Firefox/C2/Firefox-interface-and-toolbars/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:39, 11 July 2014 by Pratik kamble (Talk | contribs)
|
|
---|---|
00:00 | Firefoxच्या Interface and Toolbars वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:05 | यात आपण फायरफॉक्सच्या Interface आणि Toolbars बद्दल जाणून घेऊ. |
00:11 | आपण या ट्युटोरियलमध्ये Ubuntu Linux 10.04 वर Firefox 7.0 वापरणार आहोत. |
00:19 | आता फायरफॉक्सच्या इंटरफेसवर नजर टाकू. |
00:23 | अत्याधुनिक ब्राउजरची सर्व वैशिष्ट्ये फायरफॉक्स मध्ये आहेत. |
00:28 | Firefox प्रभावीपणे वापरण्यासाठी त्याची वैशिष्ट्ये माहित हवीत. |
00:34 | Firefox चा इंटरफेस सहा भागांत विभागला जाऊ शकतो. |
00:41 | Menu bar, Navigation toolbar, Bookmarks bar, Side bar, Status bar आणि Content area |
00:53 | या प्रत्येकाचे कार्य समजून घेऊ. |
00:57 | File मेनूवर क्लिक करून New Window वर क्लिक करा. |
01:01 | एक नवी विंडो उघडेल. |
01:05 | अनेकदा ब्राऊजरवरील छोटी अक्षरे वाचायला त्रास होतो. |
01:08 | पानाचा आकार वाढवण्यासाठी View मेनूमधे Zoomखालील Zoom in पर्याय निवडा. |
01:14 | किंवा Ctrl आणि + + चे चिन्ह दाबा. |
01:18 | यामुळे text चा आकार वाढेल. |
01:21 | Firefox चे version बघण्यासाठी Help मेनूतील About Firefox वर क्लिक करा. |
01:27 | डिफॉल्ट रूपात Firefox , homepage दर्शवते. |
01:32 | आवडीचे homepage सेट करण्यासाठी Edit मेनूतील Preferences वर क्लिक करा. |
01:39 | विंडोजसाठी Toolsखालील Options निवडा. |
01:42 | येथे General tab मधील homepage वर क्लिक करा. आणि ‘www.yahoo.com किंवा पसंतीचे वेब address टाईप करा. |
01:52 | आता खालच्या कोप-यातील Close button दाबून Firefox Preference window बंद करा. |
02:00 | वेबपेज मधील शब्द शोधण्यासाठी Edit मेनू वापरा. |
02:05 | address barवर ‘www.google.com’ टाईप करा. |
02:12 | Edit मधील Find वर जा. |
02:14 | ब्राऊजर विंडोच्या खाली एक छोटा टूल बार दिसेल. |
02:19 | त्यातील textboxमध्ये ‘Gujarati’ असे टाईप करा. |
02:23 | त्या पानावरील ‘Gujarati’हा शब्द highlight झालेला दिसेल. |
02:28 | मोठ्या मजकूरातील शब्द शोधण्यासाठी याचा उपयोग होतो. |
02:33 | आता हे बंद करू या. |
02:35 | Navigation toolbar च्या मदतीने आपल्याला इंटरनेटवर navigate करता येते. |
02:41 | Navigation bar ह्या मोठ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये वेबपेजचा address टाईप करता येतो. |
02:48 | याला URL किंवा Address bar ही म्हणतात. |
02:52 | URL barवर क्लिक करून तेथील Address डिलिट करा. |
02:57 | तेथे ‘www.google.com’ टाईप करा. |
03:02 | एंटर दाबा. |
03:03 | हे गुगलचे homepage आहे. |
03:06 | back arrow वर क्लिक करून आधीच्या पानावर परत जाता येते. |
03:12 | google वर परत जाण्यासाठी forward arrow वर क्लिक करा. |
03:17 | URL barच्या उजवीकडे घराच्या आकाराचा आयकॉन आहे. |
03:22 | ह्याच्या मदतीने चालू वेब पेजवरून डिफॉल्ट homepage वर जाता येते. |
03:28 | विशिष्ट वेब पेजवरून ब्राऊजिंगची सुरवात करण्यासाठी हे बटण उपयोगी पडते. |
03:34 | homepage बटणावर क्लिक करा. |
03:36 | आपण पूर्वीच homepage बदलून ते ‘www.yahoo.com’ केले होते. |
03:42 | यामुळे homepage बटण दाबल्यावर ब्राऊजर yahoo वर जाईल. |
03:49 | आता Bookmarks bar बघा. |
03:51 | Bookmarks चा उपयोग वारंवार लागणारी वेब पेजेस उघडण्यासाठी होतो. |
03:57 | URL barवर टाईप करा. ‘www.gmail.com’. |
04:03 | ते पान उघडल्यावर URL barच्या उजवीकडे असलेल्या चांदणीवर क्लिक करा. |
04:10 | ती चांदणी तुम्हाला पिवळ्या रंगाची झालेली दिसेल. |
04:13 | त्यावर पुन्हा क्लिक करा. |
04:14 | डायलॉग बॉक्स उघडेल. |
04:17 | ‘Folder’ फिल्डच्या drop down मधूनBookmarks टूलबार निवडा. |
04:23 | Gmail आता Bookmarks टूलबारवर समाविष्ट झाले आहे. |
04:28 | yahoo वर जाण्यासाठी homepageच्या आयकॉनवर क्लिक करा. |
04:33 | Gmailचा bookmark क्लिक करा. Gmail login page उघडले जाईल. |
04:39 | सतत लागणा-या परंतु homepage म्हणून नको असलेल्या साईटस् येथे Bookmark करता येतात. |
04:46 | आता Sidebar बद्दल जाणून घेऊ. |
04:49 | View मेनूतील Sidebar या पर्यायातील History निवडा. |
04:54 | डावीकडे आलेल्या बारमध्ये तीन पर्याय आहेत. Today, Yesterday, Older than 6 months. |
05:02 | दाखवले गेलेले पर्याय हे फायरफॉक्सच्या आधीच्या वापरावर अवलंबून असतात. |
05:09 | मेनू उघण्यासाठी Today च्या पुढील + च्या चिन्हावर क्लिक करा. |
05:15 | येथील गुगलच्या लिंकवर क्लिक करा. |
05:19 | बघा आपण आधी उघडलेल्या साईट पुन्हा उघडणे किती सोपे आहे! |
05:25 | Sidebar वर स्वतःचे असे सर्च फंक्शन आहे. |
05:29 | शोध घ्यायच्या साईटचे नाव सर्च बॉक्समध्ये टाईप केल्यास, |
05:34 | ते history मध्ये ती साईट शोधेल. |
05:37 | येथे गुगल टाईप करा. |
05:39 | पहिला रिझल्ट, गुगलचा होमपेज address दिसेल. |
05:43 | साईडबार बंद करण्यासाठी उजवीकडील कोप-यातील फुलीवर क्लिक करा. |
05:51 | पुढे Status bar काय करतो ते पाहू. |
05:55 | तुम्ही उघडत असलेल्या साईटची स्थिती खालील भागातील Status barदर्शवतो. |
06:02 | URL barवर जाऊनwww.wired.com टाईप करा आणि एंटर दाबा. |
06:10 | लगेच Status bar कडे बघितल्यास वेबपेज उघडण्याची स्थिती दिसेल. |
06:16 | Status bar मुळे साईट न उघडण्याचे कारण किंवा उघडण्यात लागणा-या वेळाचा अंदाज येतो. |
06:25 | आता शेवटी Content area बघू या. |
06:28 | उघडत असलेल्या वेब पेजमधला मजकूर येथे वाचू शकतो. |
06:33 | हा पाठ येथे संपला. |
06:35 | ट्युटोरियलमध्ये आपण फायरफॉक्सच्या Interface आणि Toolbars याबद्दल शिकलो. |
06:43 | COMPREHENSIVE ASSIGNMENT |
06:46 | तुमचे होमपेज बदलून ते www.spoken-tutorial.org करा आणि ते उघडा. |
06:54 | मग ब्राऊजरच्या History च्या सहाय्याने yahoo च्या वेबसाईटवर जा. |
07:00 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
07:05 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07:07 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07:12 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
07:17 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
07:21 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
07:27 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07:31 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे. |
07:39 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
07:50 | ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |