PHP-and-MySQL/C4/User-Login-Part-2/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 दुस-या भागात स्वागत. येथे डेटाबेसला कनेक्ट करण्यासाठी "login dot php" पेज एडिट करणे, त्यातील युजरनेम व पासवर्ड तपासणे ह्याविषयी जाणून घेऊ.
00:14 आपण डेटाबेसला आधीच कनेक्ट झालो आहोत.
00:18 हे रिफ्रेश करून, आपला युजरनेम व पासवर्ड रिसेंड करून, एरर नसल्याची खात्री करू.
00:24 म्हणजे ही एरर. जर डेटा टाईप केला नाही तर एरर मिळेल.
00:28 आता प्रथम query सेट करू.
00:36 "mysql" सारखी structured query language वापरून तुम्ही डेटाबेसला query करू शकता.
00:43 ही Microsoft Access मधेही आहे.
00:46 येथे लिहा "SELECT *" कारण आपल्याला ID, युजरनेम आणि पासवर्डची आवश्यकता आहे.
00:54 id ची गरज आहे असे वाटत नाही. पण "SELECT *" मुळे सर्व डेटा मिळेल.
00:59 म्हणून "SELECT * FROM". users टेबलमधून डेटा घेणार आहोत. खात्री करा.
01:04 बरोबर. "SELECT * FROM users" पुढे "WHERE username" जे येथे ह्याचे नाव आहे.
01:20 आणि लिहा "WHERE username equals" the "username" जे टाईप केले गेले आहे.
01:30 हे "username" उपलब्ध नसल्यास "This user doesn’t exist" हा एरर मेसेज दाखवणे आवश्यक आहे.
01:37 त्यासाठी "mysql num rows" हे दुसरे mysql फंक्शन वापरावे लागेल .
01:46 डेटाबेस query द्वारे मिळालेल्या rows ची संख्या हे मोजते.
01:53 त्यासाठी लिहू "numrows equals mysql_num_rows" आणि कंसात queryचे नाव म्हणजेच variable query ज्यात आपण queryफंक्शन संचित केले आहे.
02:08 rows ची संख्या एको केल्यास हे स्पष्ट होईल. डेटाबेसमधे केवळ1 row असल्याने 1 हे आऊटपुट मिळाले पाहिजे.
02:16 insert वर क्लिक करून आणखी एक row समाविष्ट करू. उदाहरणार्थ दुसरे युजरनेम आणि पासवर्ड.
02:26 हे करून पाहू. नंतर तपासू. युजरनेम मधे "Kyle" आणि "123" हा पासवर्ड टाईप करा.
02:38 पाहू या. बघा, आता येथे दोन rowsदिसत आहेत.
02:53 येथे "Alex" आणि "Kyle" ही रेकॉर्ड आहेत.
02:55 idआपोआप एकने वाढलेला बघू शकतो.
02:58 आपण दोन्ही युजरनेम व पासवर्ड पाहू शकतो.
03:02 रिफ्रेश केल्यावर काय दिसते पाहू.
03:06 पूर्णqueryमुळे हे आऊटपुट मिळाले आहे.
03:10 येथे विशिष्ट युजर सिलेक्ट करत असल्यामुळे आपल्याला 1मिळत आहे. queryचा हा भाग काढून टाकू.
03:18 पुन्हा रिफ्रेश केल्यावर 2 व्हॅल्यू मिळाली कारण 2 rows आहेत.
03:22 जर "SELECT where username equals my username",लिहिले तर अर्थातच उपलब्ध असलेले विशिष्ट युजरनेम निवडत आहोत जे केवळ एकाच row मधे आहे.
03:34 साधारणपणे वेबसाईटवर एकच युजरनेम दोन वेळा दिले जात नाही.
03:40 हे मिळाले. ठीक आहे. एकूण किती rows उपलब्ध आहेत हे जाणून घेण्याचा हेतू काय होता?
03:47 हेतू हा की जर if "my num_rows doesn’t equal zero" असे लिहिले आणि कार्यान्वित केले की आपल्याला loginकरता येईल.
04:01 अन्यथा "else die" लिहून "That user doesn’t exist" हा मेसेज दाखवू.
04:16 येथे जे युजरनेम दिले आहे त्यानुसार संबंधित row आपल्याला मिळते का ते तपासू.
04:25 आणि जर हे equal to zero नसेल तर login करण्याचा कोड कार्यान्वित करू.
04:29 अन्यथा die "That username doesn’t exist" हा मेसेज दाखवणार आहोत.
04:33 हे 1, 2, 3, 4 किंवा त्यापुढील काहीही असेल.
04:40 जर हे equal to zeroनसेल तर त्याला निश्चितच काही व्हॅल्यू असेल.
04:44 आणि जर equal to काही व्हॅल्यू आहे म्हणजे कोड कार्यान्वित होईल.
04:47 जर हे equal to 0असेल तर कुठलाही रिझल्ट मिळणार नाही.
04:52 हे resend करू. पुन्हा मागे जाऊ.
04:57 आणि हे "echo num_rows" काढून टाकू.
05:05 मुख्य पेजवर जाऊन "Alex" आणि "abc" ने login करू. ह्याक्षणी पासवर्ड महत्त्वाचा नाही.
05:13 काही झाले नाही. एरर मिळाली नाही.
05:15 आता Billyवापरून पाहू. पासवर्ड टाईप करून login वर क्लिक करा.
05:21 "That user doesn’t exist!" कारण Billy युजरनेम असणारी कुठलीही row नाही.
05:26 हे कार्य करत आहे.
05:28 मूळ गोष्टींवर परत जाऊ.
05:31 "Alex" आणि माझा पासवर्ड "abc" टाईप करू.
05:37 आता loginसाठीचा कोड पाहू.
05:39 loginकरण्यासाठी पासवर्ड तपासावा लागेल.
05:42 म्हणून पासवर्डसाठी फंक्शन वापरणार आहोत.
05:46 माफ करा. फंक्शन नाही. "while" loopचा वापरू.
05:52 येथे लिहा. while कंसात variable "row" equal to "mysql"..... mysql येथे array च्या रूपात row मिळवेल.
06:11 म्हणून लिहा "mysql_fetch_assoc". a-s-s-o-c
06:22 आणि पुढे query चे नाव. म्हणजेच व्हेरिएबल query जी येथे बनवली आहे.
06:28 ह्याद्वारे डेटाचा प्रत्येक column मिळवत आहोत आणि तो "row" नावाच्या array मधे ठेवत आहोत.
06:40 येथे while loopमधे खाली ब्रॅकेटस् मधे काही variables सेट करत आहोत.
06:45 येथे लिहा variable "db username" equal to variable "row" स्क्वेअर ब्रॅकेट मधे username हे डेटाबेसमधून मिळवत आहोत.
06:55 आपल्या rowचे नाव येथे बघू शकतो.
06:59 हा डेटाचा arrayअसल्यास, प्रत्येक रो मधे id, username आणि पासवर्ड असेल.
07:06 आपण 0,1,2 वापरत नाही कारण ते कार्य करेल ह्याची खात्री नाही.
07:10 आता हे सुटसुटीत ठेवणार आहोत आणि कॉलमच्या नावाचा संदर्भ वापरणार आहोत.
07:20 डेटाबेसमधील युजरनेम आपली query वापरून मिळालेल्या "row"मधे आहे.
07:26 नंतर लिहा "db password equals row" आणि ब्रॅकेटमधे सिंगल कोटसमधे password .
07:38 नंतर हे एको करू शकतो...
07:43 खरेतर db username आणि password एको करायला नको. अन्यथा नंतर एरर्स येतील.
07:49 ते डेटाबेसमधे आधीच पाहिलेले आहेत.
07:51 आता check कार्यान्वित करू. येथे "check to see if they match" अशी कमेंट लिहू.
08:00 "if" स्टेटमेंटद्वारे हे सहज करू शकतो.
08:04 टाईप करा "if" variable username equals variable db username AND variable password equals db password असल्यास हे बरोबर आहे असे म्हणू.
08:19 अन्यथा बरोबर नाही असे म्हणू.
08:22 हे कंस काढून टाकू. कारण येथे एकच ओळ आहे. "Incorrect password!" हे एको करू आणि हे तसेच ठेवू.
08:34 आणि येथे "You’re in!" एको करू.
08:41 पाठाचा हा भाग संपवण्यापूर्वी हे तपासू.
08:46 Alex आणि चुकीचा पासवर्ड टाईप केल्यावर "Incorrect password!" हा मेसेज मिळाला.
08:51 "abc" हा योग्य पासवर्ड दिल्यावर "You’re in!" मेसेज मिळाला.
08:55 युजरनेम आणि त्याची उपलब्धता तपासली आहे.
08:58 fields उपलब्ध असल्याचे तपासले आहे. युजरनेम आणि पासवर्ड एंटर करा.
09:04 जर हे चुकीचे एंटर केले तर "Incorrect password" हा मेसेज मिळेल.
09:11 बरोबर एंटर केल्यावर "You’re in" मेसेज मिळेल.
09:13 आणि जर उपलब्ध नसलेले युजरनेम एंटर केले तर user doesn’t exist असा एरर मेसेज मिळेल.
09:24 पुढील भागात sessions आणि log out page कसे बनवायचे ते बघू.
09:32 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana