Linux-Old/C2/Ubuntu-Software-Center/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 Ubuntu Software Center वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:04 यात आपण शिकू Ubuntu Software Center चा वापर.
00:09 Ubuntu Operating System वर सॉफ्टवेअरdownload, install, update आणि uninstall करणे .
00:16 Ubuntu Software Center म्हणजे काय?
00:18 हे Ubuntu वरील सॉफ्टवेअरचे व्यवस्थापन करणारे टूल आहे.
00:23 याचा वापर सॉफ्टवेअर शोधणे, download, install, update आणि uninstall करण्यासाठी होतो.
00:30 तसेच Ubuntu Software Center, प्रत्येक सॉफ्टवेअरचे reviews आणि ratings ची सूची दाखवतो.
00:36 अशा प्रकारे सॉफ्टवेअरबद्दलची माहिती ते वापरण्यापूर्वी आपल्याकडे असते.
00:41 ते सॉफ्टवेअरच्या पूर्व इतिहासाची नोंदही ठेवते.
00:45 या ट्युटोरियलमध्ये आपण Ubuntu 11.10 versionवरील Ubuntu Software Center वापरणार आहोत.
00:52 आता पुढे जाऊ या.
00:54 तुमचे इंटरनेट चालू असणे आवश्यक आहे.
00:56 सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला Administrator rights असणे आवश्यक आहे.
01:04 तुमच्या Launcher वरील Ubuntu Software Center आयकॉनवर क्लिक करा.
01:08 Ubuntu Software Centerची विंडो उघडेल.
01:12 विंडोच्या वरती डावीकडे All Software, Installed आणि History ही बटणे दिसतील.
01:19 वरती उजवीकडे कोप-यात Search field दिसेल.
01:23 Ubuntu Software Center दोन पॅनेल्समध्ये विभागलेले असते.
01:28 डावीकडील पॅनेल सॉफ्टवेअर categories ची सूची दाखवते.
01:33 उजवीकडील पॅनेल What's New आणि Top Rated ची सूची दाखवेल.
01:38 What's New panel नव्याने उपलब्ध झालेल्या सॉफ्टवेअरची सूची दाखवते.
01:42 Top Rated panel मध्ये सर्वाधिक user rating असलेली आणि वारंवार डाऊनलोड झालेल्या सॉफ्टवेअरची यादी दिसेल.
01:51 category प्रमाणे सॉफ्टवेअर ब्राऊज करू या.
01:55 डाव्या पॅनेलमधील Internet वर क्लिक करा.
01:58 Internet या category साठी Internet software आणि top rated software अशी यादी दाखवली जाईल.
02:05 काही सॉफ्टवेअरच्या नावाशेजारी tick mark केलेले वर्तुळ दिसेल.
02:10 याचा अर्थ ते सॉफ्टवेअर तुमच्या संगणकावर आधीच इन्स्टॉल केलेले आहे.
02:15 All च्या आयकॉनवर क्लिक करून Internet category मधील अधिक सॉफ्टवेअर बघू शकतो.
02:21 Internet या category तील उपलब्ध सॉफ्टवेअर विंडोमध्ये दिसतील.
02:26 तसेच आपण सॉफ्टवेअर Name, Top Rated किंवा Newest First प्रमाणे सॉर्ट करू शकतो.
02:32 वरती उजवीकडील कोप-यात असलेल्या drop-down वर क्लिक करा.
02:36 सूची मधील By Top Rated हा पर्याय निवडा.
02:40 Internet सॉफ्टवेअरची मांडणी त्यांच्या ratings नुसार झाली आहे.
02:45 तुमच्या संगणकावर इन्स्टॉल केलेल्या सॉफ्टवेअरची संपूर्ण यादी बघण्यासाठी,
02:50 Installed या बटणावर क्लिक करा.
02:53 सॉफ्टवेअरची category दाखवली जाईल.
02:56 Sound आणि Video च्या अलीकडे असलेल्या छोट्या त्रिकोणी बटणावर क्लिक करा.
03:02 संगणकावरील Sound आणि Videoशी संबंधित सॉफ्टवेअरची यादी दिसेल.
03:08 All Softwareवर क्लिक करा आणि drop-down मधील Provided by Ubuntu हा पर्याय निवडा.
03:14 Ubuntuद्वारा प्रदान केलेल्या सर्व सॉफ्टवेअरची यादी दिसेल.
03:19 आता VLC media player हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू या.
03:24 विंडोवरती उजव्या बाजूला Search box मध्ये VLC टाईप करा.
03:29 VLC media player दिसेल.
03:33 इन्स्टॉलवर क्लिक करा.
03:35 Authentication नामक dialog box उघडेल.
03:38 तुमचा system password टाईप करा.
03:42 Authenticate वर क्लिक करा.
03:44 progress bar कडे बघा. आपल्याला VLCइन्स्टॉल होत असल्याचे दिसत आहे.
03:50 पॅकेजच्या आकारमानानुसार ते इन्स्टॉल होण्यासाठी लागणारा वेळ कमी जास्त असू शकतो.
03:57 वरती progress दाखवणारे बटण ही उपलब्ध आहे.
04:02 Installation ची क्रिया होत असताना आपण इतर applications ही निवडू शकतो.
04:07 एकदा VLCइन्स्टॉल झाले की त्याच्या समोर एक छोटा tick mark दिसेल.
04:13 उजवीकडे Remove बटण दिसत आहे.
04:17 जर आपल्याला VLC uninstall करायचे असेल तर केवळ Removeया बटणावर क्लिक करा.
04:23 अशाच प्रकारे आपण इतर सर्व सॉफ्टवेअर पॅकेजेस शोधून इन्स्टॉल करू शकतो.
04:29 आता आपणHistory बघू या.
04:31 येथे आपल्याला आपण केलेले सर्व बदल बघता येतात. जसे की installations,
04:37 updates आणि काढून टाकलेली सॉफ्टवेअर्स.
04:40 History वर क्लिक करा. Historyचा डायलॉग बॉक्स उघडेल.
04:45 All Changes, Installations, Updates आणि Removals आपण History मध्ये बघू शकतो.
04:51 All Changes वर क्लिक करा.
04:53 आपण केलेले सर्व बदल दिसतील म्हणजेच Installations, Updates आणि Removals.
05:01 तुम्ही इन्स्टॉल केलेली सॉफ्टवेअर नियमितपणे Update करू शकता.
05:07 Ubuntu च्या वेबसाईटवर तुम्हाला Ubuntu आणि Ubuntu Software Center बद्दलची अधिक माहिती मिळेल.
05:17 अशा प्रकारे आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
05:21 यात आपण शिकलो Ubuntu Software Center चा वापर.
05:26 तसेच आपण Ubuntu Operating System वर सॉफ्टवेअर download, install, update आणि un-install करण्याबद्दल शिकलो.
05:36 आता assignment करू या.
05:39 Ubuntu सॉफ्टवेअरच्या मदतीने Thunderbird हे सॉफ्टवेअरDownload आणि install करू.
05:46 *प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
05:49 *ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
05:52 *जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
05:57 *स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
05:59 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
06:02 *परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06:06 *अधिक माहितीसाठी कृपया या संकेतस्थळाला जा./अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
06:12 *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
06:17 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
06:24 *यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
06:28 spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
06:35 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Nancyvarkey, PoojaMoolya, Pratik kamble, Pravin1389, Ranjana, Sneha