Digital-Divide/D0/Oral-Dental-Hygiene-and-Care/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:17, 9 May 2014 by Kavita salve (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Oral-Dental-Hygiene-and-Care

Author: Manali Ranade

Keywords: Digital-Divide


Visual Clue
Narration
00:02 रामू सकाळी उठून शाळेसाठी तयार होऊ लागला.
00:07 झोपेत असूनही ब्रशवर पेस्ट घेऊन त्याने दात घासण्यास सुरूवात केली.
00:12 शाळेत जायचे असल्याने त्याने पटकन दात घासले.
00:16 चुळा भरून तो आंघोळीला गेला आणि तयार झाला.
00:21 आईने त्याला नाश्त्यासाठी बोलावले.
00:25 त्याने नाश्ता केला.
00:27 खाताना अन्न दातात अडकल्याने तो मोठ्याने ओरडला.
00:33 आईने त्याला पाणी दिले. उशीर झालेला असल्यामुळे शाळेत जाण्यास सांगतिले.
00:39 दात दुखत असूनही रामू घराबाहेर पडला.
00:44 रस्त्यात त्याला मित्र भेटला.
00:47 तो अस्वस्थ असल्याचे पाहून सुरेशने त्याची चौकशी केली.
00:52 रामूने त्याला सर्व सांगितले.
00:54 सुरेशने रामूचे बोलणे शांतपणे ऐकले.
00:58 सुरेशने शेजारी असलेल्या दाताच्या डॉक्टर काकांबद्दल सांगितले.
01:03 शाळा सुटल्यावर रामूला डॉक्टरांकडे नेण्याचे वचन दिले.
01:09 digital divide चे अंतर भरून काढणार्‍या स्पोकन ट्युटोरियलमध्ये स्वागत.
01:14 येथे तोंडाची स्वच्छता, प्राथमिक काळजी आणि दाताच्या डॉक्टरांचा सल्ला ह्याबद्दल माहिती घेऊ.
01:23 शाळेतून येताना सुरेश व रामू दाताच्या डॉक्टरांना भेटले.
01:29 डॉक्टरांनी परीक्षण करून दात थोडा किडल्याचे सांगितले.
01:35 नंतर दात किडण्याची कारणे सांगितली.
01:40 दातांमध्ये अन्नकण अडकणे,
01:42 दात नीट न घासणे,
01:46 citric acid चे प्रमाण जास्त असलेली Soft drinks (मद्यार्क नसलेले पेय) घेणे इत्यादी.
01:50 यावर डॉक्टरांनी काही उपाय सांगितले.
01:57 खनिज व कॅल्शियमयुक्त अन्न खाणे,
02:01 दात नीट घासणे,
02:03 दिवसातून दोनदा दात घासणे,
02:05 प्रत्येक खाण्यानंतर चुळा भरणे,
02:09 सर्व वयोगटातील लोकांनी दर सहा महिन्यांनी दातांची तपासणी करणे.
02:15 दाताच्या डॉक्टरांची भेट घ्या,
02:17 जर दात सरळ रेषेत नसतील,
02:22 जर दात किडलेले असतील किंवा
02:25 गरम किंवा गार खाल्ल्यावर जर खूप वेदना होत असतील.



02:30 आता दात घासण्याच्या काही पध्दती पाहू.
02:35 दातांच्या आतल्या आणि बाहेरच्या भागात ब्रश हळूवारपणे फिरवा.
02:39 तोंडाची दुर्गंधी आणि कीटाणू निघून जाण्यासाठी जीभेवरही ब्रश फिरवा.
02:45 याला पर्याय म्हणजे पीलू किंवा बाभळाच्या झाडाची काडी चघळणे.
02:52 ही काडी चावत रहावी लागते.
02:55 ही चावलेली काडी नैसर्गिक ब्रश म्हणून वापरता येते.
03:00 हा पाठ येथे संपतो.
03:03 तोंडाच्या आरोग्यासाठी दातांची काळजी घेणे आणि वेळोवेळी दातांच्या डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे.
03:13 काळजी घ्या. सहभागाबद्दल धन्यवाद.
03:17 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
03:21 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
03:25 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
03:30 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
03:35 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
03:39 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
03:48 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
03:52 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
04:00 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro
04:16 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
04:21 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana