LibreOffice-Suite-Calc/C3/Using-Charts-and-Graphs/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Naration
00:00 लिबर ऑफिस कॅल्क वरील स्प्रेडशीट्स मध्ये चार्ट्स निविष्ट करणाऱ्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:07 या ट्यूटोरियल मध्ये आपण,
00:11 चार्ट्स बनविणे, संपादित करणे, आणि फॉरमॅटिंग,
00:14 चार्ट्स चा आकार पुन्हा बदलणे आणि स्थानांतर शिकुया.
00:18 येथे आपण उबंटू लिनक्स वर्ज़न 10.04 आणि लिबरऑफिस सूट वर्ज़न 3.3.4 वापरत आहोत.
00:27 चला आता लिबर ऑफिस कॅल्क मधील विविध प्रदर्शित पर्याया बद्दल शिकण्याची सुरवात करू.
00:32 वाचकांना माहिती व्यक्त करण्यासाठी चार्ट्स ही प्रबळ पद्धत असू शकते.
00:37 लिबर ऑफिस कॅल्क तुमच्या डेटा साठी विविध चार्ट्स फार्मेट्सचा प्रस्ताव देते.
00:43 कॅल्क वापरुन तुम्ही मोठ्या प्रमाणात चार्ट्स कस्टमाइज़ हि करू शकता.
00:48 चला आपली 'personal finance tracker.ods' शीट उघडुया.
00:53 आणि शीट मध्ये सूचीबद्ध असलेल्या प्रत्येक वस्तूवर खर्च केलेली रक्कम भरू.
00:59 आपण सेल जो “E3”संदर्भात आहे त्यावर क्लिक करू आणि “6500” रक्कम टाइप करू.
01:06 आता कॉलम च्या खाली जाऊन आपण, “E4”,”E5”,”E6” आणि “E7” निर्देशित सेल्स मध्ये “1000”,”625”,”310” आणि “2700” रक्कम अनुक्रमे टाइप करू.
01:26 नंतर शीट मध्ये सूचीबद्ध असलेल्या प्रत्येक वस्तुवर मिळालेली रक्कम भरू.
01:31 आता “F3” निर्देशित सेल क्लिक करा आणि “500” रक्कम टाइप करा.
01:37 आता या कॉलम च्या खाली जाऊन आपण, “F4”,”F5”,”F6” आणि “F7” निर्देशित सेल्स मध्ये “200”,”75”, ”10” आणि “700” रक्कम अनुक्रमे टाइप करू.
01:54 या टेबल साठी चार्ट्स कसा बनवायचा ते शिकू.
01:58 चार्ट्स बनविण्यासाठी, आपल्याला अगोदर चार्ट मध्ये समाविष्ट असलेला डेटा निवडावा लागेल.
02:04 आता सेल“SN” वर क्लिक करा आणि माउस चे बटन न सोडता शेवटचा सेल जो “700” आहे तिथपर्यंत ड्रॅग करा.
02:14 आता मेनूबार मधील “Insert” पर्याया वर क्लिक करून नंतर “Chart” पर्याया वर क्लिक करा.
02:21 तुम्ही पाहता की डिफॉल्ट चार्ट दिनांका सह वर्कशीट मध्ये निविष्ट झाला आहे.
02:27 त्याच वेळी "Chart Wizard" डायलॉग बॉक्स उघडतो.
02:32 "Chart Wizard" दर्शवितो की, डिफॉल्ट चार्ट निवडलेला आहे.
02:36 हा डिफॉल्ट चार्ट, चार्ट-विज़ार्ड मध्ये तुमच्या द्वारे केलेले बदल दर्शविण्यासाठी अपडेट करतो.
02:42 "Chart Wizard" डायलॉग बॉक्स मध्ये तीन मुख्य भाग असतात, चार्ट बनविण्यास समाविष्ट पायऱ्या, चार्ट च्या प्रकारची निवड आणि प्रत्येक प्रकारासाठी पर्याय.
02:55 “3D Look” पर्याय तपासून, तीन डायमेंशन मध्ये चार्ट प्रदर्शित करू शकतो.
03:03 चला या पर्याया चा प्रयत्न करू.
03:05 आपण “Choose a chart type” फील्ड खाली “Bar” पर्याया वर क्लिक करूया.
03:11 लक्ष द्या की चार्ट नमूना टेबल मधील डेटा ला “Bar” रूपात प्रदर्शित करतो.
03:19 त्याच प्रमाणे तुम्ही इतर पर्याय जसे, “Pie”, <pause> “Area”, <pause> “Bubble” <pause> वर क्लिक करू शकता.
03:28 आणि “Choose a chart type field” खाली अनेक पर्याया वर क्लिक करू शकता आणि आवश्यक चार्ट प्राप्त करू शकता.
03:35 “Steps” पर्याया खाली, आपल्याकडे “Data Range” नावाचा एक पर्याय आहे.
03:40 या पर्यायचा उपयोग करून, तुम्ही तुमच्या चार्ट मध्ये स्वतः हवा तेवढा डेटा दर्शवू शकता.
03:48 डेटा बनविण्यासाठी डिफॉल्ट पर्याय “Data series in columns” आहे.
03:54 आपण “Data series in rows” उपयोग करण्याशिवाय हव्या त्या पद्धतीने डेटा प्लॉट करू शकतो
04:02 हे उपयोगी आहे, जर तुम्ही डेटा दर्शविण्यासाठी चार्ट स्टाइल जसे, “Column” वापरत आहात.
04:10 शेवटी, तुम्ही “First row as label” वापरायचे आहे,
04:24 की, “First column as label”,
04:28 किंवा दोन्ही जसे लेबल्स चार्ट वरील अक्षा वर, हे निवडू शकता.
04:34 नंतर data series in column मध्ये पुन्हा क्लिक करा.
04:38 आता आपल्या नमूना चार्ट मध्ये, जर आपल्याला “Received”, शीर्षका खालील डेटा काढायचा असेल तर अगोदर “Data range” फील्ड च्या आत क्लिक करून असे करू शकता.
04:49 आणि नंतर रेंज “$A$1 is to $F$7” to “$A$1 is to $D$7” संपादित करू शकता.
05:03 लक्ष द्या “Received”, शीर्षका खालील डेटा चार्ट मध्ये आता दिसत नाही.
05:11 नंतर “Data Series” चे कार्य पाहु.
05:15 लक्ष द्या, येथे 5 रोस आहेत, जे आपल्या स्प्रेडशीट मध्ये डेटा च्या सर्व रोस ला दर्शित करत आहे.
05:21 “Add” आणि “Remove” बटन्स आपल्याला चार्ट मधील डेटा चे रोस जोडण्यास किंवा काढून टाकण्यास परवानगी देतील.
05:29 आपण “Up” आणि “Down” बटन्स वापरुन आपण डेटा पुन्हा क्रमबद्ध करू शकतो.
05:34 शेवटी डेटा ला चार्ट मध्ये दर्शित करण्याच्या पद्धती निवडल्या नंतर डायलॉग बॉक्स मधील “Finish” बटना वर क्लिक करा.
05:43 तुम्ही पाहता की, चार्ट स्प्रेडशीट मध्ये निविष्ट झाला आहे.
05:47 स्प्रेडशीट मध्ये चार्ट निविष्ट करणे शिकल्या नंतर,
05:51 आता आपण लिबरऑफिस कॅल्क मध्ये चार्ट फ़ॉर्मेट करणे शिकू.
05:56 “Format” मेन्यू मध्ये फॉर्मेटिंग आणि,
06:00 चार्ट चे स्वरुप सुंदर करण्यासाठी अनेक पर्याय असतात.
06:04 स्प्रेडशीट मध्ये निविष्ट केलेला चार्ट फ़ॉर्मेट करू.
06:08 चार्ट वर डबल-क्लिक करा, ज्यामुळे हे करड्या किनार ने आवृत्त होईल.
06:13 हे “Edit” मोड मध्ये असल्याचे दर्शित करते.
06:18 मुख्य मेन्यु बार मधील“Format” पर्याया वर क्लिक करा.
06:22 तुम्ही पाहत आहात की ड्रॉप-डाउन मेन्यु मध्ये अनेक फॉर्मेटिंग पर्याय जसे, “Format Selection”, “Position and Size”, “Arrangement”, “Chart Wall” , “Chart Area” इत्यादी समाविष्ट आहेत.
06:37 यांचा वापर, चार्ट संस्थापन, मांडणी आणि पार्श्व भागाचे फॉरमॅटिंग आणि चार्ट चे शीर्षक यासाठी केला जातो.
06:44 आपण सर्वात जास्त वापरले जाणारे फ़ॉर्मेटिंग पर्याया बद्दल एक -एक करून शिकु.
06:49 “Format Selection” पर्याय, “Chart Area” शीर्षक सोबत एका डायलॉग बॉक्स ला उघडतो.
06:56 लक्ष द्या येथे 3 टॅब्स आहेत - “Borders”, “Area” आणि “Transparency”.
07:03 डिफॉल्ट द्वारे “Borders” टॅब निवडलेला आहे.
07:07 चार्ट्स च्या किनार चे स्टाइल आणि रंग बदलू.
07:11 यासाठी “Style” फील्ड वर क्लिक करा आणि “Continuous” निवडा.
07:16 नंतर या प्रमाणे “Color” फील्ड मध्ये “Green” निवडा.
07:21 आता “OK” बटना वर क्लिक करा.
07:26 लक्ष द्या, चार्ट ची किनार, स्टाइल आणि रंगा नुसार बदलते.
07:31 “Title” पर्याय चार्ट चे शीर्षक आणि त्याचे अक्ष फ़ॉर्मेट करते.
07:36 “Axis” पर्याय, जे चार्ट बनवितात त्या ओळींना फ़ॉर्मेट करते.
07:41 त्याच प्रमाणे X आणि Y अक्षावर दिसणाऱ्या टेक्स्ट च्या फॉण्ट ला सुद्धा.
07:46 नंतर या सर्व पर्यायांचे कार्य जाणून घेण्यासाठी स्वताहून त्यांचे अण्वेषन करा
07:53 कॅल्क, चार्ट क्षेत्रातील पार्श्वभाग बदलण्याससाठी ही पर्याय पुरवीतो.
07:58 चार्ट क्षेत्र म्हणजे मुख्य शीर्षक आणि की सह चार्ट ग्राफिक चे क्षेत्र आहे.
08:05 चार्ट क्षेत्र फ़ॉर्मेट करण्यास, “Format” पर्याया वर क्लिक करा आणि “Chart Wall” निवडा.
08:12 तुम्ही “Chart Wall” शीर्षक सह एक डायलॉग बॉक्स पहाल.
08:17 “Style” फील्ड “Continuous” दर्शवितो कारण ही आपली शेवटची निवड होती.
08:22 “Color” फील्ड मध्ये , “Red” वर क्लिक करा.
08:26 आपण आकार ही “0.20”cm. मध्ये बदलुया.
08:31 आता “OK” बटना वर क्लिक करा.
08:35 तुम्ही पाहत आहात चार्ट क्षेत्र ची स्टाइल आणि रंग बदलला आहे. <pause>
08:41 आता आपण चार्ट मधील घटकांचा आकार पुन्हा बदलने आणि स्थानांतरित करणे शिकू.
08:46 चार्ट चा आकार पुन्हा बदलण्यास चार्ट नमुन्या वर क्लिक करा.
08:51 तुम्ही पाहता की चार्ट च्या भोवताली हिरवे हॅंडल्स दिसत आहेत.
08:54 चार्ट चा आकार वाढविणे किंवा कमी करण्यासाठी, चार्ट च्या चार कोपऱ्यातील एका मार्कर वर क्लिक करून ड्रॅग करा.
09:03 चार्ट स्तानांतरित करण्यास अगोदर चार्ट वर क्लिक करा.
09:07 आता कर्सर ला चार्ट वर कुठेही फिरवा.
09:11 कर्सर हाताच्या चिन्हा मध्ये बदलेल.
09:14 चार्ट वर क्लिक करून हव्या त्या जागेवर घेऊन जा आणि आता माउस सोडा.
09:20 तुम्ही चार्ट स्थानांतरित केला आहे.
09:24 नंतर आपण, “Position and Size” डायलॉग बॉक्स वापरुन चार्ट चा आकार बदलणे शिकू.
09:30 पुन्हा चार्ट वर क्लिक करा.
09:33 चार्ट वर राइट-क्लिक करा आणि कॉंटेक्स्ट मेन्यु वरुन “Position and Size” निवडा.
09:40 “Position and Size” डायलॉग बॉक्स दिसेल.
09:44 या मध्ये अनेक फील्ड्स असतात जे 'X' आणि 'Y' स्थानाला तसेच चार्ट ची लांबी आणि रुंदी निर्धारित करतात.
09:52 आता चार्ट साठी 'X' निर्देशांक ला “1.00” आणि 'Y' निर्देशांक ला “0.83” निर्धारित करू.
10:02 “OK” बटना वर क्लिक करा.
10:04 आपण पाहतो की चार्ट स्थान निर्धरित वॅल्यू नुसार चार्ट क्षेत्राच्या आत आपले स्थान स्वतः बनवितो.
10:12 हा पाठ येथे संपत आहे.
10:16 या मध्ये आपण, चार्ट्स बनविणे, संपादित करणे, आणि फॉरमॅटिंग शिकलो.
10:21 आपण स्प्रेडशीट मध्ये चार्ट चा आकार बदलणे आणि स्थानांतरित करणे ही शिकलो.
10:27 सर्वकष स्वाध्याय.
10:29 तुमची “practice.ods” स्प्रेडशीट उघडा.
10:34 डेटा साठी "Pie chart" निविष्ट करा.
10:37 चार्ट चा आकार बदलून शीट च्या खाली उज्यवा कोपऱ्यात स्थानीत करा.
10:42 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
10:46 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
10:50 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता.
10:54 स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम.
10:56 स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:00 परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
11:04 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
11:11 स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.
11:15 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
11:23 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:26 spoken-tutorial.org/NMEICT-intro.
11:34 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble