OpenFOAM/C3/Using-Template-files-in-PyFoam/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या Using Template files in PyFoam वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात जाणून घेऊ PyFoam Utilities चे कार्य
00:13 Template फाईल्स तयार करणे व त्यांचा वापर.
00:17 supersonic flow over wedge हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी PyFoamFromTemplate dot py चा वापर करणे
00:24 आपण हे Template फाईल्सच्या सहाय्याने वेगवेगळ्या wedge angles साठी कार्यान्वित करू शकतो.
00:29 या पाठासाठी मी उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04 तसेच
00:36 OpenFOAM 2.3.0 आणि

PyFoam-0.6.5 वापरत आहे.

00:42 या पाठाच्या सरावासाठी तुम्हाला लिनक्स टर्मिनल प्राथमिक ज्ञान तसेच,
00:49 OpenFOAM केसेस कार्यान्वित करण्याचा आणि त्यांचे विश्लेषण करण्याचा अनुभव असावा.
00:54 नसल्यास या वेबसाईटवरील लिनक्स आणि OpenFOAM या पाठांच्या मालिकेचा संदर्भ घ्या.
01:00 Template फाईल्स म्हणजे काय?
01:03 blockMeshDict किंवा controlDict सारख्या OpenFOAM च्या फाईल्स तयार करण्यासाठी Template फाईल्सचा उपयोग केला जातो.
01:10 Template फाईल्स प्रोग्रॅम करता येतात, त्यामुळे आपण कार्यपद्धती वापरून डेटा तयार करू शकतो.
01:16 Template फाईल ही OpenFOAM फाईल असली पाहिजे ज्यामधे पुढील गोष्टींचा समावेश असतो -
01:22 $$ ने सुरू होणारी कुठलीही ओळ ही Python प्रोग्रॅम लाईन असते.
01:28 ती Python द्वारे कार्यान्वित होईल.
01:31 vertical pipe dash variable name dash vertical pipe या सिंटॅक्सच्या सहाय्याने कोणतेही व्हेरिएबल, फाईलमधे वापरता येते.
01:42 Template फाईलचा उपयोग करण्यासाठी पुढील स्टेप्स वापरणे गरजेचे आहे :
01:47 प्रथम उपलब्ध फाईल कॉपी करा.
01:50 त्यानंतर हे Template फाईल तयार करेल.
01:54 नंतर PyFoamFromTemplate dot py कार्यान्वित करा.
01:58 blockMeshDict साठी Template फाईल तयार होईल.
02:02 आपण supersonic flow over a wedge ही केस वापरू. ही केस फाईल rhoCentralFoam solver मधे उपलब्ध आहे.
02:12 टर्मिनल उघडा. काँप्रेसिबल सॉल्व्हर्समधील rhoCentralFoam चा पाथ टाईप करा.
02:22 आता Wedge15Ma5 केस डिरेक्टरी OpenFOAM डिरेक्टरीमधे कॉपी करण्यासाठी टाईप करा cp space minus r space Wedge15Ma5 space आणि तुमच्या OpenFOAM डिरेक्टरीचा पाथ पुढे टाईप करा. एंटर दाबा.
02:46 टर्मिनलवर OpenFOAM डिरेक्टरीमधील Wedge15Ma5 पाथ टाईप करा.
02:53 constant मधील polyMesh डिरेक्टरीमधील blockMeshDict फाईलचा पाथ टाईप करा.
03:00 blockMeshDict फाईल तुमच्या पसंतीचा एडिटर वापरून उघडा.
03:06 आपण vertices चा भाग बघू शकतो.
03:09 आपल्याला slope च्या अंतिम बिंदूंचे को-ऑर्डिनेटस मिळवणे गरजेचे आहे.
03:14 angle वर आधारित असलेल्या पुढील ओळींमधे बदल करा.
03:19 टर्मिनलवर परत जा.
03:22 तुमची blockMeshDict फाईल blockMeshDict dot template नावाच्या फाईलमधे कॉपी करा.
03:29 त्यासाठी पुढील कमांड टाईप करा- cp space minus r space blockMeshDict space blockMeshDict dot template
03:40 gedit च्या सहाय्याने blockMeshDict dot template ही फाईल उघडा.
03:46 convertToMeters च्यावर पुढील ओळी समाविष्ट करा.
03:51 $$ (डॉलर डॉलर) ने सुरू होणारी कुठलीही ओळ ही Python ची ओळ आहे, आणि Python द्वारे त्या ओळीचा अर्थ लावला जातो तसेच ती कार्यान्वित केली जाते.
04:02 येथे दिल्याप्रमाणे vertices मधे बदल करा.
04:06 Template फाईलमधे वापरलेली Python व्हेरिएबल्स या फाईलमधे कुठेही प्रतिस्थापित केली पाहिजेत.
04:14 हे करण्यासाठी फाइलमध्ये vertical pipe dash variable name dash vertical pipe वापरा.
04:22 आपण या फाईलमधे केलेले बदल पाहू शकतो.
04:26 आता एक रिकामी फाईल तयार करूया.
04:30 टर्मिनलवर gedit templateFileConst टाईप करून एंटर दाबा.
04:40 त्यामधे एक डमी एंट्री बनवण्यासाठी टाईप करा dummy space 1.0 semicolon
04:48 ही डमी एंट्री अनिवार्य आहे.
04:51 Template फाईलमधे उपयोग केल्या जाणा-या कोणत्याही constant बरोबर एक बाह्य dict प्रदान केले जाणे गरजेचे आहे.
04:59 फाईल सेव्ह करून बंद करा.
05:04 आता template कमांड कार्यान्वित करणे गरजेचे आहे.
05:08 ही कमांड टर्मिनलमधे टाईप करून एंटर दाबा.
05:15 आपण बघू शकतो की दोन नव्या फाईल्स तयार झाल्या आहेत. blockMeshDict आणि Python फाईल देखील तयार झालेली आहे.
05:24 Python फाईलमधे बदल करू नका.
05:27 blockMeshDict फाईल उघडण्यासाठी gedit space blockMeshDict टाईप करून एंटर दाबा.
05:36 wedge angle आपण 15 deg बदलून तो 10 deg केला आहे.
05:41 slope चे अंतिम बिंदू देखील बदलले आहेत.
05:45 आता blockMesh, rhoCentralFoam या OpenFOAM कमांडस कार्यान्वित करून केस फाईल कार्यान्वित करू शकतो. Paraview च्या सहाय्याने रिझल्टस दृश्य स्वरूपात पाहू शकतो.
05:57 असाईनमेंट म्हणून खाली दिलेले wedge angles वापरून template कमांड कार्यान्वित करा.
06:03 थोडक्यात,
06:05 या पाठात PyFoamTemplate फाईल्सबद्दल जाणून घेतले.
06:10 तसेच- Template फाईल्स बनवून त्यांचा वापर करणे. तसेच PyFoamFromTemplate dot py कमांडचा वापर करायला शिकलो.
06:19 कृपया या फोरममधे संबंधित विषयाचे प्रश्न वेळासहित पाठवा.
06:23 कृपया या फोरमवर OpenFOAM वरील सर्वसाधारण प्रश्न पाठवा.
06:28 FOSSEE टीम TBC प्रोजेक्टचा समन्वय करते.
06:32 या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधीची अधिक माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे.
06:41 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana