Drupal/C2/Installation-of-Drupal/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या “इन्स्टॉलेशन ऑफ ड्रुपल” वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात उबंटु लिनक्स आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम्सवर ड्रुपल डाऊनलोड आणि इन्स्टॉल करण्याबद्दल जाणून घेऊ. |
00:17 | या पाठासाठी -
वेबवरील ड्रुपलचे लेटेस्ट वर्जन डाऊनलोड करण्यासाठी चालू स्थितीतील इंटरनेट कनेक्शन किंवा संगणकावर योग्य त्या फाईल्सची तुम्हाला गरज आहे. |
00:30 | आपल्या मशीनवर उबंटु लिनक्स किंवा विंडोज यापैकी एक ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल असणे आवश्यक आहे. |
00:38 | या पाठासाठी तुम्हाला तुमच्या वरीलपैकी ऑपरेटिंग सिस्टीम्सचे प्राथमिक ज्ञान असावे. |
00:45 | ड्रुपल इन्स्टॉल करण्याच्या अनेक पध्दती आहेत. |
00:48 | या पाठासाठी आपण Bitnami Drupal Stack चा उपयोग करू. कारण ही इन्स्टॉलेशनची अगदी सोपी पध्दत आहे. |
00:57 | Bitnami Drupal Stack इन्स्टॉल करण्यासाठी:
|
01:05 | * किमान 256 MB RAM |
01:08 | * किमान 150 MB हार्ड ड्राईव्ह स्पेस |
01:13 | * TCP/IP प्रोटोकॉल सपोर्ट. |
01:16 | ह्या कंपॅटिबल ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत: |
01:20 | * कोणतीही x86 लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम |
01:24 | * कोणतीही 32-bit विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम जसे की, विंडोज विस्टा, विंडोज 7, विंडोज 8, विंडोज 10, विंडोज सर्व्हर 2008 किंवा विंडोज सर्व्हर 2012. |
01:41 | कोणतीही OS X ऑपरेटिंग सिस्टीम x86. |
01:46 | आपल्या पसंतीचा वेब ब्राऊजर उघडून या दाखवलेल्या URL वर जा. |
01:53 | स्क्रॉल करून खाली जा. विंडोज आणि लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमसाठीचे इन्स्टॉलर शोधा. |
02:01 | तुम्हाला तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमनुसार इन्स्टॉलर निवडायचा आहे. |
02:06 | मी लिनक्स युजर असल्यामुळे लिनक्स इन्स्टॉलर निवडत आहे. |
02:11 | तुम्ही विंडोज युजर असाल तर विंडोजसाठीचा ड्रुपल इन्स्टॉलर निवडा. |
02:17 | येथे ड्रुपलची सर्व वेगवेगळी वर्जन्स पाहू शकतो. |
02:22 | कोणते वर्जन डाऊनलोड करावे याबाबत शंका असल्यास Recommended वर्जन डाऊनलोड करा. |
02:29 | या पाठाचे रेकॉर्डिंग करते वेळी Drupal 8.1.3 हे Recommended वर्जन वापरले आहे. |
02:36 | तुम्ही करत असताना ते वेगळे असू शकते. |
02:39 | उजव्या बाजूच्या Download वर क्लिक करा. |
02:43 | Bitnami वेबसाईटवर अकाऊंट तयार करण्यास सांगणारी पॉपअप विंडो उघडेल. |
02:50 | सध्या “No thanks” वर क्लिक करा. |
02:53 | लगेच installer डाऊनलोड होण्यास सुरूवात होईल. फाईल सेव्ह करण्यासाठी OK क्लिक करा. |
03:01 | विंडोज आणि लिनक्स या ऑपरेटिंग सिस्टीमवर इन्स्टॉल करण्याच्या पुढील पाय-या सारख्याच आहेत. |
03:07 | तुम्हाला Bitnami installer च्या फाईल्स दिल्या गेल्या असल्यास डाऊनलोड करण्याऐवजी त्यापैकी एक वापरा. |
03:15 | इन्स्टॉलर फाईल डाऊनलोड केलेला Downloads फोल्डर उघडा. |
03:20 | ही installer फाईल कार्यान्वित करण्यासाठी तुम्हाला ऍडमिन ऍक्सेस असायला हवा. |
03:25 | तुम्ही विंडोजचे युजर असल्यास installer फाईलवर राईट क्लिक करून Run as administrator निवडा. |
03:33 | तुम्ही लिनक्सचे युजर असल्यास installer फाईलवर राईट क्लिक करून Properties निवडा. |
03:40 | नंतर Permissions टॅबवर क्लिक करून Allow executing file as program हा चेकबॉक्सचा पर्याय निवडा. |
03:48 | ही विंडो बंद करण्यासाठी Close वर क्लिक करा. |
03:52 | आता installer फाईलवर डबल क्लिक करा. |
03:55 | आता इन्स्टॉल होण्यास सुरूवात होईल. ’‘‘Next’’’ वर क्लिक करा. |
04:01 | येथे कॉम्पोनंटस सिलेक्ट करू शकतो जे आपल्याला इन्स्टॉल करायचे आहेत. |
04:06 | प्रत्येक कॉम्पोनंटवर क्लिक करा आणि प्रथम त्याची सविस्तर माहिती वाचा. |
04:12 | मी सर्व कॉम्पोनंटस सिलेक्ट करणे पसंत करीन. ’‘‘Next’’’ वर क्लिक करा. |
04:18 | या विंडोमधे ड्रुपल जिथे इन्स्टॉल करायचे आहे तो फोल्डर निवडायचा आहे. |
04:24 | मी Home फोल्डर निवडत आहे. |
04:27 | विंडोजमधे हे डिफॉल्ट रूपात C कोलनवर किंवा मुख्य ड्राईव्हवर इन्स्टॉल होते. |
04:34 | ’‘‘Next’’’ वर क्लिक करा. |
04:36 | आता Drupal ऍडमिन अकाऊंट बनवावे लागेल. |
04:40 | रियल नेम म्हणून मी प्रिया टाईप करत आहे. हे नाव ऍप्लिकेशनमधे दाखवले जाईल. |
04:47 | येथे तुम्ही तुमचे नाव द्या. |
04:50 | इमेल ऍड्रेस फिल्डमधे मी priyaspoken@gmail.com टाईप करत आहे. |
04:56 | तुम्ही तुमचा वैध इमेल ऍड्रेस वापरा. |
05:00 | पुढे आपल्याला ऍडमिनिस्ट्रेटरसाठी आपल्या पसंतीचे युजरनेम आणि पासवर्ड निवडायचे आहे. |
05:07 | मी लॉगिन युजरनेममधे ऍडमिन टाईप करत आहे. |
05:11 | Password, मधे मी पासवर्ड टाईप करून खात्री करण्यासाठी तोच पासवर्ड पुन्हा टाईप करत आहे. |
05:17 | तुम्ही तुमच्या पसंतीचे लॉगिन नेम आणि पासवर्ड टाईप करू शकता. |
05:22 | ‘‘‘Next’’’ वर क्लिक करा. |
05:24 | लिनक्समधे Apache साठी डिफॉल्ट listening port 8080 आहे आणि MySQL साठी ते 3306 आहे. |
05:34 | विंडोजमधे हे 80 आणि 3306 आहे. |
05:39 | ही पोर्टस इतर ऍप्लिकेशनद्वारे आधीच वापरली जात असल्यास हे पर्यायी पोर्टची विचारणा करेल. |
05:47 | माझ्या मशीनवर MySQL आधीच इन्स्टॉल केलेले असल्याने हे पर्यायी पोर्टची विचारणा करेल. |
05:54 | मी 3307 देत आहे. |
05:57 | ‘‘‘Next’’’ वर क्लिक करा. |
05:59 | आता आपल्याला ड्रुपल साईटला नाव द्यायचे आहे. मी Drupal 8 असे नाव देत आहे. |
06:06 | तुम्ही तुमच्या पसंतीचे नाव देऊ शकता. |
06:10 | ‘‘‘Next’’’ वर क्लिक करा. |
06:12 | येथे हे Bitnami Cloud Hosting साठी विचारणा करत आहे. सध्या आपल्याला हे नको आहे. |
06:19 | त्यामुळे हे डिसिलेक्ट करण्यासाठी चेकबॉक्सवर क्लिक करा. |
06:23 | नंतर ‘‘‘Next’’’ वर क्लिक करा. |
06:26 | आता Drupal इन्स्टॉल होण्यासाठी तयार आहे. ‘‘‘Next’’’ वर क्लिक करा. |
06:31 | इन्स्टॉलेशन पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. |
06:36 | इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर Launch Bitnami Drupal Stack हा पर्याय निवडल्याची खात्री करा. |
06:43 | नंतर Finish वर क्लिक करा. |
06:46 | Bitnami Drupal Stack ची कंट्रोल विंडो आपोआप उघडेल. |
06:51 | कार्यान्वित होत असलेल्या सर्व्हिसेस बघण्यासाठी Manage Servers टॅबवर क्लिक करा. |
06:56 | आता MySQL Database आणि Apache Web Server कार्यान्वित असल्याचे आपण पाहू शकतो. |
07:02 | ड्रुपलवर काम करण्यासाठी MySQL, PostgreSQL किंवा Oracle सारख्या डेटाबेसची |
07:11 | आणि Apache किंवा Nginx सारख्या वेब सर्व्हरची आवश्यकता आहे. |
07:16 | डिफॉल्ट रूपात Bitnami Drupal Stack हे MySQL database आणि Apache web server सोबत येते. |
07:23 | कंट्रोल विंडोवर परत जाऊ. |
07:26 | योग्य बटणांवर क्लिक करून आपण सर्व्हिसेस सुरू, बंद आणि रिस्टार्ट करू शकतो. |
07:33 | Welcome टॅबवर क्लिक करा. |
07:36 | ड्रुपल सुरू करण्यासाठी उजव्या बाजूला असलेल्या Go to Application वर क्लिक करा. |
07:42 | bitnami चे पेज असलेला ब्राऊजर आपोआप उघडेल. |
07:46 | आता Access Drupal लिंकवर क्लिक करा. हे आपल्याला ड्रुपलच्या वेबसाईटवर घेऊन जाईल. |
07:54 | आपल्या वेबसाईटचे नाव Drupal 8 आहे. |
07:58 | वेबसाईटवर लॉगिन करण्यासाठी उजव्या कोप-यात वरती असलेल्या Log in लिंकवर क्लिक करा. |
08:03 | आपण तयार केलेले युजरनेम आणि पासवर्ड टाईप करू. |
08:11 | आता Login वर क्लिक करा. |
08:14 | ऍड्रेसबार मधे http://localhost:8080/drupal/user/1 हा आपल्या वेबसाईटचा वेबऍड्रेस पाहू शकतो. |
08:27 | पुढील पाठात /user/1 म्हणजे काय हे जाणून घेऊ. |
08:32 | localhost, ऐवजी 127.0.0.1 असे दाखवले जाऊ शकते हे तुमच्या सिस्टीम कॉनफिगरेशनवर आधारित आहे. |
08:42 | जर Apache चा लिसनिंग port 80 असल्यास, पुढच्या वेळी ड्रुपल ऍक्सेस करण्यासाठी पुढीलपैकी वेब ऍड्रेस वापरू शकतो. localhost colon 8080 slash drupal किंवा localhost slash drupal |
08:57 | पुढे Bitnami Drupal Stack कंट्रोल विंडो कशी ऍक्सेस करायची ते पाहू. |
09:03 | तुम्ही लिनक्स युजर असाल तर या पाय-यांचे अनुसरण करा. |
09:07 | फाईल ब्राऊजरवर जा. |
09:10 | नंतर डावीकडील साईडबार मधील Places खालील Home वर क्लिक करा. |
09:15 | आता सूचीतील drupal hyphen 8.1.3 hyphen 0 या फोल्डरवर डबल क्लिक करा. |
09:23 | येथे आपल्याला manager hyphen Linux hyphen x64.run ही फाईल दिसेल. ती उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा. |
09:33 | तुम्ही विंडोजचे युजर असाल तर Start Menu -> All Programs -> Bitnami Drupal Stack -> Bitnami Drupal Stack Manager Tool वर जा. |
09:44 | Bitnami Drupal Stack कंट्रोल विंडो उघडेल. |
09:48 | प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा Drupal उघडाल तेव्हा सर्व सर्व्हर्स कार्यान्वित असल्याची खात्री करा. |
09:54 | आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
09:57 | थोडक्यात, या पाठात उबंटु लिनक्स आणि विंडोज या ऑपरेटिंग सिस्टीमवर ड्रुपल इन्स्टॉल करायला शिकलो. |
10:07 | या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
10:14 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा. |
10:25 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:36 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |