OpenModelica/C3/Icon-and-Diagram-Views/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:19, 14 December 2017 by Latapopale (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Icon and Diagram Viewsवरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण क्लासचे icon and diagram views कसे निर्दिष्ट करावे शिकणार आहोत.
00:14 Icon/Diagram View मध्ये polygon आणि ellipse कसे इन्सर्ट करावे ?
00:20 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी OpenModelica version 1.9.2 वापरत आहे.
00:27 आपण हे ट्युटोरिअल वापरण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमचा उपयोग करू शकता - Linux, Windows, Mac OS X किंवा ARM वर FOSSEE OS.
00:39 हे ट्युटोरिअल समजण्यासाठी आणि सराव करण्यासाठी आपल्याला Modelica मध्ये क्लासच्या परिभाषेचे ज्ञान आवश्यक आहे. एनोटेशन्स कशी निर्दिष्ट करायची हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.
00:51 पूर्वापेक्षित ट्युटोरिअल आमच्या वेबसाईटवर उल्लेखित आहेत. कृपया त्यांमार्फत जा.
00:57 Icon and Diagram Views मॉडेल पाहण्यासाठी ग्राफिकली सक्षम आहे.
01:03 Annotations एखाद्या मॉडेलचे Icon and Diagram Views निर्दिष्ट करण्यासाठी वापरले जाऊ शकते.
01:09 Icon Annotation वापरून Icon View दर्शविले आहे तर Diagram Annotation वापरून Diagram View दर्शविले गेले आहे.
01:19 ते component-oriented modeling साठी ड्रॅग व ड्रॉप कार्यक्षमता सक्षम करतात.
01:25 आपण पुढील ट्युटोरिअलमध्ये ह्या वैशिष्ट्याबद्दल अधिक चर्चा करू.
01:30 आता, Icon and Diagram Annotations चे सिंटॅक्स समजून घेण्याचा प्रयत्न करू.
01:37 आपण मागील ट्युटोरिअल्समध्ये पाहिल्याप्रमाणे, अॅनोटेशन्स रेकॉर्ड म्हणून अधिक चांगल्याप्रकारे समजली जाऊ शकतात.
01:44 त्यामुळे, Icon आणि Diagram annotations ला coordinateSystem सह रेकॉर्ड्सना coordinateSystem म्हणून आणि ग्राफिक्सना fields म्हणून विचारात घेतली जाऊ शकतात.
01:55 आपण त्यातील प्रत्येकास वैयक्तिकरित्या पाहू.
01:58 coordinateSystem, खालील फिल्डसह record म्हणून मानले जाऊ शकते: extent, initialScale, preserveAspectRatio आणि grid.
02:10 आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून ते समजून घेऊ.
02:15 इथे Icon/Diagram Annotation चे सिंटॅक्स दाखवणारे हे एक उदाहरण आहे.
02:22 आता मी OMEdit वर जातो.
02:26 आपण icon आणि diagram annotations समजून घेणार आहोत. bouncingBallWithAnnotations नावाच्या एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ.
02:35 कृपया आमच्या वेबसाईटवरून ही फाईल डाऊनलोड करा.
02:39 हे मॉडेल मागील ट्यूटोरिअलमध्ये वापरले होते.
02:42 कृपया ह्या मॉडेलबद्दल अधिक माहितीसाठी पूर्वापेक्षित ट्यूटोरियल्स पाहा.
02:48 मी आधीच OMEdit मध्ये bouncingBallWithAnnotations उघडले आहे.
02:54 Libraries Browser ह्या त्याच्या आयकॉनवर डबल-क्लिक करा.
02:58 मॉडेल आता Icon Viewमध्ये उघडले आहे.
03:02 ते Diagram किंवा Text View मध्ये उघडल्यास Icon View वर जा.
03:08 चांगल्या दृश्यमानतेसाठी, OMEdit विंडो मी डावीकडे हलवतो.
03:14 ह्या मॉडेलच्या Icon View मध्ये आपण पांढर्याम पार्श्वभूमीवर वर्तुळ पाहू शकता.
03:21 मी Icon View मध्ये canvas म्हणून पांढर्याड स्पेसचा संदर्भ घेणार आहे.
03:27 लक्षात घ्या की, canvas ग्रिड्समध्ये विभागले आहे.
03:32 आपण प्रथम canvas च्या गुणधर्मांवर कुशलतेने कसे फेरबदल करावे ते शिकू.
03:37 मग आपण circle आणि polygon कसे इन्सर्ट करायचे ते शिकू.
03:43 circle च्या बाजूला असलेल्या कॅनव्हसवर राईट-क्लिक करा. Properties निवडा.
03:51 दाखवल्याप्रमाणे, एक डायलॉग बॉक्स पॉप अप होतो.
03:55 लक्षात घ्या की, Extent, Grid आणि Component नावाच्या श्रेणी आहेत.
04:04 Extent कॅनव्हासची मर्यादा सूचित करते.
04:07 Left आणि Top या नावाचे फील्ड्स कॅनव्हासच्या वरच्या डाव्या कोपर्या.त निर्देशांकाशी संबंधित आहेत.
04:16 Left आडव्या निर्देशांकाशी जुळतो आणि Top उभ्या निर्देशांकाशी जुळतो.
04:24 त्याचप्रमाणे Bottom आणि Right हे कॅनव्हासच्या तळाशी उजव्या कोपऱ्याच्या निर्देशांकांशी निगडीत आहे.
04:33 आता Left फील्ड -200 युनिट्स बदलू. Ok वर क्लिक करा.
04:41 लक्षात घ्या की 100 युनिट्सने कॅनव्हास डावीकडे विस्तारीत केले आहे.
04:47 पुन्हा कॅनव्हासवर राइट-क्लिक करा आणि Properties निवडा.
04:53 Grid हे ग्रीडची साईझ चिन्हांकित करते.
04:57 लक्षात घ्या की extent आणि grid चे युनिट्स Scale Factor पेक्षा भिन्न आहेत.
05:04 ग्रिडमध्ये आडवी फिल्ड 4 युनिटंसमध्ये बदला. OK वर क्लिक करा.
05:11 लक्षात घ्या की, कॅनव्हासमध्ये ग्रीडचा आकार वाढला आहे.
05:16 Icon View च्या हे प्रॉपर्टीज Text View मधील Icon annotation वापरून फेरफार केले जाऊ शकतात.
05:24 लक्षात घ्या की, Icon View मधील कोणताही बदल त्यानुसार Icon annotation मध्ये दाखवले आहे.
05:32 हे समजण्याचा प्रयत्न करू. modeling भागाच्या शीर्षस्थानी जा आणि Text View वर क्लिक करा. थोडे खाली स्क्रोल करा.
05:43 coordinateSystem, जसे की आपण स्लाईड्समध्ये पाहिले आहे, Icon एनोटेशनमध्ये एक फील्ड आहे.
05:50 extent coordinateSystem मध्ये एक फील्ड आहे. त्यात संख्येच्या दोन जोड्या आहेत.
05:57 Properties डायलॉग बॉक्स वापरुन extent कसे फेरबदल करावे हे आपण आधीच पाहिले आहे.
06:04 संख्यांची प्रथम जोड {-200,-100} आहे.
06:09 या जोडीची पहिली संख्या जी -200 आहे जी कॅनव्हासच्या वरच्या डाव्या कोपर्या.त होरिझोन्टल निर्देशांक दर्शविते.
06:20 त्याचप्रमाणे, -100 त्याच बिंदूचे वर्टिकल निर्देशांक दर्शवते.
06:27 दुसरी जोडी पांढर्या- स्पेसच्या खालच्या उजव्या कोपर्यादच्या निर्देशांकचे प्रतिनिधीत्व करते.
06:35 लक्षात घ्या की, ह्या 4 संख्या, top, bottom, left आणि right फिल्डशी संबंधित आहेत, आपण Properties डायलॉग बॉक्समध्ये पाहिले आहे.
06:45 आता, Icon View च्या Properties डायलॉग बॉक्स वापरून मी extent बदलतो.
06:52 आपण नंतर Text View च्या annotation मध्ये त्यानुसार बदल दिसतील.
06:59 मी Icon View जातो.
07:02 कॅनव्हासवर राईट-क्लिक करा आणि Properties निवडा.
07:07 Left फील्ड -150.00 मध्ये बदला. Ok वर क्लिक करा
07:14 Text View वर क्लिक करा, खाली स्क्रोल करा.
07:18 लक्षात घ्या की, extent मधील निर्देशांकची पहिली जोडी {-150,-100} ते {-200,-100} मध्ये बदलली आहे
07:30 हे Properties डायलॉग बॉक्स वापरून Icon View मध्ये केलेल्या बदलामुळे आहे.
07:37 म्हणूनच, Icon annotation मध्ये कोणताही बदल Icon View आणि त्याच्या विरोधात सुसंगत बदल करतो.
07:46 coordinateSystem च्या इतर फिल्ड्सची चर्चा जसे, ScaleFactor ह्या ट्युटोरिलच्या व्याप्ति बाहेर आहे.
