Netbeans/C2/Developing-a-Sample-Web-Application/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
---|---|
00.01 | नमस्कार. |
00.02 | नेटबीन्स IDE वरील इंट्रोडक्शन टु डेव्हलपिंग वेब ऍप्लिकेशन्सच्या पाठात स्वागत. |
00.08 | आपल्याला नेटबीन्सचे प्राथमिक ज्ञान आहे असे समजू. |
00.12 | नसल्यास नेटबीन्स वरील संबंधित पाठ पाहण्यासाठी स्पोकन ट्युटोरियल वेबसाईटला भेट द्या. |
00.19 | पहिला पाठ तुम्ही पाहिलेला असेल तर, |
00.22 | नेटबीन्सच्या इन्स्टॉलेशन आणि इंटरफेसशी परिचित असाल. |
00.25 | मागील पाठात नवे प्रोजेक्ट बनवण्याचे जाणून घेतले. |
00.29 | ह्या पाठासाठी उबंटु लिनक्स v11.04 ऑपरेटिंग सिस्टीम आणि नेटबीन्स IDE v7.1.1 वापरू. |
00.40 | हा पाठ नेटबीन्सद्वारे वेब ऍप्लिकेशन बनवण्यासंबंधीची ओळख करून देईल. |
00.45 | आपण बघू, |
00.46 | वेब ऍप्लिकेशन प्रोजेक्ट सेट अप करणे. |
00.49 | त्याच्या सोर्स फाईल्स बनवणे व एडिट करणे. |
00.52 | जावा पॅकेज आणि जावा सोर्स फाईल बनवणे. |
00.56 | गेटर आणि सेटर मेथडस बनवणे. |
00.59 | डिफॉल्ट जावा सर्व्हर पेजेस फाईल एडिट करणे. |
01.02 | जावा सर्व्हर पेजेस फाईल बनवणे. |
01.05 | आणि शेवटी वेब ऍप्लिकेशन प्रोजेक्ट कार्यान्वित करणे. |
01.08 | हा पाठ समजून घेण्यासाठी आवश्यक आहेः नेटबीन्स IDE, |
01.13 | जावा डेव्हलपमेंट कीट (JDK) वर्जन 6, |
01.17 | GlassFish(ग्लासफिश) सर्व्हरची मुक्त आवृत्ती. |
01.20 | स्क्रीनवरील लिंकवरून वरील सर्व गोष्टी एकत्रितपणे डाऊनलोड करता येतात. |
01.26 | हा पाठ तुम्हाला शिकवेल - सोपे वेब ऍप्लिकेशन बनवणे, |
01.30 | ते सर्व्हरवर ठेवणे, |
01.32 | आणि त्याचे प्रेझेंटेशन ब्राऊजरमधे बघणे |
01.35 | या ऍप्लिकेशनमधे जावा सर्व्हर पेजेस(JSP) द्वारे तुमचे नाव टाईप करण्यास सांगितले जाईल. |
01.42 | जावा बीन्सचे घटक वापरून HTTP सेशनमधे हे नाव संचित राहिल, |
01.48 | आणि नंतर परत मिळवून दुस-या JSP पेजवर आऊटपुट दिसेल. |
01.51 | नेटबीन्सवर जाऊन वेब ऍप्लिकेशन प्रोजेक्ट बनवूया. |
01.58 | File (फाईल) मेनूतून New Project(न्यू प्रोजेक्ट) निवडा. |
02.01 | Categories (कॅटगरीज) खालील Java Web (जावा वेब) सिलेक्ट करा. |
02.04 | Projects (प्रोजेक्टस) खालील Web Application (वेब ऍप्लिकेशन) सिलेक्ट करून Next (नेक्स्ट) क्लिक करा. |
02.09 | प्रोजेक्टला नाव द्या. आपण HelloWeb ('हॅलो वेब') नाव देऊ. |
02.15 | प्रोजेक्ट लोकेशनमधे संगणकावरील योग्य डिरेक्टरी निवडा. |
02.20 | Next (नेक्स्ट) क्लिक करा. |
02.22 | सर्व्हर आणि सेटींग्ज पॅनेल उघडेल. |
02.25 | ऍप्लिकेशन साठी जावाचे जे व्हर्जन वापरायचे आहे ते निवडा. |
02.29 | ऍप्लिकेशन ठेवण्यासाठी योग्य सर्व्हर निवडा. |
02.34 | Next (नेक्स्ट) क्लिक करा. |
02.36 | Frameworks (फ्रेमवर्क्स) पॅनेलमधे, |
02.38 | प्रोजेक्ट बनवण्यासाठी Finish (फिनिश) क्लिक करा. |
02.41 | IDE हॅलो वेब प्रोजेक्ट फोल्डर बनवेल. |
02.46 | यामधे सर्व सोर्सेस आणि प्रोजेक्ट मेटाडाटा यांचा समावेश आहे. |
02.51 | मुख्य विंडोच्या सोर्स एडिटरमधे 'index.jsp हे वेलकम पेज उघडेल. |
02.57 | येथे डावीकडे फाईल्स विंडोमधे तुम्हाला प्रोजेक्टचे फाईल स्ट्रक्चर दिसू शकेल. |
03.05 | आणि त्याचे लॉजिकल स्ट्रक्चर प्रोजेक्ट विंडोमधे दिसेल. |
03.10 | IDE चे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे सोर्स फाईल्स बनवणे आणि एडिट करणे. |
03.15 | आता Projects (प्रोजेक्टस) विंडोमधील Source Packages (सोर्स पॅकेजेस) नोड एक्सपांड करा. |
03.20 | सोर्स पॅकेजेस नोडमधे केवळ रिकामे डिफॉल्ट पॅकेज नोड आहे हे लक्षात घ्या. |
03.25 | Source Packages (सोर्स पॅकेजेसवर) राईट क्लिक करा आणि New(न्यू) मधील Java Class(जावा क्लास) निवडा. |
03.32 | आपण क्लासला NameHandler(नेम हॅंड्लर ) नाव देऊ. |
03.40 | आणि Package (पॅकेज) काँबो बॉक्समधे टाईप करा org.mypackage.hello |
03.54 | Finish (फिनिश) वर क्लिक करा. |
03.57 | NameHandler.java(नेम हॅंड्लर जावा) फाईल सोर्स एडिटरमधे उघडेल. |
04.01 | आता घोषित केलेल्या क्लासखाली स्ट्रिंग व्हेरिएबल घोषित करणार आहोत. |
04.07 | name(नेम) हे स्ट्रिंग व्हेरिएबल घोषित करू. |
04.12 | तसेच क्लासमधे public NameHandler(पब्लिक नेम हॅंड्लर) हा कन्स्ट्रक्टर समाविष्ट करू. |
04.23 | आता कन्स्ट्रक्टर मधे name = null समाविष्ट करू. |
04.30 | आता Getter(गेटटर) आणि Setter(सेटर) मेथडस बनवू. |
04.33 | Source Editor (सोर्स एडिटर) मधील name(नेम) फिल्डवर राईट क्लिक करून उघडलेल्या काँटेक्स्च्युअल मेनूतीलRefactor(रीफॅक्टर ) मधील Encapsulate Fields(एनकॅप्सुलेट फील्ड्स) सिलेक्ट करा. |
04.46 | Refactoring(रीफॅक्टरिंग) हे प्रोग्रॅमचा दृश्य परिणाम न बदलता स्ट्रक्चर सुधारण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रशुध्द तंत्र आहे. |
04.56 | थोडक्यात प्रोग्रॅमचे कार्य न बदलता त्याचे स्ट्रक्चर सुधारता येते. |
05.01 | Refactoring(रीफॅक्टरिंग) वापरून फिल्डस, मेथडस आणि क्लासेस त्यांची मोडतोड न करता हलवू शकता. |
05.08 | IDE वर परत जाऊ. |
05.11 | name फिल्ड असलेला Encapsulate Fields(एनकॅप्सुलेट फील्ड्स) चा डायलॉग बॉक्स उघडेल. |
05.16 | Fields( फील्ड्स) ची विजीबलिटी प्रायव्हेट आणि |
05.20 | Accessors(अक्सेसर्स ) विजीबलिटी public(पब्लिक) वर डिफॉल्ट रूपात सेट आहे. |
05.24 | ज्यात क्लास व्हेरिएबलचा ऍक्सेस मॉडिफायर private(प्राइवेट) असल्याचे दिसते. |
05.30 | मात्र getter(गेटटर) आणि setter(सेटर) मेथडस public(पब्लिक) मॉडिफायरने बनवल्या जातात. |
05.36 | Refactor(रीफॅक्टर ) वर क्लिक करा. |
05.39 | नेम फिल्डसाठी Getter(गेटटर) आणि Setter(सेटर) मेथडस बनल्या आहेत. |
05.46 | क्लास व्हेरिएबलचा ऍक्सेस मॉडिफायर private असेल तर getter आणि setter मेथडस public मॉडिफायरने बनवल्या जातात. |
05.56 | जावा क्लास शेवटी असा दिसला पाहिजे. |
05.59 | पुढे Default JavaServer Pages ही फाईल एडिट करू. |
06.04 | सोर्स एडिटरवरील वरच्या बाजूच्या टॅबमधील index.jsp फाईलवर क्लिक करा. |
06.11 | आता पॅलेट मॅनेजर उघडण्यासाठी टूल्स मेनूतील पॅलेटवर क्लिक करून HTML/JSP code clips वर क्लिक करा. |
06.21 | Palatte manager (पॅलेट मॅनेजर) उघडेल. |
06.26 | पॅलेट मॅनेजर मधे HTML forms(एचटीएमल फॉर्मस पर्याय एक्सपांड करा. |
06.31 | Form (फॉर्म) आयटम सिलेक्ट करा. |
06.34 | सोर्स एडिटरमधे h1 टॅग्ज नंतर लगेच तो आयटम ड्रॅग करून ड्रॉप करा. |
06.42 | Insert form (इन्सर्ट फॉर्म) डायलॉग बॉक्स उघडेल . |
06.45 | स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे व्हॅल्यूज द्या. |
06.49 | Action (ऍक्शन मधे) response.jsp |
06.54 | Method (मेथड मधे) GET |
06.56 | आणि फॉर्मला Name input form(नेम इनपुट फॉर्म) नाव द्या. |
07.04 | OK क्लिक करा. |
07.07 | index.jsp फाईलमधे HTML फॉर्म समाविष्ट झाला आहे. |
07.13 | आता पॅलेट मॅनेजरमधून Text Input (टेक्स्ट इनपुट) आयटम सिलेक्ट करा. ड्रॅग करून फॉर्म टॅग संपण्याआधीच्या बिंदूवर ड्रॉप करा. |
07.25 | Insert text input (इन्सर्ट टेक्स्ट इनपुट) डायलॉग बॉक्समधे नेमसाठी Name टाईप करा. |
07.32 | टेक्स्ट टाईप तसाच ठेवा. |
07.34 | OK वर क्लिक करा. |
07.36 | फॉर्म टॅग्जमधे HTML इनपुट टॅग समाविष्ट झाले आहेत. |
07.41 | इनपुट टॅग मधील रिकाम्या असलेल्या ऍट्रीब्यूटच्या व्हॅल्यू डिलिट करू. |
07.49 | आता पॅलेटमधून Button (बटण) आयटम सिलेक्ट करून, |
07.53 | ड्रॅग करून फॉर्म टॅग संपण्याआधीच्या बिंदूवर ड्रॉप करा. |
07.58 | लेबलसमोर OK टाईप करा. |
08.00 | submit(सबमिट) Type (टाईप) निवडून |
08.03 | पुन्हा OK वर क्लिक करा. |
08.05 | फॉर्म टॅग्जमधे HTML बटण समाविष्ट झाले आहे. |
08.12 | पहिल्या इनपुट टॅगच्या आधी Enter your Name हे टेक्स्ट टाईप करा. |
08.22 | आता h1 टॅग्जमधील डिफॉल्ट टेक्स्ट मधे बदल करू. |
08.28 | ते टेक्स्ट बदलून Entry form(एंट्री फॉर्म) करू. |
08.34 | आता राईट क्लिक करून पॅलेट मॅनेजर बंद करू. |
08.38 | सोर्स एडिटरवर राईट क्लिक करा. |
08.41 | कोड नीटनेटका दिसण्यासाठी format(फॉरमॅट) पर्याय सिलेक्ट करा. |
08.46 | index.jsp फाईल अशी दिसली पाहिजे. |
08.49 | आता जावा सर्व्हर पेजेस फाईल बनवू. |
08.53 | प्रोजेक्ट विंडोमधे HelloWeb प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करून New(न्यू) मधील JSP सिलेक्ट करा. |
09.01 | New JSP फाईल विझार्ड उघडेल. |
09.05 | फाईलला response(रेस्पॉन्स) नाव देऊन Finish(फिनिश) क्लिक करा. |
09.14 | प्रोजेक्ट विंडोमधे index.jsp फाईलच्या खाली response.jsp हा फाईल नोड, |
09.23 | आणि सोर्स एडिटरमधे नवी फाईल उघडलेली दिसेल. |
09.26 | पुन्हा (Palette manager) पॅलेट मॅनेजर उघडा. |
09.35 | JSP पर्याय एक्सपांड करा. |
09.39 | Use Bean आयटम सिलेक्ट आणि ड्रॅग करून बॉडी टॅगच्या लगेच खाली ड्रॉप करा. |
09.53 | Insert Use Bean(इनसर्ट यूस बीन) डायलॉग बॉक्स उघडेल. |
09.56 | अशाप्रकारे व्हॅल्यूज देऊ. |
09.58 | ID मधे mybean |
10.01 | Class मधे org.mypackage.hello.NameHandler |
10.13 | Scope मधे session सेट करून |
10.15 | OK क्लिक करा. |
10.18 | jsp:useBean टॅग बॉडी टॅगच्या खाली समाविष्ट झालेला दिसेल. |
10.30 | JavaBeans(जावाबिन्स) हे जावासाठी पुन्हा-पुन्हा वापरता येणारे सॉफ्टवेअर कॉम्पोनंट आहे. |
10.34 | त्यांचा उपयोग अनेक ऑब्जेक्टस एकत्र करून एक ऑब्जेक्ट बनवण्यासाठी होतो. |
10.38 | ज्याद्वारे अनेक वेगवेगळ्या ऑब्जेक्टच्या ऐवजी एक बीन ऑब्जेक्ट म्हणून ते इकडून तिकडे पाठवता येते. |
10.46 | आता पॅलेट मॅनेजरमधील Set Bean Property(सेट बीन प्रॉपर्टी) आयटम सिलेक्ट करून ते h1 टॅग्जच्या आधी ड्रॅग करून ड्रॉप करा. |
11.03 | OK क्लिक करा. |
11.12 | येथे jsp:setProperty टॅगमधील रिकाम्या असलेल्या ऍट्रीब्यूट व्हॅल्यू डिलिट करा. |
11.21 | आणि name ऍट्रीब्यूट मधे mybean आणि प्रॉपर्टीमधे name सेट करा. |
11.30 | आता h1 टॅग्जमधील टेक्स्ट बदलून Hello कॉमा स्पेस आणि उद्गारचिन्ह टाईप करा. |
11.40 | आता पॅलेट मॅनेजरमधील Get Bean हा प्रॉपर्टी आयटम निवडून तो ड्रॅग करा. आणि h1 टॅग्ज मधील Hello text नंतर ड्रॉप करा. |
11.51 | Get Bean प्रॉपर्टी आयटममधे, |
11.53 | Bean Name मधे mybean |
11.57 | आणि Property Name मधे name सेट करा. |
11.59 | OK क्लिक करा. |
12.01 | आता jsp:getProperty टॅग h1 टॅग्जमधे समाविष्ट झाला आहे. |
12.07 | गरजेनुसार कोड नीट दिसण्यासाठी सोर्स एडिटरवर राईट क्लिक करून फॉरमॅटवर क्लिक करा. |
12.16 | आता वेब ऍप्लीकेशन प्रोजेक्ट कार्यान्वित करू. |
12.20 | पॅलेट मॅनेजर बंद करू. |
12.26 | प्रोजेक्ट विंडोमधे Hello Web(हेलो वेब) ह्या प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करून run हा पर्याय निवडा. |
12.32 | टूलबारवरील run पर्यायावरही क्लिक करू शकतो. किंवा प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यासाठी कीबोर्डवरील F6 हे बटण दाबू शकतो. |
12.41 | टूलबारवरील बटणावर क्लिक करू. |
12.44 | वेब ऍप्लीकेशन कार्यान्वित केल्यावर IDE बनेल आणि ऍप्लीकेशन कोड कंपाईल होईल. |
12.53 | सर्व्हर सुरू करून त्यावर ऍप्लीकेशन ठेवले जाईल. |
12.58 | आणि शेवटी ब्राऊजर विंडोमधे ऍप्लीकेशन दाखवले जाईल. |
13.02 | ही प्रक्रिया बघण्यासाठी विंडो मेनूमधील output (आऊटपुट) पर्याय सिलेक्ट करून आऊटपुट विंडो उघडू शकता. |
13.10 | ऍप्लीकेशन यशस्वीरित्या तयार झाल्याचे दिसेल. |
13.17 | तुमच्या डिफॉल्ट ब्राऊजरवर index.jsp पेज उघडेल. |
13.23 | पुन्हा प्रोजेक्ट कार्यान्वित करू. |
13.27 | हे आपल्या डिफॉल्ट ब्राऊजरमधे उघडले आहे. |
13.32 | लक्षात घ्या की कधीकधी IDE द्वारे सर्व्हर आऊटपुट दाखवला जाण्यापूर्वीच ब्राऊजर विंडो उघडली जाईल. |
13.38 | ब्राऊजरमधील टेक्स्ट बॉक्समधे नाव टाईप करू. |
13.42 | उदाहरणार्थ उबंटु आणि Ok क्लिक करा. |
13.46 | response.jsp पेज दाखवले जाईल. ज्यात आपल्याला ग्रीटिंग दिसेल. |
13.52 | आता असाईनमेंट. |
13.56 | वेब ऍप्लीकेशन प्रोजेक्टमधे आणखी दोन टेक्स्ट फिल्डस समाविष्ट करा म्हणजे तुमच्या ऍप्लीकेशनमधे एकूण तीन टेक्स्ट इनपुट फिल्डस होतील. |
14.06 | Bean Property(बीन प्रॉपर्टी) सेट करण्यासाठी जावा बीन्स कॉम्पोनंट वापरा. |
14.09 | ब्राऊजरमधे त्याचे प्रेझेंटेशन बघा. |
14.12 | आणि शेवटी आऊटपुट दुस-या JSP पेजवर मिळवा. |
14.17 | आपण ही असाईनमेंट आधीच बनवली आहे. |
14.21 | असाईनमेंट उघडून ती IDE मधे कार्यान्वित करू. |
14.30 | आपल्याला 3 इनपुट टेक्स्ट फिल्डस दिसत आहेत. |
14.35 | त्यात योग्य माहिती टाईप करून Ok क्लिक करा. |
14.42 | आपल्याला अशाप्रकारचे आऊटपुट मिळायला हवे. |
14.47 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
14.51 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
14.54 | जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
14.59 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
15.05 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
15.09 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
15.16 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
15.21 | यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. |
15.28 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
15.40 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
15.43 | सहभागासाठी धन्यवाद . |