OpenFOAM/C3/Using-Template-files-in-PyFoam/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या Using Template files in PyFoam वरील पाठात आपले स्वागत.
|
00:07 | या पाठात जाणून घेऊ PyFoam Utilities चे कार्य |
00:13 | Template फाईल्स तयार करणे व त्यांचा वापर. |
00:17 | supersonic flow over wedge हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी PyFoamFromTemplate dot py चा वापर करणे |
00:24 | आपण हे Template फाईल्सच्या सहाय्याने वेगवेगळ्या wedge angles साठी कार्यान्वित करू शकतो. |
00:29 | या पाठासाठी मी उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04 तसेच |
00:36 | OpenFOAM 2.3.0 आणि
PyFoam-0.6.5 वापरत आहे. |
00:42 | या पाठाच्या सरावासाठी तुम्हाला लिनक्स टर्मिनल प्राथमिक ज्ञान तसेच, |
00:49 | OpenFOAM केसेस कार्यान्वित करण्याचा आणि त्यांचे विश्लेषण करण्याचा अनुभव असावा. |
00:54 | नसल्यास या वेबसाईटवरील लिनक्स आणि OpenFOAM या पाठांच्या मालिकेचा संदर्भ घ्या.
|
01:00 | Template फाईल्स म्हणजे काय?
|
01:03 | blockMeshDict किंवा controlDict सारख्या OpenFOAM च्या फाईल्स तयार करण्यासाठी Template फाईल्सचा उपयोग केला जातो. |
01:10 | Template फाईल्स प्रोग्रॅम करता येतात, त्यामुळे आपण कार्यपद्धती वापरून डेटा तयार करू शकतो. |
01:16 | Template फाईल ही OpenFOAM फाईल असली पाहिजे ज्यामधे पुढील गोष्टींचा समावेश असतो - |
01:22 | $$ ने सुरू होणारी कुठलीही ओळ ही Python प्रोग्रॅम लाईन असते. |
01:28 | ती Python द्वारे कार्यान्वित होईल. |
01:31 | vertical pipe dash variable name dash vertical pipe या सिंटॅक्सच्या सहाय्याने कोणतेही व्हेरिएबल, फाईलमधे वापरता येते. |
01:42 | Template फाईलचा उपयोग करण्यासाठी पुढील स्टेप्स वापरणे गरजेचे आहे : |
01:47 | प्रथम उपलब्ध फाईल कॉपी करा. |
01:50 | त्यानंतर हे Template फाईल तयार करेल. |
01:54 | नंतर PyFoamFromTemplate dot py कार्यान्वित करा. |
01:58 | blockMeshDict साठी Template फाईल तयार होईल. |
02:02 | आपण supersonic flow over a wedge ही केस वापरू. ही केस फाईल rhoCentralFoam solver मधे उपलब्ध आहे. |
02:12 | टर्मिनल उघडा. काँप्रेसिबल सॉल्व्हर्समधील rhoCentralFoam चा पाथ टाईप करा. |
02:22 | आता Wedge15Ma5 केस डिरेक्टरी OpenFOAM डिरेक्टरीमधे कॉपी करण्यासाठी टाईप करा cp space minus r space Wedge15Ma5 space आणि तुमच्या OpenFOAM डिरेक्टरीचा पाथ पुढे टाईप करा. एंटर दाबा. |
02:46 | टर्मिनलवर OpenFOAM डिरेक्टरीमधील Wedge15Ma5 पाथ टाईप करा. |
02:53 | constant मधील polyMesh डिरेक्टरीमधील blockMeshDict फाईलचा पाथ टाईप करा. |
03:00 | blockMeshDict फाईल तुमच्या पसंतीचा एडिटर वापरून उघडा. |
03:06 | आपण vertices चा भाग बघू शकतो. |
03:09 | आपल्याला slope च्या अंतिम बिंदूंचे को-ऑर्डिनेटस मिळवणे गरजेचे आहे. |
03:14 | angle वर आधारित असलेल्या पुढील ओळींमधे बदल करा. |
03:19 | टर्मिनलवर परत जा. |
03:22 | तुमची blockMeshDict फाईल blockMeshDict dot template नावाच्या फाईलमधे कॉपी करा. |
03:29 | त्यासाठी पुढील कमांड टाईप करा- cp space minus r space blockMeshDict space blockMeshDict dot template |
03:40 | gedit च्या सहाय्याने blockMeshDict dot template ही फाईल उघडा. |
03:46 | convertToMeters च्यावर पुढील ओळी समाविष्ट करा. |
03:51 | $$ (डॉलर डॉलर) ने सुरू होणारी कुठलीही ओळ ही Python ची ओळ आहे, आणि Python द्वारे त्या ओळीचा अर्थ लावला जातो तसेच ती कार्यान्वित केली जाते. |
04:02 | येथे दिल्याप्रमाणे vertices मधे बदल करा. |
04:06 | Template फाईलमधे वापरलेली Python व्हेरिएबल्स या फाईलमधे कुठेही प्रतिस्थापित केली पाहिजेत. |
04:14 | हे करण्यासाठी फाइलमध्ये vertical pipe dash variable name dash vertical pipe वापरा. |
04:22 | आपण या फाईलमधे केलेले बदल पाहू शकतो. |
04:26 | आता एक रिकामी फाईल तयार करूया. |
04:30 | टर्मिनलवर gedit templateFileConst टाईप करून एंटर दाबा. |
04:40 | त्यामधे एक डमी एंट्री बनवण्यासाठी टाईप करा dummy space 1.0 semicolon |
04:48 | ही डमी एंट्री अनिवार्य आहे. |
04:51 | Template फाईलमधे उपयोग केल्या जाणा-या कोणत्याही constant बरोबर एक बाह्य dict प्रदान केले जाणे गरजेचे आहे. |
04:59 | फाईल सेव्ह करून बंद करा. |
05:04 | आता template कमांड कार्यान्वित करणे गरजेचे आहे. |
05:08 | ही कमांड टर्मिनलमधे टाईप करून एंटर दाबा. |
05:15 | आपण बघू शकतो की दोन नव्या फाईल्स तयार झाल्या आहेत. blockMeshDict आणि Python फाईल देखील तयार झालेली आहे. |
05:24 | Python फाईलमधे बदल करू नका. |
05:27 | blockMeshDict फाईल उघडण्यासाठी gedit space blockMeshDict टाईप करून एंटर दाबा. |
05:36 | wedge angle आपण 15 deg बदलून तो 10 deg केला आहे. |
05:41 | slope चे अंतिम बिंदू देखील बदलले आहेत. |
05:45 | आता blockMesh, rhoCentralFoam या OpenFOAM कमांडस कार्यान्वित करून केस फाईल कार्यान्वित करू शकतो. Paraview च्या सहाय्याने रिझल्टस दृश्य स्वरूपात पाहू शकतो. |
05:57 | असाईनमेंट म्हणून खाली दिलेले wedge angles वापरून template कमांड कार्यान्वित करा. |
06:03 | थोडक्यात, |
06:05 | या पाठात PyFoamTemplate फाईल्सबद्दल जाणून घेतले. |
06:10 | तसेच- Template फाईल्स बनवून त्यांचा वापर करणे. तसेच PyFoamFromTemplate dot py कमांडचा वापर करायला शिकलो. |
06:19 | कृपया या फोरममधे संबंधित विषयाचे प्रश्न वेळासहित पाठवा. |
06:23 | कृपया या फोरमवर OpenFOAM वरील सर्वसाधारण प्रश्न पाठवा. |
06:28 | FOSSEE टीम TBC प्रोजेक्टचा समन्वय करते. |
06:32 | या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधीची अधिक माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे.
|
06:41 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद. |