Health-and-Nutrition/C2/Storage-of-expressed-breastmilk/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:53, 29 January 2020 by Latapopale (Talk | contribs)
|
|
00:01 | काढलेल्या स्तनदूधाची साठवण ह्यावरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:06 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - काढलेले स्तनदूध नंतरच्या वापरासाठी सुरक्षितपणे कसे साठवावे. |
00:14 | सुरूवात करू. काढलेल्या स्तनदूधाचे बाळ आणि आईसाठी बरेच फायदे आहेत. |
00:22 | त्याच मालिकेतील दुसऱ्या ट्युटोरिअलमध्ये हाताने स्तनदूध काढणे ह्याचे स्पष्टीकरण दिले आहे. |
00:29 | काढलेले स्तनदूध सुरक्षितपणे हाताळले आणि साठवले पाहिजे. |
00:34 | असे केल्याने, बाळासाठी त्याची उच्च गुणवत्ता राखली जाईल. |
00:39 | स्तनदूध हाताळण्यापूर्वी आईने हात साबण व पाण्याने धुवावेत आणि ते व्यवस्थित कोरडे करावेत. |
00:47 | स्तनदूध साठवण्यासाठी, आईने स्टील किंवा काचेचे रुंद तोंडाचे भांडे वापरावे जे झाकून ठेवता येऊ शकते. |
00:56 | स्टीलच्या भांड्याची शिफारस केली जात असली तरीही आपण काही चित्रांमध्ये काचेचे भांडे वापरणार आहोत. |
01:03 | जेणेकरून, भांड्यामधील दूध आपल्याला स्पष्टपणे पाहता येईल. |
01:09 | नंतर, आईने निवडलेली भांडी साबण आणि पाण्याने धुवावीत. |
01:14 | त्यानंतर तिने भांडी उकळत्या पाण्यात किमान 10 मिनिटे तरी ठेवावीत. |
01:21 | नंतर, तिने एकतर भांडी हवेत पूर्णपणे वाळवावीत किंवा न वापरलेल्या स्वच्छ कपड्याने ते कोरडे करावीत. |
01:31 | भांडी स्वयंपाकघरात वापरलेल्या कपड्याने कधीही कोरडी करू नयेत. |
01:40 | स्वच्छ भांडे पूर्णपणे कोरडे झाल्यानंतर, तिने काढलेले दूध भांड्यांमध्ये ओतावे. |
01:48 | आईने प्रत्येक भांड्यात फक्त एकदा पाजण्यापुरते पुरेसे दूध किंवा सुमारे 60 ते 90 मिलीलीटर दूध साठवावे. |
01:58 | जर आई आपले स्तनदूध गोठवत असेल तर तिने भांड्याच्या वरच्या बाजूला एक इंचाची जागा सोडावी. कारण स्तनदूध जसजसे गोठते तसतसे विस्तृत होते. |
02:12 | तिने प्रत्येक भांड्याला दूध काढलेल्याची तारीख आणि वेळेसह चिट्ठी लावावी. |
02:18 | नंतर तिने ही स्तनदूधाने भरलेली भांडी शक्य तितक्या थंड ठिकाणी ठेवावीत. |
02:25 | जर तिच्याकडे फ्रीज आहे तर त्यात दूध साठवणे उत्तम आहे. |
02:30 | तिने फ्रीजच्या सर्वात खालच्या शेल्फच्या मागे स्तनदूध ठेवावे. ही फ्रीजची सर्वात थंड जागा आहे. |
02:40 | स्तनदूध कधीही फ्रीजच्या दारात ठेवू नका. |
02:44 | तापमान जितके कमी असेल तितका वेळ दूध वेळ चांगले राहील. |
02:49 | स्वच्छ प्रकारे ठेवल्यास स्तनदूध फ्रीजमध्ये 7 दिवसांपर्यंत साठवले जाऊ शकते. |
02:56 | ते सतत थंड ठेवणे आवश्यक आहे. |
02:59 | लक्षात ठेवा, फ्रीजचा दरवाजा जितक्या वेळा उघडला जाईल तितक्या वेळा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. |
03:07 | वीज कापल्याने किंवा इतर कारणांमुळे साठवणीच्या वेळी फ्रीजच्या तापमानात वाढ झाल्यास आईने 6 तासांच्या आत स्तनदूध वापरावे. |
03:19 | जर सहा तासांत स्तनदूधाचा वापर होत नसेल तर तिने ते फेकून द्यावे. |
03:26 | आईकडे फ्रीज नसल्यास ती आपले दूध घरात सुरक्षित, थंड आणि अंधाऱ्या ठिकाणी 6 तासांपर्यंत ठेवू शकते. |
03:39 | खोली गरम असल्यास ती स्तनदूध थंड पाण्याने भरलेल्या मातीच्या भांड्याजवळ किंवा भांड्यात ठेवू शकते. |
03:51 | ताज्या आईच्या दुधात संसर्गाशी लढणारे घटक असतात. |
03:58 | म्हणून ते गाईच्या दूधापेक्षा खराब न होता जास्त काळ राहू शकते. |
04:03 | गरम वातावरणात आणि फ्रीजच्या बाहेरदेखील ताज्या स्तनदूधात कमीतकमी 6 तास तरी जंतू वाढू शकत नाहीत. |
04:15 | स्तनदूध फ्रीजच्या बाहेर साठवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे थंड पिशवी किंवा अति-गोठवलेल्या बर्फांची पाकिटे असलेला बॉक्स वापरणे, जे दर 24 तासांनी बदलावे. |
04:27 | दूध बर्फाच्या पाकिटांपासून दूर ठेवा नाहीतर ते गोठेल. |
04:33 | दूध नेण्यासाठी थंड पिशवीदेखील वापरली जाऊ शकते. |
04:38 | स्तनदूध 7 दिवसांपेक्षा जास्त काळ साठवायचे असेल तर दूध काढल्यानंतर शक्य तितक्या लवकर आईने ते गोठवून घ्यावे. |
04:49 | फ्रीजच्या फ्रीजरमध्ये अति गोठलेले दूध 2 आठवड्यांसाठी चांगले राहते. |
04:56 | वेगळ्या फ्रीजरमध्ये ठेवलेले दूध 3 ते 6 महिन्यांसाठी चांगले असेल. |
05:04 | गोठविलेले स्तनदूध फ्रीजच्या सर्वात खालच्या शेल्फवर रात्रभर ठेवून वितळवले तर ते 24 तासांच्या आत वापरावे. |
05:17 | आणि जेव्हा ते फ्रीजच्या बाहेर वितळवले जाते तेव्हा ते 2 तासांच्या आत वापरावे. |
05:25 | इतर ट्युटोरियल्समध्ये, आपण स्पष्ट केले आहे - साठवलेले स्तनदूध बाळाला पिण्यास कसे तयार करावे. |
05:32 | आणि, काढलेले स्तनदूध बाळाला कसे पाजावे. |
05:37 | ह्यासह आपण ट्युटोरिअलच्या समाप्तीकडे आलो आहोत.हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवाद केले असून ह्यासाठी आवाज क्राईस्ट ग्लोरी सर्व्हिसेस ह्यांनी दिला आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |