Scilab/C2/Iteration/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:55, 19 May 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00.01 सायलॅब च्या आयटरेटिव कॅलक्युलेशन्स वरील पाठात स्वागत .
00.07 आपण Mac(मॅक) ऑपरेटिंग सिस्टीम मधे सायलॅब वर्जन 5.2 वापरत आहोत.
00.11 ही कॅलक्युलेशन्स सायलॅब च्या दुस-या वर्जन मधे तसेच लिनक्स आणि विंडोज वरही चालतील.
00.17 iteration.sce फाईल मधे उपलब्ध असलेला कोड वापरू.
00.22 ही फाईल सायलॅब एडिटरद्वारा उघडली आहे. तो फक्त एडिटर म्हणून वापरू.
00.29 कोलन ऑपरेटर द्वारा वेक्टर बनवू.
i is equal to 1 colon 5
00.38 ह्यामुळे 1 ते 5 असा 1 ने वाढणारा वेक्टर बनेल.
00.42 या कमांडमधे i is equal to 1 colon 2 colon 5,
00.51 मधला 2 हा अंक वाढ दर्शवतो.
00.56 1 पासून वेक्टर सुरू होतो. तो 5 च्या पुढे जात नाही.
01.01 पण equal to 5 होऊ शकतो.
01.04 शेवटचे अर्ग्युमेंट 6 झाले तरी रिझल्ट तोच रहातो.
01.09 ह्याचे स्पष्टीकरण देणे कठीण नाही.
01.13 असे का होत असेल?
01.15 आता for स्टेटमेंटचा उपयोग आयटरेटिव कॅलक्युलेशन्स करण्यासाठी करू.
01.22 for i is equal to 1 colon 2 colon 7
   disp(i)
   end of for loop. 
01.28 हे कट करून सायलॅब कन्सोलवर पेस्ट करून एंटर दाबा.
01.34 loop कार्यान्वित होताना हे i ची व्हॅल्यू प्रिंट करेल.
01.37 disp (डिस्प) कमांडमुळे त्यात दिलेली अर्ग्युमेंटस दाखवली जातील.
01.42 for loop(फॉर लूप) हे इंटिजर व्हॅल्यूजसाठी वापरतात.
01.45 या केसमधे 1, 3, 5 आणि 7 या चार इंटिजर व्हॅल्यूज दिसत आहेत.
01.50 for loop(फॉर लूप) मधे जितक्या वेळा आयटरेशन्स होतात त्याला priori(प्रिओरी) म्हणतात.
01.56 या पाठाच्या उरलेल्या भागात, डिफॉल्ट इन्क्रीमेंट 1 घेऊ.
02.01 पुढील loop ने सुरू करू.

for i equal to 1 to 5

   disp(i)
end
02.10 break(ब्रेक) स्टेटमेंटद्वारे हा कोड मॉडिफाय करू शकतो.
02.18 ह्यामुळे i हा फक्त 2 पर्यंत दिसत आहे.
02.22 i च्या अंतिम व्हॅल्यूपर्यंत म्हणजे 5 पर्यंत हे आयटरेशन गेलेले नाही.
02.27 i हा 2 झाल्यावर if block(इफ ब्लॉक) पहिल्यांदा कार्यान्वित होईल.
02.30 परंतु break(ब्रेक) कमांड loop(लूप) समाप्त करेल.
02.34 इंटरमिडिएट कंडिशन पूर्ण झाल्यास loop(लूप) च्या बाहेर पडण्यासाठी break(ब्रेक) स्टेटमेंट वापरतात .
02.40 "i is equal to 2" स्टेटमेंटमधे दोन वेळा "equal to" साईन वापरतात.
02.45 प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस मधे equality( ईक्वालिटी ) ची तुलना करण्यासाठी ही सर्वमान्य पध्दत आहे.
02.50 ह्या कम्पॅरिझन स्टेटमेंटचा रिझल्ट बुलियन असतो: true( ट्रू) किंवा false(फॉल्स).
02.56 येथे कंटिन्यू स्टेटमेंट पेस्ट करून एंटर दाबा.
03.06 i हा फक्त 4 आणि 5 साठी दिसेल.
03.10 i less than or equal to 3 स्टेटमेंटनुसार i हा 3 किंवा कमी असल्यास काहीच दिसणार नाही.
03.18 continue(कंटिन्यू) स्टेटमेंट, प्रोग्रॅम मधील उरलेले loop(लूप) सोडून देते.
03.22 हे break(ब्रेक) स्टेटमेंटप्रमाणे loop(लूप) समाप्त करत नाही.
03.25 i पॅरॅमीटर इन्क्रीमेंट होतो आणि नवीन i साठी loop(लूप) ची सर्व कॅलक्युलेशन्स कार्यान्वित होतात.
03.32 येथे थोडे थांबू . less than or equal to प्रकारच्या ऑपरेटर्सविषयी माहिती घेऊ.
03.38 टाईप करा

help less than or equal to. एंटर दाबा.

03.46 हा सायलॅब help(हेल्प ) ब्राऊजर उघडेल.
03.51 less या पर्यायासाठी help(हेल्प )उपलब्ध असल्याचे दिसेल.
03.56 हे बंद केल्यावर टाईप करा help less (हेल्प लेस्स )
04.06 आपण गरजेनुसार हेल्प इन्स्ट्रक्शन्स पाहू शकतो. हे बंद करू.
04.11 सायलॅब मधे प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसपेक्षा for(फॉर) स्टेटमेंट प्रभावी ठरते.
04.16 वेक्टर साठी for loop(फॉर लूप) चे उदाहरण पाहू.
04.24 हे स्क्रिप्ट, v च्या सर्व व्हॅल्यूज दाखवत आहे.
04.28 आतापर्यंत आपण फक्त व्हेरिएबल्स दाखवत होतो.
04.32 तसेच कॅल्क्युलेशन चा रिझल्टही दाखवू शकतो.
04.35 खालील कोड संख्येचे वर्ग दाखवतात.
04.44 for loop(फॉर लूप) समजावण्यासाठी बराच वेळ दिला.
04.48 आता while loop(वाइल लूप) पाहू.
04.50 बुलियन एक्सप्रेशन true(ट्रू) असल्यास while (वाइल) स्टेटमेंट loop(लूप) कार्यान्वित करते .
04.55 loop(लूप) च्या सुरूवातीला एक्सप्रेशन true(ट्रू) असल्यास,
04.58 while loop(वाइल लूप) ची स्टेटमेंट्स कार्यान्वित होतात.
05.02 जर प्रोग्रॅम बरोबर लिहिलेला असेल तर एक्सप्रेशन false(फॉल्स) होते आणि loop(लूप) समाप्त होते .
05.08 while loop(वाइल लूप) साठी उदाहरण पाहू.
05.15 1 ते 6 ह्या i च्या व्हॅल्यूज दाखवल्या आहेत.
05.19 while loop(वाइल लूप) मधे ब्रेक आणि कंटिन्यू स्टेटमेंटस तशीच काम करतात जशी for loop(फॉर लूप) मधे करतात. break(ब्रेक) चा उपयोग पाहू.
05.33 i ची व्हॅल्यू 3झाल्यावर break(ब्रेक) स्टेटमेंटद्वारा प्रोग्रॅम loop(लूप) च्या बाहेर पडतो.
05.39 while loop(वाइल लूप) मधे कंटिन्यू स्टेटमेंटचे उदाहरण लिहून पहा .
05.44 आपण आयटरेटिव कॅलक्युलेशन्स पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
05.50 स्पोकन ट्युटोरियल्स हा टॉक टू टीचर प्रॉजेक्टचा भाग असून यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून अर्थसहाय्य मिळाले आहे.
05.57 यासंबंधी अधिक माहिती पुढील link वर उपलब्ध आहे.
06.00 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana