OpenModelica/C3/Annotations--in-Modelica/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:26, 11 December 2017 by Latapopale (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Annotations वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:05 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण Annotations कसे नमूद करावे आणि रेकॉर्ड कसे निश्चित करावे? शिकणार आहोत.
00:14 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी OpenModelica 1.9.2 वापरत आहे.
00:20 ह्या ट्युटोरियलचा सराव करण्यासाठी आपण खालीलपैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमचा उपयोग करू शकता.
00:26 हे ट्युटोरिअल समजण्यासाठी आणि सराव करण्यासाठी तुम्हाला Modelica मध्ये क्लासच्या परिभाषाचे ज्ञान आवश्यक आहे.
00:33 कृपया आमच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या पूर्वापेक्षित ट्युटोरिअल पहा.
00:39 Annotations क्लासमध्ये अनेक ठिकाणी दिसू शकतात.
00:44 त्यांचा उपयोग सिम्युलेशन सेटिंग्ज बदलण्यासाठी, डॉक्युमेन्टेशन जोडण्यासाठी, आणि क्लाससाठी add icon आणि diagram views जोडण्यासाठी केला जाऊ शकतो.
00:56 मागील ट्युटोरिअलमध्ये, आपण सिम्युलेशन सेटिंग्ज बदलण्यासाठी टूलबारमधील SimulationSetup बटण वापरले.
01:05 experiment हे मॉडेलचे ऍनोटेशन आहे जे खालीलप्रमाणे बदलण्यासाठी वापरले जाऊ शकते : Start Time , Stop Time ,Tolerance आणि Interval
01:19 Tolerance आणि Interval वरील चर्चा ह्या ट्युटोरिअल मालिकेच्या व्याप्ति बाहेर आहे.
01:25 experiment चे सिंटेक्स दर्शविणारे हे एक उदाहरण दाखवले आहे.
01:32 आता, आम्ही class नावाचा bouncingBallWithAnnotations, experiment एनोटेशन समजावून सांगू.
01:40 OMEdit वर जाऊ.
01:43 कृपया आमच्या वेबसाईटवर उपलब्ध सर्व फाईल्स डाऊनलोड करा.
01:48 ह्या ट्युटोरियलसाठी आवश्यक फाईल उघडा.
01:54 Ctrl+O दाबा.
01:58 आपल्या डेस्कटॉपवरील योग्य स्थानावर जा आणि color.mo आणि bouncingBallWithAnnotations निवडा.
02:09 ह्या फाईल्स आता OMEdit मध्ये उघडल्या आहेत.
02:13 आपण प्रथम bouncingBallWithAnnotations पाहू.
02:18 हे मॉडेलbouncingBall मॉडेलचे एक्सटेंशन आहे ज्याची आपण मागील ट्युटोरिअलमध्ये चर्चा केली होती.
02:25 कृपया ह्या मॉडेलवरील अधिक माहितीसाठी पूर्वापेक्षित ट्युटोरिअल पहा.
02:31 Libraries Browser मध्ये bouncingBallWithAnnotations वर डबल-क्लिक करा.
02:37 चांगल्या दृश्यतेसाठी OMEdit विंडो डावीकडे हलवतो.
02:42 Icon/Diagram View मध्ये क्लास उघडली आहे तर text view वर स्विच करा.
02:48 आता Text View मध्ये हे मॉडेल उघडले आहे.
02:52 मी थोडे खाली स्क्रोल करतो.
02:55 येथे आम्ही experiment एनोटेशनचा वापर startTime ला 0 आणि stopTimeला 5 युनिट्स करण्यासाठी करतो.
03:04 experiment एनोटेशन हे Simulation Setup सारखीच सेवा देते.
03:11 टूलबारमधील Simulation Setup बटणावर क्लिक करा.
03:15 आपण येथे stopTime आणि startTime फिल्ड्स पाहू शकता.
03:21 experiment एनोटेशन वापरून आपण ह्या फिल्डची वॅल्यू बदलली आहे.
03:27 आता मॉडेल सिम्युलेट करू.
03:30 Simulate बटणावर क्लिक करा.
03:33 variables browser मध्ये h निवडा.
03:37 लक्षात घ्या की सिम्युलेशन इन्टरवल 5 युनिट्स आहे.
03:42 हे experiment एनोटशनच्या startTime आणि ‘StopTime मुळे आहे.
03:48 आता h डी-सिलेक्ट करा आणि रिझल्ट डिलिट करा.
03:54 तळाशी उजवीकडील Modeling बटणावर क्लिक करा.
03:58 आता, एनोटेशन्स वापरून मॉडेलमध्ये डॉक्युमेंटेशन जोडण्याविषयी जाणून घेऊ.
04:06 हायलाईट केलेला टेक्स्ट Documentation एनोटेशनमध्ये दिसतो.
04:11 आता मी Documentation ऍनोटेशनचा एप्लिकेशन दाखवतो.
04:17 modeling एरियाच्या वर डावीकडे जा.
04:21 Documentation View नावाच्या चौथ्या बटणावर क्लिक करा.
04:24 आपण ब्राऊझरमध्ये Documentation मध्ये टाईप केलेले टेक्स्ट पाहू शकता.
04:31 ही कार्यक्षमता आपल्याला मोठ्या मॉडेल्ससाठी उपयुक्त माहिती जोडण्याची परवानगी देते ज्यासाठी documentation आवश्यक आहे.
04:40 Documentation ब्राऊझर बंद करा. पुन्हा स्लाईड्सवर जाऊ.
04:46 Record हा एक विशिष्ट क्लास आहे ज्याचा उपयोग रेकॉर्ड डाटा स्ट्रक्चर परिभाषित करण्यासाठी केला जातो.
04:52 उदाहरणार्थ, बँक खात्यांमध्ये फिल्ड म्हणून व्यक्तीचे नाव, वय इत्यादी नोंदी असतात.
05:01 Records मध्ये केवळ' व्हेरिएबल्स असू शकतात. इक्वेशन्स नाही.
05:08 येथे Person नावाचे एक रेकॉर्डचे उदाहरण दर्शविले आहे.
05:13 त्याचे फिल्ड म्हणून त्याचे वय आणि नाव आहे
05:17 मी रेकॉर्ड परिभाषा करण्यासाठी OMEdit वर जातो.
05:23 मी OMEdit विंडो उजवीकडे सरकवतो.
05:27 आता आपण Color नावाची फाईल वापरणार आहोत.
05:31 ती Textview मध्ये उघडण्यासाठी, Libraries Browser मधील color आयकॉनवर डबल-क्लिक करा.
05:39 ह्या record चे red, blue आणि green नावाचे तीन व्हेरिएबल्स आहेत.
05:47 आपण Simulate बटण टूलबारवर दिसत नसल्याचे पाहू शकता.
05:53 हे दर्शवितात की रेकॉर्डचे अनुकरण केले जात नाही.
05:58 आता मी स्लाईड्सवर परत जातो.
06:01 रेकॉर्ड म्हणून एनोटेशन एलिमेंट्स समजणे सोपे आहे.
06:07 उदाहरणार्थ, experiment एनोटेशन हे फील्ड म्हणून StartTime, StopTime, Interval आणि Tolerance सह record म्हणून मानले जाऊ शकते.
06:19 ग्राफिकल एलिमेन्ट्स सारखाच अर्थ लावला जाऊ शकतो.
06:23 जेव्हा आपण icon आणि diagram views वर चर्चा करतो तेव्हा आपण रेकॉर्ड म्हणून अॅनोटेशन्सच्या व्याख्येबद्दल समजतो.
06:33 एक असाइनमेंट म्हणून,
06:35 10 ते 20 युनिट्सपर्यंत bouncingBallWithAnnotations class च्या सिम्युलेशनसाठी स्टॉप टाईम बदला.
06:42 ह्यासाठी experiment annotation वापरा.
06:47 ह्या बदलानंतर class चे सिम्युलेट करा.
06:50 प्लॉट h विरुद्ध time आणि सिम्युलेशन स्टॉप टाईममध्ये बदल लक्षात घ्या.
06:57 आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
07:00 खालील लिंकवरील उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा.
07:03 हा स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टचा सारांश आहे.
07:07 आम्ही स्पोकन ट्युटोरिअलचा उपयोग करून कार्यशाळा चालवितो.
07:11 जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्र दिले जाते. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
07:17 ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले प्रश्न असल्यास, कृपया खालील वेबसाईटला भेट द्या.
07:24 आम्ही प्रसिद्ध पुस्तकांमधील सोडलेल्या उदाहरणांचे कोडिंग समन्वित करतो.
07:29 कृपया खालील वेबसाईटला भेट द्या.
07:32 आम्ही व्यावसायिक सिम्युलेटर लॅब OpenModelica मध्ये स्थलांतर करण्यास मदत करतो.
07:38 आम्ही अशा लोकांना मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
07:43 स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे.
07:50 त्यांच्या समर्थनासाठी आम्ही OpenModelica च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.
07:56 हे स्क्रिप्ट लता पोपळेद्वारे अनुवादित आहे. ह्या ट्युटोरियलमध्ये सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana