GChemPaint/C2/Editing-molecules/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Editing-molecules
Author: Manali Ranade
Keywords: Video tutorial, GChemPaint tools- Add an electron pair to an atom, Add or modify an atom, Add a bond or change the multiplicity of the existing one, Add a six membered cycle, Increment the charge of an atom
Time | Narration
|
---|---|
00:01 | नमस्कार. |
00:02 | GChemPaint मधील Editing Molecules वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | यात शिकणार आहोत, |
00:09 | * अणूवर unbound इलेक्ट्रॉन्स समाविष्ट करणे. |
00:12 | * कार्बोनिक अॅसिड आणि सल्फ्युरिक अॅसिड यांच्या रचना काढणे. |
00:16 | * अणूंच्या ग्रुपवर लोकल चार्ज समाविष्ट करणे आणि बदलणे. |
00:21 | तसेच शिकणार आहोत, |
00:23 | * अणूवर लोकल चार्ज समाविष्ट करणे आणि बदलणे. |
00:26 | * cyclic रेणू समाविष्ट करणे. |
00:29 | * मोनो सायक्लिक रेणूचे बाय सायक्लिक रेणूंमधे रूपांतर करणे. |
00:34 | आपण, |
00:35 | उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04 आणि |
00:39 | GChemPaint वर्जन 0.12.10 वापरू. |
00:46 | हा पाठ समजून घेण्यासाठी तुम्हाला, |
00:50 | GChemPaint केमिकल स्ट्रक्चर एडिटरची माहिती असावी. |
00:53 | नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या. |
00:58 | मी नवे GChemPaint अॅप्लिकेशन उघडले आहे. |
01:02 | प्रथम अमोनियाची रचना काढू. |
01:06 | करंट एलिमेंटच्या ड्रॉप डाऊन अॅरो बटणावर क्लिक करा. |
01:09 | टेबलमधून N सिलेक्ट करा. |
01:11 | टूल बॉक्समधील N चे निरीक्षण करा. |
01:15 | Add or modify an atom टूलवर क्लिक करा. |
01:18 | नंतर डिस्प्ले एरिया वर क्लिक करा. |
01:21 | डिस्प्ले एरियावर NH3 दिसेल. |
01:24 | कॅपिटल H दाबा. H नी सुरू होणा-या घटकांची सूची असलेला सबमेनू उघडेल. |
01:30 | सूचीतून H निवडा. |
01:33 | Add a bond or change the multiplicity of the existing one टूलवर क्लिक करा. |
01:38 | नायट्रोजन अणूला तीन बंध काढण्यासाठी, |
01:41 | बंधावर क्लिक करून तो तीन वेळा नायट्रोजन अणूवर ड्रॅग करा. |
01:46 | बंधांची रचना पिरॅमिडसारखी होईल अशा रितीने बदला. |
01:51 | आता नायट्रोजन अणूवर un-bound इलेक्ट्रॉन्सची जोडी समाविष्ट करू. |
01:56 | Add an electron pair to an atom टूलवर क्लिक करा. |
02:01 | अमोनियातील नायट्रोजन अणूवर क्लिक करा. |
02:05 | होणा-या बदलांचे निरीक्षण करा. |
02:07 | अमोनियातील नायट्रोजनकडे आता इलेक्ट्रॉन्सची जोडी आहे. |
02:12 | ही जोडी बंधामध्ये भाग घेत नाही. |
02:16 | इलेक्ट्रॉन्सच्या या जोडीला लोन पेयर (lone pair) म्हणतात. |
02:20 | असाईनमेंट म्हणून, |
02:21 | * फॉस्फरस trichloride ची रचना काढा. |
02:24 | * फॉस्फरस अणूवर un-bound इलेक्ट्रॉन्सची जोडी समाविष्ट करा. |
02:29 | आता कार्बोनिक अॅसिड(H2CO3) आणि सल्फ्युरिक अॅसिड(H2SO4) यांच्या रचना काढू. |
02:34 | येथे कार्बोनिक अॅसिड आणि सल्फ्युरिक अॅसिडची रचना असलेली स्लाईड आहे. |
02:40 | प्रथम अमोनियाची रचना एका बाजूला सरकवा. |
02:44 | त्यासाठी Select one or more objects टूलवर क्लिक करा. |
02:48 | नंतर अमोनियाच्या रचने वर क्लिक करून ते एका बाजूला ड्रॅग करा. |
02:53 | आता कार्बोनिक अॅसिड ची रचना काढू. |
02:56 | करंट एलिमेंटच्या ड्रॉप डाऊन अॅरो बटणावर क्लिक करा. |
03:00 | टेबलमधून C सिलेक्ट करा. |
03:02 | Add a bond or change the multiplicity of the existing one टूलवर क्लिक करा. |
03:07 | डिस्प्ले एरियावर क्लिक करा. |
03:09 | तीन बंधाची रचना उलट आकाराच्या Y सारखी होईल अशा रितीने बदला. |
03:15 | चौथा बंध असा काढा की कोणताही एक बाँड double बाँड होईल. |
03:21 | करंट एलिमेंटच्या ड्रॉप डाऊन अॅरो बटणावर क्लिक करा. |
03:25 | O सिलेक्ट करा. |
03:26 | Add or modify an atom टूलवर क्लिक करा. |
03:30 | बंधाजवळ कर्सर न्या. |
03:33 | बाँडच्या तीन जागांवर क्लिक करा. |
03:37 | कार्बोनिक अॅसिड(H2CO3) ची रचना तयार झाली आहे. |
03:40 | आता सल्फ्युरिक अॅसिडची रचना काढू. |
03:44 | करंट एलिमेंटच्या ड्रॉप डाऊन अॅरो बटणावर क्लिक करा. |
03:47 | S सिलेक्ट करा. |
03:48 | Add or modify an atom टूलवर क्लिक करा. |
03:52 | नंतर डिस्प्ले एरियावर क्लिक करा. |
03:55 | H2S चे निरीक्षण करा. |
03:57 | आता डिस्प्ले एरियावर कुठेही कॅपिटल O दाबा. |
04:01 | O आणि Os हे 2 पर्याय असलेला सबमेनू उघडेल. |
04:06 | O सिलेक्ट करा. |
04:08 | Add or modify an atom टूलवर क्लिक करा. |
04:11 | नंतर Add a bond or change the multiplicity of the existing one टूलवर क्लिक करा. |
04:17 | Property मेनूमधे बाँडची लांबी वाढवून ती 200 किंवा त्यापेक्षा अधिक करा. |
04:23 | OH चे तीन बंध S वर काढण्यासाठी H2S वर क्लिक करा. |
04:29 | S जवळ धनभार दिसेल. |
04:32 | ह्याचे कारण की सल्फरची संयुजा सहा आहे. |
04:39 | चौथ्या बंधासाठी S वर क्लिक करा. |
04:43 | आता माऊसचे बटण न सोडता बाँड एका बाजूला ड्रॅग करा. |
04:47 | आता विरूध्द बंध double bonds मधे रूपांतरित करू. |
04:52 | Add a bond or change the multiplicity of the existing one टूलवर क्लिक करा. |
04:58 | रचनेतील विरूध्द बाजूच्या बंधावर क्लिक करा. |
05:03 | धनभार आता दिसत नसल्याचे लक्षात येईल. |
05:08 | सल्फ्युरिक अॅसिडची रचना पूर्ण झाली आहे. |
05:12 | पुढे कार्बोनिक अॅसिड आणि सल्फ्युरिक अॅसिड या रचनांवर लोकल चार्ज समाविष्ट करू. |
05:18 | लोकल चार्ज दाखवण्यासाठी Decrement the charge of an atom टूलवर क्लिक करा. |
05:24 | कार्बोनिक अॅसिड रचनेच्या दोन O-H ग्रुप्सवर क्लिक करा. |
05:30 | कार्बोनेट आयन CO32- बनलेले दिसेल. |
05:36 | सल्फ्युरिक अॅसिड रचनेवर लोकल चार्ज दाखवण्यासाठी, |
05:41 | Decrement the charge of an atom टूलवर क्लिक करा. |
05:44 | सल्फ्युरिक अॅसिडच्या दोन विरूध्द O-H ग्रुप्सवर क्लिक करा. |
05:49 | सल्फेट आयन SO42- बनलेले दिसेल. |
05:56 | असाईनमेंट म्हणून, |
05:57 | * नायट्रिक अॅसिड (HNO3) ची रचना काढा. |
05:59 | * नायट्रेट आयन (NO3-) वर लोकल चार्ज दाखवा. |
06:02 | तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसणे अपेक्षित आहे. |
06:07 | अणूवर लोकल चार्ज कसा समाविष्ट करायचा ते बघू. |
06:12 | डिस्प्ले एरियावर कुठेही कॅपिटल N दाबा . |
06:16 | उघडलेल्या सबमेनूमधून Naसिलेक्ट करू. |
06:21 | Add or modify an atom टूलवर क्लिक करा. |
06:24 | नंतर डिस्प्ले एरियावर क्लिक करा. |
06:27 | Sodium अणू डिस्प्ले एरियावर दिसेल. |
06:30 | Increment the charge of an atom टूलवर क्लिक करा. |
06:35 | नंतर Na वर क्लिक करा. |
06:37 | Sodium अणूवरील धन भाराचे निरीक्षण करा. |
06:41 | तसेच अणूवर ऋण भार समाविष्ट करू शकतो. |
06:46 | ह्यासाठी Decrement the charge of an atom टूल निवडा. |
06:51 | आता Cyclic रेणू कसे काढायचे ते पाहू. |
06:54 | त्यासाठी GChemPaint ची नवी विंडो उघडू. |
06:59 | टूलबार वरील Create a new file वर क्लिक करा. |
07:03 | C म्हणजेच Carbon हा घटक सिलेक्ट केल्याची खात्री करा. |
07:09 | तसेच बाँडची लांबी 200 किंवा अधिक असल्याची खात्री करा. |
07:14 | टूल बॉक्स मधील चौथा टूलबार हे Cycle टूल आहे. |
07:19 | ह्यामधील अनेक टूल्स वापरू शकतो. |
07:22 | उदाहरणार्थ - |
07:24 | * Add a three membered cycle |
07:26 | * Add a four membered cycle |
07:29 | * आणि इतर cycle टूल्स |
07:32 | नंतर * Add a cycle टूल. |
07:35 | आपण Add a four membered cycle वापरू. |
07:40 | त्यावर क्लिक करा. |
07:42 | डिस्प्ले एरिया वर क्लिक करा. |
07:44 | टोकांवर cycle मधे अणू समाविष्ट करू. |
07:49 | कुठल्याही एका टोकावर राईट क्लिक करा. |
07:52 | सबमेनू उघडेल. Atom सिलेक्ट करून डिस्प्ले सिंबॉल वर क्लिक करा. |
07:58 | अशाच प्रकारे सर्व टोकांवर अणू समाविष्ट करू. |
08:03 | मिळालेली रचना Cyclobutane ची आहे. |
08:07 | आता मोनो सायक्लिक संयुगाचे बाय सायक्लिक संयुगात रूपांतर करू. |
08:12 | Add a six membered cycle टूल वर क्लिक करा. |
08:16 | डिस्प्ले एरियावर क्लिक करा. |
08:19 | cycle च्या बाँडवर कर्सर ठेवा आणि पुन्हा क्लिक करा. |
08:24 | बाय सायक्लिक संयुगाचे निरीक्षण करा. |
08:27 | फाईल save करण्यासाठी टूलबारवरील Save the current file वर क्लिक करा. |
08:32 | Save as डायलॉग बॉक्स उघडेल. |
08:35 | फाईलला Editing Molecules हे नाव द्या. |
08:38 | Save बटणावर क्लिक करा. |
08:41 | थोडक्यात, |
08:43 | या पाठात शिकलो, |
08:45 | * अणूवर unbound इलेक्ट्रॉन्स समाविष्ट करणे. |
08:48 | * कार्बोनिक अॅसिड आणि सल्फ्युरिक अॅसिड यांच्या रचना काढणे. |
08:53 | * अणूंच्या ग्रुपवर लोकल चार्ज समाविष्ट करणे आणि बदलणे. |
08:58 | तसेच आपण शिकलो, |
09:00 | * अणूवर लोकल चार्ज समाविष्ट करणे आणि बदलणे |
09:04 | * cyclic रेणू समाविष्ट करणे |
09:06 | * मोनो-सायक्लिक रेणूचे बाय-सायक्लिक रेणूंमधे रूपांतर करणे. |
09:11 | असाईनमेंट म्हणून, |
09:13 | * डिस्प्ले एरियामधे seven membered cycle समाविष्ट करणे. |
09:16 | * ते ट्रायसायक्लिक संयुगात रूपांतरित करणे. |
09:20 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
09:24 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
09:27 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
09:32 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09:36 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09:40 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
09:46 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09:50 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:57 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
10:03 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |