Netbeans/C2/Developing-a-Sample-Web-Application/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार,नेटबीन्स IDE वरील इंट्रोडक्शन टु डेव्हलपिंग वेब ऍप्लिकेशन्सच्या पाठात स्वागत.
00:08 आपल्याला नेटबीन्सचे प्राथमिक ज्ञान आहे असे समजू.
00:12 नसल्यास नेटबीन्स वरील संबंधित पाठ पाहण्यासाठी स्पोकन ट्युटोरियल वेबसाईटला भेट द्या.
00:19 पहिला पाठ तुम्ही पाहिलेला असेल तर,
00:22 नेटबीन्सच्या इन्स्टॉलेशन आणि इंटरफेसशी परिचित असाल.
00:25 मागील पाठात नवे प्रोजेक्ट बनवण्याचे जाणून घेतले.
00:29 ह्या पाठासाठी उबंटु लिनक्स v11.04 ऑपरेटिंग सिस्टीम आणि नेटबीन्स IDE v7.1.1 वापरू.
00:40 हा पाठ नेटबीन्सद्वारे वेब ऍप्लिकेशन बनवण्यासंबंधीची ओळख करून देईल.
00:45 आपण बघू,वेब ऍप्लिकेशन प्रोजेक्ट सेट अप करणे.
00:49 त्याच्या सोर्स फाईल्स बनवणे व एडिट करणे.
00:52 जावा पॅकेज आणि जावा सोर्स फाईल बनवणे.
00:56 गेटर आणि सेटर मेथडस बनवणे.
00:59 डिफॉल्ट जावा सर्व्हर पेजेस फाईल एडिट करणे.
01:02 जावा सर्व्हर पेजेस फाईल बनवणे.
01:05 आणि शेवटी वेब ऍप्लिकेशन प्रोजेक्ट कार्यान्वित करणे.
01:08 हा पाठ समजून घेण्यासाठी आवश्यक आहेः नेटबीन्स IDE,
01:13 जावा डेव्हलपमेंट कीट (JDK) वर्जन 6,
01:17 GlassFish(ग्लासफिश) सर्व्हरची मुक्त आवृत्ती.
01:20 स्क्रीनवरील लिंकवरून वरील सर्व गोष्टी एकत्रितपणे डाऊनलोड करता येतात.
01:26 हा पाठ तुम्हाला शिकवेल - सोपे वेब ऍप्लिकेशन बनवणे,
01:30 ते सर्व्हरवर ठेवणे,
01:32 आणि त्याचे प्रेझेंटेशन ब्राऊजरमधे बघणे
01:35 या ऍप्लिकेशनमधे जावा सर्व्हर पेजेस(JSP) द्वारे तुमचे नाव टाईप करण्यास सांगितले जाईल.
01:42 जावा बीन्सचे घटक वापरून HTTP सेशनमधे हे नाव संचित राहिल,
01:48 आणि नंतर परत मिळवून दुस-या JSP पेजवर आऊटपुट दिसेल.
01:51 नेटबीन्सवर जाऊन वेब ऍप्लिकेशन प्रोजेक्ट बनवूया.
01:58 File (फाईल) मेनूतून New Project(न्यू प्रोजेक्ट) निवडा.
02:01 Categories (कॅटगरीज) खालील Java Web (जावा वेब) सिलेक्ट करा.
02:04 Projects (प्रोजेक्टस) खालील Web Application (वेब ऍप्लिकेशन) सिलेक्ट करून Next (नेक्स्ट) क्लिक करा.
02:09 प्रोजेक्टला नाव द्या. आपण HelloWeb ('हॅलो वेब') नाव देऊ.
02:15 प्रोजेक्ट लोकेशनमधे संगणकावरील योग्य डिरेक्टरी निवडा.
02:20 Next (नेक्स्ट) क्लिक करा.
02:22 सर्व्हर आणि सेटींग्ज पॅनेल उघडेल.
02:25 ऍप्लिकेशन साठी जावाचे जे व्हर्जन वापरायचे आहे ते निवडा.
02:29 ऍप्लिकेशन ठेवण्यासाठी योग्य सर्व्हर निवडा.
02:34 Next (नेक्स्ट) क्लिक करा.
02:36 Frameworks (फ्रेमवर्क्स) पॅनेलमधे,
02:38 प्रोजेक्ट बनवण्यासाठी Finish (फिनिश) क्लिक करा.
02:41 IDE हॅलो वेब प्रोजेक्ट फोल्डर बनवेल.
02:46 यामधे सर्व सोर्सेस आणि प्रोजेक्ट मेटाडाटा यांचा समावेश आहे.
02:51 मुख्य विंडोच्या सोर्स एडिटरमधे 'index.jsp हे वेलकम पेज उघडेल.
02:57 येथे डावीकडे फाईल्स विंडोमधे तुम्हाला प्रोजेक्टचे फाईल स्ट्रक्चर दिसू शकेल.
03:05 आणि त्याचे लॉजिकल स्ट्रक्चर प्रोजेक्ट विंडोमधे दिसेल.
03:10 IDE चे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे सोर्स फाईल्स बनवणे आणि एडिट करणे.
03:15 आता Projects (प्रोजेक्टस) विंडोमधील Source Packages (सोर्स पॅकेजेस) नोड एक्सपांड करा.
03:20 सोर्स पॅकेजेस नोडमधे केवळ रिकामे डिफॉल्ट पॅकेज नोड आहे हे लक्षात घ्या.
03:25 Source Packages (सोर्स पॅकेजेसवर) राईट क्लिक करा आणि New(न्यू) मधील Java Class(जावा क्लास) निवडा.
03:32 आपण क्लासला NameHandler(नेम हॅंड्लर ) नाव देऊ.
03:40 आणि Package (पॅकेज) काँबो बॉक्समधे टाईप करा org.mypackage.hello
03:54 Finish (फिनिश) वर क्लिक करा.
03:57 NameHandler.java(नेम हॅंड्लर जावा) फाईल सोर्स एडिटरमधे उघडेल.
04:01 आता घोषित केलेल्या क्लासखाली स्ट्रिंग व्हेरिएबल घोषित करणार आहोत.
04:07 name(नेम) हे स्ट्रिंग व्हेरिएबल घोषित करू.
04:12 तसेच क्लासमधे public NameHandler(पब्लिक नेम हॅंड्लर) हा कन्स्ट्रक्टर समाविष्ट करू.
04:23 आता कन्स्ट्रक्टर मधे name = null समाविष्ट करू.
04:30 आता Getter(गेटटर) आणि Setter(सेटर) मेथडस बनवू.
04:33 Source Editor (सोर्स एडिटर) मधील name(नेम) फिल्डवर राईट क्लिक करून उघडलेल्या काँटेक्स्च्युअल मेनूतीलRefactor(रीफॅक्टर ) मधील Encapsulate Fields(एनकॅप्सुलेट फील्ड्स) सिलेक्ट करा.
04:46 Refactoring(रीफॅक्टरिंग) हे प्रोग्रॅमचा दृश्य परिणाम न बदलता स्ट्रक्चर सुधारण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रशुध्द तंत्र आहे.
04:56 थोडक्यात प्रोग्रॅमचे कार्य न बदलता त्याचे स्ट्रक्चर सुधारता येते.
05:01 Refactoring(रीफॅक्टरिंग) वापरून फिल्डस, मेथडस आणि क्लासेस त्यांची मोडतोड न करता हलवू शकता.
05:08 IDE वर परत जाऊ.
05:11 name फिल्ड असलेला Encapsulate Fields(एनकॅप्सुलेट फील्ड्स) चा डायलॉग बॉक्स उघडेल.
05:16 Fields( फील्ड्स) ची विजीबलिटी प्रायव्हेट आणि
05:20 Accessors(अक्सेसर्स ) विजीबलिटी public(पब्लिक) वर डिफॉल्ट रूपात सेट आहे.
05:24 ज्यात क्लास व्हेरिएबलचा ऍक्सेस मॉडिफायर private(प्राइवेट) असल्याचे दिसते.
05:30 मात्र getter(गेटटर) आणि setter(सेटर) मेथडस public(पब्लिक) मॉडिफायरने बनवल्या जातात.
05:36 Refactor(रीफॅक्टर ) वर क्लिक करा.
05:39 नेम फिल्डसाठी Getter(गेटटर) आणि Setter(सेटर) मेथडस बनल्या आहेत.
05:46 क्लास व्हेरिएबलचा ऍक्सेस मॉडिफायर private असेल तर getter आणि setter मेथडस public मॉडिफायरने बनवल्या जातात.
05:56 जावा क्लास शेवटी असा दिसला पाहिजे.
05:59 पुढे Default JavaServer Pages ही फाईल एडिट करू.
06:04 सोर्स एडिटरवरील वरच्या बाजूच्या टॅबमधील index.jsp फाईलवर क्लिक करा.
06:11 आता पॅलेट मॅनेजर उघडण्यासाठी टूल्स मेनूतील पॅलेटवर क्लिक करून HTML/JSP code clips वर क्लिक करा.
06:21 Palatte manager (पॅलेट मॅनेजर) उघडेल.
06:26 पॅलेट मॅनेजर मधे HTML forms(एचटीएमल फॉर्मस पर्याय एक्सपांड करा.
06:31 Form (फॉर्म) आयटम सिलेक्ट करा.
06:34 सोर्स एडिटरमधे h1 टॅग्ज नंतर लगेच तो आयटम ड्रॅग करून ड्रॉप करा.
06:42 Insert form (इन्सर्ट फॉर्म) डायलॉग बॉक्स उघडेल .
06:45 स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे व्हॅल्यूज द्या.
06:49 Action (ऍक्शन मधे) response.jsp
06:54 Method (मेथड मधे) GET
06:56 आणि फॉर्मला Name input form(नेम इनपुट फॉर्म) नाव द्या.
07:04 OK क्लिक करा.
07:07 index.jsp फाईलमधे HTML फॉर्म समाविष्ट झाला आहे.
07:13 आता पॅलेट मॅनेजरमधून Text Input (टेक्स्ट इनपुट) आयटम सिलेक्ट करा. ड्रॅग करून फॉर्म टॅग संपण्याआधीच्या बिंदूवर ड्रॉप करा.
07:25 Insert text input (इन्सर्ट टेक्स्ट इनपुट) डायलॉग बॉक्समधे नेमसाठी Name टाईप करा.
07:32 टेक्स्ट टाईप तसाच ठेवा.
07:34 OK वर क्लिक करा.
07:36 फॉर्म टॅग्जमधे HTML इनपुट टॅग समाविष्ट झाले आहेत.
07:41 इनपुट टॅग मधील रिकाम्या असलेल्या ऍट्रीब्यूटच्या व्हॅल्यू डिलिट करू.
07:49 आता पॅलेटमधून Button (बटण) आयटम सिलेक्ट करून,
07:53 ड्रॅग करून फॉर्म टॅग संपण्याआधीच्या बिंदूवर ड्रॉप करा.
07:58 लेबलसमोर OK टाईप करा.
08:00 submit(सबमिट) Type (टाईप) निवडून
08:03 पुन्हा OK वर क्लिक करा.
08:05 फॉर्म टॅग्जमधे HTML बटण समाविष्ट झाले आहे.
08:12 पहिल्या इनपुट टॅगच्या आधी Enter your Name हे टेक्स्ट टाईप करा.
08:22 आता h1 टॅग्जमधील डिफॉल्ट टेक्स्ट मधे बदल करू.
08:28 ते टेक्स्ट बदलून Entry form(एंट्री फॉर्म) करू.
08:34 आता राईट क्लिक करून पॅलेट मॅनेजर बंद करू.
08:38 सोर्स एडिटरवर राईट क्लिक करा.
08:41 कोड नीटनेटका दिसण्यासाठी format(फॉरमॅट) पर्याय सिलेक्ट करा.
08:46 index.jsp फाईल अशी दिसली पाहिजे.
08:49 आता जावा सर्व्हर पेजेस फाईल बनवू.
08:53 प्रोजेक्ट विंडोमधे HelloWeb प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करून New(न्यू) मधील JSP सिलेक्ट करा.
09:01 New JSP फाईल विझार्ड उघडेल.
09:05 फाईलला response(रेस्पॉन्स) नाव देऊन Finish(फिनिश) क्लिक करा.
09:14 प्रोजेक्ट विंडोमधे index.jsp फाईलच्या खाली response.jsp हा फाईल नोड,
09:23 आणि सोर्स एडिटरमधे नवी फाईल उघडलेली दिसेल.
09:26 पुन्हा (Palette manager) पॅलेट मॅनेजर उघडा.
09:35 JSP पर्याय एक्सपांड करा.
09:39 Use Bean आयटम सिलेक्ट आणि ड्रॅग करून बॉडी टॅगच्या लगेच खाली ड्रॉप करा.
09:53 Insert Use Bean(इनसर्ट यूस बीन) डायलॉग बॉक्स उघडेल.
09:56 अशाप्रकारे व्हॅल्यूज देऊ.
09:58 ID मधे mybean
10:01 Class मधे org.mypackage.hello.NameHandler
10:13 Scope मधे session सेट करून
10:15 OK क्लिक करा.
10:18 jsp:useBean टॅग बॉडी टॅगच्या खाली समाविष्ट झालेला दिसेल.
10:30 JavaBeans(जावाबिन्स) हे जावासाठी पुन्हा-पुन्हा वापरता येणारे सॉफ्टवेअर कॉम्पोनंट आहे.
10:34 त्यांचा उपयोग अनेक ऑब्जेक्टस एकत्र करून एक ऑब्जेक्ट बनवण्यासाठी होतो.
10:38 ज्याद्वारे अनेक वेगवेगळ्या ऑब्जेक्टच्या ऐवजी एक बीन ऑब्जेक्ट म्हणून ते इकडून तिकडे पाठवता येते.
10:46 आता पॅलेट मॅनेजरमधील Set Bean Property(सेट बीन प्रॉपर्टी) आयटम सिलेक्ट करून ते h1 टॅग्जच्या आधी ड्रॅग करून ड्रॉप करा.
11:03 OK क्लिक करा.
11:12 येथे jsp:setProperty टॅगमधील रिकाम्या असलेल्या ऍट्रीब्यूट व्हॅल्यू डिलिट करा.
11:21 आणि name ऍट्रीब्यूट मधे mybean आणि प्रॉपर्टीमधे name सेट करा.
11:30 आता h1 टॅग्जमधील टेक्स्ट बदलून Hello कॉमा स्पेस आणि उद्गारचिन्ह टाईप करा.
11:40 आता पॅलेट मॅनेजरमधील Get Bean हा प्रॉपर्टी आयटम निवडून तो ड्रॅग करा. आणि h1 टॅग्ज मधील Hello text नंतर ड्रॉप करा.
11:51 Get Bean प्रॉपर्टी आयटममधे,
11:53 Bean Name मधे mybean
11:57 आणि Property Name मधे name सेट करा.
11:59 OK क्लिक करा.
12:01 आता jsp:getProperty टॅग h1 टॅग्जमधे समाविष्ट झाला आहे.
12:07 गरजेनुसार कोड नीट दिसण्यासाठी सोर्स एडिटरवर राईट क्लिक करून फॉरमॅटवर क्लिक करा.
12:16 आता वेब ऍप्लीकेशन प्रोजेक्ट कार्यान्वित करू.
12:20 पॅलेट मॅनेजर बंद करू.
12:26 प्रोजेक्ट विंडोमधे Hello Web(हेलो वेब) ह्या प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करून run हा पर्याय निवडा.
12:32 टूलबारवरील run पर्यायावरही क्लिक करू शकतो. किंवा प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यासाठी कीबोर्डवरील F6 हे बटण दाबू शकतो.
12:41 टूलबारवरील बटणावर क्लिक करू.
12:44 वेब ऍप्लीकेशन कार्यान्वित केल्यावर IDE बनेल आणि ऍप्लीकेशन कोड कंपाईल होईल.
12:53 सर्व्हर सुरू करून त्यावर ऍप्लीकेशन ठेवले जाईल.
12:58 आणि शेवटी ब्राऊजर विंडोमधे ऍप्लीकेशन दाखवले जाईल.
13:02 ही प्रक्रिया बघण्यासाठी विंडो मेनूमधील output (आऊटपुट) पर्याय सिलेक्ट करून आऊटपुट विंडो उघडू शकता.
13:10 ऍप्लीकेशन यशस्वीरित्या तयार झाल्याचे दिसेल.
13:17 तुमच्या डिफॉल्ट ब्राऊजरवर index.jsp पेज उघडेल.
13:23 पुन्हा प्रोजेक्ट कार्यान्वित करू.
13:27 हे आपल्या डिफॉल्ट ब्राऊजरमधे उघडले आहे.
13:32 लक्षात घ्या की कधीकधी IDE द्वारे सर्व्हर आऊटपुट दाखवला जाण्यापूर्वीच ब्राऊजर विंडो उघडली जाईल.
13:38 ब्राऊजरमधील टेक्स्ट बॉक्समधे नाव टाईप करू.
13:42 उदाहरणार्थ उबंटु आणि Ok क्लिक करा.
13:46 response.jsp पेज दाखवले जाईल. ज्यात आपल्याला ग्रीटिंग दिसेल.
13:52 आता असाईनमेंट.
13:56 वेब ऍप्लीकेशन प्रोजेक्टमधे आणखी दोन टेक्स्ट फिल्डस समाविष्ट करा म्हणजे तुमच्या ऍप्लीकेशनमधे एकूण तीन टेक्स्ट इनपुट फिल्डस होतील.
14:06 Bean Property(बीन प्रॉपर्टी) सेट करण्यासाठी जावा बीन्स कॉम्पोनंट वापरा.
14:09 ब्राऊजरमधे त्याचे प्रेझेंटेशन बघा.
14:12 आणि शेवटी आऊटपुट दुस-या JSP पेजवर मिळवा.
14:17 आपण ही असाईनमेंट आधीच बनवली आहे.
14:21 असाईनमेंट उघडून ती IDE मधे कार्यान्वित करू.
14:30 आपल्याला 3 इनपुट टेक्स्ट फिल्डस दिसत आहेत.
14:35 त्यात योग्य माहिती टाईप करून Ok क्लिक करा.
14:42 आपल्याला अशाप्रकारचे आऊटपुट मिळायला हवे.
14:47 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
14:51 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
14:54 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
14:59 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
15:05 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
15:09 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
15:16 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
15:21 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
15:28 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
15:40 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
15:43 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana