Geogebra/C3/Mensuration/Marathi
Title of script: Mensuration Author: Mohiniraj Sutavani Keywords: Geogebra
|
|
---|---|
0:00 | नमस्कार. Geogebra च्या Mensuration वरील ट्युटोरियमध्ये आपले स्वागत. |
0:06 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत, |
0:09 | समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढणे. |
0:12 | गोल आणि शंकूचे पृष्ठफळ काढणे. |
0:15 | गोल आणि शंकूचे घनफळ काढणे. |
0:20 | मी असे गृहीत धरतो की आपल्याला Geogebraची प्राथमिक ओळख आहे. |
0:24 | Geogebraच्या संबंधित ट्युटोरियल्ससाठी |
0:27 | या संकेतस्थळावर जा. |
0:31 | या ट्युटोरियलासाठी आपण |
0:33 | Ubuntu Linux OS चे Version 11.10 |
0:38 | आणि Geogebra चे Version 3.2.47.0 वापरणार आहोत. |
0:42 | यात खालील Geogebra टूल्सचा वापर करू. |
0:46 | Segment between two points |
0:48 | Circle with center and radius |
0:51 | Ellipse |
0:52 | Polygon |
0:54 | New point आणि |
0:56 | Insert text. |
0:57 | Geogebra ची नवी विंडो उघडू. |
1:00 | Dash home मधील Media Apps वर क्लिक करा. नंतर Type खालील, Education मधील Geogebra निवडा. |
1:13 | समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढू. |
1:15 | त्यासाठी मागील पाठामधीलquadrilateral.ggb ही फाईल वापरू. |
1:20 | फाईल मेनूतील Open वर क्लिक करा. नंतर quadrilateral.ggb वर क्लिक करून |
1:27 | Open वर क्लिक करा. |
1:29 | समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ =1/2 * दोन्ही कर्णांचा गुणाकार |
1:34 | हे करून बघू या. |
1:36 | Insert text या टूलवर क्लिक करा. |
1:39 | ड्रॉईंग पॅडवर क्लिक केल्यावर एक टेक्स्ट बॉक्स उघडेल. |
1:44 | “Area of the rhombus =”+(1/2 g f)
double quotes(“) टाईप करा Area of the rhombus = double quotes (”) नंतर पुढील भाग जोडण्यासाठी '+' चे चिन्ह काढून नंतर ('1/2' space 'f' space 'g' ) 'f' आणि 'g' हे समभुज चौकोनाचे कर्ण आहेत. |
2:09 | Ok वर क्लिक करा. |
2:11 | ड्रॉईंग पॅडवर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ दिसेल. |
2:14 | आता परिमिती काढू. |
2:17 | “Insert text” टूलवर क्लिक करा. |
2:19 | ड्रॉईंग पॅडवर क्लिक केल्यावर एक टेक्स्ट बॉक्स उघडेल. |
2:22 | double quotes(“)
टाईप करा Perimeter of the rhombus = double quotes (”). नंतर '+' टाईप करून ( '4' space 'a' ) 'a' ही समभुज चौकोनातील एक बाजू आहे. |
2:44 | Ok वर क्लिक करा. |
2:46 | ड्रॉईंग पॅडवर समभुज चौकोनाची परिमिती दिसेल. |
2:50 | फाईल सेव्ह करू या. |
2:53 | फाईल मेनूमधील "Save As" वर क्लिक करा. |
2:55 | फाईलला "rhombus-area-perimeter" असे नाव द्या. |
3:12 | सेव्हवर क्लिक करा. |
3:17 | असाईनमेंट म्हणून इष्टिकाचित्तीचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढा. |
3:22 | त्यासाठी “cons-trapezium.ggb” ही फाईल वापरा. |
3:27 | 'g' हे नाव बदलून 'b' करा. |
3:30 | क्षेत्रफळाचे सूत्र = समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज /2 * उंची म्हणजेच (a+b)/2* h |
3:40 | परिमितीचे सूत्र = सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच (a+b+c+d) |
3:49 | तुमची असाईनमेंट शेवटी अशी दिसली पाहिजे. |
3:54 | गोल काढण्यासाठी Geogebra ची नवी विंडो उघडा. |
3:58 | फाईल मेनूमधील “New” वर क्लिक करा. |
4:01 | टूलबारवरील “Circle with center and radius” या टूलवर क्लिक करा. |
4:06 | 'A' बिंदू काढण्यासाठी ड्रॉईंगपॅडवर क्लिक करा. एक टेक्स्ट बॉक्स उघडेल. |
4:11 | त्रिज्येसाठी '2' टाईप करा. |
4:13 | OK वर क्लिक करा. |
4:15 | 'A' हा मध्यबिंदू असलेले आणि '2cm' त्रिज्या असलेले वर्तुळ तयार होईल. |
4:19 | टूलबारवरील “New point” टूल सिलेक्ट करून वर्तुळाच्या परिघावर 'B' बिंदू मार्क करा. |
4:26 | “Segment between two points” हे टूल सिलेक्ट करा. |
4:29 | बिंदू 'A' आणि 'B' जोडून वर्तुळाची त्रिज्या काढा. |
4:34 | वर्तुळाच्या परिघाला स्पर्श करणारा आडवा “CDE” नामक लंबगोल काढू या. |
4:42 | “Ellipse” टूलवर क्लिक करा. |
4:45 | परिघावरील 'C' आणि 'D' हे परस्पर विरूध्द दिशेचे बिंदू मार्क करा आणि वर्तुळाताच्या आत 'E' हा तिसरा बिंदू घ्या.
|
4:56 | अशा प्रकारे गोल तयार झाला आहे. |
4:59 | आता गोलाचे पृष्ठफळ काढू या. |
5:03 | “Insert text” टूलवर क्लिक करा. |
5:05 | ड्रॉईंग पॅडवर क्लिक केल्यावर एक टेक्स्ट बॉक्स उघडेल. |
5:08 | टेक्स्ट बॉक्सच्या ड्रॉप डाऊन सूचीतून π (pi) हे स्पेशल कॅरॅक्टर शोधण्यासाठी Scroll करा. |
5:17 | double quote (“)
टाईप करा Surface area of the sphere = double quote (”) नंतर '+' टाईप करून ( '4' space मग सूचीतून 'π' सिलेक्ट करा. नंतर space 'a' आणि शेवटी सूचीतून 'square' निवडून ) पूर्ण करा. |
5:45 | OK वर क्लिक करा. |
5:47 | येथे गोलाचे पृष्ठफळ दिसेल. |
5:52 | यावर क्लिक करून ते खाली ड्रॅग करा. |
5:56 | आता घनफळ काढू या. |
5:59 | “Insert text” टूलवर क्लिक करा. |
6:00 | ड्रॉईंग पॅडवर क्लिक केल्यावर एक टेक्स्ट बॉक्स उघडेल. |
6:03 | double quote (“)
टाईप करा Volume of the sphere = double quote(”) नंतर 'plus' चे चिन्ह काढून ('4/3' space नंतर सूचीतून 'π' सिलेक्ट करा. नंतर space 'a' सूचीतून 'cube' सिलेक्ट करून ) पूर्ण करा. |
6:31 | OK वर क्लिक करा. |
6:34 | येथे गोलाचे घनफळ दिसेल. |
6:36 | यावर क्लिक करून ते खाली ड्रॅग करा. |
6:40 | आता शंकू काढू या. |
6:43 | “Polygon” टूलवर क्लिक करा. |
6:45 | बिंदू 'C' आणि 'D' वर तसेच बाह्य बिंदू 'F' वर क्लिक करून पुन्हा बिंदू 'C' वर क्लिक करा. |
6:53 | “Segments between two points” टूल सिलेक्ट करून 'F' आणि 'A' हे बिंदू जोडा. |
6:59 | आपल्याला शंकूची उंची मिळेल. |
7:03 | शंकूची उंची दर्शवणा-या ऑब्जेक्ट 'b' चे नाव बदलून 'h' करू या. |
7:08 | ऑब्जेक्ट 'b' वर राईट क्लिक करा. |
7:09 | Rename वर क्लिक करा. |
7:11 | 'b' च्या जागी 'h' टाईप करून OK वर क्लिक करा. |
7:15 | तसेच आपण शंकूची तिरकस उंची दाखवणारे 'c_1' चे नाव बदलून 's' करू या. |
7:21 | ऑब्जेक्ट 'c_1' वर राईट क्लिक करा. |
7:23 | Rename वर क्लिक करा. |
7:24 | 'c_1' च्या जागी 's' टाईप करा. |
7:26 | OK वर क्लिक करा. |
7:28 | आता आपण शंकूचे पृष्ठफळ व घनफळ काढू या. |
7:33 | येथे टूलबारवरील Insert text हे टूल किंवा input bar वापरू शकतो. आपण “Input bar” वापरू. |
7:40 | “Input bar” ड्रॉप डाऊनमधून स्पेशल कॅरॅक्टर्स निवडता येतात. |
7:44 | “π” साठी Scroll करा. |
7:48 | Input bar मध्ये टाईप करा. Area = (π a s + π a²)
Surfacearea = (सूचीतून 'π' हे कॅरॅक्टर निवडा नंतर space 'a' व space 's' plus पुन्हा 'π' सिलेक्ट करून space 'a' नंतर पुन्हा सूचीतून 'square' निवडून ) पूर्ण करा. आणि एंटर दाबा. |
8:15 | शंकूचे पृष्ठफळ आपल्याला Algebra view मध्ये दिसेल. |
8:20 | जेव्हा Input bar चा वापर करतो तेव्हा आपले उत्तर Algebra view मध्ये दिसते. |
8:26 | आता घनफळ काढू या. |
8:29 | त्यासाठी Volume =(1/3 π a² h) हे सूत्र आहे.
Volume =('1/3' space सूचीतून 'π' निवडा नंतर पुन्हा space 'a' आणि पुन्हा सूचीतून 'square' निवडून space 'h' असे टाईप करून) पूर्ण करा. आणि एंटर दाबा. |
8:50 | शंकूचे घनफळ आपल्याला येथे Algebra view मध्ये दिसेल. |
8:55 | फाईल सेव्ह करण्यासाठी "Save As" वर क्लिक करा.
फाईलला "Sphere-cone" असे नाव द्या. |
9:08 | सेव्ह वर क्लिक करा. |
9:10 | आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
9:14 | थोडक्यात आपण |
9:18 | या गोष्टी समजून घेतल्या. |
9:20 | समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढणे. |
9:24 | गोल आणि शंकूचे पृष्ठफळ काढणे. |
9:27 | गोल आणि शंकूचे घनफळ काढणे. |
9:30 | तसेच आपण गोल आणि शंकू काढायला शिकलो. |
9:36 | असाईनमेंट म्हणून तुम्ही दंडगोलाचे पृष्ठफळ आणि घनफळ काढा. |
9:43 | एकाखाली एक असे समान आकाराचे दोन लंबगोल काढा. |
9:47 | लंबगोलाच्या कडा एकमेकांना जोडा. |
9:50 | कुठल्याही एक लंबगोलाचा मध्य शोधण्यासाठी “center” टूलचा वापर करा. |
9:54 | मध्यबिंदू आणि कड एकमेकांना जोडा. |
9:56 | ऑब्जेक्ट 'b' च्या जागी 'h' आणि 'e' च्या जागी 'r' करा. |
10:01 | पृष्ठफळाचे सूत्र = 2 π r(r + h) |
10:07 | घनपळाचे सूत्र = π r^2h |
10:13 | शेवटी तुमची असाईनमेंट अशी दिसणे आवश्यक आहे. |
10:19 | *सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडीओ खालील लिंकवर उपलब्ध आहे. |
10:23 | *ज्यामध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
10:26 | *आपण तो download करूनही पाहू शकता. |
10:31 | *स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
10:33 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
10:36 | जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
10:40 | अधिक माहीतीसाठी contact@spoken-tutorial.org ला लिहा. |
10:48 | *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. |
10:52 | यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. |
10:59 | *यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे. |
11:06 | *ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मोहिनीराज सुतवणी यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. |