Firefox/C3/Themes-Popup-blocking/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:00 | Mozilla Firefox मधील Themes वरील पाठात स्वागत. |
00:05 | या पाठात फायरफॉक्समधील Themes, Personas, जाहिराती रोखणे हे शिकणार आहोत. |
00:13 | फायरफॉक्स, युजरच्या आवडीप्रमाणे पॅकेजमधे सोयी सुविधा व बदल करण्याची परवानगी देतो. |
00:20 | त्यापैकी एक म्हणजे Themes. |
00:23 | फायरफॉक्सचा स्क्रीन कसा दिसावा हे theme ठरवते. |
00:27 | तसेच बॅकग्राऊंड कलर, बटणांचे रूप आणि रचना बदलते. |
00:32 | यासाठी आपण Ubuntu 10.04 वर Firefox version 7.0 वापरत आहोत. |
00:40 | Firefox ब्राऊजर उघडू. |
00:43 | प्रथम फायरफॉक्सची Theme कशी बदलायची हे जाणून घेऊ. |
00:48 | प्रथम Load images automatically हा पर्याय सुरू करूया. त्यामुळे ब्राऊजरमधे दाखवल्या जाणा-या images बघू शकतो. |
00:58 | Menu बार वरील Edit आणि नंतर Preferences वर क्लिक करा. |
01:03 | Preferences डायलॉग बॉक्समधे Content टॅब वर क्लिक करा. |
01:08 | Load images automatically च्या चेक बॉक्स वर क्लिक करा. |
01:12 | Close वर क्लिक करा. |
01:14 | आता URL वर क्लिक करून
“addons dot mozilla dot org slash firefox slash themes” असे टाईप करा. |
01:25 | Enter दाबा. |
01:27 | हे आपणास Firefox Add-ons साठीच्या Themes पेजवर नेईल. |
01:32 | येथे thumbnails रूपात मोठ्या प्रमाणावर themes दिसतील. |
01:37 | thumbnails आपल्याला themes कशा दिसतील हे दाखवते. |
01:41 | येथे theme चा preview बघू शकतो. |
01:43 | उपलब्ध themes चे प्रकार बघा आणि, |
01:46 | ही theme ज्यांनी वापरली आहे त्या युजर्सनी दिलेली रेटिंग्ज बघा. |
01:52 | आता माऊस पॉईंटर काही themes वर नेऊ.<Pause> |
01:57 | Shine Bright Skin ह्या theme वर क्लिक करा. |
02:01 | ही पेजवर उपलब्ध असलेल्या अनेक themes पैकी एक आहे. |
02:05 | Shine Bright Skin theme पेज उघडेल. |
02:09 | Continue to Download बटना वर क्लिक करा. |
02:12 | हे आपल्याला theme बद्दल अधिक माहिती देणा-या पेजवर नेईल . |
02:17 | theme इन्स्टॉल करण्यासाठी Add to Firefox बटनावर क्लिक करा. |
02:22 | Add-on डाऊनलोडिंग प्रोग्रेस बार उघडेल. |
02:27 | पुढे Software इन्स्टॉल करण्यासंबंधीचा मेसेज उघडेल. |
02:32 | Install Now वर क्लिक करा. |
02:34 | "The theme will be installed once you restart Firefox" असा मेसेज दिसेल. |
02:40 | Restart Now वर क्लिक करा. |
02:43 | Firefox बंद होईल. |
02:46 | जेव्हा ते पुन्हा उघडेल तेव्हा नवी theme लागू झालेली असेल. |
02:51 | Themes page वर जाऊ. |
02:54 | आता दुसरी theme निवडू. |
02:57 | ही theme आपल्याला Add to Firefox बटण दाखवेल. |
03:01 | त्याद्वारे ही निवडलेली theme डाऊनलोड होईल. |
03:05 | डाऊनलोड पूर्ण झाल्यावर एक वॉर्निंग मेसेज विंडो उघडेल. |
03:10 | Install Now बटनावर क्लिक करा. |
03:13 | Firefox ब्राऊजर रिस्टार्ट करण्यासंबंधीचा मेसेज दिसेल. |
03:16 | Restart now बटनावर क्लिक करा. |
03:19 | Firefox बंद होईल. |
03:22 | पुन्हा सुरू झाल्यावर नवी theme लागू झालेली दिसेल. |
03:27 | असे दिसेल की Themes मुळे ब्राऊजरचे रंगरूप सुधारता येते. |
03:31 | ते तुमच्या आवडीनुसार Firefox मधे बदल करते. |
03:36 | जर काही कारणांनी default theme वर परत जायचे असेल, |
03:40 | तर Tools खालील Add-ons वर क्लिक करा. |
03:44 | डाव्या पॅनेलवरील Appearance वर क्लिक करा. |
03:48 | येथे डाऊनलोड केलेल्या सर्व themes आपल्याला दिसतील. |
03:53 | ही Default Theme आहे. |
03:56 | Enable बटनावर क्लिक करा. |
03:59 | Restart now बटनावर क्लिक करा. |
04:02 | Firefox बंद होऊन पुन्हा सुरू होईल . |
04:06 | आणि default theme पुन्हा दिसेल . |
04:12 | Add-ons टॅब बंद करूया. |
04:16 | # Personas ह्या विनामूल्य, इन्स्टॉल करण्यास सोप्या अश्या, फायरफॉक्सच्या "skins" असतात. |
04:22 | # Personas Plus मुळे ह्या अंगभूत सुविधांवर, |
04:26 | # अधिक नियंत्रण मिळते. |
04:28 | # तसेच नवीन, लोकप्रिय आणि तुमच्या आवडीच्या Personasना access मिळतो . |
04:34 | URL बार वर क्लिक करून
“addons dot mozilla dot org slash firefox slash personas” असे टाईप करा. |
04:44 | Enter दाबा. |
04:47 | हे Firefox Add-ons च्या Personas पेज वर घेऊन जाईल. |
04:52 | येथे मोठ्या प्रमाणावर personas दिसतील. |
04:56 | आवडीच्या कुठल्याही Persona वर क्लिक करा. |
05:01 | हे तुम्हाला निवडलेल्या Persona ची अधिक माहिती देणा-या पेजवर घेऊन जाईल. |
05:06 | Add to Firefox बटनावर क्लिक करा. |
05:09 | नवी थीम इन्स्टॉल झाली आहे हे सांगणारा Notification बार वरती दिसेल. |
05:16 | Notification बारच्या उजवीकडे असलेल्या छोट्या “x” चिन्हावर क्लिक करा. |
05:21 | Firefox ही Persona आपोआप इन्स्टॉल करेल. |
05:28 | इंटरनेट वापरताना मधूनच येणा-या जाहिरातींचा कधीकधी त्रास होतो. |
05:32 | या रोखण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. |
05:36 | असेच एक add-on म्हणजे Adblock. |
05:39 | Tools नंतर Add-ons वर क्लिक करा. |
05:43 | उजव्या कोप-यातवरती असलेल्या search tab मधे Adblock शोधू. Enter दाबा. |
05:51 | Ad blocking सॉफ्टवेअरची सूची दिसेल. |
05:55 | Adblock Plusसाठी Install बटनावर क्लिक करा. |
05:59 | Adblock डाऊनलोड होण्यास सुरूवात होईल. |
06:02 | आता Ad blocker इन्स्टॉल झाले आहे. |
06:06 | “Adblock will be installed after you restart Firefox” असा नोटीफिकेशन मेसेज दिसेल. |
06:14 | Restart now लिंक वर क्लिक करा. |
06:17 | Firefox बंद होऊन पुन्हा सुरू होईल. |
06:21 | पुन्हा सुरू झाल्यावर ad blocker लागू होईल. |
06:25 | परंतु ad blockers चा वाईट परिणाम म्हणजे, |
06:30 | * ad blocker सुरू असल्यास काही साईटस आपल्याला प्रवेश नाकारतात. |
06:35 | * कारण अनेक विनामूल्य साईटस जाहिरातींद्वारे उत्पन्न मिळवतात. |
06:41 | * काही साईटस ब्राऊजरवर दाखवण्यास Adblocker प्रतिबंध करू शकतात. |
06:46 | * ads block करण्यापूर्वी ह्या सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करणे गरजेचे आहे. |
06:51 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
06:54 | या पाठात शिकलोः थीम्स, Personas, जाहिराती रोखणे. |
07:00 | ही असाईनमेंट करा. |
07:03 | * 'NASA night launch' थीम इन्स्टॉल करा. |
07:06 | * नंतर default theme वर परत या. |
07:10 | * yahoo.com वरील pop ups शिवाय सर्व pop ups रोखा. |
07:15 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
07:18 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07:21 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07:25 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
07:28 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
07:31 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
07:35 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
07:41 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07:45 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
07:53 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
07:56 | * spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro |
08:04 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . |
08:08 | धन्यवाद . |