Health-and-Nutrition/C2/General-guidelines-for-Complementary-feeding/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:45, 24 August 2020 by Latapopale (Talk | contribs)
|
|
00:02 | पूरक आहार देण्याची सामान्य मार्गदर्शक तत्त्वे ह्यावरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:09 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत, |
00:14 | 6 महिन्याच्या बाळांसाठी पूरक आहार सुरू करण्याचे महत्त्व |
00:19 | आणि 6 ते 24 महिन्याच्या बाळांसाठी पूरक आहाराची मार्गदर्शक तत्त्वे. |
00:27 | सुरूवात करू. |
00:29 | बाळाला जन्मापासून ते 6 महिन्यांच्या कालावधीपर्यंत निव्वळ स्तनपानच करावे. |
00:37 | 6 महिन्यांचे बाळ याचा अर्थ असा नाही की बाळाच्या वयाच्या 6 व्या महिन्याची सुरुवात झाली. |
00:45 | तिने 6 महिने पूर्ण करून तिच्या वयाचा 7 वा महिना सुरू झाला आहे. |
00:52 | ह्या वयात बाळासाठी निव्वळ स्तनपान पुरेसे नसते. |
00:59 | आईच्या दुधाबरोबरच घरी शिजवलेले पोषक अन्न बाळाला दिलेच पाहिजे. |
01:06 | ह्या अन्नास पूरक अन्न म्हणतात. |
01:11 | हे 6 महिने ते 24 महिन्याच्या बाळास दिले जाणे गरजेचे आहे. |
01:18 | बाळाला उंच, निरोगी आणि बुद्धिमान बनविण्यात ह्याची महत्त्वाची भूमिका आहे. |
01:26 | वयाच्या 6 व्या महिन्यात पूरक आहार सुरू करणे महत्त्वाचे आहे. |
01:33 | अन्यथा, बाळाच्या वाढीत आणि विकासात अडथळा येईल. |
01:39 | नंतरच्या वयात बाळ घन पदार्थ नाकारण्याचीदेखील शक्यता असते. |
01:47 | लक्षात ठेवा पूरक अन्न स्तनपानास पाठींबा देते. |
01:53 | म्हणूनच, कमीतकमी वयाच्या 2 वर्षापर्यंत स्तनपान देणे आवश्यक आहे. |
02:00 | प्रकार, |
02:02 | सुसंगतता |
02:04 | आणि पूरक अन्नाचे प्रमाण बाळाच्या वयानुसार बदलते. |
02:10 | प्रत्येक वयोगटासाठी विशिष्ट शिफारसी आहेत. |
02:16 | त्याच मालिकेतल्या दुसऱ्या ट्युटोरिअलमध्ये त्यांची सविस्तर चर्चा केली आहे. |
02:23 | आता, सर्व वयोगटातील पूरक आहार देण्याच्या महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वांवर चर्चा करू. |
02:31 | कोणताही नवीन पदार्थ प्रथम बाळाला स्वतंत्रपणे देणे आवश्यक आहे. |
02:37 | नंतर हे पदार्थ इतर पदार्थांसोबत एकत्र केले पाहिजे. |
02:42 | बाळाला एखाद्या विशिष्ट पदार्थाचे वावडे आहे का याचे मूल्यांकन करण्यास हे मदत करेल. |
02:48 | चांगल्या पोषणासाठी विविध प्रकारचे पदार्थ खाणे आवश्यक आहे. |
02:54 | दर चौथ्या दिवशी बाळाच्या आहारात नवीन पदार्थाची भर घाला. |
03:01 | आधी दिलेल्या अन्नात 1 चमचा नवीन पदार्थाचा देऊन सुरवात करा. |
03:08 | रोज हळूहळू त्याचे प्रमाण वाढवा. |
03:12 | सर्व 8 खाद्य गटांमधील पौष्टिक घट्ट अन्न हळूहळू देणे आवश्यक आहे. |
03:20 | पहिला खाद्यगट धान्य, मुळे आणि कंद आहे. |
03:27 | ऊसळी, बियाणे आणि मेवा हा दुसरा गट आहे. |
03:32 | तिसरा गट आहे दुधाचे पदार्थ |
03:37 | चौथा गट आहे मांस, मासे आणि कोंबडी. |
03:42 | पाचवा गट आहे अंडी. |
03:46 | सहावा गट आहे जीवनसत्त्व अ ने समृद्ध फळे आणि भाज्या. |
03:52 | सातवा गट इतर फळे आणि भाज्या आहेत. |
03:57 | शेवटी, परंतु सर्वात महत्वाचा आठवा गट आहे आईचे दूध (स्तनपान). |
04:04 | इतर खाद्यगटांसह हे दररोज समाविष्ट केले जाणे आवश्यक आहे. |
04:11 | तसे पाहता, बाळाच्या आहारात सर्व 8 ही खाद्यगटांचा समावेश असलाच पाहिजे. |
04:17 | जर एखाद्या बाळाच्या आहारात या गटांपैकी 5 पेक्षा कमी गट असतील तर ही एक गंभीर समस्या आहे. |
04:24 | ते त्वरित दुरुस्त केले जाणे आवश्यक आहे. |
04:28 | काही बाळांना आईचे दूध बिल्कूल मिळत नाही. |
04:33 | त्यांच्या आहारात दररोज उर्वरित 7 गटातील खाद्य समाविष्ट करा. |
04:40 | तसेच, त्यांना दररोज 500 मि.ली. प्राण्याचे दूध आणि 2 अतिरिक्त जेवण द्यावे. |
04:49 | बाळाला दूध पाजण्यापूर्वी प्राण्याचे दूध नेहमी उकळवा. |
04:55 | आता आपण बाळाच्या आहारात नवीन खाद्य गट जोडण्याचा क्रम याविषयी चर्चा करू. |
05:02 | आईच्या दुधाबरोबरच पहिल्या 5 गटांमधून पूरक आहार देणे सुरू करा. |
05:09 | वयाच्या 6 महिन्यांनंतर बाळाला जास्त प्रमाणात पोषकद्रव्ये आवश्यक असतात. |
05:16 | तथापि, सुरुवातीच्या काळात दिले जाणारे अन्नाचे प्रमाण कमी असते. |
05:24 | म्हणून, पहिल्या 5 गटातील पौष्टिक घट्ट पदार्थ दिले जाऊ शकतात. |
05:31 | हे पदार्थ प्रथिने आणि चांगले मेद यासारख्या पोषकद्रव्यांनी समृद्ध असतात. |
05:38 | बाळाची उंची आणि स्नायूंच्या विकासासाठी ते महत्त्वाचे आहेत. |
05:45 | बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी चांगले मेद महत्त्वपूर्ण आहेत. |
05:50 | या पदार्थांनंतर भाज्या आणि फळे देणे सुरू करा. |
05:57 | भाज्या आणि फळांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात. |
06:03 | तथापि, ते पहिल्या 5 गटांतील प्रथिने आणि चरबीइतके समृद्ध नसतात . |
06:11 | म्हणूनच, वजन वाढण्याचे थांबणे किंवा कमी होणे हे टाळण्यासाठी ते उशिरा सुरू केले जातात. |
06:18 | तसेच, फळे चवीला गोड असतात. |
06:23 | हे महत्त्वाचे आहे की गोड चव अनुभवण्यापूर्वी लहान मुलांनी विविध प्रकारच्या चवी अनुभवलेल्या असाव्यात. |
06:31 | वेगवेगळ्या चवी अनुभवल्यामुळे मुलांना जास्तीत जास्त पदार्थ घेण्यास मदत होते. |
06:37 | यामुळे नंतर ते “मोजकेच खाणारे” बाळ होण्याची शक्यता कमी असते. |
06:44 | म्हणूनच, इतर सर्व प्रकारच्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यानंतरच मुलाच्या आहारात फळांचा समावेश केला पाहिजे . |
06:51 | दिवसातून एकदा किंवा दोनदा ताजे, हंगामी, स्थानिक फळे देण्याची शिफारस केली जाते. |
06:59 | नियमित जेवणानंतर मिष्टान्न म्हणून फळ देता येते. |
07:05 | फळांचा घट्ट रस बाळाच्या नियमित जेवणामध्ये मिसळू नये. |
07:11 | ह्या वयोगटासाठी फळांचा रस वापरण्याची शिफारस केलेली नाही |
07:16 | यात घरगुती आणि तयार अशा दोन्हीही प्रकारचा फळांच्या रसाचा समावेश आहे. |
07:23 | लक्षात ठेवा, 2 वर्षांपर्यंत स्तनपान देणे सुरू ठेवा. |
07:28 | कडक अन्न देणे टाळा ज्यामुळे बाळाला गुदमरल्यासारखे होऊ शकते. |
07:34 | अख्खा मेवा, द्राक्षे, चणे आणि कच्चे गाजरचे तुकडे ही अशा पदार्थांची उदाहरणे आहेत. |
07:44 | स्वच्छपणे तयार केलेले,ताजे शिजवलेले घरगुती अन्न बाळासाठी सर्वोत्कृष्ट आहे. |
07:51 | जर बाळाचे भोजन साठवायचे असेल तर कृपया आमच्या सेफ स्टोरेजवरील ट्युटोरिअल पहा. |
07:57 | सुरक्षित तयारी आणि बाळाचा आहार देण्याविषयीही याच ट्युटोरिअलमध्ये चर्चा आहे. |
08:06 | कृपया अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या. |
08:10 | अन्नासोबतच उकळून थंड केलेले पाणीदेखील 6 महिन्यांच्या बाळाला दिले जाऊ शकते. |
08:18 | दिवसातून दोनदा 30 ते 60 मिली पाण्याने सुरवात करा. |
08:25 | ह्याचे प्रमाण गरम वातावरणात आणि बाळाच्या मागणीनुसार वाढवा. |
08:31 | आईचे दूध आणि पाणी हे बाळासाठी सर्वोत्कृष्ट पेय आहेत. |
08:37 | तथापि, त्यांची योग्य वेळ असणे आवश्यक आहे. |
08:42 | जेवणाआधी बाळाला आईचे दूध किंवा पाणी देऊ नका. |
08:48 | भुकेलेले बाळ नवीन पदार्थ खाण्याचा संभव असतो. |
08:54 | जेवणाच्या 20 ते 30 मिनिटांपूर्वी किंवा नंतर बाळाला स्तनपान किंवा पाणी देऊ शकता. |
09:02 | मुलाची वाढ चांगली होण्यासाठी पुरेसा पूरक आहार आवश्यक आहे. |
09:08 | ह्यासह आपण ट्युटोरिअलच्या समाप्तीकडे आलो आहोत. सहभागासाठी धन्यवाद. |
हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवाद केले असून ह्यासाठी आवाज राधिका हुद्दार ह्यांनी दिला आहे. |