OpenModelica/C2/Introduction-to-OMEdit/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:53, 11 December 2017 by Latapopale (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | Introduction to OMEditवरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:07 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण OpenModelica आणि OMEdit बद्दल शिकणार आहोत. |
00:15 | लायब्ररी ब्राऊझरमधून एक Class उघडा, लायब्ररी ब्राऊझरमधून एक Class सिम्युलेट करा. |
00:23 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी OpenModelica वर्जन 1.9.5 आण उबंटू लिनक्स ओएस 14.04 वापरत आहे. |
00:36 | परंतु, या ट्युटोरिअलमध्ये प्रदर्शित केलेली प्रोसेस ही इतर OS मध्ये एकसारखीच आहे जसे Windows , Mac OS X किंवा ARM वर FOSSEE OS सारखी आहे. |
00:48 | ह्या ट्युटोरिअलचे सिम्युलेशन करण्यासाठी आपणांस भिन्न आणि बीजगणितीय समीकरणांचे ज्ञान असावे. |
00:55 | OpenModelica काय आहे? OpenModelica ही एक ओपन-सोर्स मॉडेलिंग आणि सिम्युलेशन एन्वायरमेंट आहे. |
01:03 | कॉम्प्लेक्स सिस्टमसाठी ऑब्जेक्ट ओरिएंटेड, मल्टी-डोमेन मॉडेलिंग लँग्वेज. |
01:09 | औद्योगिक आणि शैक्षणिक दोन्ही उद्देशांसाठी हेतू आहे. |
01:15 | प्रथम OMEdit काय आहे ते पाहू. |
01:19 | OMEdit हे OpenModelica Connection Editor चे संक्षिप्त रूप आहे. |
01:24 | ग्राफिकल मॉडेलसाठी हे नवीन ग्राफिकल यूजर इंटरफेस आहे. |
01:29 | मॉडेल्सची निर्मिती आणि सुधारण्यासाठी त्यात अनेक वैशिष्ट्ये आहेत. |
01:34 | आता मी OMEdit विंडोवर जातो. |
01:38 | मी आधीच माझ्या सिस्टमवर OMEdit इन्टॉल केले आहे. |
01:43 | OMEdit विंडो उघडण्यासाठी, Dash Home वर क्लिक करा. |
01:47 | सर्च बारमध्ये, OMEdit टाईप करा. |
01:51 | OMEdit आयकॉनवर क्लिक करा, जे प्रदर्शित होत आहे. |
01:55 | OMEdit आयकॉनवर क्लिक केल्यावर आपण Welcome perspective विंडो पाहत आहोत. हे Recent Files आणि Latest News ची सूची दर्शविते. |
02:06 | OMEdit विंडोच्या डाव्या बाजूवर, आपल्याला लायब्ररी ब्राऊझर दिसत आहे. येथे आपण लायब्ररींची सूची पाहू शकता. |
02:15 | Modelica लायब्ररी विस्तृत करू. |
02:18 | त्यासाठी, Modelica लायब्ररीच्या डाव्या बाजूच्या बाणावर क्लिक करा. |
02:23 | इथे आपण उपलब्ध असलेल्या लायब्ररींची यादी पाहू शकता. |
02:28 | Thermal लायब्ररीच्या डाव्या बाजूच्या बाणावर क्लिक करा. |
02:31 | Thermal अंतर्गत, आपल्याला HeatTransfer लायब्ररी आढळते. ती विस्तृत करा. |
02:37 | पुन्हा एकदा, आपल्याला अनेक वेगवेगळ्या लायब्ररीज दिसतील. |
02:43 | आता Example लायब्ररी विस्तृत करू. |
02:47 | येथे आपण Heat Transfer ची विविध उदाहरणे पाहू शकता. |
02:52 | TwoMasses नावाचे क्लास उघडू. |
02:56 | TwoMasses वर राईट-क्लिक करा आणि Open Class निवडा. |
03:01 | आपण क्लास उघडण्यासाठी class वर डबल-क्लिकदेखील करू शकतो. |
03:06 | आता आपण Modeling Perspective विंडोमध्ये आहोत. |
03:10 | Diagram View मध्ये class डीफॉल्टपणे उघडेल. |
03:14 | Diagram View वर्गात उघडत नसल्यास काळजी करू नका. |
03:19 | मी तुम्हाला दाखवेन की वेगवेगळ्या viewsमध्ये कसे स्विच करावे. |
03:23 | modeling area विंडोवर, आपण मॉडेलचे Diagram View पाहू शकतो. |
03:28 | modeling areaच्या शीर्षस्थानी, आपल्याला चार भिन्न आयकॉन्स दिसतात. |
03:33 | प्रथम आयकॉन हे Icon View प्रदर्शित करते. |
03:37 | Model प्रतिनिधित्त्व पाहण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
03:41 | पुढील आयकॉन Diagram view प्रदर्शित करते. |
03:45 | मॉडेलचे प्रतिनिधित्व करणारे आरेखन पाहण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
03:49 | तिसरे आयकॉन Text View आहे. |
03:52 | त्यावर क्लिक करू. |
03:54 | इथे आपण Two Masses क्लासशी संबंधित Modelica कोड पाहू. |
04:00 | पुढील ट्युटोरिअल्समध्ये आपण OMEdit मध्ये कोड कसे लिहायचे ते शिकणार आहोत. |
04:05 | पुढील आयकॉन Documentation view वर क्लिक करा. |
04:10 | Documentation Browser नावाची एक नवीन विंडो OMEdit विंडोच्या उजव्या बाजूला उघडेल. |
04:17 | इथे आपण मॉडेलबद्दल दिलेली सविस्तर माहिती वाचू शकतो. |
04:23 | आता Documentation Browser बंद करा. |
04:27 | model सिम्युलेट करण्यापूर्वी, आपल्याला मॉडेलची शुद्धता तपासणे गरजेचे आहे. |
04:32 | हे करण्यासाठी प्रथम टूलबारवरील Check All Models बटण शोधा. |
04:37 | ह्या बटणावर पांढऱ्या रंगाचे डबल टिक्स आहेत. त्यावर क्लिक करा. |
04:43 | लक्षात घ्या की एक Messages Browser विंडोच्या तळाशी उघडते. |
04:48 | हे Modelica class शी संबंधित संदेश दर्शवेल. |
04:53 | आता, मॉडेल सिम्युलेट करण्याचा प्रयत्न करू. |
04:56 | हे करण्यासाठी, टूलबारवरील हिरव्या रंगाच्या एरो बटणावर क्लिक करा. |
05:02 | हे Simulate बटण आहे जे मॉडेल सिम्युलेट करण्यासाठी वापरले जाते. |
05:06 | आपण Modelica class सिम्युलेट करण्यासाठी Ctrl +B देखील दाबू शकतो. |
05:11 | सिम्युलेट केल्यावर नवीन विंडो उघडेल. |
05:14 | हे class ची कंम्पायलेशन प्रोसेस दर्शविते. |
05:18 | कंम्पायलेशन यशस्वी झाल्यानंतर, आऊटपुट विंडो मेसेज प्रदर्शित करेल: |
05:23 | Simulation process finished successfully. ही विंडो मिनिमाईज करा. |
05:30 | डिफॉल्टपणे, Plotting Perspective हे, OMEdit विंडोमध्ये उघडते |
05:35 | जर ते उघडत नसेल, तर उजव्या बाजूस Plotting बटणावर क्लिक करा. |
05:40 | आपण Plotting विंडो उघडण्यासाठी Ctrl +F3 देखील दाबू शकतो. |
05:45 | येथे आपण Modelica class चे सिम्युलेशन रिझल्ट्स पाहू शकतो. |
05:50 | Plotting Perspective च्या उजवीकडील, Variables Browser विंडो पाहा. |
05:55 | Variables Browser अंतर्गत, मी Modelica class चे इनपुट व्हेरिएबल वॅल्यूज कसे बदलावे ते दाखवतो. |
06:03 | conduction व्हेरिएबल विस्तृत करू. |
06:06 | G ची वॅल्यू बदला आणि Q_flow आणि dT चे वॅल्यूज कसे बदलतात ते पाहा. |
06:13 | डीफॉल्टपणे, G = 10, Q_flow = 263.599 W आणि dT = 26.3599 K |
06:25 | G ची व्हॅल्यू 10 वरून 15 बदलू. |
06:30 | आणि Enter दाबा. |
06:32 | विंडोच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात जाऊ. |
06:35 | टूलबारवरील Re-simulate बटणावर क्लिक करा. |
06:39 | आपल्याला सक्सेस मेसेज विंडो दिसते. ही विंडो मिनिमाईज करा. |
06:44 | एकदा सिम्युलेशन पूर्ण झाल्यावर, होणारा बदल लक्षात ठेवा. |
06:48 | Q_flow = 203.009 W आणि dT = 13.5339 K |
06:56 | आता मी तुम्हांला प्लॉट कसे जनरेट करायचे ते दाखवतो. |
07:00 | dT व्हेरिएबल समोरील चेकबॉक्सवर क्लिक करा. |
07:04 | आपण X-axis वर time आणि Y-axis वर dT दरम्यान प्लॉट पाहू शकता. |
07:11 | हे प्लॉट वेळेनुसार बदलत असलेल्या two masses मधील तापमानाच्या अंतराचे वर्णन करतात. |
07:17 | डीफॉल्टपणे, सिम्युलेशन 0 ते 1 युनिट टाईमपर्यंत रन होते. |
07:22 | आपण Simulation Setup ऑप्शनचा वापर करून हे इंटर्वल बदलू शकतो. |
07:27 | ह्यासाठी Modeling Perspective वर जा. |
07:30 | उजव्या बाजूस Modeling बटणावर क्लिक करा. |
07:33 | किंवा Modeling विंडो उघडण्यासाठी, Ctrl +F2 दाबा. |
07:38 | टूलबारवरील Simulation Setup ऑप्शनवर क्लिक करा. |
07:43 | Simulation Setup विंडो उघडते. |
07:46 | Stop Time ला 5 युनिटमध्ये बदला. |
07:49 | हे सुनिश्चित करा की, Simulate चेक बॉक्स तपासला आहे. |
07:52 | Ok वर क्लिक करा. |
07:55 | आपल्याला ताबडतोब सक्सेस मेसेज विंडो दिसते. |
07:59 | ही विंडो मिनिमाईज करा. |
08:02 | class, 0 ते 5 युनिट टाईमच्या सिम्युलेशन इंटर्वलसह रि-सिम्युलेट होते. |
08:08 | आपण इतर कोणत्याही दोन व्हेरिएबल्स दरम्यान, टाईमपेक्षा, एक प्लॉटदेखील मिळवू शकतो. आता हे करून पाहू. |
08:16 | टूलबारवरील New Parametric Plot Window वर क्लिक करा. |
08:20 | आता आपण Q_flow आणि dT अशी दोन व्हेरिएबल्स निवडू, जी आपल्याला प्ल़ॉट करायची आहेत. |
08:26 | आता आपण, X-axis वर dT आणि Y-axis वर Q_flow यादरम्यान एक प्लॉट पाहू शकतो. |
08:34 | जसे की त्यांच्यातील तापमानाचा फरक कमी होतो, हे हीट फ्लोची भिन्नता दर्शविते. |
08:40 | एकदा आवश्यक प्लॉट जनरेट केल्यानंतर आपण रिझल्ट डिलिट करू शकतो. |
08:45 | Variables Browser मध्ये, TwoMasses वर राईट-क्लिक करा. |
08:49 | Delete Result निवडा. रिझल्ट आता डिलिट करण्यात आला आहे. |
08:55 | OpenModelica मध्ये एक Help मेनू आहे. |
08:58 | Menu बारवर जा आणि Help ऑप्शनवर क्लिक करा. |
09:02 | इथे आपण User Guide, System, Scripting आणि Modelica Documentation पाहू शकता. |
09:10 | सारांशित करू. |
09:12 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण OpenModelica बद्दल शिकलो |
09:16 | OMEdit चा परिचय |
09:18 | Libraries Browser मधून Class उघडणे. |
09:21 | Libraries Browser मधून Class सिम्युलेट करणे. |
09:25 | असाईनमेंट म्हणून : Fluid लायब्ररीमध्ये Modelica विस्तृत करा. |
09:30 | Modelica मध्ये Examples लायब्ररी विस्तृत करा. |
09:34 | HeatExchanger लायब्ररीमध्ये, HeatExchangerSimulation क्लास सिम्युलेट करा. |
09:39 | काही इनपुट व्हेरिएबल्सचे वॅल्यू बदला आणि रि-सिम्युलेट करा. |
09:43 | Q_Flow_1 आणि time ह्यांदरम्यान एक प्ल़ॉट जनरेट करा. |
09:48 | खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा. |
09:51 | हे स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टचा सारांश देते. |
09:55 | स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरिअलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
10:01 | परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हांला लिहा. |
10:08 | ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपल्याला प्रश्न आहेत का ? कृपया ह्या साईइटला भेट द्या. जेथे आपणास प्रश्न आहेत ते मिनिट आणि सेकंद निवडा. |
10:17 | आपला प्रश्न थोडक्यात स्पष्ट करा. FOSSEE टीममधील कोणीतरी त्याचे उत्तर देईल. |
10:23 | स्पोकन ट्युटोरिअल फोरम, ह्या ट्युटोरिअलवरील विशिष्ट प्रश्नांसाठी आहे. कृपया त्यांच्यावरील असंबंधित आणि सामान्य प्रश्न पोस्ट करू नका. हे गोंधळ कमी करण्यास मदत करेल. |
10:36 | अधिक गोंधळ न घालता, आपण ही चर्चा शिक्षणविषयक सामग्री म्हणून वापरू शकता. |
10:42 | FOSSEE टीम लोकप्रिय पुस्तकांतील सोडवलेल्या उदाहरणांची कोडींग समन्वयित करते. |
10:47 | आम्ही अशांना मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. अधिक तपशीलासाठी, कृपया ह्या साईटला भेट द्या. |
10:56 | FOSSEE टीम, व्यावसायिक सिम्युलेटर लॅब OpenModelica वर स्थलांतरित करण्यासाठी मदत करते. |
11:02 | आम्ही हे करणाऱ्यांना मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. अधिक माहितीसाठी, कृपया ह्या साईटला भेट द्या. |
11:11 | स्पोकन ट्युटोरिअल आणि FOSSEE प्रोजेक्ट्सला, NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी मिळाला आहे. |
11:20 | हे स्क्रिप्ट लता पोपळेद्वारे अनुवादित आहे. सहभागासाठी धन्यवाद. |