07:54 मी पुन्हा स्लाईड्सवर जातो.
07:57 आपण आधीच चर्चा केली आहे की Icon ऍनोटेशनमध्ये त्याचे एलिमेंट्स म्हणून coordinateSystem आणि graphics आहेत.
08:06 graphics record मध्ये पुढील गोष्टी असू शकतात : : Line , Rectangle , Ellipse , Polygon, Text आणि Bitmap.
08:17 Icon and Diagram viewsमध्ये हे आयटम्स कसे इनसर्ट करायचे ते आपण आता पाहू.
08:25 मी OMEdit वर परत जातो.
08:29 आपण तीन टप्प्यांत हे एनोटेशन्स समजू शकतो. bouncingBallWithAnnotations आधीपासूनच एक circle आहे जो त्याच्या Icon View मध्ये इनसर्ट केला आहे.
08:40 Ellipse एनोटेशन वापरून circle प्राप्त केले आहे. प्रथम आपण त्याची प्रॉपर्टिज सुधारित करण्याचा प्रयत्न करू.
08:49 लक्षात ठेवा की, Ellipse इनसर्ट केले आहे आणि त्याचे प्रॉपर्टिज आयकॉन एनोटेशनच्या ग्राफिक्स फिल्डमध्ये निर्दिष्ट केले आहेत.
08:59 मी Icon View वर जातो.
09:02 circle मधील निळ्या स्पेसवर राईट-क्लिक करा. Properties निवडा.
09:09 OriginX is the horizontal coordinate of center of ellipse.
09:15 Similarly, OriginY is the vertical coordinate of the center of ellipse.
09:22 Extent1X हे ellipse च्या सर्वात डाव्या बिंदूचे आडवे निर्देशांक आहे.
09:29 Extent1Y हे ellipse च्या सर्वात वरचे निर्देशांक आहे.
09:36 त्याप्रमाणे Extent2X and Extent2Y सर्वात डावे आणि सर्वात खालील बिंदूशी जुळतो.
09:48 Line Style चा उपयोग बॉर्डर लाईनच्या प्रॉपर्टीज बदलण्यासाठी केला जातो.
09:53 Line Style अंतर्गत Color वर क्लिक करा.
09:57 ह्याने आपण बॉर्डरचा रंग बदलू शकतो.
10:01 मी रेड निवडतो आणि OK वर क्लिक करतो.
10:05 Line Style अंतर्गत ड्रॉपडाऊन मेनू Pattern वर क्लिक करा.
10:10 हे आपल्याला बॉर्डरचे पॅटर्न बदलण्यास अनुमती देते. मी एक सॉलिड लाईन निवडली आहे.
10:17 Thickness फिल्ड बॉर्डरची जाडी निर्दिष्ट करते.
10:21 त्यास 0.5 युनिटमध्ये बदला.
10:25 Ok वर क्लिक करा.
10:27 लाल रंगाची बॉर्डरमधील वाढ आणि जाडीची वाढ ह्यांच्यातील बदल लक्षात घ्या.
10:34 आता पुन्हा एकदा सर्कलवर क्लिक करा आणि Properties निवडा.
10:40 Fill Style अंतर्गत, Color वर क्लिक करा.
10:44 Color Palette मधून Black निवडा. Ok वर क्लिक करा.
10:49 हा रंग ellipse च्या आतील भागात रंग भरण्यासाठी रंग दर्शवतो.
10:56 आता Fill Pattern ड्रॉप-डाऊन मेनूवर क्लिक करा.
11:00 FillPattern.Horizontal निवडा आणि Ok वर क्लिक करा.
11:06 लक्ष द्या की, रंग काळ्यामध्ये बदलला आहे आणि पॅटर्न सॉलिडपासून हॉरिझेन्टलमध्ये बदलले आहे.
11:15 आता Ellipse एनोटेशन स्पष्ट करण्यासाठी, मी Text View वर जातो. Text Viewवर क्लिक करा. खाली स्क्रोल करा.
11:25 lineColor तीन संख्या घेते जे बॉर्डरचा रंग परिभाषित करते.
11:31 ह्या तीनपैकी प्रत्येक संख्या 0 आणि 255 ह्यांदरम्यान व्हॅल्यू घेऊ शकते.
11:38 वापरलेल्या रंगाच्या RGB तीव्रतेशी ते संबंधित आहेत.
11:44 fillPattern आतील भागात भरले जाणारे पॅटर्न निर्दिष्ट करते.
11:51 extent हे coordinateSystem च्या extent फील्डच्या संदर्भात समान आहे.
11:57 LineThickness बॉर्डरची जाडी दर्शवते.
12:02 लक्षात घ्या की, हे सर्व फील्ड्स Properties डायलॉग बॉक्स वापरून बदलता येतात, जसे आपण आधीच पाहिले आहे.
12:10 आता, मी टूलबारच्या सहाय्याने नवीन ellipse तयार करण्यासाठी Icon View वर जातो. Icon View वर क्लिक करा.
12:19 मी काही स्पेस मोकळी करण्यासाठी विद्यमान circle ची पुनर्रचना करतो.
12:24 circle वर राईट-क्लिक करा आणि properties निवडा.
12:29 Extent2Y ला 0 युनिट्समध्ये बदला. Ok वर क्लिक करा.
12:35 आता नवीन ellipse इन्सर्ट करण्यासाठी, टूलबारमधील Ellipse बटणावर क्लिक करा.
12:42 कॅन्वसमध्ये कुठेतरी लेफ्ट-क्लिक करा आणि माऊस धरून ड्रॅग करा.
12:50 एक ellipse तयार झाल्यानंतर माऊस सोडून द्या.
12:55 ellipse वर राईट-क्लिक करा आणि Properties निवडा म्हणजे ते आपली प्रॉपर्टिज बदलू शकेल. Ok वर क्लिक करा.
13:05 त्याचप्रमाणे आपण टूलबारच्या मदतीने Line, Polygon, Rectangle आणि Text घालू शकता.
13:13 आता मी Diagram View स्पष्ट करते. Diagram View वर क्लिक करा.
13:19 लक्षात घ्या की, येथे एक ओळ इन्सर्ट केली आहे. या रेषेची प्रॉपर्टिज Diagram एनोटेशनमध्ये निर्दिष्ट केली आहे.
13:28 Diagram एनोटेशन समजून घेण्यासाठी Text View वर जा. खाली स्क्रोल करा.
13:35 Diagram एनोटेशन त्याच्या सिन्टॅक्समध्ये Icon एनोटेशन समान आहे.
13:41 ह्यात हा त्याचे कम्पोनंट रेकॉर्ड्स म्हणून coordinateSystem आणि graphics आहे.
13:47 Diagram View मध्ये Line ची इन्सर्ट केलेल्या प्रॉपर्टिज येथे नमूद केल्या आहेत.
13:53 Line एनोटेशनचे फिल्ड्ज सहज समजले जाऊ शकतात.
13:58 आता Icon आणि Diagram Views मधील फरक समजून घेऊ.
14:04 मी OMEdit विंडो उजवीकडे हलवतो.
14:09 Ctrl + S दाबून मॉडेल सेव्ह करा.
14:13 Icon View मध्ये दर्शविलेली आकृती Libraries Browser मधील आयकॉन म्हणून दिसते जसे येथे पाहिले जाऊ शकते.
14:22 तर Diagram View कॉम्पेनंट-आधारित मॉडेलिंगमध्ये लक्षणीय प्रमाणात वापरले जाते.
14:29 आगामी ट्यूटोरिअलमध्ये आपण component-oriented modeling बद्दल अधिक जाणून घेऊ.
14:35 आता मी पुन्हा स्लाईड्सवर जातो.
14:39 Ellipse मध्ये खालील फील्ड्स आहेत जशी आपण आधीच चर्चा केली आहे.
14:44 असाईनमेंट म्हणून, मॉडेलच्या Icon View मध्ये line, polygon, rectangle इन्सर्ट करा.
14:53 त्यांचे प्रॉपर्टिज मॉडिफाय करा आणि त्यांचे एनोटेशन्स समजून घ्या.
14:58 आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
15:02 खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पहा. हा स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट सारांशित करतो.
15:08 आम्ही स्पोकन ट्युटोरियल्सच्या सहाय्याने वर्कशॉपचे आयोजन करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
15:14 ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले प्रश्न असल्यास, कृपया खालील वेबसाईटला भेट द्या.
15:20 आम्ही लोकप्रिय पुस्तकांतील सोडवलेल्या उदाहरणांचे कोडिंग करतो. कृपया दाखवलेल्या वेबसाईटला भेट द्या.
15:28 आम्ही व्यावसायिक सिम्युलेटर लॅब स्थलांतर करण्यास OpenModelicaला मदत करतो.
15:33 कृपया आमच्या लॅबमधील स्थलांतरणाच्या अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या.
15:39 स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे अर्थसहाय्य दिले जाते.
15:46 त्यांच्या समर्थनासाठी आम्ही OpenModelica च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.

हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana