Linux/C2/Basic-Commands/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script:Basic commands
Author: Manali Ranade
Keywords: Linux
|
|
---|---|
0:00 | लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमवरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
0:05 | या ट्युटोरियलमध्ये प्राथमिक कमांडस् शिकू या. |
0:10 | यात Ubuntu 10.04 वापरू. |
0:12 | लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम कशी सुरू करायची हे तुम्ही जाणता असे आपण मानू या. |
0:17 | जर आपल्याला यासंबंधी माहिती हवी असेल तर http://Spoken-Tutorial.org येथील उपलब्ध ट्युटोरियलमध्ये पाहू शकता. |
0:26 | या ट्युटोरियलमध्ये आपण Command आणि Command Interpreter म्हणजे काय हे पाहणार आहोत. |
0:33 | नंतर आपण लिनक्समध्ये man या कमांडच्या सहाय्याने मदत कशी मिळवायची ते पाहू. |
0:39 | आता पहिला प्रश्न, Commands म्हणजे काय? |
0:43 | साध्या शब्दात सांगायचे तर लिनक्स कमांड म्हणजे असे शब्द की जे टाईप केल्यावर संगणक काही कार्य करतो. |
0:52 | लिनक्स कमांडस् चार किंवा कमी अक्षरांच्या असतात. जसे की, ls, who, ps. |
0:59 | कमांडस् Lowercase मधे दिल्या जातात व Case Sensetive असतात. |
1:05 | Application Menu मध्ये जा. |
1:08 | Accessories सिलेक्ट करा आणि त्यात उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी Terminal वर क्लिक करा. |
1:14 | किंवा Terminal Window उघडण्यासाठी कीबोर्डवरील CTRL, ALT आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा. |
1:20 | आता आपल्याला Prompt $ आणि त्याच्यापुढे लुकलुकणारा कर्सर दिसेल. इथेच आपल्याला कमांड टाईप करायच्या आहेत. |
1:29 | who असा शब्द टाईप करा आणि एंटर की दाबा. |
1:34 | आपण logged in असलेल्या उपयोगकर्त्यांची नावे बघू शकतो. आपण 'who' ही कमांड कार्यान्वित केल्यावर सिस्टीम वर कोण logged in आहे हे दिसते. |
1:47 | संगणकातील कोणत्या घटकामुळे काही अक्षरांनी बनलेली कमांड कार्यान्वित होते? |
1:54 | हे Command Interpreter चे काम आहे. त्याला Shell असे म्हणतात. |
1:59 | Shell हा एक प्रोग्रॅम असून तो आपल्याला आणि लिनक्स सिस्टीमला जोडण्याचे काम करतो. |
2:08 | तसेच Shell, ऑपरेटिंग सिस्टीमला कार्यरत करण्यासाठी कमांडस् स्वीकारतो. |
2:13 | लिनक्समध्ये एकापेक्षा जास्त Shell स्थापित केलेले असू शकतात. युजर त्याच्या आवडीप्रमाणे हवा तो Shell वापरू शकतो. |
2:22 | लिनक्सवर कायम स्वरूपी /bin/sh हे Standard Shell इन्स्टॉल केलेले असते. ज्याला bash म्हणजेच the GNU Bourne-Again SHell म्हणतात. जे GNU Suite of tool मधून घेतले आहे. |
2:35 | आपण या ट्युटोरियलमध्ये सर्वसामान्य कमांडस् ची माहिती घेणार आहोत. ज्या थोड्याशा फरकांनी बहुतांश सर्व लिनक्स Shells मध्ये वापरता येतात. |
2:44 | आपण या ट्युटोरियलमध्ये bash या Shell चा उपयोग करणार आहोत. |
2:51 | कारण bash हे सर्वात लोकप्रिय असलेले shell आहे. आणि जवळजवळ सर्वप्रकारच्या युनिक्सवर वापरता येते. |
2:58 | इतर वापरल्या जाणा-या shells पुढीलप्रमाणे. Bourne shell जे मुळात Unix shell आहे, C shell आणि Korn shell . |
3:08 | आपण कोणते Shellवापरत आहोत हे बघण्यासाठी |
3:11 | Terminal वर जा आणि echo space dollar in capital SHELL अशी कमांड टाईप करून एंटर दाबा. |
3:27 | साधारणपणे /bin/bash असा आऊटपुट मिळतो. याचा अर्थ आपण bash Shell मध्ये आहोत. |
3:34 | अनेक पध्दतींनी आपण वेगवेगळे Shells सक्रिय करू शकतो. ज्याबद्दल आपण ऍडव्हान्स ट्युटोरियलमध्ये जाणून घेऊ. |
3:42 | Commands या बहुदा C मध्ये लिहिलेल्या Program फाईल्स असतात. |
3:47 | या फाईल्स डिरेक्टरीमध्ये साठवलेल्या असतात. कमांडस् कुठे साठवलेल्या आहेत हे शोधण्यासाठी आपण type या कमांडचा उपयोग करू शकतो. |
3:55 | Command Prompt वर type space ps असे टाईप करून एंटर दाबा. |
4:03 | ps ही फाईल /bin या डिरेक्टरीमध्ये समाविष्ट केलेली आहे असे आपल्याला दिसते. |
4:09 | जेव्हा आपण Command Prompt वर Command देतो तेव्हा Shell, डिरेक्टरीतील फाईलच्या यादीमध्ये त्या कमांडच्या नावाची फाईल शोधतो. |
4:18 | ती फाईल सापडली तर त्या फाईलशी संबंधित प्रोग्रॅम कार्यान्वित करतो. नाहीतर Command not found ही error देतो. |
4:27 | आपण नंतर पाहूच की ज्या डिरेक्टरीजचा शोध घेतला जातो त्यांची यादी PATH या व्हेरिएबल मध्ये असते. |
4:34 | आता जर आपल्याला ती यादी बघायची असेल तर टाईप कराः echo space dollar कॅपिटल लेटरमध्ये PATH |
4:44 | आणि एंटर दाबा. |
4:52 | कमांडस् बद्दल जाणून घेताना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट माहित असणे आवश्यक आहे. |
4:57 | लिनक्स कमांडस् चे दोन प्रकार आहेत. External command आणि Internal command. |
5:02 | External commands च्या फाईल्स स्वतंत्रपणे अस्तित्वात असतात. |
5:07 | लिनक्स मध्ये बहुतांश कमांडस् अशाच प्रकारच्या आहेत. परंतु काही कमांडस् चे कार्य Shell मध्ये लिहिलेले असते. म्हणजेच त्याची स्वतंत्र रूपात फाईल उपलब्ध नसते. |
5:18 | त्यांना Internal commands म्हणतात. |
5:20 | echo कमांड ही वास्तवात एक Internal command आहे. त्याबद्दल आपण जाणून घेऊ. |
5:25 | Terminal वर जाऊन कमांड टाईप करा. |
5:33 | type space echoआणि एंटर दाबा. |
5:40 | echo is a shell built-in असे आऊटपुट दिसेल. |
5:43 | याचा अर्थ ही कमांड ही Shell मधूनच कार्यान्वित झाली आहे. म्हणून ही Internal command आहे आणि कमांडशी संबंधित फाईल नेम दिले गेलेले नाही. |
5:56 | दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कमांडस् ची रचना समजून घेणे गरजेचे आहे. |
6:01 | कमांड ही एक शब्दाची किंवा space वापरून वेगळे केलेल्या अनेक शब्दांनी बनलेली असू शकते. |
6:08 | दुस-या प्रकारात पहिला शब्द ही खरी कमांड असते तर त्यानंतरचे शब्द हे arguments असतात. |
6:16 | Arguments हे कमांडमधील पर्याय, expression किंवा filename असते. |
6:20 | आपण टाईप केलेल्या पर्यायानुसार एकच कमांड वेगवेगळे कार्य करू शकते. |
6:26 | साधारणपणे पर्यायाच्या आधी एक किंवा दोन वजाची चिन्हे असतात ज्याला क्रमशः short किंवा long पर्याय म्हणतात. |
6:35 | Terminal Window वर जाऊन कमांड टाईप करा आणि त्याचे आऊटपुट बघा. |
6:40 | Terminal Window रिकामी करण्यासाठी प्रथमclear असे टाईप करा. |
6:44 | नंतर ls असे टाईप करून एंटर दाबा. |
6:49 | पुन्हा clear असे टाईप करून एंटर दाबा. |
6:55 | ls space minus a असे टाईप करून एंटर दाबा. |
7:04 | Terminal Window रिकामी करण्यासाठी clear असे टाईप करा. |
7:11 | ls space minus minus all असे टाईप करून एंटर दाबा. |
7:19 | Terminal रिकामे करण्यासाठी clear असे टाईप करा. |
7:23 | ls space minus d असे टाईप करून एंटर दाबा. |
7:32 | आता पर्याय बदलल्यावर कमांडचे कार्य कसे बदलते हे समजण्यासाठी एवढे पुरेसे आहे. |
7:40 | लिनक्स मध्ये मोठ्या संख्येने कमांडस् आहेत. |
7:45 | प्रत्येकासाठी अनेक पर्याय आहेत. |
7:48 | कमांडस् संयुक्त रूपातदेखील वापरता येतात. ज्याबद्दल नंतर जाणून घेऊ. |
7:55 | कमांडची माहिती देण्यास लिनक्सवर 'online help' सुविधा उपलब्ध आहे. |
8:01 | man command आपल्याला सिस्टीमवर उपलब्ध असलेल्या प्रत्येक कमांडचे डॉक्युमेंटेशन प्रदान करते. |
8:08 | उदाहरणादाखल ls कमांडबद्दल जाणून घेण्यासाठी Terminal वर जाऊ. |
8:16 | आणि ls या argument सहित man ही कमांड टाईप करा. म्हणजेच man space ls असे टाईप करून एंटर दाबा. |
8:30 | त्यातून बाहेर पडण्यासाठी q दाबा. |
8:35 | man हे सिस्टीमचे manual page आहे. manबरोबर argument देता येते. |
8:43 | कमांड दिल्यानंतर या argumentशी संबंधित असलेले page दर्शवले जाते. |
8:49 | man command मध्ये सेक्शनचे नावही देता येते. त्यानुसार शोध घेतला जातो. |
8:55 | नाव दिलेले नसले तर, man command उपलब्ध असलेले सर्व section शोधते. व त्यातील फक्त पहिले पान स्क्रीनवर दाखवते. |
9:07 | man या कमांडबद्दल अजून अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही man याच कमांडचा उपयोग करू शकता. |
9:14 | Terminal वर जाऊन man space man असे टाईप करा. आणि एंटर दाबा. |
9:23 | त्यातून बाहेर पडण्यासाठी q दाबा. |
9:26 | man कमांडसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. |
9:30 | आपण जास्त वापरल्या जाणा-या कमांडस् बघू. काही वेळा आपल्याला योग्य कमांड माहित नसते. अशावेळी आपण काय करू शकतो? |
9:41 | man ही कमांडminus k हा पर्याय देते. ज्याद्वारे संबंधित कमांडस् ची यादी आणि त्यांचे कार्य संक्षिप्त रूपात दर्शवले जाते. |
9:50 | उदाहरणार्थ आपल्याला एक डिरेक्टरी बनवायची आहे. परंतु त्यासाठीची योग्य कमांड आपल्याला माहित नाही. |
9:56 | मग Command promptवर जा आणि man space minus k space directories असे टाईप करून एंटर दाबा. |
10:12 | दिलेल्या यादीतील प्रत्येक कमांडचा अभ्यास करून योग्य ती कमांड वापरता येते. |
10:17 | वरील सर्व गोष्टी आपण apropos या कमांडच्या सहाय्याने सुध्दा करू शकतो. |
10:21 | Command prompt वर apropos space directories असे टाईप करून एंटर दाबा. आणि येणारे आऊटपुट बघा. |
10:36 | काही वेळा आपल्याला अधिक माहितीची आवश्यकता नसते. केवळ एखादी कमांड काय करते हे जाणून घेणे पुरेसे असते. |
10:40 | त्यावेळी आपण whatis किंवा man minus f या कमांडचा उपयोग करू शकतो. |
10:52 | Terminal Window रिकामी करण्यासाठी clear असे टाईप करा. |
10:58 | आता whatis space ls असे टाईप करून एंटर दाबा. |
11:06 | काही Commandना अनेक पर्याय असतात. जर आपल्याला त्या Commandना असलेल्या विविध पर्यायांची यादी हवी असेल |
11:13 | तर आपण minus help या पर्यायाचा उपयोग करू. |
11:18 | Command prompt वर जा आणि ls space minus minus help असे टाईप करा. आणि एंटर दाबा. |
11:29 | आपण वरच्या दिशेला स्क्रॉल करू या. म्हणजे आपल्याला या manual page वरील सर्व पर्याय बघता येतील. |
11:45 | आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:56 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
12:00 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |