PHP-and-MySQL/C4/User-Login-Part-2/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:22, 10 December 2013 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: User-Login-Part-2

Author: Manali Ranade

Keyw]ords: PHP-and-MySQL


Visual Clue
Narration
0:00 दुस-या भागात स्वागत. येथे डेटाबेसला कनेक्ट करण्यासाठी "login dot php" पेज एडिट करणे, त्यातील युजरनेम व पासवर्ड तपासणे ह्याविषयी जाणून घेऊ.
0:14 आपण डेटाबेसला आधीच कनेक्ट झालो आहोत.
0:18 हे रिफ्रेश करून, आपला युजरनेम व पासवर्ड रिसेंड करून, एरर नसल्याची खात्री करू.
0:24 म्हणजे ही एरर.
0:25 जर डेटा टाईप केला नाही तर एरर मिळेल.
0:28 आता प्रथम query सेट करू.
0:36 "mysql" सारखी structured query language वापरून तुम्ही डेटाबेसला query करू शकता.
0:43 ही Microsoft Access मधेही आहे.
0:46 येथे लिहा "SELECT *" कारण आपल्याला ID, युजरनेम आणि पासवर्डची आवश्यकता आहे.
0:54 id ची गरज आहे असे वाटत नाही. पण "SELECT *" मुळे सर्व डेटा मिळेल.
0:59 म्हणून "SELECT * FROM". users टेबलमधून डेटा घेणार आहोत. खात्री करा.
1:04 बरोबर. "SELECT * FROM users" पुढे "WHERE username" जे येथे ह्याचे नाव आहे.
1:20 आणि लिहा "WHERE username equals" the "username" जे टाईप केले गेले आहे.
1:30 हे "username" उपलब्ध नसल्यास "This user doesn’t exist" हा एरर मेसेज दाखवणे आवश्यक आहे.
1:37 त्यासाठी "mysql num rows" हे दुसरे mysql फंक्शन वापरावे लागेल .
1:46 डेटाबेस query द्वारे मिळालेल्या rows ची संख्या हे मोजते.
1:53 त्यासाठी लिहू "numrows equals mysql_num_rows" आणि कंसात queryचे नाव म्हणजेच variable query ज्यात आपण queryफंक्शन संचित केले आहे.
2.08 rows ची संख्या एको केल्यास हे स्पष्ट होईल. डेटाबेसमधे केवळ1 row असल्याने 1 हे आऊटपुट मिळाले पाहिजे.
2.16 insert वर क्लिक करून आणखी एक row समाविष्ट करू. उदाहरणार्थ दुसरे युजरनेम आणि पासवर्ड.
2:26 हे करून पाहू. नंतर तपासू. युजरनेम मधे "Kyle" आणि "123" हा पासवर्ड टाईप करा.
2:38 पाहू या. बघा, आता येथे दोन rowsदिसत आहेत.
2:53 येथे "Alex" आणि "Kyle" ही रेकॉर्ड आहेत.
2:55 idआपोआप एकने वाढलेला बघू शकतो.
2:58 आपण दोन्ही युजरनेम व पासवर्ड पाहू शकतो.
3:02 रिफ्रेश केल्यावर काय दिसते पाहू.
3:06 पूर्णqueryमुळे हे आऊटपुट मिळाले आहे.
3:10 येथे विशिष्ट युजर सिलेक्ट करत असल्यामुळे आपल्याला 1मिळत आहे. queryचा हा भाग काढून टाकू.
3:18 पुन्हा रिफ्रेश केल्यावर 2 व्हॅल्यू मिळाली कारण 2 rows आहेत.
3:22 जर "SELECT where username equals my username",लिहिले तर अर्थातच उपलब्ध असलेले विशिष्ट युजरनेम निवडत आहोत जे केवळ एकाच row मधे आहे.
3:34 साधारणपणे वेबसाईटवर एकच युजरनेम दोन वेळा दिले जात नाही.
3:40 हे मिळाले. ठीक आहे. एकूण किती rows उपलब्ध आहेत हे जाणून घेण्याचा हेतू काय होता?
3:47 हेतू हा की जर if "my num_rows doesn’t equal zero" असे लिहिले आणि कार्यान्वित केले की आपल्याला loginकरता येईल.
4.01 अन्यथा "else die" लिहून "That user doesn’t exist" हा मेसेज दाखवू.
4:16: येथे जे युजरनेम दिले आहे त्यानुसार संबंधित row आपल्याला मिळते का ते तपासू.
4:25 आणि जर हे equal to zero नसेल तर login करण्याचा कोड कार्यान्वित करू.
4:29 अन्यथा die "That username doesn’t exist" हा मेसेज दाखवणार आहोत.
4:33 हे 1, 2, 3, 4 किंवा त्यापुढील काहीही असेल.
4:40 जर हे equal to zeroनसेल तर त्याला निश्चितच काही व्हॅल्यू असेल.
4:44 आणि जर equal to काही व्हॅल्यू आहे म्हणजे कोड कार्यान्वित होईल.
4:47 जर हे equal to 0असेल तर कुठलाही रिझल्ट मिळणार नाही.
4:52 हे resend करू. पुन्हा मागे जाऊ.
4:57 आणि हे "echo num_rows" काढून टाकू.
5:05 मुख्य पेजवर जाऊन "Alex" आणि "abc" ने login करू. ह्याक्षणी पासवर्ड महत्त्वाचा नाही.
5:13 काही झाले नाही. एरर मिळाली नाही.
5:15 आता Billyवापरून पाहू. पासवर्ड टाईप करून login वर क्लिक करा.
5:21 "That user doesn’t exist!" कारण Billy युजरनेम असणारी कुठलीही row नाही.
5:26 हे कार्य करत आहे.
5:28 मूळ गोष्टींवर परत जाऊ.
5:31 "Alex" आणि माझा पासवर्ड "abc" टाईप करू.
5:37 आता loginसाठीचा कोड पाहू.
5:39 loginकरण्यासाठी पासवर्ड तपासावा लागेल.
5:42 म्हणून पासवर्डसाठी फंक्शन वापरणार आहोत.
5:46 माफ करा. फंक्शन नाही. "while" loopचा वापरू.
5:52 येथे लिहा. while कंसात variable "row" equal to "mysql"..... mysql येथे array च्या रूपात row मिळवेल.
6:11 म्हणून लिहा "mysql_fetch_assoc". a-s-s-o-c
6:22 आणि पुढे query चे नाव. म्हणजेच व्हेरिएबल query जी येथे बनवली आहे.
6:28 ह्याद्वारे डेटाचा प्रत्येक column मिळवत आहोत आणि तो "row" नावाच्या array मधे ठेवत आहोत.
6:40 येथे while loopमधे खाली ब्रॅकेटस् मधे काही variables सेट करत आहोत.
6:45 येथे लिहा variable "db username" equal to variable "row" स्क्वेअर ब्रॅकेट मधे username हे डेटाबेसमधून मिळवत आहोत.
6:55 आपल्या rowचे नाव येथे बघू शकतो.
6:59 हा डेटाचा arrayअसल्यास, प्रत्येक रो मधे id, username आणि पासवर्ड असेल.
7:06 आपण 0,1,2 वापरत नाही कारण ते कार्य करेल ह्याची खात्री नाही.
7:10 आता हे सुटसुटीत ठेवणार आहोत आणि कॉलमच्या नावाचा संदर्भ वापरणार आहोत.
7:20 डेटाबेसमधील युजरनेम आपली query वापरून मिळालेल्या "row"मधे आहे.
7:26 नंतर लिहा "db password equals row" आणि ब्रॅकेटमधे सिंगल कोटसमधे password .
7:38 नंतर हे एको करू शकतो...
7:43 खरेतर db username आणि password एको करायला नको. अन्यथा नंतर एरर्स येतील.
7:49 ते डेटाबेसमधे आधीच पाहिलेले आहेत.
7:51 आता check कार्यान्वित करू. येथे "check to see if they match" अशी कमेंट लिहू.
8:00 "if" स्टेटमेंटद्वारे हे सहज करू शकतो.
8:04 टाईप करा "if" variable username equals variable db username AND variable password equals db password असल्यास हे बरोबर आहे असे म्हणू.
8:19 अन्यथा बरोबर नाही असे म्हणू.
8:22 हे कंस काढून टाकू. कारण येथे एकच ओळ आहे. "Incorrect password!" हे एको करू आणि हे तसेच ठेवू.
8:34 आणि येथे "You’re in!" एको करू.
8:41 पाठाचा हा भाग संपवण्यापूर्वी हे तपासू.
8:46 Alex आणि चुकीचा पासवर्ड टाईप केल्यावर "Incorrect password!" हा मेसेज मिळाला.
8:51 "abc" हा योग्य पासवर्ड दिल्यावर "You’re in!" मेसेज मिळाला.
8:55 युजरनेम आणि त्याची उपलब्धता तपासली आहे.
8:58 fields उपलब्ध असल्याचे तपासले आहे. युजरनेम आणि पासवर्ड एंटर करा.
9:04 जर हे चुकीचे एंटर केले तर "Incorrect password" हा मेसेज मिळेल.
9:11 बरोबर एंटर केल्यावर "You’re in" मेसेज मिळेल.
9:13 आणि जर उपलब्ध नसलेले युजरनेम एंटर केले तर user doesn’t exist असा एरर मेसेज मिळेल.
9:24 पुढील भागात sessions आणि log out page कसे बनवायचे ते बघू.
9:32 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana