Firefox/C3/Themes-Popup-blocking/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 14:51, 12 March 2014 by Kavita salve (Talk | contribs)
Title of script: Themes-Popup-blocking
Author: Manali Ranade
Keywords: Firefox
|
|
---|---|
0:00 | Mozilla Firefox मधील Themes वरील पाठात स्वागत. |
0:05 | या पाठात फायरफॉक्समधील Themes, Personas, जाहिराती रोखणे हे शिकणार आहोत. |
0:13 | फायरफॉक्स, युजरच्या आवडीप्रमाणे पॅकेजमधे सोयी सुविधा व बदल करण्याची परवानगी देतो. |
0:20 | त्यापैकी एक म्हणजे Themes. |
0:23 | फायरफॉक्सचा स्क्रीन कसा दिसावा हे theme ठरवते. |
0:27 | तसेच बॅकग्राऊंड कलर, बटणांचे रूप आणि रचना बदलते. |
0:32 | यासाठी आपण Ubuntu 10.04 वर Firefox version 7.0 वापरत आहोत. |
0:40 | Firefox ब्राऊजर उघडू. |
0:43 | प्रथम फायरफॉक्सची Theme कशी बदलायची हे जाणून घेऊ. |
0:48 | प्रथम Load images automatically हा पर्याय सुरू करूया. त्यामुळे ब्राऊजरमधे दाखवल्या जाणा-या images बघू शकतो. |
0:58 | Menu बार वरील Edit आणि नंतर Preferences वर क्लिक करा. |
1:03 | Preferences डायलॉग बॉक्समधे Content टॅब वर क्लिक करा. |
1:08 | Load images automatically च्या चेक बॉक्स वर क्लिक करा. |
1:12 | Close वर क्लिक करा. |
1:14 | आता URL वर क्लिक करून
“addons dot mozilla dot org slash firefox slash themes” असे टाईप करा. |
1:25 | Enter दाबा. |
1:27 | हे आपणास Firefox Add-ons साठीच्या Themes पेजवर नेईल. |
1:32 | येथे thumbnails रूपात मोठ्या प्रमाणावर themes दिसतील. |
1:37 | thumbnails आपल्याला themes कशा दिसतील हे दाखवते. |
1:41 | येथे theme चा preview बघू शकतो. |
1:43 | उपलब्ध themes चे प्रकार बघा आणि, |
1:46 | ही theme ज्यांनी वापरली आहे त्या युजर्सनी दिलेली रेटिंग्ज बघा. |
1:52 | आता माऊस पॉईंटर काही themes वर नेऊ.<Pause> |
1:57 | Shine Bright Skin ह्या theme वर क्लिक करा. |
2:01 | ही पेजवर उपलब्ध असलेल्या अनेक themes पैकी एक आहे. |
2:05 | Shine Bright Skin theme पेज उघडेल. |
2:09 | Continue to Download बटना वर क्लिक करा. |
2:12 | हे आपल्याला theme बद्दल अधिक माहिती देणा-या पेजवर नेईल . |
2:17 | theme इन्स्टॉल करण्यासाठी Add to Firefox बटनावर क्लिक करा. |
2:22 | Add-on डाऊनलोडिंग प्रोग्रेस बार उघडेल. |
2:27 | पुढे Software इन्स्टॉल करण्यासंबंधीचा मेसेज उघडेल. |
2:32 | Install Now वर क्लिक करा. |
2:34 | "The theme will be installed once you restart Firefox" असा मेसेज दिसेल. |
2:40 | Restart Now वर क्लिक करा. |
2:43 | Firefox बंद होईल. |
2:46 | जेव्हा ते पुन्हा उघडेल तेव्हा नवी theme लागू झालेली असेल. |
2:51 | Themes page वर जाऊ. |
2:54 | आता दुसरी theme निवडू. |
2:57 | ही theme आपल्याला Add to Firefox बटण दाखवेल. |
3:01 | त्याद्वारे ही निवडलेली theme डाऊनलोड होईल. |
3:05 | डाऊनलोड पूर्ण झाल्यावर एक वॉर्निंग मेसेज विंडो उघडेल. |
3:10 | Install Now बटनावर क्लिक करा. |
3:13 | Firefox ब्राऊजर रिस्टार्ट करण्यासंबंधीचा मेसेज दिसेल. |
3:16 | Restart now बटनावर क्लिक करा. |
3:19 | Firefox बंद होईल. |
3:22 | पुन्हा सुरू झाल्यावर नवी theme लागू झालेली दिसेल. |
3:27 | असे दिसेल की Themes मुळे ब्राऊजरचे रंगरूप सुधारता येते. |
3:31 | ते तुमच्या आवडीनुसार Firefoxमधे बदल करते. |
3:36 | जर काही कारणांनी default theme वर परत जायचे असेल, |
3:40 | तर Tools खालील Add-ons वर क्लिक करा. |
3:44 | डाव्या पॅनेलवरील Appearance वर क्लिक करा. |
3:48 | येथे डाऊनलोड केलेल्या सर्व themes आपल्याला दिसतील. |
3:53 | ही Default Theme आहे. |
3:56 | Enable बटनावर क्लिक करा. |
3:59 | Restart now बटनावर क्लिक करा. |
4:02 | Firefox बंद होऊन पुन्हा सुरू होईल . |
4:06 | आणि default theme पुन्हा दिसेल . |
4:12 | Add-ons टॅब बंद करूया. |
4:16 | # Personas ह्या विनामूल्य, इन्स्टॉल करण्यास सोप्या अश्या, फायरफॉक्सच्या "skins" असतात. |
4:22 | # Personas Plus मुळे ह्या अंगभूत सुविधांवर, |
4:26 | # अधिक नियंत्रण मिळते. |
4:28 | # तसेच नवीन, लोकप्रिय आणि तुमच्या आवडीच्या Personasना access मिळतो . |
4:34 | URL बार वर क्लिक करून
“addons dot mozilla dot org slash firefox slash personas” असे टाईप करा. |
4:44 | Enter दाबा. |
4:47 | हे Firefox Add-ons च्या Personas पेज वर घेऊन जाईल. |
4:52 | येथे मोठ्या प्रमाणावर personas दिसतील. |
4:56 | आवडीच्या कुठल्याही Persona वर क्लिक करा. |
5:01 | हे तुम्हाला निवडलेल्या Persona ची अधिक माहिती देणा-या पेजवर घेऊन जाईल. |
5:06 | Add to Firefox बटनावर क्लिक करा. |
5:09 | नवी थीम इन्स्टॉल झाली आहे हे सांगणारा Notification बार वरती दिसेल. |
5:16 | Notification बारच्या उजवीकडे असलेल्या छोट्या “x” चिन्हावर क्लिक करा. |
5:21 | Firefox ही Persona आपोआप इन्स्टॉल करेल. |
5:28 | इंटरनेट वापरताना मधूनच येणा-या जाहिरातींचा कधीकधी त्रास होतो. |
5:32 | या रोखण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. |
5:36 | असेच एक add-on म्हणजे Adblock. |
5:39 | Tools नंतर Add-ons वर क्लिक करा. |
5:43 | उजव्या कोप-यातवरती असलेल्या search tab मधे Adblock शोधू. Enter दाबा. |
5:51 | Ad blocking सॉफ्टवेअरची सूची दिसेल. |
5:55 | Adblock Plusसाठी Install बटनावर क्लिक करा. |
5:59 | Adblock डाऊनलोड होण्यास सुरूवात होईल. |
6:02 | आता Ad blocker इन्स्टॉल झाले आहे. |
6:06 | “Adblock will be installed after you restart Firefox” असा नोटीफिकेशन मेसेज दिसेल. |
6:14 | Restart now लिंक वर क्लिक करा. |
6:17 | Firefox बंद होऊन पुन्हा सुरू होईल. |
6:21 | पुन्हा सुरू झाल्यावर ad blocker लागू होईल. |
6:25 | परंतु ad blockers चा वाईट परिणाम म्हणजे, |
6:30 | * ad blocker सुरू असल्यास काही साईटस आपल्याला प्रवेश नाकारतात. |
6:35 | * कारण अनेक विनामूल्य साईटस जाहिरातींद्वारे उत्पन्न मिळवतात. |
6:41 | * काही साईटस ब्राऊजरवर दाखवण्यास Adblocker प्रतिबंध करू शकतात. |
6:46 | * ads block करण्यापूर्वी ह्या सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करणे गरजेचे आहे. |
6:51 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
6:54 | या पाठात शिकलोः थीम्स, Personas, जाहिराती रोखणे. |
7:00 | ही असाईनमेंट करा. |
7:03 | * 'NASA night launch' थीम इन्स्टॉल करा. |
7:06 | * नंतर default theme वर परत या. |
7:10 | * yahoo.com वरील pop ups शिवाय सर्व pop ups रोखा. |
7:15 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
7:18 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
7:21 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
7:25 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
7:28 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
7:31 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
7:35 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
7:41 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
7:45 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
7:53 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
7:56 | * spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro |
8:04 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . |
8:08 | धन्यवाद . |