Netbeans/C2/Netbeans-Debugger/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
---|---|
00.01 | नमस्कार. |
00.02 | Netbeans Debugger वरील पाठात स्वागत. |
00.06 | तुम्ही Netbeansपहिल्यांदा वापरत असल्यास सुरूवातीचे पाठ स्पोकन ट्युटोरियल वेबसाईटवर पहा. |
00.14 | ह्या पाठासाठी Linux ऑपरेटिंग सिस्टीम Ubuntu v12.04, |
00.21 | आणि Netbeans IDE v7.1.1 वापरू. |
00.26 | आपण जाणतो की प्रोग्रॅम डिबग करण्याचे काम काळजीपूर्वक करावे लागते. |
00.31 | debugging टूल आणि त्याच्या फीचर्सची माहिती करून घेतल्यास महत्त्वाचा वेळ वाचू शकतो. |
00.39 | debugging टूल उपयुक्त आणि प्रभावी ठरते, |
00.42 | विशेषतः मोठा कोड लिहिताना किंवा तपासताना. |
00.46 | या पाठात Netbeans Debugger ने प्रदान केलेली काही फीचर्स जाणून घेऊ. |
00.53 | येथे पाहू, |
00.55 | debugging विंडो, |
00.58 | breakpoints निश्चित करणे, |
01.00 | समीकरणे तपासणे आणि watches सेट करणे, |
01.04 | तुमच्या कार्यान्वित प्रोग्रॅमचा वेध घेण्याचा पर्याय, |
01.07 | आणि debugger कॉनफिगर करण्याचे उपलब्ध पर्याय. |
01.12 | आता सुरूवात करू आणि हा सँपल कोडdebug करू. |
01.17 | Netbeans IDE वर जाऊ. |
01.20 | आपण ह्या पाठासाठी आधीच IDE मधे sampleDebug हे जावा ऍप्लिकेशन बनवले आहे. |
01.27 | a, b, आणि cना प्राथमिक व्हॅल्यूज देण्याचा हा छोटा प्रोग्रॅम आहे . |
01.35 | हे 'Hello World!' आणि 'a' ची व्हॅल्यू प्रिंट करेल. |
01.40 | तसेच हे 'SampleClass' नावाचे क्लास ऑब्जेक्ट तयार करेल. त्याची व्हॅल्यू पूर्णांक प्रकारची आणि private असेल. |
01.52 | नंतर हे 'b' ची व्हॅल्यू काढेल, |
01.55 | आणि c ची व्हॅल्यू काढण्यासाठी फंक्शन कॉल करेल, |
02.00 | आणि 'b' व 'c' च्या व्हॅल्यूज प्रिंट करेल. |
02.05 | debuggingची सुरूवात breakpoint सेट करण्याने करू. |
02.09 | त्यासाठी लाईन नंबरवर क्लिक करा. |
02.13 | Hello World! प्रिंट करणा-या ओळीवर सेट करू. |
02.18 | ब्रेकपॉईंट सेट केलेल्या ओळीचा रंग गुलाबी झाला आहे. आणि ओळीचा नंबर छोट्या चौकोनाने मार्क केला गेला आहे. |
02.28 | debugging मोड मधे टूलबारवरील |
02.31 | Debug Project बटण क्लिक करून प्रोग्रॅम कार्यान्वित केल्यावर, |
02.35 | breakpoint असलेल्या ओळीवर येऊन प्रोग्रॅम कार्यान्वित होणे थांबेल. |
02.41 | आत्तापर्यंत 'a' ची व्हॅल्यू सेट केलेली आहे. |
02.45 | व्हॅल्यू तपासण्यासाठी कर्सर 'a' वर न्या. |
02.49 | येथे 10ही व्हॅल्यू दाखवत आहे . |
02.52 | वर्कस्पेस खाली आणखी एक विंडो उघडली आहे. |
02.59 | तिथे 'Variables' विंडो आहे जी व्हेरिएबल्स आणि त्यांच्या व्हॅल्यूजची सूची दाखवते. |
03.07 | आत्तापर्यंत केवळ 'a' व्हेरिएबलला प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे. |
03.11 | sample debug चे आऊटपुट असलेली 'Output' विंडो देखील पाहू शकतो . |
03.17 | तिथे अजून आऊटपुट नाही. |
03.19 | तसेच 'Debugger Console' ' दाखवत आहे की प्रोग्रॅम 29 व्या ओळीवरील ब्रेकपॉईंटला थांबला आहे. |
03.28 | तसेच 'Breakpoints' विंडो 29 व्या ओळीवर ब्रेकपॉईंट सेट केल्याचे दाखवत आहे. |
03.36 | पुढे जाण्यापूर्वी watch कसे समाविष्ट करायचे ते पाहू. |
03.40 | उदाहरणार्थ समजा 'aSample' ह्या पूर्णांक व्हॅल्यूवर watch हवा आहे. |
03.48 | वर्कस्पेसखालील 'Variables' विंडोमधे, Enter new Watch पर्यायावर डबल क्लिक करा आणि व्हेरिएबलला 'aSample.value' नाव द्या. |
04.02 | OK क्लिक करा . |
04.06 | अजून 'aSample' बनले नसल्यामुळे ते त्याची व्हॅल्यू माहित नसल्याचे दाखवत आहे. |
04.12 | एकदा ही ओळ कार्यान्वित झाली की ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू समजेल. |
04.16 | अशाच प्रकारे पदावली, वॉच करून त्यांचे मूल्यमापन देखील करू शकतो. |
04.21 | येथे b=a+10 साठी तपासू. |
04.25 | a-4 किती ,ते बघायचे असेल तर काय करता येईल? |
04.29 | त्यासाठी मेनूबारवरील Debug मेनूमधे जाऊन Evaluate expression पर्याय सिलेक्ट करा. |
04.37 | workspaceमधे 'Evaluate Code' विंडो उघडेल. |
04.41 | येथे 'a-4' ही पदावली लिहा. |
04.45 | Evaluate Expression बटणावर क्लिक करा. Variable विंडो 'a-4' ची व्हॅल्यू 6 दाखवत आहे. |
04.56 | आता पुढे एका ओळीचा कोड कार्यान्वित करू. |
05.00 | त्यासाठी टूलबारवरील Step-Over बटण निवडा. |
05.06 | हे केवळ “Hello World” प्रिंट करणारा एका ओळीचा कोड कार्यान्वित करेल. |
05.12 | आऊटपुट बघण्यासाठी आऊटपुट विंडोवर जाऊन sampleDebug आऊटपुटवर जा. |
05.17 | Hello World! a is 10 हे आऊटपुट दिसेल. |
05.22 | आता प्रोग्रॅम SampleClass ऑब्जेक्ट बनवण्यासाठी त्या ओळीवर थांबला आहे. |
05.28 | आता SampleClassच्या कन्स्ट्रक्टर मधे जायचे आहे. |
05.32 | त्यासाठी टूलबारवरील Step Into पर्याय निवडा. |
05.41 | नंतर Step Over सिलेक्ट करा. कन्स्ट्रक्टर कॉलमधे आलेली व्हॅल्यू आता 10वर सेट झाली आहे. |
05.51 | तुम्ही व्हेरिएबलवर कर्सर नेऊन देखील तपासू शकता. |
05.55 | पुन्हा Step Over सिलेक्ट केल्यावर this.variable देखील 10वर सेट झाले आहे. |
06.03 | ह्या फंक्शनमधून बाहेर पडण्यासाठी Continue, Step Over किंवा Step Outपैकी काहीही निवडू शकतो. |
06.11 | मेथडमधून बाहेर येण्यासाठी Step-Out निवडू. |
06.14 | जेथून फंक्शन कॉल केले होते तेथे आपण परत आलो आहोत. |
06.19 | पुन्हा Step-Over केल्यावर aSample.value आता 10वर सेट झाल्याचे दिसेल. |
06.27 | जी आपण वॉचसाठी निवडली होती. |
06.30 | Breakpoints आणि StepOversव्यतिरिक्त ज्या ओळीवर कर्सर ठेवला आहे तिथे प्रोग्रॅमचे कार्यान्वित होणे थांबवू शकतो. |
06.38 | उदाहरणार्थ येथे फंक्शनमधे जाऊ. d=b-5असे लिहिलेल्या ओळीवर कर्सर सेट करू . |
06.49 | टूलबारवरील Run To Cursor पर्याय निवडा. |
06.54 | प्रोग्रॅम कार्यान्वित होण्यासाठी ह्या फंक्शनमधे जाईल आणि कर्सर जिथे आहे तिथे प्रोग्रॅम थांबल्याचे दिसेल. |
07.05 | प्रोग्रॅमने bची व्हॅल्यू 20 अशी काढली आहे. |
07.10 | व्हेरिएबल विंडोमधे 'b' ची व्हॅल्यू 20 वर सेट झाली आहे. |
07.14 | पुन्हा Step Over निवडू. dची प्राथमिक व्हॅल्यू 15 अशी होईल. |
07.23 | आता return निवडू शकतो किंवा प्रोग्रॅम संपूर्ण कार्यान्वित करू शकतो. |
07.29 | Step Out निवडा आणि फंक्शन कॉलवर परत जा. |
07.36 | getC() फंक्शनवर कर्सर नेल्यावर फंक्शनने रिटर्न केलेली 15 ही व्हॅल्यू दिसेल. |
07.43 | व्हेरिएबल 'c' ला अजून व्हॅल्यू प्रदान केलेली नाही. |
07.47 | त्यामुळे Step Over करून ही ओळ कार्यान्वित करू तेव्हा 'c' ला 15 ही व्हॅल्यू मिळेल. |
07.55 | व्हेरिएबल विंडोमधे जाऊन किंवा व्हेरिएबलवर कर्सर नेऊन 'c' ची व्हॅल्यू तपासू शकतो. |
08.03 | debugging सेशन थांबवायचे असल्यास टूलबारवरील Finish Debugger Session पर्याय निवडू. |
08.12 | पुढील breakpoint पर्यंत कार्य चालू ठेवायचे असेल तर Continue पर्याय निवडा. |
08.19 | हे पूर्ण झाले की उर्वरित प्रोग्रॅम पूर्ण कार्यान्वित करण्यासाठी Continue पर्याय निवडता येतो. |
08.25 | येथे Continue निवडा. |
08.27 | Output विंडोमधे: b is 20 आणि c is 15 हे आऊटपुट दिसत आहे. |
08.34 | आता netbeans मधील debugging पर्यायांचा आढावा घेऊ. |
08.39 | तुम्हाला ऍडव्हान्स फीचर्स सेट करायची असल्यास, |
08.42 | Tools मेनूत Optionsक्लिक करा. Miscellaneous पर्यायावर जाऊन Java Debugger टॅबवर क्लिक करा. |
08.53 | येथे multi-threaded प्रोग्रॅमसाठी ब्रेकपॉईंट सेटींग पर्याय बदलता येतील. |
08.59 | किंवा कुठल्या मेथड मधे step in करायचे हे ठरवण्यासाठी फिल्टर्स देता येतील. |
09.07 | आता असाईनमेंट, |
09.09 | तुमचा कोणताही एक प्रोग्रॅम घ्या. त्यात आधीपासूनच एरर्स असतील तर अधिक चांगले. |
09.16 | नसल्यास लॉजिक किंवा अल्गोरिथम संबंधीच्या काही एरर्स समाविष्ट करा. |
09.20 | कोडमधे ब्रेकपॉईंट सेट करा. ज्या फंक्शनमधे एररची शक्यता आहे ते कॉल करण्याच्या ठिकाणी सहसा ब्रेक सेट करतात. |
09.29 | फंक्शनमधे जाण्यासाठी Step-Into वापरा. |
09.32 | ओळी कार्यान्वित करण्यासाठी Step-Overs वापरा आणि variable विंडोमधे त्याच्या व्हॅल्यूज तपासून खात्री करा. |
09.41 | एरर्स ओळखून दुरूस्त करताना kartanna watches समाविष्ट करा. |
09.45 | मेथडमधून Step-Out करा. |
09.48 | पुढील breakpoint पर्यंत जाण्यासाठी continue वापरा. |
09.51 | आणि शेवटी debugger सेशन संपवून ऍप्लिकेशन कार्यान्वित करा. |
09.57 | या पाठात netbeans debugger विषयी, |
10.02 | तसेच breakpoints आणि watches सेट करणे, |
10.06 | कोड कार्यान्वित होत असताना तपासावयाची पदावली समाविष्ट करणे, |
10.11 | प्रोग्रॅमचे कार्य ट्रेस करण्यासाठी Step-Into, Step-Over, Step-Out आणि Run-to-Cursor पर्यायांचा आढावा घेतला. |
10.19 | तसेच डिबगींगसाठी debuggerचे ऍडव्हान्स्ड पर्याय कॉनफिगर करायला शिकलो. |
10.24 | टेस्टिंग आणि डिबगींग करताना ह्या पाठामुळे तुमचा खूप वेळ वाचेल. |
10.30 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
10.33 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
10.36 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
10.41 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
10.46 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
10.49 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
10.55 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
10.59 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11.05 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11.14 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . |
11.18 | सहभागासाठी धन्यवाद . |