KiCad/C2/Designing-circuit-schematic-in-KiCad/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:30, 23 June 2014 by Pratik kamble (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Designing-circuit-schematic-in-KiCad

Author: Manali Ranade

Keywords: KiCAD


Visual Clue
Narration
00:01 Kicad वापरून circuit schematic डिझाईन करण्याच्या पाठात आपले स्वागत.
00:08 PCB designing मधे समाविष्ट असलेल्या पाय-या पाहू.
00:12 पहिली पायरी, आपल्या सर्किटचे schematic बनवणे.
00:16 दुसरी पायरी, netlist तयार करणे.
00:19 तिसरी पायरी, सर्किटमधील components ची चिन्हे map करणे.
00:22 चवथ्या पायरीत सर्किटचा ढोबळ आराखडा बनवणे.
00:27 या पाठात पहिली स्टेप जाणून घेऊ.
00:32 हव्या असलेल्या circuit चे schematic बनवणे .
00:35 आपण Ubuntu 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम,
00:40 आणि KiCad version 2011, hyphen 05 hyphen 25 वापरणार आहोत.
00:49 तुम्हाला Electronic circuits चे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे.
00:56 ह्या पाठासाठी Astable multivibrator चे circuit उदाहरण म्हणून वापरू.
01:04 KiCad सुरू करण्यासाठी,
01:05 Ubuntu desktop स्क्रीनच्या डाव्या कोप-यात वर जा.
01:08 Dash Home या पहिल्या आयकॉनवर क्लिक करा.
01:12 सर्च बारमधे 'KiCad' टाईप करून एंटर दाबा.
01:19 KiCad ची मेन विंडो स्क्रीनवर दिसेल.
01:22 लक्षात घ्या, Ubuntu 12.04 मधे KiCad मेनूबार, Ubuntu desktop वरील पॅनेलमधे उघडतो.
01:30 नवे project सुरू करण्यासाठी आधी File आणि नंतर New वर क्लिक करा.
01:35 तुमच्या project ला नाव द्या. उदाहरणार्थ project1 .
01:42 लक्ष द्या, प्रोजेक्ट, .pro extension ने सेव्ह होईल.
01:47 स्पष्ट दिसण्यासाठी विंडोच्या आकारात बदल करू.
01:52 प्रोजेक्ट कुठे सेव्ह होते ते पहा. गरज असल्यास directory बदला.
01:58 Save वर क्लिक करा.
02:01 KiCad मधे Circuit schematics, EESchema द्वारे बनवले जातात.
02:06 EESchema कसे सुरू करायचे ते पाहू.
02:10 KiCad च्या मेन विंडोतील वरच्या पॅनेलमधील पहिल्या टॅबला EESchema किंवा Schematic editor म्हणतात.
02:19 EESchema क्लिक केल्यावर Schematic editor उघडेल.
02:23 it cannot find the schematic असा मेसेज दाखवणारा Info dialog box दिसेल.
02:28 Ok वर क्लिक करा.
02:32 येथे circuit schematic बनवू.
02:35 EESchema विंडोच्या उजव्या पॅनेलवर जा.
02:38 Place a component बटणावर क्लिक करा.
02:42 रिकाम्या EESchema विंडोवर क्लिक करा.
02:46 component selection विंडो उघडेल.
02:49 EESchema विंडोमधे 555 timer IC schematic प्रस्थापित करू.
02:56 component selection विंडोच्या नेम फिल्डमधे 555 टाईप करून Ok वर क्लिक करा.
03:05 हे LM555N हा सर्च रिझल्ट दाखवेल.
03:11 हा रिझल्ट सिलेक्ट करून OK क्लिक करा.
03:14 EESchema विंडोवर component चे schematic दिसेल .
03:19 ते आपल्या कर्सरला जोडलेले असेल.
03:22 एकदा क्लिक करून ते component स्क्रीनच्या मध्यभागी ठेवा.
03:27 Zoom in आणि out करण्यासाठी माऊसचे scroll बटण वापरा.
03:35 जो Component झूम इन किंवा आऊट करायचा आहे त्यावर कर्सर ठेवा.
03:39 Zoom in आणि out करण्यासाठी अनुक्रमे F1 आणि F2 ही बटणे वापरू शकता.
03:46 तुम्हाला, 555 IC वर VCC आणि GND म्हणजेच ground टर्मिनल कदाचित दिसत असेल किंवा नसेल .
03:56 ती दिसत नसल्यास EESchema window च्या डाव्या पॅनेलवर जा.
04:00 Show hidden pins बटनावर क्लिक करा.
04:04 आपण EESchema विंडोमधे resistor ठेवणार आहोत.
04:09 आपण Place a component हा पर्याय निवडला होता.
04:13 EESchema वर क्लिक करा. तुम्हाला component selection विंडो दिसेल.
04:21 नेम फिल्डमधे 'r' टाईप करून OK क्लिक करा.
04:26 EESchema वर Resistor schematic दिसेल जे कर्सरला जोडलेले असेल.
04:32 EESchema वर कुठेही एका क्लिकद्वारे तो resistor ठेवा.
04:37 आपल्याला दोन resistors हवेत.
04:39 Place a component बटणाद्वारे ते मिळू शकतात.
04:42 आपल्याकडे एक resistor आहे. हा component कॉपी कसा करायचा ते पाहू.
04:48 त्यासाठी त्यावर राईट क्लिक करून Copy Component हा पर्याय निवडा.
05:01 Component कॉपी cursor ला जोडलेली असेल.
05:05 EESchema वर कुठेही एकदा क्लिक करून resistor तेथे ठेवा.
05:11 कीबोर्डवरील 'c' बटणाद्वारे हे अधिक लवकर करू शकता.
05:16 त्यासाठी, component वर कर्सर ठेवून 'c' बटण दाबा.
05:22 पुन्हा तो तुमच्या कर्सरला जोडला जाईल.
05:27 त्यास ठेवण्यास एकदा क्‍लिक करा.
05:30 shortcuts ची यादी मिळवण्यासाठी Shift आणि question mark ही बटणे दाबा.
05:36 ही कीबोर्डवरील shortcuts ची यादी आहे.
05:40 ही विंडो बंद करा.
05:43 component selection विंडो उघडण्यासाठी EESchema विंडोवर क्लिक करा.
05:49 आपल्याला Electrolytic आणि Ceramic हे दोन capacitors हवे आहेत.
05:53 Electrolytic capacitor समाविष्ट करण्यासाठी CP1 टाईप करून OK क्लिक करा.
06:00 Ceramic capacitor समाविष्ट करण्यासाठी 'c' टाईप करून OK क्लिक करा.
06:06 आपल्याला Light Emitting Diode म्हणजेच LED हवा आहे.
06:10 component selection विंडो मधे LED टाईप करून OK वर क्लिक करा.
06:17 आपल्याला power supply म्हणजेच VCC आणि Ground terminals हवे आहेत.
06:22 EESchema च्या उजव्या पॅनेलवरील Place a power port बटना वर क्लिक करा.
06:29 component selection विंडो उघडण्यासाठी EESchema वर एकदा क्लिक करा.
06:34 List All बटना वर क्लिक केल्यावर विविध power notations ची यादी दिसेल .
06:40 +5V (plus 5 volt) निवडा. OK वर क्लिक करा.
06:48 EESchema विंडोवर एकदा क्लिक करून component तिथे ठेवा.
06:52 ground terminal साठीही.
06:54 सूचीतून ground निवडून OK वर क्लिक करा.
07:01 ground terminal निवडू.
07:08 तसेच बाह्य वीज पुरवठा जोडण्यासाठी connector हवा आहे.
07:14 component selection विंडो उघडण्यासाठी EESchema वर क्लिक करा.
07:19 List All बटनावर क्लिक करा. तुम्हाला list दिसेल.
07:24 'conn' पर्याय निवडून OK क्लिक करा.
07:31 खाली स्क्रोल करून सूचीतून CONN_2 निवडून OK क्लिक करा.
07:41 दोन terminal चा connector माऊसच्या pointer ला जोडलेला दिसेल.
07:48 तो ठेवण्यासाठी एकदा क्लिक करा.
07:56 सर्व components ची योग्य मांडणी करण्यासाठी ते हलवू.
08:01 त्यासाठी 'm' ही shortcut key वापरू.
08:04 componentहलवण्यासाठी माऊसचा कर्सर त्यावर ठेवा. उदाहरणार्थ resistor. 'm' हे बटण दाबा.
08:15 आपण EESchema वर एकदा क्लिक करून हा resistor, IC 555 च्या उजवीकडे ठेवू.
08:28 LED फिरवून तो उभा करण्यासाठी कीबोर्डवरील 'R' ही shortcut key वापरू .
08:40 आता सर्किट डायग्रॅमनुसार components एकमेकांना wire ने जोडू.
08:45 आंतरजोडणीची सुरूवात करू.
08:48 EESchema च्या उजव्या पॅनेलवरील Place a wire बटणावर क्लिक करा.
08:56 आता दोन resistors एकमेकांना जोडू.
08:58 दोन्ही resistors च्या कोणत्याही एका node वर क्लिक करून त्यांना wire जोडणार आहोत.
09:11 IC 555 ची सातवी pin दोन resistor ला जोडणा-या wire ला जोडू.
09:18 IC 555 च्या सातव्या pin वर क्लिक करा आणि नंतर दोन resistors ला जोडणा-या wire वर क्लिक करा.
09:30 हे आपोआप junction तयार करेल, node जे झालेला दिसेल.
09:35 मी हे components आधीच जोडून सेव्ह करून ठेवले आहेत.
09:39 वेळ वाचवण्यासाठी आधी बनवलेले schematic उघडून ते वापरू.
09:44 File menu वर जाऊन Open वर क्लिक करा.
09:53 Confirmation विंडो उघडेल. Yes वर क्लिक करा.
10:04 मी संबंधित डिरेक्टरीमधून project1.sch निवडणार आहे.
10:18 प्रथम विंडोचा आकार बदलू.
10:22 नंतर Open वर क्लिक करा.
10:33 हे आधी बनवलेले schematic आहे.
10:36 components ला नावे कशी द्यायची ते पाहू.
10:39 Annotation प्रत्येक component ला एक विशिष्ट ओळख देते.
10:43 ह्यामुळे components वरील प्रश्नचिन्हांच्या जागी unique अंक लिहिले जातील.
10:50 EESchema च्या वरच्या पॅनेलवरील “Annotate schematic” बटणावर क्लिक करा.
10:58 "Annotate Schematic" विंडो उघडेल.
11:02 ह्या विंडोमधे configuration default ठेवा.
11:05 Annotation बटणावर क्लिक करा.
11:09 फक्त नावे न दिलेले घटक Annotate होतील असा मेसेज मिळेल.
11:13 OK वर क्लिक करा.
11:15 "Annotate schematic" विंडोवरील Close बटणावर वर क्लिक करा.
11:20 components वरील प्रश्नचिन्हाच्या जागी unique अंक आल्याचे लक्षात येईल.
11:30 File वर क्लिक करा.
11:37 हे schematic सेव्ह करण्यासाठी "Save whole schematic Project" निवडा.
11:43 File वर क्लिक करा. Quit निवडा.
11:48 हे EESchema window बंद करेल.
11:50 KiCad च्या main विंडोवर जा.
11:53 File वर क्लिक करा. Quit निवडा.
11:56 KiCad द्वारे circuit schematic बनवण्याचा पाठाचा उद्देश पूर्ण झाला आहे .
12:01 पाठात काय शिकलो
12:05 ते थोडक्यात,
12:07 KiCad मधे circuit schematic बनवण्यासाठी EESchema वापरणे.
12:11 circuit schematic ला Annotation (टीप ) देणे.
12:15 खालील असाईनमेंट करा.
12:17 component selection विंडो वापरुन EESchema वर Inductor हा component ठेवा.
12:24 'a', 'x' आणि 'y' ह्या shortcut keys वापरून बघा.
12:31 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
12:35 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
12:37 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
12:43 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
12:45 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
12:48 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
12:52 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
12:59 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
13:03 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
13:09 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
13:13 spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
13:20 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
13:25 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana