OpenModelica/C2/OpenModelica-Connectors/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | OpenModelica Connectors वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:06 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण एक नवीन class तयार करणे, अस्तित्वात असलेला class उघडणे, विभिन्न classes कनेक्ट करणे, model बनवणे model आणि सिम्युलेट करणे शिकणार आहोत. |
00:22 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी OpenModelica version 1.11.0 आणि Ubuntu Linux OS 14.04 वापरत आहे. |
00:34 | परंतु, ह्या ट्युटोरिअलमध्ये प्रदर्शित केलेली प्रक्रिया इतर OS मध्ये समान आहे. जसे - Windows, Mac OS X किंवा ARM वर FOSSEE. |
00:47 | ह्या ट्युटोरिअलचा सराव करण्यासाठी, आपल्याला OMEdit बद्दल माहित असणे आवश्यक आहे. पूर्वापेक्षित ट्युटोरिअलचा आमच्या वेबसाईटवर उल्लेख केला आहे. |
00:57 | ट्युटोरिअलमध्ये वापरलेली RLC_Circuit फाईल आमच्या साईटवर कोड फाईल म्हणून देण्यात आली आहे. |
01:04 | Code Files लिंकवरून फाईल्स डाऊनलोड करा. |
01:09 | मी आधीच OMEdit विंडो उघडली आहे. |
01:13 | आता आपण नवीन model कसे तयार करावे याबद्दल चर्चा करू. |
01:18 | प्रथम आपण नवीन class तयार करणार आहोत. तर File मेनूवर जा आणि New Modelica Class निवडा. |
01:27 | Create New Modelica Class विंडो प्रदर्शित होते. |
01:31 | Name फील्डमध्ये, आपण तयार करू इच्छित असलेल्या class चे नाव प्रविष्ट करा. |
01:37 | मी Sample असे नाव प्रविष्ट करेन. |
01:41 | Specialization फील्डमध्ये, आपण तयार करू इच्छित असलेल्या class चा प्रकार निवडा. मी Class निवडेन. |
01:50 | मग OK वर क्लिक करा. |
01:53 | दिलेल्या नावासह एक नवीन class तयार होईल. |
01:57 | आगामी ट्युटोरिअलमध्ये आपण classes बद्दल अधिक शिकू. |
02:02 | आता आपण हा क्लास सेव्ह करू. |
02:05 | त्यासाठी, Sample class वर राईट-क्लिक करा आणि Save वर क्लिक करा. |
02:11 | ही फाईल सेव्ह करण्यासाठी योग्य स्थान निवडा. |
02:15 | Sample फाईल बंद करू. Sample वर राईट-क्लिक करा आणि Unload निवडा. |
02:22 | प्रदर्शित कंम्फरमेशन डायलॉग बॉक्समध्ये Yes वर क्लिक करा. |
02:27 | आता आपण विद्यमान class कसा उघडायचा हे शिकणार आहोत. |
02:32 | class उघडण्यासाठी, File मेनूवर जा. मग Open Model/Library File वर क्लिक करा. |
02:40 | आपल्याला जी उघडायची आहे ती इच्छित फाईल निवडा. |
02:44 | मी Code files फाईल निवडेन जी आधी RLC_Circuit.mo मधून डाऊनलोड केली होती. |
02:52 | Open बटणावर क्लिक करा. |
02:55 | आता आपण Connectors बद्दल शिकू. |
02:59 | Connector हा एका मॉडेलचे दुसर्या मॉडेलसोबत माहितीची देवाणघेवाण करण्यासाठीचा एक मार्ग आहे. |
03:07 | Connectors चे उपयोग : |
03:09 | कनेक्टर्स हे कनेक्शन्स, कम्युनिकेशन, कंपोन्मेट आणि बाहेरील जग यांना एकत्र जोडण्यासाठी वापरले जातात. |
03:17 | पुढे आपण classes जोडणे शिकू. |
03:20 | यासाठी मी RLC_Circuit फाईल वापरणार आहे जी आपण आधीच उघडली आहे. |
03:28 | RLC_Circuit हे एक Modelica package आहे ज्यात भिन्न classes आहेत. |
03:34 | package विस्तृत करू. |
03:37 | येथे आपण विविध classes, म्हणजे, Ground, VoltageSource , Resistor , Capacitor आणि Inductor पाहू शकतो. |
03:49 | आणि connector नावाचे Pin देखील. |
03:53 | आपण ह्या मालिकेत आगामी ट्युटोरिअल्समध्ये classes आणि connectors बद्दल अधिक जाणून घेऊ. |
04:00 | ह्या पॅकेजमध्ये circuit class देखील असतो. |
04:05 | circuit फाईलवर डबल-क्लिक करा आणि Text view वर जा. |
04:11 | इथे आपण पाहू शकतो की class मध्ये कोणत्याही कोडचा समावेश नाही. |
04:17 | आता Diagram View वर जा. |
04:20 | ग्रिड क्षेत्रामध्ये आपण सर्व blocks/components ठेवू. मग आपण त्यांना कनेक्ट करू. |
04:29 | Resistor वर क्लिक करा आणि त्यास ग्रीड स्पेसमध्ये ड्रॅग आणि ड्रॉप करा. |
04:35 | आपल्याला मेसेज मिळतो Enter Component Name. |
04:38 | Name फील्डमध्ये, R म्हणून कम्पोनन्ट नाव प्रविष्ट करा आणि OK वर क्लिक करा. |
04:47 | Inductor वर क्लिक करा आणि त्याला ग्रिड स्पेसमध्ये ड्रॅग आणि ड्रॉप करा आणि Resistor च्या नंतर ठेवा. |
04:56 | कम्पोनन्ट नाव L प्रविष्ट करा आणि OK वर क्लिक करा. |
05:02 | Capacitor वर क्लिक करा. ग्रिड स्पेसमध्ये ड्रॅग आणि ड्रॉप करा आणि ते Inductorच्या नंतर ठेवा. |
05:10 | कम्पोनन्ट नाव C प्रविष्ट करा आणि OK वर क्लिक करा. |
05:15 | नंतर, VoltageSource वर क्लिक करा आणि त्यास ग्रीड स्पेसमध्ये ड्रॅग आणि ड्रॉप करा. |
05:22 | हे R, L आणि C च्या वर ठेवा, जे श्रृंखलेनुसार आहेत. |
05:28 | कम्पोनन्ट नाव ACVoltage म्हणून प्रविष्ट करा. |
05:32 | लक्षात ठेवा, कृपया कम्पोनन्ट नावाच्या फील्डमध्ये कोणतीही स्पेस ठेवू नका. |
05:38 | सिम्युलेशनच्या वेळी तो अनुवाद एरर देईल. आता OK वर क्लिक करा. |
05:45 | त्यानंतर, Ground वर क्लिक करा आणि त्यास ग्रीड स्पेसमध्ये ड्रॉप आणि ड्रॉप करा. |
05:52 | हे श्रृंखलेत, R, L आणि C कम्पोनन्ट खाली ठेवा. |
05:57 | कम्पोनन्ट नाव G म्हणून प्रविष्ट करा आणि OK वर क्लिक करा. |
06:02 | आता श्रृंखलेत RLC Circuit तयार करण्यासाठी आपल्याकडे सर्व आवश्यक कम्पोनन्ट्स घटक आहेत. |
06:09 | हे कम्पोनन्ट्स जोडू. |
06:12 | माऊस कम्पोनन्टच्या डाव्या भागावर ठेवा. |
06:16 | पॉपअप RLC underscore Circuit dot pin p प्रदर्शित होतो. |
06:22 | हे positive pin दर्शवते. |
06:25 | त्याचप्रमाणे, कम्पोनन्टचा उजवा भाग RLC underscore Circuit dot pin n म्हणून पॉप अप दाखवितो. |
06:34 | हे negative pin दर्शवते. |
06:37 | कर्सर Resistorच्या negative pin वर ठेवा. |
06:42 | आपण + चिन्ह पाहू शकतो जेव्हा कर्सर n pin वर ठेवले जाते. |
06:48 | pin वर क्लिक करा. |
06:49 | ते धरून ठेवा आणि Inductor च्या p pin वर ड्रॅग करा. |
06:54 | Inductor's p pin वर क्लिक करा आणि नंतर कर्सर सोडा. |
07:01 | पुढे, आपण Inductor च्या n pin ला Capacitor च्या p pin शी जोडणार आहोत. |
07:08 | Inductor च्या n pin वर क्लिक करा. |
07:11 | धरून ठेवा आणि ते Capacitor च्या p pin वर ड्रॅग करा. |
07:15 | Capacitor च्या n pin वर क्लिक करा. |
07:20 | आता आपण श्रृंखलेत Resistor, Inductor आणि Capacitor कनेक्ट आहेत. |
07:28 | पुढील पायरी आहे VoltageSource प्रदान करणे. |
07:32 | Resistor च्या n pin वर क्लिक करा. |
07:36 | धरून ठेवा आणि ते VoltageSource च्या p pin वर ड्रॅग करा. |
07:42 | तशाचप्रकारे, आपण Capacitor चे n pin हे VoltageSource च्या n pin शी कनेक्ट करणार आहोत. |
07:50 | Capacitor च्या n pin वर क्लिक करा. |
07:53 | धरून ठेवा आणि ते VoltageSource च्या p pin वर ड्रॅग करा. |
07:58 | n pin वर क्लिक करा आणि कर्सर सोडा. |
08:03 | पुढील पायरी आहे, सर्किट Ground करणे. |
08:07 | VoltageSource च्या n pin वर क्लिक करा. |
08:11 | धरून ठेवा आणि ते Ground वर ड्रॅग करा. |
08:14 | लक्षात घ्या की Ground ला फक्त एकच pin मिळाली आहे जी आहे p pin. |
08:20 | त्यावर क्लिक करा आणि कर्सर सोडा. आता सर्किट पूर्ण आहे. |
08:25 | ट्युटोरिअल थांबवा आणि तपासा की आपले सर्किट ह्याप्रमाणे दिसले पाहिजे. |
08:33 | class सेव्ह करण्यासाठी CTRL S दाबा. |
08:37 | आता आपण class ची शुद्धता तपासणार आहोत. |
08:41 | Check All Models बटणावर क्लिक करा. |
08:45 | Messages Browser चे निरीक्षण करा. |
08:49 | हे, समीकरणांची संख्या आणि व्हेरिएबल्सची संख्या दर्शविते. |
08:53 | ते दोन्ही समान असतील तर मॉडेल सिम्युलेटसाठी तयार होईल. |
08:58 | Simulate बटणावर क्लिक करा. एक नवीन विंडो प्रदर्शित होते. |
09:03 | ही आऊटपुट विंडो success message दाखवते. |
09:09 | R विस्तृत करा आणि Ir आणि time च्या दरम्यान प्लॉट मिळवण्यासाठी Ir वर क्लिक करा. |
09:18 | आगामी ट्युटोरिल्समध्ये आपण इक्वेशन्स आणि व्हेरिएबल्स ह्याबद्दल शिकू. |
09:24 | हे सर्व ह्या ट्युटोरिअलसाठी आहे. सारांशित करू. |
09:28 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण, नवीन class तयार करणे, एक विद्यमान class उघडणे, विभिन्न classes कनेक्ट करणे, Model तयार करणे आणि सिम्युलेट करणे शिकलो. |
09:43 | असाईनमेंट म्हणून - RLC सर्किट निर्माण करा, जिथे Resistor, Inductor आणि Capacitor समांतर कनेक्शनमध्ये आहेत. |
09:53 | RLC_Circuit package मध्ये उपलब्ध असलेले समान classes आणि connector वापरा. |
10:01 | ही सर्किटची आकृती आहे ज्याची रचना करणे गरजेची आहे. |
10:07 | खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा. [1] हे स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टचा सारांश देते. |
10:15 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरिअल्सच्या साहाय्याने कार्यशाळा चालविते, ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हांला लिहा. |
10:31 | ह्या फोरममध्ये आपल्या वेळेसह आपले प्रश्न पोस्ट करा. |
10:34 | FOSSEE टीम लोकप्रिय पुस्तकांतील सोडवलेल्या उदाहरणांच्या कोडींगचे समन्वय करतो. आम्ही अशा लोकांना मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. अधिक माहितीसाठी, कृपया हया साईटला भेट द्या. |
10:49 | FOSSEE टीम व्यावसायिक सिम्युलेटर लॅब OpenModelica मध्ये स्थलांतर करण्यास मदत करते. आम्ही अशा लोकांना मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. अधिक माहितीसाठी, कृपया ह्या साईटला भेट द्या. |
11:06 | स्पोकन ट्युटोरिअल आणि FOSSEE प्रोजेक्ट्सला NMEICT, MHRD भारत सरकारद्वारे निधी मिळाला आहे. |
11:15 | हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. सहभागासाठी धन्यवाद. |