GChemPaint/C2/Editing-molecules/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार. GChemPaint मधील Editing Molecules वरील पाठात आपले स्वागत.
00:06 यात शिकणार आहोत,
00:09 अणूवर unbound इलेक्ट्रॉन्स समाविष्ट करणे.
00:12 कार्बोनिक अॅसिड आणि सल्फ्युरिक अॅसिड यांच्या रचना काढणे.
00:16 अणूंच्या ग्रुपवर लोकल चार्ज समाविष्ट करणे आणि बदलणे.
00:21 तसेच शिकणार आहोत,
00:23 अणूवर लोकल चार्ज समाविष्ट करणे आणि बदलणे.
00:26 cyclic रेणू समाविष्ट करणे.
00:29 मोनो सायक्लिक रेणूचे बाय सायक्लिक रेणूंमधे रूपांतर करणे.
00:34 आपण, उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04 आणि
00:39 GChemPaint वर्जन 0.12.10 वापरू.
00:46 हा पाठ समजून घेण्यासाठी तुम्हाला,
00:50 GChemPaint केमिकल स्ट्रक्चर एडिटरची माहिती असावी.
00:53 नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या.
00:58 मी नवे GChemPaint अॅप्लिकेशन उघडले आहे.
01:02 प्रथम अमोनियाची रचना काढू.
01:06 करंट एलिमेंटच्या ड्रॉप डाऊन अॅरो बटणावर क्लिक करा.
01:09 टेबलमधून N सिलेक्ट करा.
01:11 टूल बॉक्समधील N चे निरीक्षण करा.
01:15 Add or modify an atom टूलवर क्लिक करा.
01:18 नंतर डिस्प्ले एरिया वर क्लिक करा.
01:21 डिस्प्ले एरियावर NH3 दिसेल.
01:24 कॅपिटल H दाबा. H नी सुरू होणा-या घटकांची सूची असलेला सबमेनू उघडेल.
01:30 सूचीतून H निवडा.
01:33 Add a bond or change the multiplicity of the existing one टूलवर क्लिक करा.
01:38 नायट्रोजन अणूला तीन बंध काढण्यासाठी,
01:41 बंधावर क्लिक करून तो तीन वेळा नायट्रोजन अणूवर ड्रॅग करा.
01:46 बंधांची रचना पिरॅमिडसारखी होईल अशा रितीने बदला.
01:51 आता नायट्रोजन अणूवर un-bound इलेक्ट्रॉन्सची जोडी समाविष्ट करू.
01:56 Add an electron pair to an atom टूलवर क्लिक करा.
02:01 अमोनियातील नायट्रोजन अणूवर क्लिक करा.
02:05 होणा-या बदलांचे निरीक्षण करा.
02:07 अमोनियातील नायट्रोजनकडे आता इलेक्ट्रॉन्सची जोडी आहे.
02:12 ही जोडी बंधामध्ये भाग घेत नाही.
02:16 इलेक्ट्रॉन्सच्या या जोडीला लोन पेयर (lone pair) म्हणतात.
02:20 असाईनमेंट म्हणून, फॉस्फरस trichloride ची रचना काढा.
02:24 फॉस्फरस अणूवर un-bound इलेक्ट्रॉन्सची जोडी समाविष्ट करा.
02:29 आता कार्बोनिक अॅसिड(H2CO3) आणि सल्फ्युरिक अॅसिड(H2SO4) यांच्या रचना काढू.
02:34 येथे कार्बोनिक अॅसिड आणि सल्फ्युरिक अॅसिडची रचना असलेली स्लाईड आहे.
02:40 प्रथम अमोनियाची रचना एका बाजूला सरकवा.
02:44 त्यासाठी Select one or more objects टूलवर क्लिक करा.
02:48 नंतर अमोनियाच्या रचने वर क्लिक करून ते एका बाजूला ड्रॅग करा.
02:53 आता कार्बोनिक अॅसिड ची रचना काढू.
02:56 करंट एलिमेंटच्या ड्रॉप डाऊन अॅरो बटणावर क्लिक करा.
03:00 टेबलमधून C सिलेक्ट करा.
03:02 Add a bond or change the multiplicity of the existing one टूलवर क्लिक करा.
03:07 डिस्प्ले एरियावर क्लिक करा.
03:09 तीन बंधाची रचना उलट आकाराच्या Y सारखी होईल अशा रितीने बदला.
03:15 चौथा बंध असा काढा की कोणताही एक बाँड double बाँड होईल.
03:21 करंट एलिमेंटच्या ड्रॉप डाऊन अॅरो बटणावर क्लिक करा.
03:25 O सिलेक्ट करा. Add or modify an atom टूलवर क्लिक करा.
03:30 बंधाजवळ कर्सर न्या.
03:33 बाँडच्या तीन जागांवर क्लिक करा.
03:37 कार्बोनिक अॅसिड(H2CO3) ची रचना तयार झाली आहे.
03:40 आता सल्फ्युरिक अॅसिडची रचना काढू.
03:44 करंट एलिमेंटच्या ड्रॉप डाऊन अॅरो बटणावर क्लिक करा.
03:47 S सिलेक्ट करा. Add or modify an atom टूलवर क्लिक करा.
03:52 नंतर डिस्प्ले एरियावर क्लिक करा.
03:55 H2S चे निरीक्षण करा.
03:57 आता डिस्प्ले एरियावर कुठेही कॅपिटल O दाबा.
04:01 O आणि Os हे 2 पर्याय असलेला सबमेनू उघडेल.
04:06 O सिलेक्ट करा.
04:08 Add or modify an atom टूलवर क्लिक करा.
04:11 नंतर Add a bond or change the multiplicity of the existing one टूलवर क्लिक करा.
04:17 Property मेनूमधे बाँडची लांबी वाढवून ती 200 किंवा त्यापेक्षा अधिक करा.
04:23 OH चे तीन बंध S वर काढण्यासाठी H2S वर क्लिक करा.
04:29 S जवळ धनभार दिसेल.
04:32 ह्याचे कारण की सल्फरची संयुजा सहा आहे.
04:39 चौथ्या बंधासाठी S वर क्लिक करा.
04:43 आता माऊसचे बटण न सोडता बाँड एका बाजूला ड्रॅग करा.
04:47 आता विरूध्द बंध double bonds मधे रूपांतरित करू.
04:52 Add a bond or change the multiplicity of the existing one टूलवर क्लिक करा.
04:58 रचनेतील विरूध्द बाजूच्या बंधावर क्लिक करा.
05:03 धनभार आता दिसत नसल्याचे लक्षात येईल.
05:08 सल्फ्युरिक अॅसिडची रचना पूर्ण झाली आहे.
05:12 पुढे कार्बोनिक अॅसिड आणि सल्फ्युरिक अॅसिड या रचनांवर लोकल चार्ज समाविष्ट करू.
05:18 लोकल चार्ज दाखवण्यासाठी Decrement the charge of an atom टूलवर क्लिक करा.
05:24 कार्बोनिक अॅसिड रचनेच्या दोन O-H ग्रुप्सवर क्लिक करा.
05:30 कार्बोनेट आयन CO32- बनलेले दिसेल.
05:36 सल्फ्युरिक अॅसिड रचनेवर लोकल चार्ज दाखवण्यासाठी,
05:41 Decrement the charge of an atom टूलवर क्लिक करा.
05:44 सल्फ्युरिक अॅसिडच्या दोन विरूध्द O-H ग्रुप्सवर क्लिक करा.
05:49 सल्फेट आयन SO42- बनलेले दिसेल.
05:56 असाईनमेंट म्हणून, नायट्रिक अॅसिड (HNO3) ची रचना काढा.
05:59 नायट्रेट आयन (NO3-) वर लोकल चार्ज दाखवा.
06:02 तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसणे अपेक्षित आहे.
06:07 अणूवर लोकल चार्ज कसा समाविष्ट करायचा ते बघू.
06:12 डिस्प्ले एरियावर कुठेही कॅपिटल N दाबा .
06:16 उघडलेल्या सबमेनूमधून Naसिलेक्ट करू.
06:21 Add or modify an atom टूलवर क्लिक करा.
06:24 नंतर डिस्प्ले एरियावर क्लिक करा.
06:27 Sodium अणू डिस्प्ले एरियावर दिसेल.
06:30 Increment the charge of an atom टूलवर क्लिक करा.
06:35 नंतर Na वर क्लिक करा.
06:37 Sodium अणूवरील धन भाराचे निरीक्षण करा.
06:41 तसेच अणूवर ऋण भार समाविष्ट करू शकतो.
06:46 ह्यासाठी Decrement the charge of an atom टूल निवडा.
06:51 आता Cyclic रेणू कसे काढायचे ते पाहू.
06:54 त्यासाठी GChemPaint ची नवी विंडो उघडू.
06:59 टूलबार वरील Create a new file वर क्लिक करा.
07:03 C म्हणजेच Carbon हा घटक सिलेक्ट केल्याची खात्री करा.
07:09 तसेच बाँडची लांबी 200 किंवा अधिक असल्याची खात्री करा.
07:14 टूल बॉक्स मधील चौथा टूलबार हे Cycle टूल आहे.
07:19 ह्यामधील अनेक टूल्स वापरू शकतो.
07:22 उदाहरणार्थ -
07:24 Add a three membered cycle
07:26 Add a four membered cycle
07:29 आणि इतर cycle टूल्स
07:32 नंतर * Add a cycle टूल.
07:35 आपण Add a four membered cycle वापरू.
07:40 त्यावर क्लिक करा.
07:42 डिस्प्ले एरिया वर क्लिक करा.
07:44 टोकांवर cycle मधे अणू समाविष्ट करू.
07:49 कुठल्याही एका टोकावर राईट क्लिक करा.
07:52 सबमेनू उघडेल. Atom सिलेक्ट करून डिस्प्ले सिंबॉल वर क्लिक करा.
07:58 अशाच प्रकारे सर्व टोकांवर अणू समाविष्ट करू.
08:03 मिळालेली रचना Cyclobutane ची आहे.
08:07 आता मोनो सायक्लिक संयुगाचे बाय सायक्लिक संयुगात रूपांतर करू.
08:12 Add a six membered cycle टूल वर क्लिक करा.
08:16 डिस्प्ले एरियावर क्लिक करा.
08:19 cycle च्या बाँडवर कर्सर ठेवा आणि पुन्हा क्लिक करा.
08:24 बाय सायक्लिक संयुगाचे निरीक्षण करा.
08:27 फाईल save करण्यासाठी टूलबारवरील Save the current file वर क्लिक करा.
08:32 Save as डायलॉग बॉक्स उघडेल.
08:35 फाईलला Editing Molecules हे नाव द्या.
08:38 Save बटणावर क्लिक करा.
08:41 थोडक्यात,
08:43 या पाठात शिकलो,
08:45 अणूवर unbound इलेक्ट्रॉन्स समाविष्ट करणे.
08:48 कार्बोनिक अॅसिड आणि सल्फ्युरिक अॅसिड यांच्या रचना काढणे.
08:53 अणूंच्या ग्रुपवर लोकल चार्ज समाविष्ट करणे आणि बदलणे.
08:58 तसेच आपण शिकलो,
09:00 अणूवर लोकल चार्ज समाविष्ट करणे आणि बदलणे
09:04 cyclic रेणू समाविष्ट करणे
09:06 मोनो-सायक्लिक रेणूचे बाय-सायक्लिक रेणूंमधे रूपांतर करणे.
09:11 असाईनमेंट म्हणून,
09:13 डिस्प्ले एरिया मधे seven membered cycle समाविष्ट करणे.
09:16 ते ट्रायसायक्लिक संयुगात रूपांतरित करणे.
09:20 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09:24 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:27 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:32 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:36 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:40 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
09:46 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:50 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:57 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:03 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana