Health-and-Nutrition/C2/Basics-of-newborn-care/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:00 | नवजात बाळाची काळजी घेण्याच्या मूलभूत गोष्टी ह्यावरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:05 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - नवजात बाळाला कसे सांभाळावे, |
00:11 | गर्भनाळेची काळजी, नवजात बाळाला भरवणे आणि ढेकर देणे, |
00:15 | लंगोट आणि त्यामुळे येणारे लाल पुरळ |
00:19 | नवजात बाळाच्या झोपेच्या सवयी. |
00:23 | बाळाचा जन्म झाल्यावर संपूर्ण कुटुंब उत्साहित होते आणि प्रत्येकाला बाळाला पाहायचे आणि धरायचे असते. |
00:34 | म्हणूनच नवजात बाळाला उचलताना काही महत्त्वाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. |
00:40 | नवजात बाळांमध्ये रोगप्रतिकार शक्ती प्रबळ नसते. त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते. |
00:48 | बाळाला संसर्गापासून बचावासाठी त्याला स्पर्श करण्यापूर्वी किंवा धरण्यापूर्वी हात स्वच्छ असणे महत्वाचे आहे. |
00:57 | नवजात बाळास धरण्यापूर्वी, हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा आणि स्वच्छ कोरड्या कपड्याने कोरडे करा. |
01:07 | आता पहिली गोष्ट शिकू जी आहे - बाळाला कसे धरावे. |
01:11 | एका हाताने बाळाच्या डोक्याला व मानेला आधार देऊन आणि दुसर्या हाताने खालच्या बाजूस धरून बाळाला धरा. |
01:19 | बाळाला खाली झोपवण्यासाठी, नेहमी बाळाच्या डोक्याला व मानेला आधार द्या आणि त्याचबरोबर त्याच्या खालच्या बाजूसदेखील धरून ठेवा. |
01:26 | दुसरीकडे, झोपलेल्या बाळाला उठवण्यासाठी पुढील गोष्टी करा - |
01:31 | बाळाच्या पायांना गुदगुल्या करा किंवा आधार देऊन त्याला बसवावे किंवा बाळाच्या कानाला हळूवारपणे स्पर्श करा. |
01:42 | नेहमी लक्षात ठेवा की नवजात बाळ संवेदनशील असते. |
01:46 | नवजात बाळाला सांभाळताना खबरदारी घ्याव्यात - जसे नवजात बाळ कोणत्याही प्रकारच्या खेळासाठी तयार नसते. |
01:55 | म्हणूनच, बाळाला गुडघ्यावर ठेवून हलवू नका किंवा त्याला हवेत झेलू नका. |
02:01 | खेळताना किंवा चिडलेला असताना नवजात बाळाला कधीही जोरात हलवू नका. |
02:05 | बाळाची मान अचानकपणे हलवू नका. यामुळे बाळाला अंतर्गत जखमा होऊ शकतात. |
02:14 | आता आपण घरी गर्भनाळेविषयीची काळजी कशी घ्यावी ते शिकू. |
02:18 | जेव्हा बाळ आईच्या गर्भाशयात असते तेव्हा गर्भनाळच बाळाचे जीवन असते. पण, एकदा बाळाचा जन्म झाल्यावर त्याची गरज नसते. |
02:30 | जन्मानंतर काही मिनिटांतच गर्भनाळेचे स्पंदन थांबताच त्याची गाठ मारावी. |
02:37 | रुग्णालयातून मूल घरी जाईपर्यंत नाळ सुकून आकसण्यास सुरवात होते. |
02:45 | सुमारे एक ते दोन आठवड्यांत नाळ स्वतःहूनच पडते. |
02:50 | लक्षात घ्या की गर्भनाळेतून बाळाच्या शरीरात संसर्ग होण्याची शक्यता असते. |
02:57 | म्हणूनच, याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. |
03:02 | त्यासाठी, लक्षात ठेवा की बाळाची गर्भनाळ कोरडी ठेवावी आणि हवेच्या संपर्कात असावी. |
03:09 | गर्भनाळ पडेपर्यंत केवळ ओल्या कपड्याने पुसावे. |
03:14 | गर्भनाळ बाळाच्या लंगोटच्या बाहेर ठेवावी किंवा गुंडाळून लंगोटच्या काठेच्या आत ठेवावी. |
03:24 | जर नाळेच्या टोकातून किंवा त्वचेच्या जवळील भागापासून रक्त येत असेल तर, |
03:32 | पू, नाभीभोवती सूज किंवा लालसरपणा आल्यास, |
03:36 | नाभीच्या आसपास बाळाला दुखत असल्याची चिह्ने दिसल्यास |
03:41 | आणि जर नाळ एक महिन्यापर्यंत पडली नाही तर कृपया बाळाच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. |
03:46 | कधीकधी असेही होऊ शकते की जेव्हा नाळ गळू लागते किंवा गळून पडल्यावर तिथे थोडे रक्त येऊ शकते. परंतू हे त्वरीत थांबविले पाहिजे. |
04:01 | लक्षात ठेवा, गर्भनाळ कधीही खेचू नका. |
04:04 | तसेच, कोणतीही क्रिम किंवा पावडर टाकू नका. |
04:08 | किंवा नाळ पडल्यानंतर बाळाच्या नाभीवर कोणतीही पट्टी बांधू नका. |
04:13 | नवजात बाळाची काळजी घेण्याच्या पौष्टिक पैलूंसाठी आपण बाळाला कसा आहार द्यावा याबद्दल बोलू. |
04:2 | प्रसूतीनंतर 1 तासाच्या आत नवजात बाळाला दूध पाजावे. |
04:25 | पहिल्या 6 महिन्यांसाठी आईचे दूधच दिले पाहिजे. |
04:30 | याव्यतिरिक्त, आईने बाळाला पुरेसा त्वचेचा त्वचेशी संपर्क उपलब्ध करून दिला पाहिजे आणि बाळ उपाशी असल्याचे संकेत पाहिले पाहिजेत. |
04:40 | हे सर्व मुद्दे त्याच मालिकेच्या इतर ट्युटोरिअल्समध्ये सांगितले आहेत. |
04:46 | कधीकधी, नवजात बाळांना दूध पाजण्यासाठी वारंवार उठवावे लागते, विशेषत: कमी वजनाच्या आणि वेळेआधी जन्मलेल्या बाळांना. |
04:57 | एखाद्या, निरोगी किंवा वेळेआधी जन्मलेल्या बाळास स्तनपानात रस नाही असे वाटल्यास आईने डॉक्टरांचा किंवा आरोग्य सेविकेचा सल्ला घ्यावा. |
05:09 | स्तनपान करताना, मुले सहसा हवादेखील गिळतात ज्यामुळे ते चिडचिडे होतात. |
05:15 | हे टाळण्यासाठी, बाळाला प्रत्येक स्तनपानानंतर ढेकर द्यावा. |
05:20 | त्याच मालिकेच्या दुसर्या ट्युटोरिअलमध्ये त्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. |
05:25 | पुढे आहे लंगोटविषयी. जेव्हा बाळ शौच किंवा लघवी करेल तेव्हा बाळाला त्याच्या पाठीवर झोपवून त्याची खराब लंगोट काढा. |
05:37 | बाळाचे जननेंद्रिय हळूवारपणे स्वच्छ करण्यासाठी आणि पुसण्यासाठी पाणी आणि मऊ कापड वापरा. |
05:44 | बाळाच्या जननेंद्रियावर साबण लावू नका. जर मुलगी असेल तर नेहमी पुढून मागच्या दिशेला स्वच्छ करावे त्यामुळे मूत्रमार्गाच्या भागातील संसर्ग टाळला जाईल. |
05:55 | आई किंवा काळजी घेणाऱ्याने लंगोट बदलण्यापूर्वी आणि नंतर नेहमीच हात चांगले धुवावेत. |
06:03 | कधीकधी असेही होऊ शकते की लंगोटमुळे बाळाच्या त्वचेवर पुरळ येऊ शकतात. |
06:08 | लंगोटमुळे पुरळ येणे हे सामान्य आहे. पुरळ हे विशेषतः लाल आणि फुगीर असतात हे काही दिवसात - गरम पाण्याने अंघोळ केल्याने, |
06:18 | काही विशेष क्रीम लावल्याने आणि काही वेळा लंगोट न घातल्याने बरे होतील. |
06:25 | बाळाची त्वचा संवेदनशील असल्यामुळे पुरळ उठतात आणि ओल्या लंगोटमुळे बाळ चिडचिडे होते. |
06:33 | हे पुरळ रोखण्यासाठी किंवा त्यांच्यावर उपचार करण्यासाठी, लघवी किंवा शौच केल्यावर बाळाचे लंगोट वेळोवेळी बदलावे. |
06:41 | मऊ कापड आणि पाण्याने ती जागा हळूवारपणे स्वच्छ करावी. बाजारात मिळणारे ओले कापड किंवा कागदाने नाही ह्यामुळे त्याला त्रास होईल. |
06:50 | लंगोटच्या त्रासापासून वाचवणाऱ्या "बॅरियर" क्रीमचा एक जाड थर लावू शकता. |
06:55 | झिंक ऑक्साईड असलेली क्रिम वापरा जी ओलावा दूर ठेवते. |
07:03 | बाळाची लंगोट रंग आणि सुगंध नसलेल्या डिटर्जंटने धुवावी. |
07:08 | दिवसातील काही वेळ बाळाला डायपर किंवा लंगोट न घालताच राहू द्या. त्यामुळे त्वचेला हवा लागेल. |
07:18 | जर, पुरळ 3 दिवसांपेक्षा जास्त काळ असतील किंवा ती जास्त चिघळत आहेत असे दिसून आल्यास, कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या. |
07:27 | हे एखाद्या बुरशीजन्य संसर्गामुळे उद्भवू शकते त्यासाठी औषधाची गरज आहे. |
07:33 | शेवटी, बाळाच्या झोपेच्या सवयीबद्दल चर्चा करू. |
07:38 | एका दिवसात बाळ सुमारे 14 ते 16 तास किंवा त्याहून अधिक झोपतात. |
07:43 | नवजात बाळ एकावेळी साधारणतः 2–4 तास झोपते. |
07:48 | बर्याच नवजात बाळांसाठी दिवस आणि रात्री एकच असतात. |
07:52 | ते रात्री जागे राहतात आणि दिवसा झोपी जातात. |
07:58 | रात्री ते जास्त वेळ झोपावे आणि त्यांची झोपमोड न व्हावी ह्यासाठी - रात्रीचा दिवा वापरून उजेड कमी ठेवावा आणि दिवसा वेळोवेळी तिच्याशी बोलून आणि खेळून तिला थोडे जागे ठेवण्याचा प्रयत्न करा. |
08:17 | आई किंवा काळजी घेणाऱ्याने की बाळ नेहमीच त्याच्या पाठीवर झोपेल हे लक्षात ठेवले पाहिजे. |
08:24 | यामुळे अचानक होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी होईल. |
08:30 | झोपतानाच्या इतर सुरक्षित खबरदाऱ्या म्हणजे त्यांच्या पाळण्यामध्ये कांबळ, रजई, मेंढीचे कातडे, कापूस भरलेल्या खेळणी, उश्या ठेवू नये. |
08:44 | ह्या सर्व गोष्टींमुळे बाळ गुदमरू शकते. |
08:47 | तसेच, रोज रात्री बाळाच्या डोक्याची स्थिती बदलत रहा - प्रथम उजवीकडे, नंतर डावीकडे अशा प्रकारे. |
08:58 | ह्यामुळे बाळाच्या डोक्याची बाजू एकाच बाजूने चपटी होणार नाही. |
09:04 | ह्यासह आपण नवजात बाळाची काळजी घेण्याच्या मूलभूत गोष्टी ह्यावरील ट्युटोरिअलच्या समाप्तीकडे आलोत. |
09:11 | हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवाद केले असून ह्यासाठी आवाज क्राईस्ट ग्लोरी सर्व्हिसेस ह्यांनी दिला आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |