C-and-C++/C2/First-C-Program/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: First-C-Program
Author: Mohiniraj Sutavani
Keywords: C-and-C++
|
|
---|---|
00.02 | C program च्या पहिल्या ट्युटोरियलमध्ये स्वागत. |
00.06 | आपण शिकणार आहोत. |
00.08 | C मध्ये साधा program लिहिणे. |
00.11 | तो compile करणे. |
00.13 | व execute करणे. |
00.14 | आपण common errors आणि त्यावरील solutions सुद्धा बघू. |
00.19 | ह्या ट्युटोरियलसाठी आपण |
00.22 | Ubuntu operating system 11.10 आणि gcc Compiler चे version 4.6.1 वापरू. |
00.31 | ट्युटोरियलच्या सरावासाठी |
00.33 | तुम्हाला Ubuntu OS आणि Editor ची माहिती असणे आवश्यक आहे. |
00.39 | vim आणि gedit हे एडिटर्स आहेत. |
00.42 | येथे आपणgedit वापरू. |
00.46 | संबंधित ट्युटोरियल्स दिलेल्या website वर बघू शकता. |
00.51 | उदाहरणाच्या सहाय्याने C program कसा लिहायचा ते पाहू. |
00.56 | Ctrl, Alt आणि T बटणे दाबून टर्मिनल विंडो उघडा. |
01.07 | text editor उघडण्यासाठी prompt वर लिहा. |
01.12 | “gedit” space “talk” dot “c” space “&” |
01.20 | ampersand (&), prompt ला मुक्त करते. |
01.25 | C files चे extension dot “c” असते. |
01.31 | एंटर दाबा. |
01.33 | टेक्स्ट एडिटर उघडेल. |
01.37 | प्रोग्रॅम लिहिण्यास सुरूवात करा. |
01.39 | double slash “//” space टाईप करा. |
01.42 | “My first C program”. |
01.48 | ओळीस कमेंट करण्यासाठी double slash वापरतात. |
01.52 | प्रोग्रॅम समजण्यासाठी कॉमेंटसचा वापर होतो. |
01.56 | हे documentation साठी उपयोगी पडते. |
01.58 | ह्यात प्रोग्रॅमसंबंधी माहिती देतात. |
02.01 | double slash ला single line comment म्हणतात. |
02.07 | एंटर दाबा. |
02.09 | hash “#include” space open angle bracket , close angle bracket टाईप करा. |
02.17 | प्रथम कंस पूर्ण करून नंतर त्यात लिहिणे ही चांगली सवय आहे. |
02.24 | कंसात “stdio” dot”.” “h” टाईप करा. |
02.30 | stdio.h म्हणजे header file |
02.34 | standard input/output functions वापरत असलेल्या प्रोग्रॅममध्ये ही header file आवश्यक आहे. एंटर दाबा. |
02.43 | “int” space “main” opening bracket, closing bracket “()” असे टाईप करा. |
02.50 | main हे विशिष्ट function आहे. |
02.53 | प्रोग्रॅम नेहमी या ओळीपासून कार्यान्वित होतो. |
02.58 | open bracket आणि close bracket ला parenthesis म्हणतात. |
03.04 | main पुढे Parenthesis असणे म्हणजे main हे function असल्याचे दाखवते. |
03.11 | main function कुठेलही argument घेत नाही. |
03.15 | हे integer टाईपची व्हॅल्यू देते. |
03.19 | data types आपण दुस-या ट्युटोरियलमध्ये पाहू. |
03.23 | main function बद्दल अधिक माहितीसाठी स्लाईडसवर जाऊ. |
03.30 | program मध्ये main function आवश्यक असते. |
03.33 | पण एकापेक्षा अधिक main function चालत नाहीत. |
03.37 | नाहीतर प्रोग्रॅमची सुरूवात compiler ला सापडणार नाही. |
03.41 | कंसाची रिकामी जोडी main function मधे argument नसल्याचे दाखवते. |
03.47 | arguments बद्दल पुढील ट्युटोरियलमध्ये पाहू. |
03.52 | program मध्ये जाऊ. एंटर दाबा. |
03.58 | open curly brace “{” टाईप करा. |
04.00 | open curly bracket main function ची सुरूवात दाखवते. |
04.05 | close curly bracket “}” टाईप करा. |
04.08 | close curly bracket main function संपल्याचे दाखवते. |
04.13 | आता ह्या कंसांमध्ये |
04.14 | दोन वेळा एंटर दाबून नंतर कर्सर एक ओळ वर न्या. |
04.20 | Indentation मुळे code सहज वाचता येतो. |
04.23 | errors ही पटकन सापडतात. |
04.26 | तीन वेळा स्पेस द्या. |
04.29 | टाईप करा “printf” आणि पुढे open bracket close bracket “()” |
04.34 | printf हे टर्मिनलवर आउटपुट दाखवणारे C चे standard फंक्शन आहे. |
04.39 | कंसात double quotesमधे |
04.44 | printf स्टेटमेंटमधील double quotes मधे असलेले काहीही टर्मिनलवर प्रिंट होते. |
04.50 | “Talk To a Teacher backslash n” असे टाईप करा. |
05.00 | Backslash n “\n” म्हणजे नवी ओळ. |
05.03 | printfहे function कार्यान्वित झाल्यावर कर्सर नवीन ओळीवर जाईल. |
05.11 | C statement हे semicolon “;” ने संपविणे आवश्यक आहे. |
05.15 | ओळीच्या शेवटी semicolon टाईप करा. |
05.19 | Semicolon स्टेटमेंट टर्मिनेटरचे कार्य करतो. |
05.24 | एंटर दाबून तीन वेळा स्पेस द्या. |
05.28 | “return” space “0” आणि semicolon “;” टाईप करा. |
05.34 | ही ओळ integer zero देईल. |
05.38 | ह्या function चा टाईप int असल्यामुळे ते integer व्हॅल्यू परत देते. |
05.45 | फंक्शनमधील return statement कार्यान्वित होणारे शेवटचे स्टेटमेंट असते. |
05.51 | returned values संबंधी दुस-या ट्युटोरियलमध्ये पाहू. |
05.56 | फाईल "Save" करा. |
06.00 | सेव्ह करणे ही चांगली सवय आहे. |
06.03 | वीज खंडित झाल्यास होणारे नुकसान टळते. |
06.06 | प्रोग्रॅम क्रॅश झाल्यास होणारे नुकसानही टळते |
06.11 | प्रोग्रॅम compile करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ. |
06.15 | टाईप करा “gcc” space “talk.c” space hyphen “-o” space “myoutput” |
06.24 | gcc हा compiler आहे. |
06.27 | talk.c हे filename . |
06:30 | -o myoutput सांगते की कार्यान्वित झालेले आऊटपुट myoutput ह्या फाईलमध्ये गेले पाहिजे. |
06.37 | एंटर दाबा. |
06.39 | प्रोग्रॅम compile झालेला दिसेल. |
06.42 | ls -lrt, टाईप केल्यावर सर्वात खाली myoutput ही फाईल तयार झालेली दिसेल. |
06.54 | प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यासाठी dot slash “./myoutput” टाईप करून एंटर दाबा. |
07.01 | “Talk To a Teacher” हे आऊटपुट दिसेल. |
07.06 | return ही कार्यान्वित होणारी शेवटची ओळ असते. |
07.10 | म्हणजेच return स्टेटमेंटनंतर काहीही कार्यान्वित होत नाही. |
07.16 | प्रोग्रॅमकडे परत जाऊ. |
07.17 | return statementनंतर अजून एक printf statement समाविष्ट करून टाईप करा. printf("Welcome \n"); |
07.35 | सेव्ह करा. |
07.37 | टर्मिनलवर जाऊन compile आणि execute करा. |
07.41 | up arrow key दाबून पूर्वीच्या कमांडस परत मिळवू शकतो. |
07.46 | जे आता मी केले. |
07.51 | आपल्याला दिसेल की दुसरे welcome स्टेटमेंट कार्यान्वित झाले नाही. |
07.58 | प्रोग्रॅमकडे परत जाऊ. |
08.00 | 'Welcome' statement हे return statement च्या वर लिहा. |
08.07 | सेव्ह करा. |
08.09 | compile आणि execute करा. |
08.15 | दुसरे printf statement, welcome कार्यान्वित झालेले दिसेल. |
08.23 | common errors पाहण्यासाठी प्रोग्रॅमकडे परत जाऊ. |
08.29 | समजा “stdio.h” मध्ये dot लिहिण्यास विसरलो. हे सेव्ह करा. |
08.35 | compile आणि execute करा. |
08.42 | हे बघा. |
08.43 | talk.c fileच्या दुस-या ओळीवरfatal error मिळाली आहे. |
08.48 | compiler ला “stdioh”नावाची header file न मिळाल्याने no such file or directory ही error मिळाली. |
08.59 | हे compilation संपुष्टात आले. |
09.03 | ही एरर दुरूस्त करण्यासाठी प्रोग्रॅमवर जाऊन पुन्हा dot “.” समाविष्ट करून सेव्ह करा. |
09.11 | compile आणि execute करा. आता हे काम करत आहे. |
09.19 | आणखी एक error पाहू. |
09.23 | पुन्हा प्रोग्रॅमकडे जाऊ. |
09.26 | समजा आपण ओळीच्या शेवटी semicolon देण्यास विसरलो. |
09.31 | हे सेव्ह करूनcompile आणि execute करा. |
09:42 | talk.c ह्या fileच्या ओळ क्रमांक सहा वरerror दिसेल. printf च्या आधीsemicolon अपेक्षित आहे. |
09.51 | पुन्हा प्रोग्रॅमकडे जाऊ. semicolon हे स्टेटमेंट टर्मिनेटर म्हणून काम करते. |
09.59 | हे पाचव्या ओळीच्या शेवटी आणि सहाव्या ओळीच्या सुरूवातीला शोधले जाईल. |
10.07 | ही सहावी ओळ आहे. |
10.09 | येथे शेवटी semicolon देऊ शकतो. |
10.13 | compiler ने देखील सहाव्या ओळीवर एरर दिली होती. |
10.18 | आता semicolon देऊन पाहू. |
10.24 | सेव्ह करा. |
10.26 | Compile आणि execute करा. हे कार्य करीत आहे. |
10.33 | पुन्हा प्रोग्रॅमवर जाऊ. ह्या ओळीच्या शेवटी semicolon टाईप करा. |
10.41 | कारण ओळीच्या शेवटी semicolon टाईप करण्याची पध्दत आहे. सेव्ह करा. |
10.49 | Compile आणि execute करा. हे कार्य करत आहे. |
10.55 | स्लाईडस वर परत जाऊ. |
10.57 | Assignment |
10.59 | "Welcome to the World of C" असे प्रिंट करणारा प्रोग्रॅम लिहा. |
11.03 | printf statement मध्ये “\n” समाविष्ट नसेल तर काय होते ते बघा. |
11.09 | आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
11.12 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
11.15 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
11.18 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
11.22 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
11.25 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
11.28 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
11.32 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
11.38 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
11.42 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11.48 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11.51 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद . |