Ruby/C2/Logical-and-other-Operators/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Arithmetic-and-Relational-Operators
Author: Manali Ranade
Keywords: Ruby
Time | Narration
|
---|---|
00.01 | रुबीमधील Arithmetic आणि Relational Operators वरील पाठात आपले स्वागत. |
00.06 | या पाठात शिकणार आहोत, |
00.08 | ऍरीथमेटिक ऑपरेटर्स |
00.10 | ऑपरेटर्सचा प्राधान्यक्रम |
00.12 | रिलेशनल ऑपरेटर्स |
00.14 | येथे उबंटु लिनक्स वर्जन12.04 आणि रुबी 1.9.3 वापरणार आहोत. |
00.23 | या पाठासाठी तुम्हाला लिनक्स टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे. |
00.28 | तसेच irb चा परिचय असावा. |
00.31 | नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00.34 | आता ऍरीथमेटिक ऑपरेटर्स बद्दल जाणून घेऊ. |
00.38 | रुबीमधील ऍरीथमेटिक ऑपरेटर्स असे आहेत. |
00.42 | + बेरीज: उदाहरणार्थ. a+b. |
00.45 | - वजाबाकी: उदाहरणार्थ. a-b. |
00.48 | / भागाकार: उदाहरणार्थ. a/b. |
00.51 | * गुणाकार: उदाहरणार्थ. a*b. |
00.55 | % मॉड्युलस: उदाहरणार्थ. a%b. |
00.59 | ** घातांक: उदाहरणार्थ a**b |
01.04 | irb द्वारे ही ऍरीथमेटिक ऑपरेटर्स वापरून बघू . |
01.08 | Ctrl, Alt आणि T एकत्रित दाबून टर्मिनल उघडा. |
01.14 | स्क्रीनवर टर्मिनल विंडो उघडेल. |
01.17 | इंटरऍक्टीव्ह रुबी उघडण्यासाठी टाईप करा irb आणि एंटर दाबा. |
01.21 | टाईप करा 10 अधिक20 आणि एंटर दाबा. |
01.25 | बेरजेची क्रिया होऊन 30 उत्तर मिळाले. |
01.31 | तसेच वजाबाकी आणि गुणाकार ह्या क्रिया करता येतात. |
01.35 | भागाकार करून बघू. |
01.38 | टाईप करा 10 स्लॅश 4 |
01.40 | आणि एंटर दाबा. |
01.42 | येथे दिसेल की अपूर्णांकाचा भाग कापून 2 असे पूर्णांकात उत्तर मिळाले. |
01.47 | अधिक अचूक उत्तर मिळण्यासाठी एक संख्या float म्हणून देणे आवश्यक आहे. |
01.52 | टाईप करा 10.0 स्लॅश 4 |
01.56 | आणि एंटर दाबा. |
01.58 | 2.5 असे उत्तर मिळेल. |
02.01 | आता modulus ऑपरेटर वापरून बघू. |
02.05 | modulus ऑपरेटर आऊटपुट म्हणून बाकी देतो. |
02.09 | टाईप करा 12 पर्सेंटेजचे चिन्ह 5 आणि एंटर दाबा. |
02.15 | येथे 12 ला 5 ने भागले जाईल आणि 2 ही बाकी मिळेल. |
02.21 | आता घातांक वापरून बघू. |
02.24 | 2, नंतर दोन वेळा asterisk चे चिन्ह आणि 5 टाईप करा. एंटर दाबा. |
02.32 | याचा अर्थ 2 चा पाचवा घात 5. |
02.36 | आपल्याला 32 हे आऊटपुट मिळेल. |
02.39 | पुढे ऑपरेटर प्राधान्यक्रमाबद्दल जाणून घेऊ. |
02.44 | पदावलीमधे अनेक गणिती क्रिया असल्यास, |
02.47 | प्रत्येक भागाचे वेगळे मूल्यमापन होते, |
02.50 | आणि उत्तर काढण्यासाठी पूर्वी ठरवलेल्या प्राधान्यक्रम वापरतात. |
02.56 | ह्याचा अर्थ सर्वाधिक प्राधान्य असलेला ऑपरेटर सर्वप्रथम कार्यान्वित होतो. |
03.01 | नंतर प्राधान्य क्रमानुसार पुढील ऑपरेटर कार्यान्वित होतो. |
03.07 | सर्वाधिक पासून सर्वात कमी प्राधान्य असलेल्या सर्व ऑपरेटर्सची सूची ह्या स्लाईडवर आहे. |
03.13 | उदाहरणार्थ 3 + 4 * 5 आपल्याला 23 उत्तर देईल 35 नाही. |
03.23 | गुणाकाराच्या (*) क्रियेला बेरजेच्या (+) क्रियेपेक्षा अधिक प्राधान्य आहे. |
03.29 | त्यामुळे ते प्रथम कार्यान्वित होईल. |
03.32 | त्यामुळे चार गुणिले पाच बरोबर 20 आणि नंतर त्यात तीन मिळवले गेले आणि 23 हे आऊटपुट मिळाले. |
03.42 | ऑपरेटरला प्राधान्य देण्यावर आधारित असलेली आणखी काही उदाहरणे पाहू. |
03.47 | टर्मिनलवर जा. |
03.50 | Crtl आणि L एकत्रित दाबूनirb कन्सोल क्लियर करा. |
03.56 | टाईप करा 7 वजा 2 गुणिले 3 |
04.03 | आणि एंटर दाबा. |
04.05 | आपल्याला 1 हे उत्तर मिळेल. |
04.08 | येथे ऍस्टेरिक चिन्हाला वजाच्या चिन्हापेक्षा अधिक प्राधान्य आहे. |
04.13 | त्यामुळे प्रथम गुणाकार आणि नंतर वजाबाकीची क्रिया केली जाईल. |
04.20 | दुसरे उदाहरण पाहू. |
04.22 | टाईप करा कंसात 10 अधिक 2, कंस पूर्ण, स्लॅश 4 |
04.29 | आणि एंटर दाबा. |
04.30 | आपल्याला 3 हे उत्तर मिळेल. |
04.33 | येथे भागाकार (स्लॅश) पेक्षा () कंसाला अधिक प्राधान्य आहे. |
04.39 | कंसाच्या आतील बेरजेची क्रिया प्रथम केली जाईल. |
04.44 | नंतर भागाकार केला जाईल. |
04.47 | आता रिलेशनल ऑपरेटर्स बद्दल जाणून घेऊ. |
04.51 | स्लाईडसवर जाऊ. |
04.54 | रिलेशनल ऑपरेटर्सना कंपॅरिझन ऑपरेटर्स असेही नाव आहे. |
04.59 | रिलेशनल ऑपरेटर्स असलेल्या पदावली boolean व्हॅल्यूज देतात. |
05.04 | रुबीतील रिलेशनल ऑपरेटर्स असे आहेत. |
05.07 | == Equals to उदाहरणार्थ a==b |
05.14 | dot eql question mark उदाहरणार्थ a.eql?b |
05.21 | != Not equals to उदाहरणार्थ a exclamation equal b |
05.28 | < Less than उदाहरणार्थ a less than b |
05.37 | <= Lesser than or equal to उदाहरणार्थa less than equal b |
05.44 | >= Greater than or equal to उदाहरणार्थa greater than equal b |
05.49 | <=> Combined comparison उदाहरणार्थa less than equal greater than b |
05.56 | ह्यापैकी काही ऑपरेटर्स वापरून पाहू. |
06.00 | टर्मिनलवर जा. |
06.02 | ctrl, L एकत्रितपणे दाबून irb कंसोल क्लियर करा. |
06.09 | equals to ऑपरेटर वापरून पाहू. |
06.11 | टाईप करा 10 equals equals 10 |
06.16 | आणि एंटर दाबा. |
06.17 | true असे आऊटपुट मिळेल. |
06.20 | .eql? हा ऑपरेटर equals toऑपरेटर प्रमाणेच आहे. |
06.24 | वापरून पाहू. |
06.25 | टाईप करा 10 .eql?10 आणि एंटर दाबा. |
06.33 | true असे आऊटपुट मिळेल. |
06.35 | not equal to ऑपरेटर वापरून पाहू. |
06.39 | टाईप करा 10 not equal 10 |
06.44 | आणि एंटर दाबा. |
06.46 | false असे आऊटपुट मिळेल. |
06.48 | कारण दोन्ही अंक एकच आहेत. |
06.51 | ctrl, L एकत्रितपणे दाबून irb कंसोल क्लियर करा. |
06.56 | आता less than ऑपरेटर वापरून पाहू. |
07.00 | टाईप करा 10 less than 5 आणि एंटर दाबा. |
07.05 | येथे पहिला ऑपरंड दुस-यापेक्षा लहान असेल तरtrue आऊटपुट मिळेल. |
07.10 | अन्यथा false आऊटपुट मिळेल. |
07.14 | false आऊटपुट मिळाले कारण 10 हे 5 पेक्षा लहान नाहीत. |
07.19 | आता greater than वापरून पाहू. |
07.22 | टाईप करा 5 greater than 2 |
07.26 | येथे पहिला ऑपरंड दुस-यापेक्षा मोठा असेल तरtrue आऊटपुट मिळेल. |
07.31 | अन्यथा false आऊटपुट मिळेल. |
07.34 | एंटर दाबा. |
07.36 | True आऊटपुट मिळाले कारण 5 हा 2 पेक्षा मोठा आहे. |
07.42 | ctrl, L एकत्रितपणे दाबून irb कंसोल क्लियर करा. |
07.47 | आता less than equal to ऑपरेटर वापरून पाहू. |
07.51 | टाईप करा 12 less than equal 12 |
07.56 | आणि एंटर दाबा. |
07.59 | येथे पहिला ऑपरंड दुस-यापेक्षा लहान किंवा तेवढाच असेल तर true आऊटपुट मिळेल. |
08.04 | अन्यथा false आऊटपुट मिळेल. |
08.07 | True आऊटपुट मिळाले कारण12 बरोबर 12 आहेत. |
08.11 | तुम्ही greater than or equal to वापरून पाहू शकता. |
08.15 | आता कंबाईंड कँपॅरिझन ऑपरेटर पाहू . |
08.19 | ह्या operator चे उत्तर, |
08.21 | पहिला ऑपरंड दुस-याबरोबर असल्यास, 0 येईल, |
08.24 | पहिला ऑपरंड दुस-यापेक्षा मोठा असल्यास, 1 येईल, |
08.29 | पहिला ऑपरंड दुस-यापेक्षा लहान असल्यास, -1 येईल. |
08.34 | उदाहरणाद्वारे याचे कार्य पाहू. |
08.36 | टाईप करा 3 less than equals greater than 3 |
08.41 | आणि एंटर दाबा. |
08.43 | 0 आऊटपुट मिळाले. |
08.45 | कारण दोन्ही ऑपरंड समान म्हणजे 3 आहेत. |
08.50 | आता एक ऑपरंड बदलून 4 करू. |
08.53 | टाईप करा 4 less than equals greater than 3 |
08.58 | आणि एंटर दाबा. |
08.59 | 1 आऊटपुट मिळाले. |
09.01 | कारण4 हे 3 पेक्षा मोठे आहेत. |
09.04 | आता पुन्हा एकदा बदल करू. |
09.07 | टाईप करा 4 less than equals greater than 7 |
09.11 | आणि एंटर दाबा. |
09.13 | -1 आऊटपुट मिळाले. |
09.14 | कारण 4 हे 7 पेक्षा लहान आहेत. |
09.17 | आता असाईनमेंट. |
09.19 | irb वापरून पुढील उदाहरणे सोडवा. आऊटपुट तपासा. |
09.24 | 10 + bracket 2 astreisk 5 bracket 8 slash 2 |
09.32 | 4 astreisk 5 slash 2 plus 7 |
09.37 | तसेच मेथडद्वारे ऍरीथमेटिक ऑपरेटर्स वापरून बघा. |
09.42 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
09.45 | थोडक्यात, |
09.47 | या पाठात आपण , |
09.49 | बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकारासाठी वापरली जाणारी अधिक, वजा, ऍस्टेरिक, स्लॅश ही ऍरीथमेटिक ऑपरेटर्स , |
09.59 | ऑपरेटर्सचा प्राधान्यक्रम, |
10.01 | आणि रिलेशनल ऑपरेटर्स |
10.04 | उदाहरणाद्वारे समजून घेतले. |
10.06 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
10.10 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
10.14 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
10.18 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
10.20 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
10.23 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
10.26 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
10.32 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
10.36 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10.43 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
10.51 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . |
10.57 | सहभागासाठी धन्यवाद. |