Digital-Divide/D0/Oral-Dental-Hygiene-and-Care/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:20, 9 May 2014 by Kavita salve (Talk | contribs)
Title of script: Oral-Dental-Hygiene-and-Care
Author: Manali Ranade
Keywords: Digital-Divide
|
|
---|---|
00:02 | रामू सकाळी उठून शाळेसाठी तयार होऊ लागला. |
00:07 | झोपेत असूनही ब्रशवर पेस्ट घेऊन त्याने दात घासण्यास सुरूवात केली. |
00:12 | शाळेत जायचे असल्याने त्याने पटकन दात घासले. |
00:16 | चुळा भरून तो आंघोळीला गेला आणि तयार झाला. |
00:21 | आईने त्याला नाश्त्यासाठी बोलावले. |
00:25 | त्याने नाश्ता केला. |
00:27 | खाताना अन्न दातात अडकल्याने तो मोठ्याने ओरडला. |
00:33 | आईने त्याला पाणी दिले. उशीर झालेला असल्यामुळे शाळेत जाण्यास सांगतिले. |
00:39 | दात दुखत असूनही रामू घराबाहेर पडला. |
00:44 | रस्त्यात त्याला मित्र भेटला. |
00:47 | तो अस्वस्थ असल्याचे पाहून सुरेशने त्याची चौकशी केली. |
00:52 | रामूने त्याला सर्व सांगितले. |
00:54 | सुरेशने रामूचे बोलणे शांतपणे ऐकले. |
00:58 | सुरेशने शेजारी असलेल्या दाताच्या डॉक्टर काकांबद्दल सांगितले. |
01:03 | शाळा सुटल्यावर रामूला डॉक्टरांकडे नेण्याचे वचन दिले. |
01:09 | digital divide चे अंतर भरून काढणार्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये स्वागत. |
01:14 | येथे तोंडाची स्वच्छता, प्राथमिक काळजी आणि दाताच्या डॉक्टरांचा सल्ला ह्याबद्दल माहिती घेऊ. |
01:23 | शाळेतून येताना सुरेश व रामू दाताच्या डॉक्टरांना भेटले. |
01:29 | डॉक्टरांनी परीक्षण करून दात थोडा किडल्याचे सांगितले. |
01:35 | नंतर दात किडण्याची कारणे सांगितली. |
01:40 | दातांमध्ये अन्नकण अडकणे, |
01:42 | दात नीट न घासणे, |
01:46 | citric acid चे प्रमाण जास्त असलेली Soft drinks (मद्यार्क नसलेले पेय) घेणे इत्यादी. |
01:50 | यावर डॉक्टरांनी काही उपाय सांगितले. |
01:57 | खनिज व कॅल्शियमयुक्त अन्न खाणे, |
02:01 | दात नीट घासणे, |
02:03 | दिवसातून दोनदा दात घासणे, |
02:05 | प्रत्येक खाण्यानंतर चुळा भरणे, |
02:09 | सर्व वयोगटातील लोकांनी दर सहा महिन्यांनी दातांची तपासणी करणे. |
02:15 | दाताच्या डॉक्टरांची भेट घ्या, |
02:17 | जर दात सरळ रेषेत नसतील, |
02:22 | जर दात किडलेले असतील किंवा |
02:25 | गरम किंवा गार खाल्ल्यावर जर खूप वेदना होत असतील.
|
02:30 | आता दात घासण्याच्या काही पध्दती पाहू. |
02:35 | दातांच्या आतल्या आणि बाहेरच्या भागात ब्रश हळूवारपणे फिरवा. |
02:39 | तोंडाची दुर्गंधी आणि कीटाणू निघून जाण्यासाठी जीभेवरही ब्रश फिरवा. |
02:45 | याला पर्याय म्हणजे पीलू किंवा बाभळाच्या झाडाची काडी चघळणे. |
02:52 | ही काडी चावत रहावी लागते. |
02:55 | ही चावलेली काडी नैसर्गिक ब्रश म्हणून वापरता येते. |
03:00 | हा पाठ येथे संपतो. |
03:03 | तोंडाच्या आरोग्यासाठी दातांची काळजी घेणे आणि वेळोवेळी दातांच्या डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे. |
03:13 | काळजी घ्या. सहभागाबद्दल धन्यवाद. |
03:17 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
03:21 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
03:25 | जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
03:30 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
03:35 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
03:39 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
03:48 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
03:52 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
04:00 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro |
04:16 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
04:21 | सहभागासाठी धन्यवाद. |