Linux-Old/C2/Ubuntu-Software-Center/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Installation Through Ubuntu software center
Author: Manali Ranade
Keywords: Ubuntu
|
|
---|---|
0:00 | Ubuntu Software Center वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
0:04 | यात आपण शिकू Ubuntu Software Center चा वापर. |
0:09 | Ubuntu Operating System वर सॉफ्टवेअरdownload, install, update आणि uninstall करणे . |
0:16 | Ubuntu Software Center म्हणजे काय? |
0:18 | हे Ubuntu वरील सॉफ्टवेअरचे व्यवस्थापन करणारे टूल आहे. |
0:23 | याचा वापर सॉफ्टवेअर शोधणे, download, install, update आणि uninstall करण्यासाठी होतो. |
0:30 | तसेच Ubuntu Software Center, प्रत्येक सॉफ्टवेअरचे reviews आणि ratings ची सूची दाखवतो. |
0:36 | अशा प्रकारे सॉफ्टवेअरबद्दलची माहिती ते वापरण्यापूर्वी आपल्याकडे असते. |
0:41 | ते सॉफ्टवेअरच्या पूर्व इतिहासाची नोंदही ठेवते. |
0:45 | या ट्युटोरियलमध्ये आपण Ubuntu 11.10 versionवरील Ubuntu Software Center वापरणार आहोत. |
0:52 | आता पुढे जाऊ या. |
0:54 | तुमचे इंटरनेट चालू असणे आवश्यक आहे. |
0:56 | सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला Administrator rights असणे आवश्यक आहे. |
1:04 | तुमच्या Launcher वरील Ubuntu Software Center आयकॉनवर क्लिक करा. |
1:08 | Ubuntu Software Centerची विंडो उघडेल. |
1:12 | विंडोच्या वरती डावीकडे All Software, Installed आणि History ही बटणे दिसतील. |
1:19 | वरती उजवीकडे कोप-यात Search field दिसेल. |
1:23 | Ubuntu Software Center दोन पॅनेल्समध्ये विभागलेले असते. |
1:28 | डावीकडील पॅनेल सॉफ्टवेअर categories ची सूची दाखवते. |
1:33 | उजवीकडील पॅनेल What's New आणि Top Rated ची सूची दाखवेल. |
1:38 | What's New panel नव्याने उपलब्ध झालेल्या सॉफ्टवेअरची सूची दाखवते. |
1:42 | Top Rated panel मध्ये सर्वाधिक user rating असलेली आणि वारंवार डाऊनलोड झालेल्या सॉफ्टवेअरची यादी दिसेल. |
1:51 | category प्रमाणे सॉफ्टवेअर ब्राऊज करू या. |
1:55 | डाव्या पॅनेलमधील Internet वर क्लिक करा. |
1:58 | Internet या category साठी Internet software आणि top rated software अशी यादी दाखवली जाईल. |
2:05 | काही सॉफ्टवेअरच्या नावाशेजारी tick mark केलेले वर्तुळ दिसेल. |
2:10 | याचा अर्थ ते सॉफ्टवेअर तुमच्या संगणकावर आधीच इन्स्टॉल केलेले आहे. |
2:15 | All च्या आयकॉनवर क्लिक करून Internet category मधील अधिक सॉफ्टवेअर बघू शकतो. |
2:21 | Internet या category तील उपलब्ध सॉफ्टवेअर विंडोमध्ये दिसतील. |
2:26 | तसेच आपण सॉफ्टवेअर Name, Top Rated किंवा Newest First प्रमाणे सॉर्ट करू शकतो. |
2:32 | वरती उजवीकडील कोप-यात असलेल्या drop-down वर क्लिक करा. |
2:36 | सूची मधील By Top Rated हा पर्याय निवडा. |
2:40 | Internet सॉफ्टवेअरची मांडणी त्यांच्या ratings नुसार झाली आहे. |
2:45 | तुमच्या संगणकावर इन्स्टॉल केलेल्या सॉफ्टवेअरची संपूर्ण यादी बघण्यासाठी, |
2:50 | Installed या बटणावर क्लिक करा. |
2:53 | सॉफ्टवेअरची category दाखवली जाईल. |
2:56 | Sound आणि Video च्या अलीकडे असलेल्या छोट्या त्रिकोणी बटणावर क्लिक करा. |
3:02 | संगणकावरील Sound आणि Videoशी संबंधित सॉफ्टवेअरची यादी दिसेल. |
3:08 | All Softwareवर क्लिक करा आणि drop-down मधील Provided by Ubuntu हा पर्याय निवडा. |
3:14 | Ubuntuद्वारा प्रदान केलेल्या सर्व सॉफ्टवेअरची यादी दिसेल. |
3:19 | आता VLC media player हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू या. |
3:24 | विंडोवरती उजव्या बाजूला Search box मध्ये VLC टाईप करा. |
3:29 | VLC media player दिसेल. |
3:33 | इन्स्टॉलवर क्लिक करा. |
3:35 | Authentication नामक dialog box उघडेल. |
3:38 | तुमचा system password टाईप करा. |
3:42 | Authenticate वर क्लिक करा. |
3:44 | progress bar कडे बघा. आपल्याला VLCइन्स्टॉल होत असल्याचे दिसत आहे. |
3:50 | पॅकेजच्या आकारमानानुसार ते इन्स्टॉल होण्यासाठी लागणारा वेळ कमी जास्त असू शकतो. |
3:57 | वरती progress दाखवणारे बटण ही उपलब्ध आहे. |
4:02 | Installation ची क्रिया होत असताना आपण इतर applications ही निवडू शकतो. |
4:07 | एकदा VLCइन्स्टॉल झाले की त्याच्या समोर एक छोटा tick mark दिसेल. |
4:13 | उजवीकडे Remove बटण दिसत आहे. |
4:17 | जर आपल्याला VLC uninstall करायचे असेल तर केवळ Removeया बटणावर क्लिक करा. |
4:23 | अशाच प्रकारे आपण इतर सर्व सॉफ्टवेअर पॅकेजेस शोधून इन्स्टॉल करू शकतो. |
4:29 | आता आपणHistory बघू या. |
4:31 | येथे आपल्याला आपण केलेले सर्व बदल बघता येतात. जसे की installations, |
4:37 | updates आणि काढून टाकलेली सॉफ्टवेअर्स. |
4:40 | History वर क्लिक करा. Historyचा डायलॉग बॉक्स उघडेल. |
4:45 | All Changes, Installations, Updates आणि Removals आपण History मध्ये बघू शकतो. |
4:51 | All Changes वर क्लिक करा. |
4:53 | आपण केलेले सर्व बदल दिसतील म्हणजेच Installations, Updates आणि Removals. |
5:01 | तुम्ही इन्स्टॉल केलेली सॉफ्टवेअर नियमितपणे Update करू शकता. |
5:07 | Ubuntu च्या वेबसाईटवर तुम्हाला Ubuntu आणि Ubuntu Software Center बद्दलची अधिक माहिती मिळेल. |
5:17 | अशा प्रकारे आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
5:21 | यात आपण शिकलो Ubuntu Software Center चा वापर. |
5:26 | तसेच आपण Ubuntu Operating System वर सॉफ्टवेअर download, install, update आणि un-install करण्याबद्दल शिकलो. |
5:36 | आता assignment करू या. |
5:39 | Ubuntu सॉफ्टवेअरच्या मदतीने Thunderbird हे सॉफ्टवेअरDownload आणि install करू. |
5:46 | *प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
5:49 | *ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
5:52 | *जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
5:57 | *स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
5:59 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
6:02 | *परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
6:06 | *अधिक माहितीसाठी कृपया या संकेतस्थळाला जा./अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
6:12 | *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
6:17 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
6:24 | *यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
6:28 | spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro |
6:35 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |
Contributors and Content Editors
Nancyvarkey, PoojaMoolya, Pratik kamble, Pravin1389, Ranjana, Sneha