LibreOffice-Suite-Calc/C3/Using-Charts-and-Graphs/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:40, 3 March 2017 by Pratik kamble (Talk | contribs)
Resources for recording Using Charts and graphs in Calc
Time | Naration |
00:00 | लिबर ऑफिस कॅल्क वरील स्प्रेडशीट्स मध्ये चार्ट्स निविष्ट करणाऱ्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:07 | या ट्यूटोरियल मध्ये आपण, |
00:11 | चार्ट्स बनविणे, संपादित करणे, आणि फॉरमॅटिंग, |
00:14 | चार्ट्स चा आकार पुन्हा बदलणे आणि स्थानांतर शिकुया. |
00:18 | येथे आपण उबंटू लिनक्स वर्ज़न 10.04 आणि लिबरऑफिस सूट वर्ज़न 3.3.4 वापरत आहोत. |
00:27 | चला आता लिबर ऑफिस कॅल्क मधील विविध प्रदर्शित पर्याया बद्दल शिकण्याची सुरवात करू. |
00:32 | वाचकांना माहिती व्यक्त करण्यासाठी चार्ट्स ही प्रबळ पद्धत असू शकते. |
00:37 | लिबर ऑफिस कॅल्क तुमच्या डेटा साठी विविध चार्ट्स फार्मेट्सचा प्रस्ताव देते. |
00:43 | कॅल्क वापरुन तुम्ही मोठ्या प्रमाणात चार्ट्स कस्टमाइज़ हि करू शकता. |
00:48 | चला आपली 'personal finance tracker.ods' शीट उघडुया. |
00:53 | आणि शीट मध्ये सूचीबद्ध असलेल्या प्रत्येक वस्तूवर खर्च केलेली रक्कम भरू. |
00:59 | आपण सेल जो “E3”संदर्भात आहे त्यावर क्लिक करू आणि “6500” रक्कम टाइप करू. |
01:06 | आता कॉलम च्या खाली जाऊन आपण, “E4”,”E5”,”E6” आणि “E7” निर्देशित सेल्स मध्ये “1000”,”625”,”310” आणि “2700” रक्कम अनुक्रमे टाइप करू. |
01:26 | नंतर शीट मध्ये सूचीबद्ध असलेल्या प्रत्येक वस्तुवर मिळालेली रक्कम भरू. |
01:31 | आता “F3” निर्देशित सेल क्लिक करा आणि “500” रक्कम टाइप करा. |
01:37 | आता या कॉलम च्या खाली जाऊन आपण, “F4”,”F5”,”F6” आणि “F7” निर्देशित सेल्स मध्ये “200”,”75”, ”10” आणि “700” रक्कम अनुक्रमे टाइप करू. |
01:54 | या टेबल साठी चार्ट्स कसा बनवायचा ते शिकू. |
01:58 | चार्ट्स बनविण्यासाठी, आपल्याला अगोदर चार्ट मध्ये समाविष्ट असलेला डेटा निवडावा लागेल. |
02:04 | आता सेल“SN” वर क्लिक करा आणि माउस चे बटन न सोडता शेवटचा सेल जो “700” आहे तिथपर्यंत ड्रॅग करा. |
02:14 | आता मेनूबार मधील “Insert” पर्याया वर क्लिक करून नंतर “Chart” पर्याया वर क्लिक करा. |
02:21 | तुम्ही पाहता की डिफॉल्ट चार्ट दिनांका सह वर्कशीट मध्ये निविष्ट झाला आहे. |
02:27 | त्याच वेळी "Chart Wizard" डायलॉग बॉक्स उघडतो. |
02:32 | "Chart Wizard" दर्शवितो की, डिफॉल्ट चार्ट निवडलेला आहे. |
02:36 | हा डिफॉल्ट चार्ट, चार्ट-विज़ार्ड मध्ये तुमच्या द्वारे केलेले बदल दर्शविण्यासाठी अपडेट करतो. |
02:42 | "Chart Wizard" डायलॉग बॉक्स मध्ये तीन मुख्य भाग असतात, चार्ट बनविण्यास समाविष्ट पायऱ्या, चार्ट च्या प्रकारची निवड आणि प्रत्येक प्रकारासाठी पर्याय. |
02:55 | “3D Look” पर्याय तपासून, तीन डायमेंशन मध्ये चार्ट प्रदर्शित करू शकतो. |
03:03 | चला या पर्याया चा प्रयत्न करू. |
03:05 | आपण “Choose a chart type” फील्ड खाली “Bar” पर्याया वर क्लिक करूया. |
03:11 | लक्ष द्या की चार्ट नमूना टेबल मधील डेटा ला “Bar” रूपात प्रदर्शित करतो. |
03:19 | त्याच प्रमाणे तुम्ही इतर पर्याय जसे, “Pie”, <pause> “Area”, <pause> “Bubble” <pause> वर क्लिक करू शकता. |
03:28 | आणि “Choose a chart type field” खाली अनेक पर्याया वर क्लिक करू शकता आणि आवश्यक चार्ट प्राप्त करू शकता. |
03:35 | “Steps” पर्याया खाली, आपल्याकडे “Data Range” नावाचा एक पर्याय आहे. |
03:40 | या पर्यायचा उपयोग करून, तुम्ही तुमच्या चार्ट मध्ये स्वतः हवा तेवढा डेटा दर्शवू शकता. |
03:48 | डेटा बनविण्यासाठी डिफॉल्ट पर्याय “Data series in columns” आहे. |
03:54 | आपण “Data series in rows” उपयोग करण्याशिवाय हव्या त्या पद्धतीने डेटा प्लॉट करू शकतो |
04:02 | हे उपयोगी आहे, जर तुम्ही डेटा दर्शविण्यासाठी चार्ट स्टाइल जसे, “Column” वापरत आहात. |
04:10 | शेवटी, तुम्ही “First row as label” वापरायचे आहे, |
04:24 | की, “First column as label”, |
04:28 | किंवा दोन्ही जसे लेबल्स चार्ट वरील अक्षा वर, हे निवडू शकता. |
04:34 | नंतर data series in column मध्ये पुन्हा क्लिक करा. |
04:38 | आता आपल्या नमूना चार्ट मध्ये, जर आपल्याला “Received”, शीर्षका खालील डेटा काढायचा असेल तर अगोदर “Data range” फील्ड च्या आत क्लिक करून असे करू शकता. |
04:49 | आणि नंतर रेंज “$A$1 is to $F$7” to “$A$1 is to $D$7” संपादित करू शकता. |
05:03 | लक्ष द्या “Received”, शीर्षका खालील डेटा चार्ट मध्ये आता दिसत नाही. |
05:11 | नंतर “Data Series” चे कार्य पाहु. |
05:15 | लक्ष द्या, येथे 5 रोस आहेत, जे आपल्या स्प्रेडशीट मध्ये डेटा च्या सर्व रोस ला दर्शित करत आहे. |
05:21 | “Add” आणि “Remove” बटन्स आपल्याला चार्ट मधील डेटा चे रोस जोडण्यास किंवा काढून टाकण्यास परवानगी देतील. |
05:29 | आपण “Up” आणि “Down” बटन्स वापरुन आपण डेटा पुन्हा क्रमबद्ध करू शकतो. |
05:34 | शेवटी डेटा ला चार्ट मध्ये दर्शित करण्याच्या पद्धती निवडल्या नंतर डायलॉग बॉक्स मधील “Finish” बटना वर क्लिक करा. |
05:43 | तुम्ही पाहता की, चार्ट स्प्रेडशीट मध्ये निविष्ट झाला आहे. |
05:47 | स्प्रेडशीट मध्ये चार्ट निविष्ट करणे शिकल्या नंतर, |
05:51 | आता आपण लिबरऑफिस कॅल्क मध्ये चार्ट फ़ॉर्मेट करणे शिकू. |
05:56 | “Format” मेन्यू मध्ये फॉर्मेटिंग आणि, |
06:00 | चार्ट चे स्वरुप सुंदर करण्यासाठी अनेक पर्याय असतात. |
06:04 | स्प्रेडशीट मध्ये निविष्ट केलेला चार्ट फ़ॉर्मेट करू. |
06:08 | चार्ट वर डबल-क्लिक करा, ज्यामुळे हे करड्या किनार ने आवृत्त होईल. |
06:13 | हे “Edit” मोड मध्ये असल्याचे दर्शित करते. |
06:18 | मुख्य मेन्यु बार मधील“Format” पर्याया वर क्लिक करा. |
06:22 | तुम्ही पाहत आहात की ड्रॉप-डाउन मेन्यु मध्ये अनेक फॉर्मेटिंग पर्याय जसे, “Format Selection”, “Position and Size”, “Arrangement”, “Chart Wall” , “Chart Area” इत्यादी समाविष्ट आहेत. |
06:37 | यांचा वापर, चार्ट संस्थापन, मांडणी आणि पार्श्व भागाचे फॉरमॅटिंग आणि चार्ट चे शीर्षक यासाठी केला जातो. |
06:44 | आपण सर्वात जास्त वापरले जाणारे फ़ॉर्मेटिंग पर्याया बद्दल एक -एक करून शिकु. |
06:49 | “Format Selection” पर्याय, “Chart Area” शीर्षक सोबत एका डायलॉग बॉक्स ला उघडतो. |
06:56 | लक्ष द्या येथे 3 टॅब्स आहेत - “Borders”, “Area” आणि “Transparency”. |
07:03 | डिफॉल्ट द्वारे “Borders” टॅब निवडलेला आहे. |
07:07 | चार्ट्स च्या किनार चे स्टाइल आणि रंग बदलू. |
07:11 | यासाठी “Style” फील्ड वर क्लिक करा आणि “Continuous” निवडा. |
07:16 | नंतर या प्रमाणे “Color” फील्ड मध्ये “Green” निवडा. |
07:21 | आता “OK” बटना वर क्लिक करा. |
07:26 | लक्ष द्या, चार्ट ची किनार, स्टाइल आणि रंगा नुसार बदलते. |
07:31 | “Title” पर्याय चार्ट चे शीर्षक आणि त्याचे अक्ष फ़ॉर्मेट करते. |
07:36 | “Axis” पर्याय, जे चार्ट बनवितात त्या ओळींना फ़ॉर्मेट करते. |
07:41 | त्याच प्रमाणे X आणि Y अक्षावर दिसणाऱ्या टेक्स्ट च्या फॉण्ट ला सुद्धा. |
07:46 | नंतर या सर्व पर्यायांचे कार्य जाणून घेण्यासाठी स्वताहून त्यांचे अण्वेषन करा |
07:53 | कॅल्क, चार्ट क्षेत्रातील पार्श्वभाग बदलण्याससाठी ही पर्याय पुरवीतो. |
07:58 | चार्ट क्षेत्र म्हणजे मुख्य शीर्षक आणि की सह चार्ट ग्राफिक चे क्षेत्र आहे. |
08:05 | चार्ट क्षेत्र फ़ॉर्मेट करण्यास, “Format” पर्याया वर क्लिक करा आणि “Chart Wall” निवडा. |
08:12 | तुम्ही “Chart Wall” शीर्षक सह एक डायलॉग बॉक्स पहाल. |
08:17 | “Style” फील्ड “Continuous” दर्शवितो कारण ही आपली शेवटची निवड होती. |
08:22 | “Color” फील्ड मध्ये , “Red” वर क्लिक करा. |
08:26 | आपण आकार ही “0.20”cm. मध्ये बदलुया. |
08:31 | आता “OK” बटना वर क्लिक करा. |
08:35 | तुम्ही पाहत आहात चार्ट क्षेत्र ची स्टाइल आणि रंग बदलला आहे. <pause> |
08:41 | आता आपण चार्ट मधील घटकांचा आकार पुन्हा बदलने आणि स्थानांतरित करणे शिकू. |
08:46 | चार्ट चा आकार पुन्हा बदलण्यास चार्ट नमुन्या वर क्लिक करा. |
08:51 | तुम्ही पाहता की चार्ट च्या भोवताली हिरवे हॅंडल्स दिसत आहेत. |
08:54 | चार्ट चा आकार वाढविणे किंवा कमी करण्यासाठी, चार्ट च्या चार कोपऱ्यातील एका मार्कर वर क्लिक करून ड्रॅग करा. |
09:03 | चार्ट स्तानांतरित करण्यास अगोदर चार्ट वर क्लिक करा. |
09:07 | आता कर्सर ला चार्ट वर कुठेही फिरवा. |
09:11 | कर्सर हाताच्या चिन्हा मध्ये बदलेल. |
09:14 | चार्ट वर क्लिक करून हव्या त्या जागेवर घेऊन जा आणि आता माउस सोडा. |
09:20 | तुम्ही चार्ट स्थानांतरित केला आहे. |
09:24 | नंतर आपण, “Position and Size” डायलॉग बॉक्स वापरुन चार्ट चा आकार बदलणे शिकू. |
09:30 | पुन्हा चार्ट वर क्लिक करा. |
09:33 | चार्ट वर राइट-क्लिक करा आणि कॉंटेक्स्ट मेन्यु वरुन “Position and Size” निवडा. |
09:40 | “Position and Size” डायलॉग बॉक्स दिसेल. |
09:44 | या मध्ये अनेक फील्ड्स असतात जे 'X' आणि 'Y' स्थानाला तसेच चार्ट ची लांबी आणि रुंदी निर्धारित करतात. |
09:52 | आता चार्ट साठी 'X' निर्देशांक ला “1.00” आणि 'Y' निर्देशांक ला “0.83” निर्धारित करू. |
10:02 | “OK” बटना वर क्लिक करा. |
10:04 | आपण पाहतो की चार्ट स्थान निर्धरित वॅल्यू नुसार चार्ट क्षेत्राच्या आत आपले स्थान स्वतः बनवितो. |
10:12 | हा पाठ येथे संपत आहे. |
10:16 | या मध्ये आपण, चार्ट्स बनविणे, संपादित करणे, आणि फॉरमॅटिंग शिकलो. |
10:21 | आपण स्प्रेडशीट मध्ये चार्ट चा आकार बदलणे आणि स्थानांतरित करणे ही शिकलो. |
10:27 | सर्वकष स्वाध्याय. |
10:29 | तुमची “practice.ods” स्प्रेडशीट उघडा. |
10:34 | डेटा साठी "Pie chart" निविष्ट करा. |
10:37 | चार्ट चा आकार बदलून शीट च्या खाली उज्यवा कोपऱ्यात स्थानीत करा. |
10:42 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
10:46 | ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल. |
10:50 | जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता. |
10:54 | स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम. |
10:56 | स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
11:00 | परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. |
11:04 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
11:11 | स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे. |
11:15 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे. |
11:23 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11:26 | spoken-tutorial.org/NMEICT-intro. |
11:34 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद |