GeoGebra-5.04/C2/Theorems-in-GeoGebra/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:42, 31 December 2019 by Radhika (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Marathi Narration
0:01 Theorems in GeoGebra वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
0:06 या ट्यूटोरियल मध्ये आपण जिओजेब्रा वापरुन सांगू आणि सिध्द करू. पायथागोरस प्रमेय आणि मिडपॉईंट प्रमेय.
0:16 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे.

उबंटू लिनक्स ओएस version 16.04 जिओजेब्रा version 5.0.438.0-डी.

0:29 या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी, शिकणार्‍याला GeoGebra इंटरफेसची माहिती असावी .

संबंधित जिओजेब्रा ट्यूटोरियलसाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या.

0:40 पायथागोरस प्रमेय सांगू
0:43 कर्णाचा वर्ग (उजव्या कोनाच्या विरुद्ध बाजू) इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो.
0:50 मी आधीच जिओजेबरा इंटरफेस उघडला आहे.
0:54 आपण अर्धवर्तुळाच्या रेखांकनापासून सुरूवात करू.
0:58 Semicircle through 2 Points टूल वर क्लिक करा.
1:02 त्यानंतर ग्राफिक्स व्यू मध्ये दोन बिंदू चिन्हांकित करण्यासाठी क्लिक करा.
1:07 पॉईंट वापरुन आपण अर्धवर्तुळ c वर दुसरा बिंदू C चिन्हांकित करू.
1:14 आता अर्धवर्तुळावरील बिंदू वापरून त्रिकोण ABC काढू.
1:19 पॉलीगॉन टूलवर क्लिक करा आणि त्रिकोण ABC काढा
1:26 येथे आपण त्रिकोण काढण्यासाठी अर्धवर्तुळ वापरत आहोत.
1:30 कारण आपल्याला 90 अशांच्या कोनाच्या मापाची गरज आहे
1:36 चला त्रिकोणाचे कोन मोजू.
1:39 एंगल टूल वर क्लिक करा आणि त्रिकोणाच्या आत क्लिक करा. येथे कोन ACB 90 अंश आहे.
1:49 आता आपण अर्धवर्तुळ c लपवू.
1:52 Algebra view मध्ये कोनिक अंतर्गत c च्या निळ्या बिंदूवर क्लिक करा.
1:58 त्रिकोणाच्या बाजूंनी तीन चौरस काढू.
2:02 त्यासाठी Regular Polygon tool वर क्लिक करा आणि नंतर बिंदू C, B वर क्लिक करा.
2:09 Regular Polygon text बॉक्स डीफॉल्ट value 4 सह उघडेल.
2:14 तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा.
2:17 जर आपण B, C बिंदूवर क्लिक केले तर चौरस उलट दिशेने काढला जाईल.
2:25 Undo या बटणावर क्लिक करून प्रक्रिया पूर्ववत करू.
2:29 आता बिंदू A, C वर क्लिक करा आणि नंतर दिसत असलेल्या text बॉक्समधील ओके बटणावर क्लिक करा.
2:37 त्याचप्रमाणे B, A बिंदूवर क्लिक करा आणि नंतर दिसत असलेल्या text बॉक्समधील ओके बटणावर क्लिक करा.
2:46 आता आपल्याकडे  Pythagorean triplets दाखवणारे तीन चौरस आहेत.
2:51 आकृती स्पष्टपणे पाहण्यासाठी आता आपण झूम आउट टूल वापरू.
2:57 आता आपण चौरसाचे क्षेत्र शोधू.
3:01 एरिया टूलवर क्लिक करा आणि अनुक्रमे पॉली 1, पॉली 2 आणि पॉली 3 वर क्लिक करा.
3:12 संबंधित चौरसाचे क्षेत्र दाखवले जाईल
3:16 Move tool वापरुन labels स्पष्ट दिसण्यासाठी ड्रॅग करा.
3:29 आता आपण क्षेत्रफळ पॉली 1 प्लस क्षेत्रफळ पॉली 2 हे पॉली 3 च्या क्षेत्रफळाइतके असल्याचे तपासू.
3:36 इनपुट बारमध्ये पॉली 1 + पॉली 2 टाइप करा आणि एंटर दाबा.
3:43 Algebra view मध्ये Number d, पॉली 3 च्या क्षेत्रफळाची value दर्शविते.
3:49 म्हणून पायथागोरस प्रमेय सिद्ध झाले आहे.
3:52 आता मी पायथागोरस प्रमेय करीता कन्स्ट्रक्शन प्रोटोकॉल स्पष्ट करते.
3:57 कन्स्ट्रक्शन प्रोटोकॉल अ‍ॅनिमेशन म्हणून आकृतीचे क्रमाक्रमाने रचना दर्शविते..
4:03 अ‍ॅनिमेशन पाहण्यासाठी व्ह्यू मेनूवर क्लिक करा आणि कन्स्ट्रक्शन प्रोटोकॉल चेक बॉक्स निवडा.
4:10 कन्स्ट्रक्शन प्रोटोकॉल व्यू ग्राफिक्स व्यू च्या पुढे उघडेल.
4:15 कन्स्ट्रक्शन प्रोटोकॉल व्यू पाहण्यासाठी मी ग्राफिक्स व्यू व्ह्यूची सीमा ड्रॅग करेन.
4:21 या व्यूमध्ये काही columnसह एक टेबल आहे. टेबलच्या खाली आपल्याकडे अ‍ॅनिमेशन कंट्रोल्स आहेत.
4:29 आता प्ले बटणावर क्लिक करा.
4:32 अ‍ॅनिमेशन म्हणून आकृतीची क्रमाक्रमाने रचना पहा.
4:50 आता आपण मिडपॉईंट प्रमेय सिद्ध करू.
4:53 त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्य-बिंदूंमध्ये जोडणारा रेषाखंड तिसर्‍या बाजूच्या समांतर आणि अर्धा आहे.
5:01 मी एक नवीन जिओजेब्रा विंडो उघडली आहे.
5:05 पॉलीगॉन टूल वापरुन त्रिकोण ABC काढा.
5:16 आता आपण AB आणि AC चा मधला बिंदू शोधू.
5:21 Midpoint or Center टूलवर क्लिक करा. नंतर बाजू AB आणि AC वर क्लिक करा.
5:30 लाइन टूल वापरुन बिंदू D आणि E मधून रेषा काढा.
5:38 आता आपण रेषाखंड AB च्या समांतर रेषा काढू.
5:42 त्यासाठी पॅरलल लाइन टूलवर क्लिक करा आणि रेषाखंड AB वर क्लिक करा.
5:49 नंतर बिंदू C वर क्लिक करा रेषाखंड AB ला समांतर रेषां g काढली आहे.
5:56 लक्ष द्या की f आणि g रेषा एका बिंदूत छेदत आहेत.
6:01 इंटरसेक्ट टूलचा वापर करून, छेदनबिंदू F म्हणून चिन्हांकित करू.
6:08 आता आपल्याला F C E आणि D A E कोन मोजण्याची आवश्यकता आहे.
6:17 एंगल टूल वर क्लिक करा आणि F, C, E आणि D, ​​A, E बिंदूवर क्लिक करा.
6:32 ते कोन समान असल्याचे पहा. ते एकमेकांचे अंतर्गत पर्यायी कोन आहेत.
6:38 त्याचप्रमाणे आपण C,B,D आणि E,D,A मोजू.
6:49 कोन समान आहेत. हे दर्शविते की रेषा f ही BC रेषाखंडाला समांतर आहे.
6:56 Distance or Length  टूल वापरुन D, E आणि B, C या बिंदूवर क्लिक करा.

लक्षात घ्या की DE हा BC च्या अर्धा आहे.

7:09 म्हणूनच मिडपॉईंट प्रमेय सिद्ध झाले आहे.
7:12 पुन्हा एकदा मी प्रमेय करीता कन्स्ट्रक्शन प्रोटोकॉल दर्शविते.
7:17 व्यू मेनूवर क्लिक करा. कन्स्ट्रक्शन प्रोटोकॉल चेक बॉक्स निवडा.
7:23 कन्स्ट्रक्शन प्रोटोकॉल view ग्राफिक्स व्यू च्या पुढे उघडेल.
7:28 आता प्ले बटणावर क्लिक करा.

आकृतीची क्रमाक्रमाने रचना पहा.

7:51 असाईनमेंट म्हणून हे प्रमेय सिद्ध करा.
7:55 आपली पूर्ण झालेली असाईनमेंट यासारखी दिसावी.
7:59 आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहू.
8:02 या ट्यूटोरियल मध्ये आपण जिओजेब्रा वापरुन सांगितले आणि सिद्ध केले,

पायथागोरस प्रमेय आणि मिडपॉईंट प्रमेय

8:12 पुढील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टचा सारांश देते.

कृपया ते डाउनलोड करा आणि पहा.

8:20 स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा घेते आणि प्रमाणपत्र देते.

अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.

8:28 कृपया या फोरममध्ये त्या विशिष्ट वेळे मधील प्रश्न पोस्ट करा.
8:32 स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी, एमएचआरडी, भारत सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते.

यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.

8:43 मी राधिका आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Radhika