Health-and-Nutrition/C2/Vegetarian-recipes-for-pregnant-women/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:44, 7 September 2020 by Sakinashaikh (Talk | contribs)
|
|
00:00 | गर्भवती महिलांसाठी शाकाहारी पाककृती ह्यावरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:07 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत: |
00:10 | पोषणयुक्त आहाराचे महत्त्व. |
00:13 | काही पौष्टिक शाकाहारी पाककृती. |
00:17 | प्रथम,पोषणयुक्त आहाराचे महत्त्व समजू घेऊ. |
00:23 | गर्भधारणेदरम्यान पौष्टिक पदार्थांच्या गरजा वाढतात. |
00:28 | हे प्रामुख्याने पेशींच्या विकासासाठी आहे. |
00:32 | पोषणयुक्त आहार गर्भाच्या वाढीस आणि विकासास मदत करतो. |
00:38 | म्हणूनच, चांगल्या पौष्टिक आहाराचे सेवन करणे महत्वाचे आहे. |
00:43 | चांगला पौष्टिक आहार गर्भधारणेदरम्यान येणाऱ्या गुंतागुंती टाळण्यास मदत करते. |
00:48 | आहार प्रथिने |
00:51 | चांगले मेद,जीवनसत्त्वे |
00:53 | आणि खनिजे ह्यांनी समृद्ध असावा, |
00:55 | पोषणयुक्त आहार घेतल्यास मळमळ आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. |
01:02 | यामुळे अशक्तपणा |
01:05 | गर्भधारणेवेळी होणारा मधुमेह |
01:07 | आणि उच्च रक्तदाब ह्यांचा धोकादेखील कमी होतो. |
01:09 | यामुळे जन्मावेळी कमी वजनाचे बाळ |
01:13 | आणि अकाली प्रसुतीची शक्यतादेखील कमी होते. |
01:16 | चांगल्या आहाराव्यतिरिक्त दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. |
01:22 | पौष्टिक आहार घेण्याबरोबरच त्याचे पौष्टिक शोषणदेखील महत्त्वपूर्ण आहे. |
01:29 | अन्नामध्ये असलेले फायटेट्स, ऑक्सॅलेट्स आणि टॅनिन्सपौष्टिक शोषणावर परिणाम करतात. |
01:36 | विविध पाककृती तंत्रांचा उपयोग करून पौष्टिक शोषण वाढविले जाऊ शकते. |
01:42 | उदाहरणार्थ: भिजवणे, |
01:45 | मोड आणणे,भाजणे |
01:47 | आणि आंबवणे. |
01:48 | वाफवणे, परतणे |
01:50 | आणि उकळणे ही इतर काही उदाहरणे आहेत. |
01:54 | पौष्टिक घटक वाढविण्यासाठी, आपण विविध पौष्टिक पूडदेखील वापरू शकतो. |
02:01 | एकतर शेवग्याच्या पानांची, |
02:03 | कढीपत्त्याची पूड किंवा शेंगदाणे आणि बियांचा वापर करू शकतो. |
02:07 | ही पूड तयार करण्याची पद्धत दुसर्याव ट्युटोरिअलमध्ये स्पष्ट केली आहे. |
02:12 | कृपया अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या. |
02:15 | गर्भधारणेच्या 9 महिन्यांत निरोगी वजन वाढविणे आवश्यक आहे. |
02:20 | साखर |
02:23 | गूळ,प्रक्रिया केलेले |
02:25 | आणि तयार खाद्यपदार्थ टाळण्याची शिफारस केली जाते. |
02:28 | कॅफिन, दारू |
02:30 | आणि तंबाखू टाळा. |
02:32 | डॉक्टरांच्या परवानगीशिवाय औषध घेऊ नका. |
02:36 | याविषयी अधिक माहिती दुसर्याष ट्युटोरिअलमध्ये दिली आहे. |
02:40 | आता आपण आपल्या पहिल्या पाककृतीपासून सुरवात करू जी आहे चवळीची इडली. |
02:46 | ही पाककृती तयार करण्यासाठी आपल्याला प्रत्येकी 2 चमचे |
02:50 | अख्खी बाजरी |
02:52 | अख्खे राळे हवे आहे. |
02:54 | आपल्याला प्रत्येकी 1 चमचा |
02:57 | मोड आलेली चवळी |
02:59 | अख्खे मोड आलेले हरभरे |
03:01 | मेथीचे दाणे |
03:03 | भाजलेल्या सुर्यफूलाच्या बिया हेदेखील लागतील. |
03:05 | आपल्याला प्रत्येकी 1/4 चमचा |
03:10 | शेवग्याच्या पानांची पूड, कढीपत्त्याची पूड |
03:13 | शेंगदाणे आणि बियांची पूड |
03:15 | आणि मीठदेखील लागेल. |
03:17 | प्रथम चवळी आणि अख्ख्या हरभऱ्यांना मोड आणण्यापासून सुरवात करू. |
03:22 | मी मोड आणण्याची प्रक्रिया स्पष्ट करते. |
03:25 | चवळी आणि अख्खे हरभरे रात्रभर वेगवेगळे भिजत ठेवा. |
03:31 | सकाळी त्यातील पाणी काढून घ्या आणि मलमलच्या कपड्यात ते वेगवेगळे बांधा. |
03:36 | मोड येण्यासाठी 2 दिवस ते उबदार ठिकाणी ठेवा. |
03:40 | लक्षात ठेवा की वेगवेगळ्या शेंगांना मोड येण्यास वेगवेगळा वेळ लागतो. |
03:45 | मोड तयार झाले की बाजरी आणि मेथीचे दाणे एकत्र भिजवा. |
03:50 | ते6 ते 8 तास किंवा रात्रभर भिजवा. |
03:55 | त्यातील पाणी काढून सूर्यफुलाच्या बिया आणि मोड यांसह बाजरीचे बारीक पीठ (बॅटर) तयार करा |
04:01 | वाटण्यासाठी आपण दगडी ग्राइंडर किंवा मिक्सर वापरू शकता. |
04:06 | वाटल्यानंतर, आंबवण्यासाठी रात्रभर ते किंवा 6 ते 8 तास ठेवा. |
04:13 | शिजवण्यापूर्वी पिठात(बॅटर) मीठ आणि इतर सर्व पूड घाला आणि एकत्र करा. |
04:19 | इडलीच्या भांड्याला तेल लावा आणि त्यात पीठ(बॅटर)ओता. |
04:24 | ते कुकर किंवा स्टीमरमध्ये ठेवा आणि 10-12 मिनिटे वाफवून घ्या. |
04:29 | किंवा आपण कुकरमध्ये1/4 पाणी घालून शिटीशिवाय वाफवू शकता. |
04:35 | 7 ते 8 मिनिटांनंतर इडली काढून गरमगरम वाढा. |
04:41 | ही पाककृती प्रथिने |
04:45 | कॅल्शियम आणि लोह ह्यांनी समृद्ध आहे. |
04:47 | हे फोलेट, |
04:50 | मॅग्नेशियम आणि पोटॅशियमनेदेखील समृद्ध आहे. |
04:53 | पुढील पाककृती आहे बाजरीची खिचडी. |
04:56 | हीतयार करण्यासाठी, आपल्याला आवश्यक आहे – प्रत्येकी 1 चमचा |
05:01 | अख्खी बार्नयार्ड बाजरी, मोड आलेली अख्खी बाजरी |
05:04 | मोड आलेले सोयाबीन |
05:06 | 1 चिरलेला कांदा, 1 चिरलेले गाजर |
05:09 | 1 चिरलेले बीट |
05:11 | आपल्याला प्रत्येकी1 चमचा |
05:15 | खोवलेले ताजे खोबरे |
05:17 | आणि खसखसदेखील लागेल. |
05:19 | आपल्याला |
05:21 | ½ कप दहीदेखील लागेल. |
05:23 | 1/4 चमचा प्रत्येकी |
05:26 | हळद, कोथिंबीर |
05:28 | आणि जिरे पूड. |
05:30 | जिरे, |
05:32 | शेवग्याच्या पानांची पूड, कढीपत्याची पूड हेदेखील लागतील. |
05:35 | चवीनुसार मीठ, आणि |
05:37 | 1 चमचा तेल किंवा तूप. |
05:40 | लक्षात ठेवा की मी अख्खी बाजरी आणि सोयाबीन मोड येण्यासाठी स्वतंत्रपणे भिजवले आहेत. |
05:46 | एका घटकास मोड येण्यास कदाचित अधिक वेळ लागू शकतो किंवा दोघांना एकाच वेळी मोड येऊ शकतात. |
05:52 | माझ्या बाबतीत, सोयाबीनला मोड येण्यास जास्त वेळ लागला. |
05:57 | बार्नयार्ड बाजरी 6 ते 8 तास पाण्यात भिजवा. |
06:01 | पाणी काढून टाका आणि बाजूला ठेवा. |
06:04 | प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करून त्यात जिरे घाला. |
06:09 | आता सर्व भाज्या, मोड आलेली बाजरी, सोयाबीन आणि दही घाला. |
06:17 | खोवलेले खोबरे, खसखस, मीठ, पावडर आणि सर्व सुके मसाले घाला. |
06:23 | चांगले मिसळा. |
06:25 | मग, 1 कप पाणी घाला. |
06:28 | खिचडीसाठी2 शिट्या होऊ द्या. |
06:32 | एकदा झाले की गरमगरम वाढा. |
06:35 | ही पाककृती प्रथिने |
06:38 | चांगले मेद, जीवनसत्त्व-अ |
06:40 | आणि कॅल्शियमने समृद्ध आहे, |
06:42 | हे लोह |
06:45 | फोलेट, मॅग्नेशियम |
06:47 | आणि फॉस्फरस ह्यासारख्या खनिजांनी समृद्ध आहे, |
06:49 | आमची तिसरी पाककृतीआहे मूग रॅप.(गुंडाळी) |
06:53 | या पाककृतीसाठी आपल्यालाहवे आहे |
06:55 | ¼ कप– मोड आणून वाळवलेले नागलीचे पीठ |
06:58 | 1 चमचा बेसन पीठ |
07:01 | ½ कप मोड आलेले मूग |
07:04 | ¼ कप कुस्करलेले पनीर |
07:06 | 1 चमचा चिरलेला कांदा |
07:08 | 1 चमचा चिरलेला टोमॅटो |
07:12 | आपल्याला प्रत्येकी 1/4 चमचा |
07:15 | हळद |
07:17 | कोथिंबीरआणि जिरे पूड |
07:19 | जिरे, कढीपत्याची पूड |
07:22 | शेवग्याच्या पानांची पूड |
07:24 | 1 चमचातेल किंवा तूपदेखील आवश्यक आहे. |
07:27 | आपल्याला अर्धा लिंबू |
07:29 | आणि चवीनुसार मीठदेखील लागेल. |
07:32 | कृती - ह्या ट्युटोरिअलमध्ये आधी सांगितल्याप्रमाणे मुगाला मोड आणा. |
07:37 | नागलीचे पीठ तयार करण्यासाठी, नागली रात्रभर भिजवा. |
07:42 | आता ते मलमलच्या कपड्यात बांधा आणि 6-8 तास किंवा रात्रभर ठेवा. |
07:48 | एकदा त्यांना मोड आले की, लोखंडी पसरट भांड्यात ते कोरडे भाजून घ्या. |
07:54 | यानंतर ग्राइंडरने पीठ तयार करा आणि बाजूला ठेवा. |
08:01 | लोखंडी पसरट भांड्यात तेल गरम करा. |
08:04 | जिरे, कोरडे मसाले आणि पूड घाला. |
08:09 | चिरलेला कांदा आणि टमाटे घाला आणि मऊ होईपर्यंत परतवा. |
08:14 | नंतर मोड आलेले मूग घाला आणि 10 मिनिटे शिजू द्या. |
08:19 | पनीर आणि मीठ घाला आणि 5 ते 10 मिनिटे शिजवा. |
08:24 | ¼ कपपाणी घाला आणि आणखी 5-10 मिनीटे शिजू द्या. |
08:30 | आच बंद करा आणि थंड होऊ द्या. |
08:34 | आता लिंबाचा रस घालून मिश्रण बाजूला ठेवा. |
08:38 | नंतर, एका वाडग्यात नागलीचे पीठ आणि बेसन पीठ एकत्र करावे. |
08:44 | कोमट पाणी घालून पीठ मळा. |
08:48 | आता गोल आकारात पराठे लाटा. |
08:51 | पराठे दोन्ही बाजूंनी लोखंडी तव्यावर भाजा. |
08:56 | पराठे एका ताटलीत ठेवा आणि मुगाचे मिश्रण पराठ्यावर पसरवा. |
09:02 | आता तो गुंडाळा आणि वाढा. |
09:05 | ही पाककृती प्रथिने |
09:07 | आणि चांगले मेद ह्यांनी समृद्ध आहे. |
09:10 | हे कॅल्शियम, |
09:12 | लोह, फोलेट, |
09:14 | मॅग्नेशियम आणि झिंक यांचे स्त्रोतदेखील आहे. |
09:16 | येथे सांगितलेल्या बाजरींशिवाय तुम्ही इतरधान्ये जसे राळे, भगर आणि नागली वापरू शकता. |
09:22 | उदाहरणार्थ : ज्वारी, |
09:24 | भगर, तुकडा गहू |
09:26 | किंवा अख्खा गहू. |
09:28 | त्याचप्रमाणे, आपण इतर मोडदेखील वापरू शकता. |
09:32 | उदाहरणार्थ: मोड आलेले चणे, |
09:35 | मोड आलेलेहिरवे वाटाणे किंवा |
09:37 | मोड आलेली मटकी. |
09:39 | सांगितलेल्या बियांशिवाय तुम्ही स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्याबियादेखील वापरू शकता. |
09:46 | उदाहरणार्थ: तीळ, |
09:48 | भोपळ्याच्या बिया, |
09:50 | जवसाच्या बिया आणि अळीवाच्या बिया. |
09:53 | निरोगी गर्भधारणा आणि बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी ह्या सर्व पाककृतींचा समावेश करा. |
10:00 | ह्यासह आपण ट्युटोरिअलच्या समाप्तीकडे आलो आहोत. सहभागासाठी धन्यवाद. हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवाद केले असून ह्यासाठी आवाज राधिका हुद्दार ह्यांनी दिला आहे. |