्व काही म्हणजे ऑब्जेक्ट्स.
00.49 क्लास म्हणजे संबंधित डेटा आणि फंक्शन्सचा संच.
00.53 माहितीत सुसूत्रता ठेवण्यास यांचा उपयोग होतो.
00.56 ऑब्जेक्ट म्हणजे क्लासचा instanceतयार करणे.
01.00 class ह्या कीवर्डद्वारे क्लास घोषित केला जातो.
01.05 त्याच्यापुढे क्लासचे नाव दिले जाते.
01.08 शेवट “end” द्वारे होतो.
01.11 क्लासचे उदाहरण पाहू.
01.14 class Product
01.16 ruby कोड
01.17 end
01.20 क्लासच्या नावाची सुरूवात कॅपिटल अक्षराने होणे आवश्यक आहे .
01.24 ज्या नावात एकापेक्षा अधिक शब्द असतील ते camelcased असणे आवश्यक आहे.
01.28 उदाहरणार्थ,
01.30 UserInformation
01.32 ProductInformation
01.34 यानंतरची फाईल नेम्स त्यातील शब्द underscoreने जोडून लिहू.
01.37 user underscore information
01.40 product underscore information
01.45 रुबीच्या सुरूवातीच्या पाठात दाखवल्याप्रमाणे gedit मधे नवी फाईल बनवा.
01.48 त्याला class_definition.rb असे नाव द्या.
01.52 माझ्याकडे क्लासेस चा वापर केलेले एक उदाहरण आहे.
01.57 पाठ थांबवून तुम्ही कोड टाईप करू शकता.
02.02 या उदाहरणात मी Order नामक क्लास घोषित केला आहे.
02.05 आता हा क्लास उपयोगी बनवण्यासाठी त्यात काही व्हेरिएबल्स समाविष्ट करू.
02.11 मी “myinstance” हे इन्स्टन्स व्हेरिएबल घोषित केले आहे .
02.15 आणि त्याला व्हॅल्यू दिली आहे.
02.18 “myclassvar” नावाचे क्लास व्हेरिएबल घोषित केले आहे .
02.21 आणि त्याला व्हॅल्यू दिली आहे.
02.24 आता हा क्लास उपयोगी बनवण्यासाठी त्यात कोड समाविष्ट करू.
02.30 टाईप करा puts Order dot instance underscore variables.
02.36 या ओळीच्या आधी नव्या ओळीकरता टाईप करा puts काही कॅरॅक्टर्स आणि slash n.
02.43 ही ओळ कॉपी करून ती ह्या ओळीच्या खाली पेस्ट करा व फाईल सेव्ह करा.
02.51 आता हा कोड कार्यान्वित करू.
02.53 टर्मिनलवर जा आणि टाईप करा
02.56 ruby space class underscore definition dot rb
03.02 आणि आऊटपुट बघा.
03.05 आपण घोषित केलेले instance व्हेरिएबल दिसेल.
03.09 आता टाईप करा puts Order dot class underscore variables.
03.15 डिमार्केशन, लगेच ओळीच्या खाली कॉपी आणि पेस्ट करून सेव्ह करा.
03.21 आता टर्मिनलवर जा आणि आधीसारखीच फाईल कार्यान्वित करा.
03.26 आपण घोषित केलेले क्लास व्हेरिएबल देखील दाखवले जात आहे.
03.32 आता तुम्ही स्वतःचा क्लास बनवू शकता.
03.35 आता ऑब्जेक्ट म्हणजे काय ते पाहू.
03.40 ऑब्जेक्ट म्हणजे क्लास चा instance .
03.43 ऑब्जेक्ट हे क्लास पासून बनलेले असते.
03.46 क्लासमधे घोषित केलेल्या प्रॉपर्टीज आणि मेथडस ऑब्जेक्ट मधे असतात.
03.52 ऑब्जेक्ट कसे घोषित करायचे?
03.54 new कीवर्डद्वारे क्लासचा ऑब्जेक्ट घोषित केला जातो .
03.58 येथे Product क्लासचा ऑब्जेक्ट घोषित करत आहोत.
04.02 येथे आपले ऑब्जेक्ट बनेल.
04.05 product = Product.new
04.09 ह्या क्रियेला ऑब्जेक्टचे इनिशियलायझेशन असे म्हणतात.
04.12 हे ऑब्जेक्ट Product प्रकाराचे आहे.
04.16 आता आपण “initialize” ही मेथड बघू.
04.20 initialize मेथड ऑब्जेक्ट तयार करताना कॉल केली जाते.
04.26 new या कीवर्डने ऑब्जेक्ट कॉल करताना, आपण इनिशियलाईज मेथड वापरतो.
04.31 इनिशियलाईज मेथडला अनेक parameters असू शकतात.
04.37 इतर रुबी मेथडसप्रमाणेच, तिची सुरूवात “def” कीवर्डने होते.
04.43 त्याचे उदाहरण पाहू.
04.46 रुबीच्या सुरूवातीच्या पाठात दाखवल्याप्रमाणे gedit मधे नवी फाईल बनवा.
04.50 आणि त्याला object undescore initialize dot rb असे नाव द्या.
04.55 माझ्याकडे ऑब्जेक्ट इनिशियलायझेशन कोडचे उदाहरण आहे.
05.00 पाठ थांबवून तुम्ही कोड टाईप करू शकता.
05.04 येथे आपण “Order” नावाचा क्लास घोषित केला आहे.
05.08 नंतर अर्ग्युमेंटशिवाय इनिशियलाईज मेथड घोषित केली आहे.
05.13 नंतर “I have created an object” हा मेसेज दाखवणारी puts मेथड लिहिली आहे.
05.20 नंतर Order dot new असे टाईप केले आहे.
05.24 जे इनिशियलाईज मेथड कॉल करेल.
05.27 टर्मिनलवर जा आणि टाईप करा
05.31 ruby space object underscore initialize dot rb
05.36 आणि आऊटपुट बघा.
05.39 I have created an object” असा मेसेज दिसेल.
05.43 आता gedit वर जाऊन मेथडमधे अर्ग्युमेंट समाविष्ट करा.
05.48 putsमधे काही बदल करू .
05.51 ह्याने पास केलेल्या अर्ग्युमेंटसच्या व्हॅल्यूज दाखवल्या पाहिजेत.
05.55 पुढे टाईप करा.
05.56 Order dot new(“I have created an object”).
06.04 येथे नव्या मेथडला अर्ग्युमेंट दिली आहे.
06.08 हे अर्ग्युमेंट इनिशियलाईज मेथडला पास केले जाते .
06.13 टर्मिनलवर जा आणि टाईप करा
06.16 ruby space object underscore initialize dot rb
06.20 आणि आऊटपुट पहा.
06.22 आपल्याला “I have created an object” असा मेसेज दिसेल.
06.29 आता तुम्हाला object initialization चा अर्थ लक्षात येईल.
06.33 लक्षात घ्या, रुबीतील मेथडस ही क्लासने वापरलेली functions असतात.
06.39 क्लास मधील प्रत्येक मेथड ही “def” आणिend” ब्लॉकमधे घोषित केलेली असते.
06.45 अनेक शब्दांनी बनवलेले मेथडचे नाव underscoreने जोडतात.
06.48 मेथडच्या नावाला काही कॅरॅक्टर्स जोडता येतात ती म्हणजे
06.54 ? (question-mark)
06.56 = (equal to)
06.58 प्रत्येक कॅरॅक्टर मुळे मेथडला वेगळा अर्थ प्राप्त होतो.
07.02 काही उदाहरणे पाहू.
07.05 रुबीच्या सुरूवातीच्या पाठात दाखवल्याप्रमाणे gedit मधे नवी फाईल बनवा.
07.09 त्याला class underscore methods dot rb असे नाव द्या.
07.14 माझ्याकडे क्लास मेथडसच्या कोडचे एक उदाहरण आहे.
07.17 पाठ थांबवून तुम्ही कोड टाईप करू शकता.
07.21 येथे “Animal” नावाचा क्लास घोषित केला आहे.
07.23 आपल्याकडे “breathe” आणिwalk” या मेथडस आहेत .
07.28 त्या “def” आणिend” कीवर्डस वापरून लिहिल्या आहेत.
07.32 Animalहे ऑब्जेक्ट इनिशियलाईज केले आहे.
07.36 आणि ते “animal” व्हेरिएबलला दिले. येथे “a” लोअरकेसमधे आहे.
07.40 यानंतर “breathe” आणि “walk” या मेथडस एकामागून एक कॉल केल्या आहेत.
07.48 आता प्रोग्रॅम कार्यान्वित करा.
07.51 टर्मिनलवर जा आणि टाईप करा
07.53 ruby space class underscore methods dot rb
07.58 आणि आऊटपुट पहा.
08.00 “ I breathe”
08.02 “ I walk”
08.03 या ओळी
08.04 प्रिंट झालेल्या दिसतील.
08.05 कारण आपण “breathe” आणिwalk” मेथडस कॉल केल्या होत्या.
08.10 या मेथडस मधे लिहिलेली “puts” स्टेटमेंटस आपल्याला हा रिझल्ट दाखवतील .
08.16 आता question markने संपणा-या मेथडस कशा तयार करायच्या ते पाहू.
08.21 रुबीच्या सुरूवातीच्या पाठात दाखवल्याप्रमाणे gedit मधे नवी फाईल बनवा.
08.25 आणि त्याला class underscore methods underscore with underscore trailing underscore characters dot rb असे नाव द्या.
08.35 माझ्याकडे question mark सहित क्लास मेथडच्या कोडचे उदाहरण आहे.
08.40 पाठ थांबवून तुम्ही कोड टाईप करू शकता.
08.45 येथे आपण उदाहरण म्हणून पूर्वीचाच क्लास घेतला आहे.
08.48 येथे breathe मेथडच्या शेवटी “question mark (?)” आहे.
08.52 अशा मेथडस सामान्यतः boolean values परत करतात.
08.55 हे रुबीतील मेथडसच्या naming convention प्रमाणे आहे.
09.00 ही मेथड animal dot breathe question-mark असे लिहून कॉल केली जाते.
09.06 टर्मिनलवर जा आणि टाईप करा
09.09 ruby space class underscore methods underscore with underscore trailing underscore characters dot rb आणि आऊटपुट पहा.
09.22 true” हे आऊटपुट मिळेल.
09.26 पुढे “walk” नामक आणखी मेथड घोषित करू .
09.30 त्याच्या आधी equal-to चिन्ह “=(value)” लिहू.
09.36 ही मेथड animal dot walk लिहून कॉल करतात.
09.41 ही मेथड कार्यान्वित करू.
09.44 टर्मिनलवर जा आणि टाईप करा
09.45 ruby class underscore methods underscore with underscore trailing underscore characters dot rb
09.52 आणि आऊटपुट पहा.
09.56 undefined method” अशी एरर मिळेल.
09.59 कारण equal to चिन्हाला वेगळा अर्थ आहे.
10.03 मेथडला व्हॅल्यू देण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
10.08 आता आपण ही मेथड वेगळ्या पध्दतीने कॉल करू.
10.13 टाईप करा puts animal dot walk equal to “ hops”
10.17 पुन्हा एकदा करून बघू.
10.20 टर्मिनलवर जा. मागील कमांड कार्यान्वित करून आऊटपुट बघा.
10.27 hops” शब्द प्रिंट झालेला दिसेल.
10.30 मेथडच्या पुढीलequal to चे चिन्ह हे व्हॅल्यू देण्यासाठी आहे असे दाखवते.
10.36 आता तुम्ही मेथडस लिहू शकता.
10.42 या पाठात आपण शिकलो,
10.44 क्लासेस घोषित करणे
10.46 क्लासचे ऑब्जेक्ट्स घोषित करणे
10.48 रुबीमधील मेथडस घोषित करण्याच्या विविध पध्दती.
10.52 आता असाईनमेंट.
10.54 Product नामक क्लास घोषित करा.
10.56 “myvar” च्या व्हॅल्यू घेण्यासाठी आणि सेट करण्यासाठी मेथडस घोषित करा.
11.01 व्हॅल्यू सेट करण्यासाठी “=” चिन्ह वापरून मेथड घोषित करा .
11.05 वरील क्लासचे ऑब्जेक्ट Instantiate करा आणि वरील दोन्ही मेथडस वापरून व्हॅल्यू set आणि get करा.
11.12 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
11.14 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11.18 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
11.22 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
11.24 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11.27 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11.30 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
11.36 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11.39 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11.46 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11.56 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana