Scilab/C2/Iteration/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 सायलॅब च्या आयटरेटिव कॅलक्युलेशन्स वरील पाठात स्वागत .
00:07 आपण Mac(मॅक) ऑपरेटिंग सिस्टीम मधे सायलॅब वर्जन 5.2 वापरत आहोत.
00:11 ही कॅलक्युलेशन्स सायलॅब च्या दुस-या वर्जन मधे तसेच लिनक्स आणि विंडोज वरही चालतील.
00:17 iteration.sce फाईल मधे उपलब्ध असलेला कोड वापरू.
00:22 ही फाईल सायलॅब एडिटरद्वारा उघडली आहे. तो फक्त एडिटर म्हणून वापरू.
00:29 कोलन ऑपरेटर द्वारा वेक्टर बनवू. i is equal to 1 colon 5
00:38 ह्यामुळे 1 ते 5 असा 1 ने वाढणारा वेक्टर बनेल.
00:42 या कमांडमधे i is equal to 1 colon 2 colon 5,
00:51 मधला 2 हा अंक वाढ दर्शवतो.
00:56 1 पासून वेक्टर सुरू होतो. तो 5 च्या पुढे जात नाही.
01:01 पण equal to 5 होऊ शकतो.
01:04 शेवटचे अर्ग्युमेंट 6 झाले तरी रिझल्ट तोच रहातो.
01:09 ह्याचे स्पष्टीकरण देणे कठीण नाही.
01:13 असे का होत असेल?
01:15 आता for स्टेटमेंटचा उपयोग आयटरेटिव कॅलक्युलेशन्स करण्यासाठी करू.
01:22 for i is equal to 1 colon 2 colon 7

disp(i), end of for loop.

01:28 हे कट करून सायलॅब कन्सोलवर पेस्ट करून एंटर दाबा.
01:34 loop कार्यान्वित होताना हे i ची व्हॅल्यू प्रिंट करेल.
01:37 disp (डिस्प) कमांडमुळे त्यात दिलेली अर्ग्युमेंटस दाखवली जातील.
01:42 for loop(फॉर लूप) हे इंटिजर व्हॅल्यूजसाठी वापरतात.
01:45 या केसमधे 1, 3, 5 आणि 7 या चार इंटिजर व्हॅल्यूज दिसत आहेत.
01:50 for loop(फॉर लूप) मधे जितक्या वेळा आयटरेशन्स होतात त्याला priori(प्रिओरी) म्हणतात.
01:56 या पाठाच्या उरलेल्या भागात, डिफॉल्ट इन्क्रीमेंट 1 घेऊ.
02:01 पुढील loop ने सुरू करू.

for i equal to 1 to 5 disp(i) end

02:10 break(ब्रेक) स्टेटमेंटद्वारे हा कोड मॉडिफाय करू शकतो.
02:18 ह्यामुळे i हा फक्त 2 पर्यंत दिसत आहे.
02:22 i च्या अंतिम व्हॅल्यूपर्यंत म्हणजे 5 पर्यंत हे आयटरेशन गेलेले नाही.
02:27 i हा 2 झाल्यावर if block(इफ ब्लॉक) पहिल्यांदा कार्यान्वित होईल.
02:30 परंतु break(ब्रेक) कमांड loop(लूप) समाप्त करेल.
02:34 इंटरमिडिएट कंडिशन पूर्ण झाल्यास loop(लूप) च्या बाहेर पडण्यासाठी break(ब्रेक) स्टेटमेंट वापरतात .
02:40 "i is equal to 2" स्टेटमेंटमधे दोन वेळा "equal to" साईन वापरतात.
02:45 प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस मधे equality( ईक्वालिटी ) ची तुलना करण्यासाठी ही सर्वमान्य पध्दत आहे.
02:50 ह्या कम्पॅरिझन स्टेटमेंटचा रिझल्ट बुलियन असतो: true( ट्रू) किंवा false(फॉल्स).
02:56 येथे कंटिन्यू स्टेटमेंट पेस्ट करून एंटर दाबा.
03:06 i हा फक्त 4 आणि 5 साठी दिसेल.
03:10 i less than or equal to 3 स्टेटमेंटनुसार i हा 3 किंवा कमी असल्यास काहीच दिसणार नाही.
03:18 continue(कंटिन्यू) स्टेटमेंट, प्रोग्रॅम मधील उरलेले loop(लूप) सोडून देते.
03:22 हे break(ब्रेक) स्टेटमेंटप्रमाणे loop(लूप) समाप्त करत नाही.
03:25 i पॅरॅमीटर इन्क्रीमेंट होतो आणि नवीन i साठी loop(लूप) ची सर्व कॅलक्युलेशन्स कार्यान्वित होतात.
03:32 येथे थोडे थांबू . less than or equal to प्रकारच्या ऑपरेटर्सविषयी माहिती घेऊ.
03:38 टाईप करा help less than or equal to. एंटर दाबा.
03:46 हा सायलॅब help(हेल्प ) ब्राऊजर उघडेल.
03:51 less या पर्यायासाठी help(हेल्प )उपलब्ध असल्याचे दिसेल.
03:56 हे बंद केल्यावर टाईप करा help less (हेल्प लेस्स )
04:06 आपण गरजेनुसार हेल्प इन्स्ट्रक्शन्स पाहू शकतो. हे बंद करू.
04:11 सायलॅब मधे प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसपेक्षा for(फॉर) स्टेटमेंट प्रभावी ठरते.
04:16 वेक्टर साठी for loop(फॉर लूप) चे उदाहरण पाहू.
04:24 हे स्क्रिप्ट, v च्या सर्व व्हॅल्यूज दाखवत आहे.
04:28 आतापर्यंत आपण फक्त व्हेरिएबल्स दाखवत होतो.
04:32 तसेच कॅल्क्युलेशन चा रिझल्टही दाखवू शकतो.
04:35 खालील कोड संख्येचे वर्ग दाखवतात.
04:44 for loop(फॉर लूप) समजावण्यासाठी बराच वेळ दिला.
04:48 आता while loop(वाइल लूप) पाहू.
04:50 बुलियन एक्सप्रेशन true(ट्रू) असल्यास while (वाइल) स्टेटमेंट loop(लूप) कार्यान्वित करते .
04:55 loop(लूप) च्या सुरूवातीला एक्सप्रेशन true(ट्रू) असल्यास,
04:58 while loop(वाइल लूप) ची स्टेटमेंट्स कार्यान्वित होतात.
05:02 जर प्रोग्रॅम बरोबर लिहिलेला असेल तर एक्सप्रेशन false(फॉल्स) होते आणि loop(लूप) समाप्त होते .
05:08 while loop(वाइल लूप) साठी उदाहरण पाहू.
05:15 1 ते 6 ह्या i च्या व्हॅल्यूज दाखवल्या आहेत.
05:19 while loop(वाइल लूप) मधे ब्रेक आणि कंटिन्यू स्टेटमेंटस तशीच काम करतात जशी for loop(फॉर लूप) मधे करतात. break(ब्रेक) चा उपयोग पाहू.
05:33 i ची व्हॅल्यू 3झाल्यावर break(ब्रेक) स्टेटमेंटद्वारा प्रोग्रॅम loop(लूप) च्या बाहेर पडतो.
05:39 while loop(वाइल लूप) मधे कंटिन्यू स्टेटमेंटचे उदाहरण लिहून पहा .
05:44 आपण आयटरेटिव कॅलक्युलेशन्स पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
05:50 स्पोकन ट्युटोरियल्स हा टॉक टू टीचर प्रॉजेक्टचा भाग असून यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून अर्थसहाय्य मिळाले आहे.
05:57 यासंबंधी अधिक माहिती पुढील link वर उपलब्ध आहे.
06:00 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana