OpenModelica/C3/Annotations--in-Modelica/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration | |
00:01 | Annotations वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. | |
00:05 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण Annotations कसे निर्दिष्ट करावे आणि रेकॉर्ड कसे परिभाषित करावे ? शिकणार आहोत. | |
00:14 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी OpenModelica 1.9.2 वापरत आहे. | |
00:20 | ह्या ट्युटोरियलचा सराव करण्यासाठी आपण खालीलपैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीम्सचा वापर करू शकता. | |
00:26 | हे ट्युटोरिअल समजण्यासाठी आणि सराव करण्यासाठी आपल्याला Modelica मध्ये क्लासच्या परिभाषेचे ज्ञान आवश्यक आहे. | |
00:33 | कृपया आमच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या पूर्वापेक्षित ट्युटोरिअल पहा. | |
00:39 | Annotations क्लासमध्ये अनेक ठिकाणी प्रदर्शित होऊ शकतात. | |
00:44 | त्यांचा उपयोग सिम्युलेशन सेटिंग्ज बदलण्यासाठी, सहाय्यक डॉक्युमेन्टेशन जोडण्यासाठी, आणि क्लासला icon आणि diagram views जोडण्यासाठी केला जाऊ शकतो. | |
00:56 | मागील ट्युटोरिअल्समध्ये, आपण सिम्युलेशन सेटिंग्ज बदलण्यासाठी टूलबारमधील SimulationSetup बटण वापरले. | |
01:05 | experiment हे मॉडेलचे ऍनोटेशन आहे जे खालील गोष्टी बदलण्यासाठी वापरले जाऊ शकते : Start Time , Stop Time ,Tolerance आणि Interval. | |
01:19 | Tolerance आणि Interval वरील चर्चा ह्या ट्युटोरिअल मालिकेच्या व्याप्ती बाहेर आहे. | |
01:25 | येथे experiment एनोटेशनचे सिन्टेक्स दर्शविणारे हे एक उदाहरण दाखवले आहे. | |
01:32 | आता, आपण bouncingBallWithAnnotations नामक क्लासच्या माध्यमातून, experiment एनोटेशन समजावून सांगू. | |
01:40 | मी OMEdit वर जाते. | |
01:43 | कृपया आमच्या वेबसाईटवर उपलब्ध सर्व फाईल्स डाऊनलोड करा. | |
01:48 | मी ह्या ट्युटोरियलसाठी आवश्यक मॉडेल फाईल्स उघडते. | |
01:54 | Ctrl+O दाबा. | |
01:58 | आपल्या डेस्कटॉपवरील योग्य स्थानावर जा आणि color.mo आणि bouncingBallWithAnnotations निवडा. | |
02:09 | ह्या फाईल्स आता OMEdit मध्ये उघडल्या आहेत. | |
02:13 | आपण प्रथम bouncingBallWithAnnotations पाहू. | |
02:18 | हे मॉडेलbouncingBall मॉडेलचे एक एक्सटेंशन आहे, ज्याची चर्चा आपण मागील ट्युटोरिअल्समध्ये केली होती. | |
02:25 | कृपया ह्या मॉडेलवरील अधिक माहितीसाठी पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्स पाहा. | |
02:31 | Libraries Browser मध्ये bouncingBallWithAnnotations वर डबल-क्लिक करा. | |
02:37 | चांगल्या दृश्यतेसाठी मी OMEdit विंडो डावीकडे हलवते. | |
02:42 | Icon/Diagram View मध्ये क्लास उघडली आहे तर text view वर जा. | |
02:48 | आता मॉडेल Text View मध्ये उघडले आहे. | |
02:52 | मी थोडे खाली स्क्रोल करते. | |
02:55 | येथे आपण experiment एनोटेशन startTime ला 0 आणि stopTime ला 5 युनिट्स करण्यासाठी वापरतो. | |
03:04 | experiment एनोटेशन हे Simulation Setup टूलबॉक्स सारखीच सेवा देते. | |
03:11 | टूलबारमध्ये Simulation Setup बटणावर क्लिक करा. | |
03:15 | आपण येथे तेच stopTime आणि startTime फिल्ड्स पाहू शकता. | |
03:21 | experiment एनोटेशन वापरून आपण ह्या फिल्ड्सच्या व्हॅल्यूज बदलल्या आहेत. | |
03:27 | आता मॉडेल सिम्युलेट करू. | |
03:30 | Simulate बटणावर क्लिक करा. | |
03:33 | variables browser मध्ये h निवडा. | |
03:37 | लक्षात घ्या की सिम्युलेशन इन्टरवल 5 युनिट्स आहेत. | |
03:42 | हे experiment एनोटेशनच्या startTime आणि StopTime मुळे आहे. | |
03:48 | आता h डी-सिलेक्ट करा आणि रिझल्ट डिलीट करा. | |
03:54 | तळाशी उजवीकडे Modeling बटणावर क्लिक करा. | |
03:58 | आता, एनोटेशन्स वापरून मॉडेलमध्ये डॉक्युमेंटेशन जोडण्याविषयी अधिक जाणून घेऊ. | |
04:06 | हायलाईट केलेला टेक्स्ट Documentation एनोटेशनमध्ये दिसतो. | |
04:11 | आता मी Documentation ऍनोटेशनचे एप्लिकेशन दाखवते. | |
04:17 | modeling एरियाच्या वर डावीकडे जा. | |
04:21 | Documentation View नावाच्या चौथ्या बटणावर क्लिक करा. | |
04:24 | आपण ब्राऊझरमध्ये Documentation एनोटेशनमध्ये टाईप केलेले टेक्स्ट पाहू शकता. | |
04:31 | ही कार्यक्षमता आपल्याला मोठ्या मॉडेल्ससाठी उपयुक्त माहिती जोडण्याची परवानगी देते, ज्यासाठी documentation आवश्यक आहे. | |
04:40 | Documentation ब्राऊझर बंद करा. मी पुन्हा स्लाईड्सवर जाते. | |
04:46 | Record हा एक विशिष्ट क्लास आहे, ज्याचा उपयोग record डाटा स्ट्रक्चर परिभाषित करण्यासाठी केला जातो. | |
04:52 | उदाहरणार्थ, बँक खात्यांमध्ये फिल्ड्स म्हणून व्यक्तीचे नाव, वय इत्यादी नोंदी असतात. | |
05:01 | Records मध्ये केवळ व्हेरिएबल्स असू शकतात. इक्वेशन्स नाही. | |
05:08 | येथे Person नावाचे एक रेकॉर्डचे उदाहरण दर्शविले आहे. | |
05:13 | त्यांचे फिल्ड्स म्हणून त्यात name आणि age आहे. | |
05:17 | मी रेकॉर्ड परिभाषित करण्यासाठी OMEdit वर जाते. | |
05:23 | मी OMEdit विंडो उजवीकडे सरकवते. | |
05:27 | आता आपण Color नावाची फाईल वापरणार आहोत. | |
05:31 | ती Textview मध्ये उघडण्यासाठी, Libraries Browser मध्ये color आयकॉनवर डबल-क्लिक करा. | |
05:39 | ह्या record चे red, blue आणि green नावाचे तीन व्हेरिएबल्स आहेत. | |
05:47 | आपण पाहू शकता की Simulate बटण टूलबारवर दिसत नाही. | |
05:53 | हे असे दर्शविते की रेकॉर्डचे अनुकरण केले जात नाही. | |
05:58 | आता मी स्लाईड्सवर परत जाते. | |
06:01 | रेकॉर्ड्स म्हणून एनोटेशन एलिमेंट्स समजणे अधिक सोपे आहे. | |
06:07 | उदाहरणार्थ, experiment एनोटेशन हे त्यांचे फिल्ड्स म्हणून StartTime, StopTime, Interval आणि Tolerance सह record म्हणून मानले जाऊ शकते. | |
06:19 | ग्राफिकल एलिमेन्ट्सची तशाचप्रकारे व्याख्या केली जाऊ शकते. | |
06:23 | आपण रेकॉर्ड म्हणून एनोटेशन्सच्या व्याख्येबद्दल अधिक समजून घेऊ,जेव्हा आपण icon आणि diagram views वर चर्चा करू. | |
06:33 | एक असाइनमेंट म्हणून, | |
06:35 | 10 ते 20 युनिट्सपर्यंत bouncingBallWithAnnotations class च्या सिम्युलेशनसाठी स्टॉप टाईम बदला. | |
06:42 | ह्यासाठी experiment annotation वापरा. | |
06:47 | ह्या बदलानंतर class सिम्युलेट करा. | |
06:50 | h विरुद्ध time प्लॉट करा आणि सिम्युलेशन स्टॉप टाईममध्ये बदल लक्षात घ्या. | |
06:57 | आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. | |
07:00 | खालील लिंकवरील उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा. | |
07:03 | हा स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टचा सारांश देतो. | |
07:07 | आम्ही स्पोकन ट्युटोरिअलचा उपयोग करून कार्यशाळा चालवितो. | |
07:11 | जे ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्र दिले जाते. कृपया आमच्याशी संपर्क साधा. | |
07:17 | ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले प्रश्न असल्यास, कृपया खालील वेबसाईटला भेट द्या. | |
07:24 | आम्ही प्रसिद्ध पुस्तकांमधील सोडलेल्या उदाहरणांचे कोडिंग समन्वित करतो. | |
07:29 | कृपया खालील वेबसाईटला भेट द्या. | |
07:32 | आम्ही व्यावसायिक सिम्युलेटर लॅब OpenModelica मध्ये स्थलांतरीत करण्यास मदत करतो. | |
07:38 | आम्ही असे करणाऱ्या लोकांना मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा. | |
07:43 | स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे. | |
07:50 | आम्ही OpenModelica च्या विकसनशील टीमचे त्यांच्या समर्थनासाठी आभारी आहोत. | |
07:56 | हे स्क्रिप्ट लता पोपळेद्वारे अनुवादित आहे. ह्या ट्युटोरिअलमध्ये सहभागासाठी धन्यवाद. |